(पोट मागते ते - चरण्या अजून काही...)
काव्यरस
प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल.
तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही
हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही
तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई
पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही
चाटून ही ताटाला - आले न पोटी काही
भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही
सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे
आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई
उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही
पाच भाकर्या अन - वडे पाच खाई
लाजून ही स्वतःला - उरले काहीच नाही
पोट मागते ते - चरण्या अजून काही
टाळून ही मला तू - मी टळलोच नाही
जरी जातो मी आता - पाहुणा उद्याचा ही
वाचने
1930
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
टाळून ही मला तू - मी टळलोच नाही
जरी जातो मी आता - पाहुणा उद्याचा ही
हे आवडले जास्त
.... .
हात सुका मुसलमान भुका......
म्हण ऐकली होती..
विडंबनात्मक रचना मस्तच...
नगरी नगरी द्वारे द्वारेऽऽ
ढुंडु रे खावयाला !
तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही
हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही
=) ) =) ) =) ) =) ) =) )
तुमच्या शब्दांना एक आगळीच धार आहे!
=)) =))
सगळ्या कवितेला मस्त लय .वा ..वा !!
खूप छान .मस्त विडम्बन !!
=))
टाळून ही मला तू - मी टळलोच