Skip to main content

"डान्राव" व काही "मुक्ताफळे"........

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी. - डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले. - एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना. - तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो. - तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो. - फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं. - डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते. - डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात. - पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत. - पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती. - तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात. - डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात. - रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23671
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

२ प्रश्न आहेत. १. मिपावर स्वतःचा आयडी रद्द करुन घेण्याची प्रोसिजर काय आहे ? २. मिपावर दुसर्‍याचा आयडी रद्द करण्याची मागणी करण्याची प्रोसिजर काय आहे ? तज्ज्ञांनी योग्य तो प्रकाश टाकावा. धन्यवाद - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉन्राव, तुमच्या नावावर धागा काढून लोकांनी तुमचा महत्वच सिद्ध केल आहे. " they might not love you or hate you. But they can't ingore you for sure!" प्रसिद्धी झोताचा आनंद लुटा. टीका व्हायला ही काही तरी लायकी लागते. माप निघायला आधी काही तरी असावा लागता. मी मिपा वर नवीन असल्यामुळे आपणाबद्दल जास्ती माहीती नव्हती. पण आता उत्सुकता लागून राहिली आहे जाणून घ्यायची. आहे की नाहे फायदा? कवी साहेब धागा काढल्याबद्दल धन्यवाद ;)

In reply to by रन्गराव

डान्राव, द छोटा संपादक यांच्याबद्दलच्या धाग्यात तुम्ही दोघांनी आमचे पूज्य गुर्जी श्री.श्री. पूजावाले घासकडवी यांच्याबद्दल लिहून अवांतर करू नये अशी विनंती. (डान्रावांची राको आणि गुर्जींची लेको)

डान्रावांच्या केसाला झिरो मशीन लावले की ते मशीन फेकुन द्यावे लागते कारण त्याची धारच जाते. डान्रावांच्या किबोर्डावर प्रत्येक बटन ५ वेळा आहे, कारण त्यांच्या टंकायच्या वेगासाठी एक बटन वापरुच शकत नाही.

In reply to by Nile

डानरावांचे बिग बॉसच्या घरात आगमन होते........ . . . . . . . . . . . . . पुढच्या दिवशी सकाळी स्पीकरवरुन घोषणा होते........... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . डानराव चाहते है की बिग बॉस कन्फेशन रुम मे आ जायें!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

=)) =)) =))

डान्रावांसाठी कुठलाच स्पेलचेकर काम करत नाही, कारण एक शब्दातील चुक शोधेपर्यंत मेगाबाईटी प्रतिसाद टंकुन झालेला असतो. डान्रावांचा एक केस एका वादळात तुटुन उडाला तर तीन दिवस बंगळुरात अंधार होता.

लेख आहे.. अजून पंच यायला हवे होते..चोता दोन यांच्या कर्तुत्वाच्यामानाने पंच कमी वाटले.. -तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो. - तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो. ही दोन्ही वाक्यापैकी एकच शक्य आहे असे वाटले.. रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत... हे हुच्च आहे.. बाकी चालू दे..

एकदा चुकुन डान्रावांच्या केसाने शॉर्टसर्कीट झाले तर भारतातील एक आख्खी ग्रीड कोसळली. तुम्ही डान्रावांबद्दल ही एक ओळ वाचेपर्यंत डान्रावांनी एक आख्खे संपादकीय (ते ही कानडीत) टंकुन झालेले असेल.

दोन वर्षांपुर्वी गुगलने डान्रावांच्या केसांत लपवलेला फुटबॉल शोधायची मोहिम हाती घेतली, शोध अजुन सुरुच आहे.

डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात. - पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. डान्रावांचा एक केस एका वादळात तुटुन उडाला तर तीन दिवस बंगळुरात अंधार होता.
गल्लत होते आहे.. डॉनरावांच्या केसांत मुंबईचे एका दिवसाचे वडे तळून होतील इतके तेल असते!!!

दुसर्‍या महायुद्धात जपान-जर्मनी हरले कारण त्यांनी अ‍ॅटम बाँब चुकुन डान्रावांच्या केसात फोडला.

