✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

[जोगवा] : एक वास्तवदर्शन

प
पारा यांनी
Wed, 12/08/2010 - 21:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3500 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

बघायचा आहे पण बघवेल का हा

रेवती
Wed, 12/08/2010 - 22:03 नवीन
बघायचा आहे पण बघवेल का हा चित्रपट असं वाटतं आहे म्हणून डोक्यातून तो काढून टाकलाय. आपण असल्या चालीरिती मानत नाही. जे मानतात त्यांना फारसा त्रास होत नाही. आपण मात्र अस्वस्थ होउन जातो म्हणून आजकाल अश्याप्रकारचे चित्रपट पाहणं टाळते. त्यातली गाणी मात्र आवडलीत. त्यातही उपेंद्र लिमयेच्या अभिनयाची चुणुक पहायला मिळते.
  • Log in or register to post comments

छान !!

सुहास..
Wed, 12/08/2010 - 23:21 नवीन
छान !! अवांतर : कधीतरी १९८५ च्या जुन्या " जोगवा " मुळे मागे राहिलेला, २००९ चा " एक कप चहा "पण प्या कधीतरी आमच्यासाठी !! पुणेकर आहे पण फु़कट पाजतो हवे तर !!
  • Log in or register to post comments

उपेंद्र

स्वाती दिनेश
Wed, 12/08/2010 - 23:24 नवीन
उपेंद्र लिमयेचे काम तर अफाटच झाले आहे, किशोर कदम, मुक्ता बर्वे सुध्दा लक्षणीयच! जोगवा पूर्ण सलग पाहू शकले नाही, पाहत असताना अनेकदा सुन्न झाले आणि पोझ मोडवर टाकून शांत झाल्यावर पुढे सिनेमा पाहिला. अवांतर- 'झुलवा'ने सुध्दा असच अस्वस्थ केले होते ,सयाजी शिंदे होता त्यात..
  • Log in or register to post comments

>>जोगवा पूर्ण सलग पाहू शकले

दिपाली पाटिल
गुरुवार, 12/09/2010 - 02:48 नवीन
>>जोगवा पूर्ण सलग पाहू शकले नाही, पाहत असताना अनेकदा सुन्न झाले आणि पोझ मोडवर टाकून शांत झाल्यावर पुढे सिनेमा पाहिला. असं केल्याशिवाय बघवतच नाही जोगवा...फार अस्वस्थ करतो हा चित्रपट, अस्संच "बयो" बघताना झालं होतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

+ १

मेघवेडा
गुरुवार, 12/09/2010 - 03:07 नवीन
जोगवा पाहिलेला नाही. पाहीन मिळेल तेव्हा. 'बयो' भारीच! मूळ कथानक ताकदीचं आहेच, आणि सर्वांनीच ताकदीचा अभिनय केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल

जोगवा उत्कृष्ठ आहे, विषयाशी

विंजिनेर
गुरुवार, 12/09/2010 - 06:09 नवीन
जोगवा उत्कृष्ठ आहे, विषयाशी सच्चा आहे. साधारण उपेक्षित वर्गाची गोष्ट सांगणारा चित्रपट असून सुद्धा कुठेही अंगावर येत नाही. प्रेक्षकाला खिळून ठेवतो. केवळ अतिप्रसिद्धीमुळे चाललेल्या नटरंगपेक्षा खूप उजवा आहे. महाराष्ट्रातल्या लोककलेचा समृद्ध वारसा इतक्या ताकदीने मांडणारा कुणी दिग्दर्शक आहे हे बघून मला अभिमान वाटला होता. गाण्यांबद्दल सुद्धा काय बोलावे महाराजा - मुक्ता बर्वे समर्थ अभिनेत्री आहेच पण "जीव दंगला" मधे ती फक्त हॉट दिसते :) पारंपारिक चालीत बांधलेला, उत्कृष्ठ छायाचित्रण, नृत्य असलेला जागर - "लल्लाटी भंडार" सुद्धा वेड लावतो.
  • Log in or register to post comments

नेत्राभिनय

बेसनलाडू
गुरुवार, 12/09/2010 - 06:15 नवीन
लल्लाटी भंडार मधील लिमयेंचा नेत्राभिनय केवळ उत्तम आहे. काही न बोलता डोळ्यांनीच सगळं आणि खूप काही सांगून जातात. इतर चित्रपटांमध्ये लिमयेंची काहीशी दादागिरी स्वरूपाची व्यक्तीरेखा, 'आगाऊ' छापाची संवादशैली असते. यांपेक्षा जोगवा मध्ये खूपच वेगळी प्रतिमा आहे. या व्यक्तिरेखेत सुरुवातीला बरीचशी अगतिकता दाखवली आहे आणि मग कुठेतरी एक-दोनदा त्या अगतिकतेतून बाहेत येण्यासाठीची फुटकळ बंडखोरी नि तिचे शेवटी पूर्ण बंडात झालेले पर्यवसान. लिमयेंच्या या आधीच्या भूमिकांच्या तुलनेत हे तसे आव्हानात्मकच होते. या भूमिकेतील बारकावे समजून घेण्यासाठी, जोगत्यांचे-जोगतिणींचे खरे आयुष्य अभ्यासण्यासाठी ते एका जोगत्याबरोबर काही दिवस राहत होते, असेही कळले. या भूमिकेसाठी त्यांनी केलेली तयारी आणि पडद्यावर दिसणारा त्याचा परिणाम दोन्ही स्तुत्य! थोड्या हळव्या, भावनाप्रधान भूमिकांसाठी त्यांना 'जोगवा'सारख्या एक-दोन आणखी संधी मिळणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास ते लवकरच अष्टपैलू अभिनेते होतील, यात शंका नाही. (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

चित्रपट वास्तवदर्शन

भानस
Fri, 12/10/2010 - 20:40 नवीन
करणारा व अतिशय नेमके व सच्चेपणाने उतरला आहे. कलाकारांची कामेही अप्रतिमच. उपेंद्रचे काम उत्कृष्टच. जरूर जरूर पाहावा असा चित्रपट.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा