Skip to main content

"डान्राव" व काही "मुक्ताफळे"........

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 13/10/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी. - डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले. - एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना. - तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो. - तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो. - फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं. - डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते. - डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात. - पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत. - पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती. - तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात. - डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात. - रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23756
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

१. डान्राव चेल्सीला पाठिंबा देत नाहीत. खुद्द रोमन अब्रामोविच आणि चेल्सी डान्रावांना सपोर्ट करतात. २. डान्रावांमुळेच कानडीत 'विविक्षित' आणि 'गल्लत' ह्या दोन शब्दांची भर पडली आहे. ३. गिरीश कुबेर आणि शिरीष कणेकर ह्या दोन लेखकांची कारकीर्द डान्रावांमुळे घडली आहे.

३. डान्राव आपल्या एका प्रतिसादाचे दोन तुकडे करून दोन घाग्यांवर मारतात ते पाहूनच रजनीकांत बंदुकीच्या गोळीचे दोन तुकडे करुन मारायला शिकला.

खास इथे भरभरुन लिहणार्‍या आमच्या काही मित्रांसाठी आमचेही २ कोट्स : १. लोकांना भले मोठ्ठे प्रतिसाद लिहण्यासाठी काही मिनिटे लागत असतील तर तेच प्रतिसाद उडवायला डॉन्रावांना काही सेकंद पुरतात. २. मिपावरचे सदस्यत्व मंजुर होण्यासाठी कदाचित काही आठवडे लागत असतील पण डॉन्राव तेच अ‍ॅक्टिव्ह सभासद काही क्षणातच ब्लॉक करु शकतात. बाकी चालु द्यात ;) - छोटा डॉन

आयला काय खत्तरनाक धागा आहे. डॉनयज्ञात आमच्याही समिधा: १. दोन नवी पुस्तके येत आहेत: "हा (केसांच्या) तेलाचा इतिहास आहे" आणि "एका केसियाने" २. दोन नव्या कविता येत आहेतः "न्हालेल्या ह्या डॉनरावसम..." आणि "ह्या केसांच्या रंगकोशी.." ३. दोन नवे चित्रपट येत आहेतः "केस बाय केस" आणि "पुणे-बंगळूर-पुणे एक लांबलचक प्रवास" ४. मंगळागौरीच्या गाण्यांवरही डॉनचा प्रभावः "केस बाई केस, डॉन्याचे केस, लांबसडक केस, तोंडास फेस...आणून सोड बाई आणून सोड"

डॉन राव जिथे बॉल फेकतात तिथे त्रिफळा आपोआप जातो, डॉन राव एकदा रेल्वे रुळाच्या मध्य भागी उभे राहिले, आगगाडी डॉन रावांना भेदत पुढे गेली, आणि तिचे दोन तुकडे झाले, एक तुकडे उजवीकडे, एक डावीकडे. डॉन राव ज्या विमानात बसतात, त्याला इंधनाची गरजच भासत नाही, डॉन राव विमानाच्या इंजिनात बसून फक्त फुंकर मारत राहतात. डॉन रावांना एकाला मारायचे असले तर ते त्याचे सगळे अणु रेणू, प्रोटोन, nutron वेगळे करतात. डॉन राव पाण्यात श्वास घेत नाहीत, H2O घेतात, आणि H2 सोडून देऊन फक्त O ठेवतात.

डॉनराव काय हो हे... पार आठवडी बाजार पण उठाव्लाय तुमचा...!! बाकी लई मज्जा येतेय वाचायला... तसा धागा अखंडच राहील...!!! अर्थात तुमच्या कृपेने...

डॉन रावांचा जन्म होन्याअगोदर इथे एक ब्लॅक होल होते. डॉन राव आल्या नंतर त्यांनी ते ब्लॅक होल दुर फेकुन दिले

डान्राव सॅटेलायीट हाताने अवकाशात फेकुन देतात, आणि ते सुद्धा इतके अचुक फेकतात कि ते बरोबर योग्य जागी जाउन स्थिर होते. escape velocity ची गणित मनातल्या मनात करतात.