पुर्वी निबंध स्पर्धेत किती ओळी/पानं/शब्दं असावेत असा नियमच नव्हता, पण एक दिवस डान्रावांनी स्पर्धेत भाग घेतला.

-- प्रकाशाचा वेग कोणीही पार करू शकत नाही, पण डान्राव बोलायला आणि/किंवा टंकायला लागले आणि जनरल रिलेटीव्हीटी खोटी ठरली.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक कणाच्या, अवकाशाच्या, काळाच्या लघुत्तम पातळीला गेलं की विश्व धाग्यांनी बनलेलं आहे असं स्ट्रिंग थिअरी सांगते - ते धागे दुसरं तिसरं काही नसून डान्रावांचे केस आहेत. ते २७ डायमेन्शन्समध्ये कर्ल झालेले आहेत. जनरल रिलेटिव्हिटीचं काय घेऊन बसली आहेस?

डोनराव एकदा भराभरा बोलू लागले तर नासावाल्यांनी त्या दिवशी आवाजाचा वेग प्रकाशापेक्षा जास्त मोजला! मग डोन्राव दात घासुन हसले प्रकाशाचा वेग पूर्ववत झाला. डोन्रावांनी एकदा केस कापले ते तिरुपतीच्या एक आठवड्याच्या कलेक्शनपेक्षा जास्त भरले.

आमचे परममित्र डान्राव यांचा बाजार उठलेला पाहुन डोळे पाणावले. असो. आमची भर - कॅम्लिन कंपनी काळी शाई करतांना डान्रावाच्या रंगाशी तुलना करुन काळा रंग जमला की नाही ठरवते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>डानराव तोंडाने टंकतात टंकतात ऐवजी, थुंकतात असे वाचले... =)) मला वाटलं, असेल ब्वॉ, थुंकुन पण एखादा मेगाबायटी प्रतिसाद तयार होत असेल..

प्रत्येकाची नाडीपट्टी कशी अस्तित्वात असू शकेल? हा प्रश्न त्या डॉनरावांनी टंकल्या आहेत हे कळल्यावर निकाली निघाला.

जगातील सर्वात बेस्ट फिशिंग नेट्स डान्रावांच्या केसांपासुन बनतात. त्या नेट्स बनवणारी कंपनी बंदच पडली, कारण एकदा नेट घेतलेल्या गिर्‍हाईका पुन्हा नेट विकत घेण्याची वेळच आली नाही.

In reply to by Nile

दॉन्याची पॉलीईथिलिन न पॉलीप्रोपिलिन बनवण्याची फॅक्टरी आहे. दॉन्याचे गळणारे केस हे प्रोसेस करुन केसातुन पॉलीईथिलिन न पॉलीप्रोपिलिन मिळते व ते नेट बनवणार्याना रॉ मटेरिअल म्हणुन विकले जाते.

ठ्ठो!!! गुर्जी, ह. ह. ह. पु. वा. =)) =)) मला वाटलं होतं की बिग बेसिनमधली झाडे मोठी आणि लांबलचक आहेत, डॉनरावांचे प्रतिसाद त्याहुन मोठे आणि लांबलचक असतात हे विसरलो होतो. ;) तिथल्याप्रमाणेच फादर ऑफ द प्रतिसाद्स असा मान सर्वात मोठ्या प्रतिसादाला मिळायला हवा.. =)) =))

एकाच म्यानात दोन तलवारी (डॉन तलवारी असे वाचावे) राहु शकणार नाहीत असे डानरावांनी रजनीकांतला बजावले.रजनीकांत गपगुमान आपले चंबुगबाळे आवरुन तामिळनाडुत गेला.

