मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पोट मागते ते - चरण्या अजून काही...)

नगरीनिरंजन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल. तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही चाटून ही ताटाला - आले न पोटी काही भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही पाच भाकर्‍या अन - वडे पाच खाई लाजून ही स्वतःला - उरले काहीच नाही पोट मागते ते - चरण्या अजून काही टाळून ही मला तू - मी टळलोच नाही जरी जातो मी आता - पाहुणा उद्याचा ही

वाचने 1930 वाचनखूण प्रतिक्रिया 7

डावखुरा 30/11/2010 - 17:16
हात सुका मुसलमान भुका...... म्हण ऐकली होती.. विडंबनात्मक रचना मस्तच...
तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही =) ) =) ) =) ) =) ) =) ) तुमच्या शब्दांना एक आगळीच धार आहे!