प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल.
तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही
हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही
तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई
पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही
चाटून ही ताटाला - आले न पोटी काही
भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही
सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे
आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई
उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही
पाच भाकर्या अन - वडे पाच खाई
लाजून ही स्वतःला - उरले काहीच नाही
पोट मागते ते - चरण्या अजून काही
टाळून ही मला तू - मी टळलोच नाही
जरी जातो मी आता - पाहुणा उद्याचा ही
काव्यरस
वाचने
1932
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाळून ही मला तू - मी टळलोच
हात सुका मुसलमान
नगरी नगरी द्वारे द्वारेऽऽ
तोडून बंध कटीचा - केली जरी
=)) =))
सगळ्या कवितेला मस्त लय .वा
=))