In reply to by गांधीवादी

डान्राव असले तरीही सॅटेलाईटला escape velocity दिली तर तो निसटून जाईल, पृथ्वीभोवती फिरणार नाही हो!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>डान्राव असले तरीही सॅटेलाईटला escape velocity दिली तर तो निसटून जाईल, पृथ्वीभोवती फिरणार नाही हो! तेवढे चालुन जाते हो "गांधीवादा"त, तुम्ही नका टेन्शन घेऊ राको.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो ताई, ते मनातल्या मनात पक्कि गणिते करुनच फेकतात असे मला बापड्याला सांगायचे व्हते. (नक्कि कुठलि गणिते करतात ते माहित नाहि, मनात करतात ना) आणि हो, त्या सॅटेलाईटच्या तुकड्याला कोणत्याहि वेगाने फेका हो, त्याची काय बिशाद आहे पृथ्वी सोडुन जान्याची. डान्रावांना तुम्हि काय नासा समजले काय ? अपमान घोर अपमान. कुठे डान्राव आनि कुठे ते फडतुस नासा शास्त्रज्ञ.

In reply to by गांधीवादी

डान्राव शिंकले की कतरिना (कैफ नव्हे) वादळे येतात. हा हा हा या वरून मिपाच्या एका सदस्याने केलेली " वारा ( णे ) आणि हिमवादळे अशी एक गल्लीच्छा कॉमेन्ट आठवली

In reply to by अब् क

डान्राव इतके तेजस्वी आहेत की त्यांचे सगळे फोटो पांढरेफटक येतात.

प्रस्तुत ठिकाणी डॉन्रावांबरोबर आमची देखील समाधी बांधावी. आम्ही या पुरात वाहून गेलेलो आहोत.

In reply to by मुक्तसुनीत

आपण डान्रावांएवढेच प्रसिद्ध आणि कर्तबगार आहोत हे दाखवण्याचा एक क्षीण, ही&ही प्रयत्न!

डॉनराव आणि सचिन तेंडुलकर यांच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने चढताच आहे हे दिसून येते आणि दोघेही या क्षणी बंगलोरमध्येच आहेत हाही एक विलक्षण योगायोगच !! (इथेही साम्य दर्शविताना सचिनच्या अगोदर डॉन यांचे नाव आपसुकच टंकले गेले आहे....) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मला चिमटा काढा रे.. इंद्राने फक्क्क्त्त्त ३ ओळीचा प्रतिसाद दिला... हे कस शक्य आहे? (अचंबीत)केशवसुमार चोता दोन ह्याना समर्पीत धागा आहे आणि फक्क्क्क्क्त्त्त्त ३ ओळी.. इंद्रा हा चोता दोन ह्यांचा अपमान आहे.. चोता दोन तुझ्या कडे बघून घेतील.. (ते नुसत्या बघण्याने महाभारतातले अनेक चमत्कार करू शकतात हे.वे.सा.न.ला.)

In reply to by केशवसुमार

इन्द्राच्या प्रतिसादात माहितीतही चूक आहे. तेंडल्या बंगळुरूत असला तरीही डान्राव पुण्यात आहेत (अशी आतल्या गोटातली खबर आहे.) इन्द्राचा आयडी हॅक होण्यात पराचा हात आहे असं डान्राव मला कालच सांगत होते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीतै.. काय हे तुम्हाला इतक कस कळत नाही.. चोता दोन जिथे असतात ते बेंग्लोर अस इंद्राला सुचवायचे आहे..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"....इन्द्राच्या प्रतिसादात माहितीतही चूक आहे...." ~~ हे कसं शक्य आहे, मी स्वतः तेंडल्या मॅन ऑफ दि सीरिजची ट्रॉफी उंचावून डॉन्रावांना दाखवित होता ते आम्ही इथे कोल्हापुरात बसून पाहिलं ना.... आणि गॅलरीतील लांब केसाची ती व्यक्ती 'जया प्रदा' नक्कीच नव्हती.....आता तर्कशास्त्रानुसार जर 'ती दाट केशसंभारवाली व्यक्ती तिथे गॅलरीत उभे राहून सचिनला हातवारे करीत होती, अन् जर ती जयाप्रदा नसेल तर ती मग नक्कीच डॉन्रावच असणार यात संदेह नाही...मग जर ते डॉन्राव असतील तर मग पुण्यात आलेली व्यक्ती कोण? हे पाहणे अदितीचे काम ! इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मग जर ते डॉन्राव असतील तर मग पुण्यात आलेली व्यक्ती कोण?
तो डान्रावांनी बनवलेला रोबो असु शकतो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निषेध !!!! डान्राव एकाच वेळी बेंगालूरु आणि पुणे या दोन्ही (किंवा अधिक) ठिकाणी असू शकत नाहीत असे म्हणणे हा डान्रावाचा अपमान आहे.