१. डान्रावांना दारू चढत नाही, डान्राव दारूवर चढतात. २. डान्राव सिगारेट ओढत नाहीत. सिगारेट स्वतः डान्रावांच्या ओठात येते. ३. डान्राव गजर वाजल्याने उठत नाहीत. डान्राव उठल्याचे पाहून गजर वाजतो. (दुपारी २-३ वाजता वगैरे) ४. डान्राव कपडे घालत नाहीत. त्यांच्या बॉडीला घाबरून लोकंच त्यांच्यावर कपडे चढवतात. ५. डान्राव अंघोळ करत नाहीत. पाणीच त्यांच्यावरून घसरून स्वत:ला स्वच्छ करून घेतं. ६. डान्रावांनी कुणाला पटवलं नाही. कारण डान्रावांचं पटेल असं जगात कुणीच नाही. ७. डान्रावांनी उपास केल्यास जगभरातल्या गरीबांना पुरेल इतकं अन्न उरतं. आणि कमी दारू पहिल्यास कंपन्यांचा शेअर्सचा भाव पडतो. ८. डान्राव नोकरी करत नाहीत. कंपनीला डान्रावांनी नोकरी दिली आहे. ९. डान्राव भांग पाडत नाहीत. कारण त्यांचे केस सरळ करेल इतका मजबूत कंगवाच नाही. १०. डान्राव लवकरच लग्न करणार आहेत. अनेक मुलींचे पालक निश्वास सोडणार आहेत. . डान्राव हमारा नेता है, सबका..................................

In reply to by आदिजोशी

अ‍ॅड्या, लै भारी रे!!
डान्राव कपडे घालत नाहीत. त्यांच्या बॉडीला घाबरून लोकंच त्यांच्यावर कपडे चढवतात. डान्राव अंघोळ करत नाहीत. पाणीच त्यांच्यावरून घसरून स्वत:ला स्वच्छ करून घेतं.
कहर आहे हा!

In reply to by Nile

पतंग काटाकाटी चँपीयनशीप मधे विजेत्या स्पर्धकाचे रहस्य - मांजा म्हणुन डोन्रावांचे गळलेले केस वापरले होते! नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, क्रिकेटमधे बॉल टँपरिंग टाळण्याकरता, चेंडूची शिवण आता डॉनरावांच्या केसाने शिवली जाणार आहे.

सर्वात जास्त वेगाने प्रतिक्रिया आलेला धागा. डॉन राव जितक्या वेगाने प्रतिक्रिया लिहितात, त्याच्या पेक्षा जास्त वेगाने त्यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया येतात.

जपान ते इंग्लड अशी समुद्राखालुन ऑप्टीक फायबर जेव्हा घालायची होती तेव्हा मोजणी साठी डान्रावांचा एक केस वापरण्यात आला. पण ऑप्टीकफायबरची लांबी फक्त २८ हजार किमी असल्याने त्यांना शेवटी डान्रावांच्या केसाचे अनेक तुकडे करुन लहानसा तुकडाच पुरला.

चालु द्यात तुमच्या गमजा ... पाहिन पाहिन आणि एक दिवस ... ( बाकी तुम्हाला आमच्या पावर माहित आहेतच ) ;) असो, हुच्च धागा आहे ! ह्यातल्या प्रत्येक प्रतिसादाची मी ( डॉन, डॉन्राव आदी शब्द वगळुन ) मज्जा घेतली आहे. - छोटा डॉन

डॉनराव तुम्ही तुमच्या आयाळ / केसांसाठी कुठ्ला तेल , शैम्पू वापरता ?? केसगळती वर काही घरगुती उपाय सांगणार का ??? ;-) त्यावर एखादा धागा टाका ना प्लीज

डानरावांचे केस इतके लांब आहेत की नुकतेच त्यांना तेल लावता लावता डानराव बंगळुरातुन पुण्यात येऊन पोहोचले आणि इथलेच झाले :)

