अकल्पायुष व्हावे तयाकुळा ...आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाह्यलं.
माझीया सकळा हरीच्या दासा.आजीनी माझ्याकडे पाह्यल.
कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी......हे माझ्याकडे बघून मिस्किल हसले .ही संत मंडळी सुखी असो.
नामा म्हणे तया कुळा असावे कल्याण म्हणेपर्यंत मी ह्याच्याकडेच बघत राह्यले.
आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं.
दिवस संपूच नये असं वाटत होतं
छान... सुरेख ललीत लेख.... विषय पण छान मांडला आहे.
पुढ्च्या लेखासाठी शुभेच्छा....
विद्याधर
रामदास काका,
जबरी...मानलं बुवा तुम्हाला.
हे स्वगत खर्रोखर अप्रतिम लिहिलय तुम्ही. अथपासून इतिपर्यंत सगळे भाग पुन्हा सलग वाचले आणि झालो ते फक्त आवक् !
अहो, हे जर छापून एखाद्याला वाचायला दिलं आणि सांगितलं की हे एका पुरुषानं लिहिलंय...वेड्यात जमा करेल समोरचा...
स्त्रीयांची टिपीकल वागणूक, भावनांचे खेळ, हळवेपणा काय अचुक रेखाटलाय.
सर...हॅट्स ऑफ टू यू !!!
मागच्या भागातलं
ह्यांचा श्वास धीमा होत गेला.दोन मिनीटात घोरायला लागले.
माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना..... राम रक्षेतला राम मला यांच्यासारखा दिसायला लागला.... मुझे अपनी शरण् में ले लो राम.
हे खास आवडलं.
पती-पत्नीमध्ये चालणार्या काही चावट गोष्टींचाही उल्लेख अतिशय संयत पध्दतीनं केल्यामुळे कुठेही उथळपणा मुळीच जाणवत नाही..मग तो आय-पील चा उल्लेख असो, किंवा 'हल्ली जागरणं फारशी सोसवत नाहीत" असो.
आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं
मस्त....
आजी-आजोबा होऊ घातलेलं जोडपं असं परत तरुण झालेलं छान चित्र डोळ्यापुढं आलं
आजोबांच्या काळ्यापांढर्या मिशीतलं अस्फुट हसु, चष्म्याआडची मिस्किल नजर, आजीचं मनातल्या मनात मोहरुन जाणं, हळूच लाजणं, नव्या नवरीसारखं- कोणि पहात तर नाहीना असं वाटून कावरंबावरं होणं...
मजा आ गया.....
हा पॉल एर्डमन एकदम 'योगिनी जोगळेकर' पण होऊ शकतो?
कथानकाचा अनपेक्षित ट्विस्ट अस्वस्थता वाढवणारा. पण शेवट गोऽऽड आणि सर्वकाही गोड.
अभिनंदन.
तरी पण एक नाही कळले..
....मी गेलो होतो सुजाथाची चौकशी करायला...
सुजाथाला दिवस गेलेत.
तिची भावंडं थॅलसिमीक आहेत...म्हणून मी साठ्यांना भेटायला गेलो हो भेटायला
ही सुजाथा कोण? तिला दिवस गेले आहेत म्हणून 'हे' डॉ. साठ्यांना भेटायला का गेले?
दादा.....पूर्ण बेड रेस्ट. रिस्क घेउ नका...तीन महीने आराम...कधीही काहीही होउ शकतं बरं....
शरु आहे ना अमेरीकेत....हवं तर सगळ्या टेस्ट तिकडेच करा.....माझ्या डोळ्यावर अंधेरी यायला लागली.
जर सुजाथाला दिवस गेले आहेत तर डॉ. साठ्यांनी दादांना सगळ्या टेस्ट करून घ्यायला, तेही अमेरिकेत जाऊन, कशाकरीता सांगितले?
प्रतिक्रिया
अकल्पायुष
हेच,
छान !!!
सुंदर!
झक्कास
आईशप्पथ!
हा पॉल
ट्वीस्ट..
मामींनी केला गोंधळ
मामींनी केला गोंधळ
सुंदर
छान!!! अगदी
छान जमलय