In reply to by केशवसुमार

यालाच डॉन्रावांची किमया म्हणतात. त्यांच्या केवळ नावानेच इंद्रा तीन ओळींचा प्रतिसाद देतो. ऐकारे, पुढल्यावेळेस इंद्रराजकडून थोडक्यात उत्तर हवे असेल तर डॉन्रावांचे नाव तुमच्या प्रतिसादात किंवा प्रश्नात टाका.

In reply to by प्रियाली

नाही ओ, प्रियालीताई....तसं काही मी करणार नाही. माझे प्रतिसाद हे नेहमीच्याच धाटणीचे राहतील. तुम्ही "थोडक्यात पाहिजे असेल तर...." असे म्हणता, पण हत्ती कितीही रोडावला तर गाढव कधीच होणार नाही. त्याच न्यायाने अन्य धाग्यावर माझे प्रतिसाद राहतील. आता डॉन-चालिसामध्ये माझ्याकडून आणखी किती भर घालायची ! मुळात गंगा दुथडी भरून वाहत चालली आहे हे तुम्ही पाहाताच. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

माझ्या प्रतिसादात डॉन्रावांचे नाव होते. इंद्राचा वरचा प्रतिसादही फक्त ३ ओळींचा. ;)

In reply to by केशवसुमार

अहो केशवराव....प्रतिसाद प्रदीर्घ झाला असता, पण या अगोदरचे "डॉन-महात्म्य" वाचून मी त्या प्रवाहात पुरता वाहून गेलो, गुदमरलो म्हणा ना....अशाने की एखाद्या सदस्याचा (जरी संपादक मंडळातील असला तरी...) टीआरपी इतक्या हाय लेव्हलचा असू शकतो, ही बुचकाळ्यात टा़कणारी सिच्युएशन होऊ शकते, नेमक्या त्याचवेळी तिकडे बेंगलोरात सचिनच्या नावाचा उदोउदो चालल्याचे नीओवर पाहातच होतो आणि दोन्हीतील प्रसिद्धीचे साम्य पाहून अंमळ चकितच झालो होतो. सबब तो योगायोग नोंद करण्याच्या दृष्टीनेच या अगोदरचा प्रतिसाद होता. खुद्द डॉन्राव स्वतः हा कोणत्याही प्रकारचा अपमान समजत नसतील अशी आशा आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता तसा महाभारतसदृश्य चमत्कार, निदान माझ्याबाबतीत तरी ते करण्याचा विचार करणार नाहीत. इन्द्रा

डान्राव इतके मुलखाचे वायदेआजम आहेत की नावातल्या 'मे' आणि 'कॅन' या शब्दांनी हुरळून जाऊनच त्यांनी 'मेकॅनिकल' ला अॅडमिशन घेतली. ते इंजिनिअरींग आहे हे त्यांच्या नंतर लक्षात आलं.

एका शेतकर्‍यावर देव प्रसन्न झाला, म्हणाला ३ वर माग. शेतकरी म्हणाला मला लाख एकर जमीन दे , लाख गाई गुरं दे आणि त्यांची देख्भाल करण्यास आवश्यक नोकरबळ दे. देव म्हणाला तथास्तु. झालं शेतकरी श्रीमंत झाला. पण त्याला एकच राक्षस नोकर म्हणून मिळाला. त्या राक्षसाची ही खूबी होती की तो कामाशिवाय बसू शकत नसे. शेतकरी म्हणाला ही लाख एकर जमीन नांगर आणि क्षणात त्या राक्षसाने ती नांगरली. राक्षस म्हणाला "मला काम दे नाहीतर मी तुला खाणार" अशा रीतीने कोणतच काम त्या राक्षसाला पुरं पडेना. मग शेतकरी गेला डान्रवांकडे. डान्राव म्हणाले "चिंता करू नकोस" त्यांनी केसाची बट दिली. राक्षसाला तिची लांबी मोजायला सांगीतली. तो राक्षस कवाचा लांबी मोजतूया मोजतूया..........पन बट काही केल्या संपतच नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

=)) =)) पर्‍या म्हणजे ना :-) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ तरी कर्कु तोचि अक्षु। आय्डीभेदु बदलु। मिपांतु तो मनोगतु।मोडकु मिरवे॥

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपांतु तो मनोगतु।मोडकु मिरवे॥
इथे 'शिष्य मोडकु' असा बदल सुचवतो. हा खास शब्द का सुचवला आहे ते मोडक सांगतीलच ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्‍या म्हणजे ना
अगं खरंच..! मी नाही ओळखत कुणा डान्रावाल! कोण हा??? परात्या.

डान्राव संगनकातिल तबकडि स्वतः हाताने फिरवीतात. खुप जोरात फिरवितात त्यामुळे डाटा खुप पटापटा वाचला जातो.

न्युटनचा तिसरा नियम त्यांना लागु होत नाहि. त्यांनी कितिहि जोरात गुद्दा दिला तरी समोरच्याकडुन कधिच काहिहि प्रतिक्रिया येत नाहि.

डान्रावांच्या गाडिचे टायर्स कधिच पंचर होत नाहित, कारण ते कधी गाडि वापरतच नाहित, ते सगळि कामे बसल्याबसल्याच करतात.

डान्राव इकडे तिकडे हालचाल करतात त्यामुळे समुद्राला भरति आणि ओहोटी येते. (प्रतिसाद क्र. ९९)

डान्राव हे छोटे का आहेत महित आहे का ? जर का मोठे झाले तर ह्या विश्वात त्यांना जागा पुरनार नाहि. (हा १०० वा. प्रतिसाद. डान्राव राग मानुन घेउ नये, हि विनंती)

In reply to by गांधीवादी

परा-नाना प्रोत्साहन मंडळाच्या नव्या पॅकेजमध्ये गांधीवादींचाही समावेश करावा अशी मी शिफारस करतो.

In reply to by आदिजोशी

आधी स्वतः होलसेलमधे त्याचा बाजार उठवल्यावर मग हे पुन्हा .... अल्लाऽऽऽ जीव गेला.

In reply to by गांधीवादी

डान्रावांबरोबर आपलं नाव छापून आलं की आपली प्रसिद्धी होते. (डान्रावांची राको)

डान्रावांनां बुद्धिबळात कोनिहि हरवु शकत नाहि. कारण, त्यांच्या प्रत्येक सोंगटि मध्ये वजिरा इतकिच पॉवर असते.

सॉरी मि. शिवाजीराव ऑफ कोल्हापुर (व्हाया बेंगरुलु टु चेन्नाई) तुम्ही दुसर्‍या नंबरवर आहात. एक नंबर अर्थातच छोटा डान पण कुणीतरी त्यांचा फोटु टाका राव.

In reply to by आप्पा

चेष्टा , मज्जा, थट्टा, विरंगुळा, टाईइमपास आदी शब्दांचा अर्थ मला उत्तम समजतो. अर्थात काही लिमिट्समध्ये माझी त्याला ना नाही. पण "फोटो" वगैरे गोष्टी अती होतात. हे माझ्या वैयक्तिक आवडीच्या व प्रायव्हसीच्या विरोधात आहे, अशा बाबी मला अजिबात आवडणार नाहीत हे निक्षुन सांगतो. सदर धाग्यात कुणीही कसलेही फोटो टाकण्याचा प्रयत्न करु नये ही नम्र विनंती. मस्करीची कुस्करी होऊ नये हीच सदिच्छा !!! धन्यवाद ! - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

हे पहा आमचे डान्राव: अरे येऊन येऊन येणार कोण, डान्राव, डान्राव!! गुगलबाबाला "chhota don" विचारलं असता हे दिसलं: आणि "छोटा डॉन" विचारलं तेव्हा हे दिसलं: अर्थातच डान्राव सर्वज्ञानी, सर्वव्यापी (स्वारी प्राजु) आणि सर्वसर्चेबल असल्यामुळे हे तिन्ही फोटो डान्रावांचेच आहेत यात मला अजिबात सौंशय नाही. अवांतरः 'चोता दोन' अशी चौकशी केल्यावर (मीच केलेल्या) पोळ्यांचा (मीच काढलेला) फोटो दिसला.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एक पोळी केली की .. दुसरी साठी तुमच्याकडे तवा पण बदलतात का ?

In reply to by गणेशा

त्या दोन्ही चित्रांमधे एकच पोळी आहे. फक्त डावीकडे ती पोळपाटावर आहे आणि उजवीकडे तव्यावर! :-)

In reply to by गणेशा

एक पोळी केली की .. दुसरी साठी तुमच्याकडे तवा पण बदलतात का ?
आमच्याकडे एक पोळी झाली की खाणार तोंडच बदलतात. :(

In reply to by Nile

आमच्याकडे एक पोळी झाली की खाणार तोंडच बदलतात.
धडावरचं की पाट/डायनिंग खुर्चीवरचं (म्हणजे जेवायला बसलेलं)?

In reply to by प्रियाली

खुर्चीवरचं हो. ते दहा तोंडे असलेले मानव की दानव फक्त तुमच्या रामायणात. ;-)