(तिच्यायला ही क्रमशःची सवय लई बेकार बघा. असो.) . ११. डान्राव बंगळूरात राहत नाहीत. डान्राव राहतील त्या शहराचं बंगळूर होतं. १२. डान्राव बार मधे जात नाहीत. डान्राव जातील त्या जागेचा बार होतो. १३. डान्राव डेटींग करत नाहीत. कारण डान्रावांना तोडीस तोड एकच व्यक्ती जगात आहे - खुद डान्राव. १४. डान्राव कात्रीने केस कापत नाहीत. डान्राव केसाने कात्री कापतात. १५. डान्रावांच्या केसात उवा नाहीत. उवांच्या केसांत डान्राव आहेत. १६. डान्राव साबण वापरत नाहीत. कारण डान्रावांच नुस्तं नाव ऐकून पाण्यालाच आपोआप फेस येतो. १७. डान्रावांना स्वप्न पडत नाहीत. स्वप्नांना डान्राव पडतात. १८. डान्राव कधीच ओरडत नाहीत. कारण डान्राव कधीच "रडत" नाहीत. १९. डान्राव रात्री झोपत नाहीत. डान्राव झोपले की रात्र होते. २०. डान्राव ह्यांव डान्राव त्यांव डान्राव म्हणजे ट्यांव ट्यांव . डान्राव हमारा नेता है, सबका..................................

माझीही उगीचच काही भर... १. डान्रावांच्या एका प्रतिसादातल्या अक्षरांची पुनर्रचना केली तर त्यातून चारी वेद आणि महाभारत, रामायण वगैरे काव्य लिहून काही अक्षरं उरतात. २. डान्राव लेखन करणार असतील त्यादिवशी इतर लोकांसाठी लोडशेडींग असते.

  • डॉनराव घसरगुंडीवरून घसरत नाहीत.. डॉनराव जिथे घसरतात त्याला घसरगुंडी म्हणतात..
  • डॉनरावांच्या गावाला वडाच्या परंब्यांना मुले लोंबकळुन खेळत नाहीत.. ते डॉनरावांच्या केसाला लोंबकाळतात
  • डॉनराव पँन्टीला (तुमानीला) सस्पेंडर लावत नाहीत ते त्याच्या एवजी स्वतःच्या बटाच वापरतात

In reply to by केशवसुमार

>>डॉनराव पँन्टीला सस्पेंडर लावत नाहीत ते त्याच्या एवजी स्वतःच्या बटाच वापरतात डानराव पँटी घालतात?

In reply to by ब्रिटिश टिंग्या

त्यांच्या मजबूत बटांमुळे त्यांच्या पॅंटी जागेवर घट्ट राहातात...

In reply to by राजेश घासकडवी

त्यांच्या मजबूत बटांमुळे त्यांच्या पॅंटी जागेवर घट्ट राहातात >>> चुकुन बटांमुळे एवजी 'बटाट्यांमुळे' वाचल ना गुर्जी ..ठ्या करुन फुटलो

In reply to by ब्रिटिश टिंग्या

डानराव पँटी घालतात? टिंग्या तू बर्रोब्बर ओळखलस रे .... डान्राव प्यान्ट घालतात अर्थात ते जे कपडा घालतात त्याला प्यान्ट म्हणतात

१. डान्राव चेल्सीला पाठिंबा देत नाहीत. खुद्द रोमन अब्रामोविच आणि चेल्सी डान्रावांना सपोर्ट करतात. २. डान्रावांमुळेच कानडीत 'विविक्षित' आणि 'गल्लत' ह्या दोन शब्दांची भर पडली आहे. ३. गिरीश कुबेर आणि शिरीष कणेकर ह्या दोन लेखकांची कारकीर्द डान्रावांमुळे घडली आहे.

३. डान्राव आपल्या एका प्रतिसादाचे दोन तुकडे करून दोन घाग्यांवर मारतात ते पाहूनच रजनीकांत बंदुकीच्या गोळीचे दोन तुकडे करुन मारायला शिकला.

खास इथे भरभरुन लिहणार्‍या आमच्या काही मित्रांसाठी आमचेही २ कोट्स : १. लोकांना भले मोठ्ठे प्रतिसाद लिहण्यासाठी काही मिनिटे लागत असतील तर तेच प्रतिसाद उडवायला डॉन्रावांना काही सेकंद पुरतात. २. मिपावरचे सदस्यत्व मंजुर होण्यासाठी कदाचित काही आठवडे लागत असतील पण डॉन्राव तेच अ‍ॅक्टिव्ह सभासद काही क्षणातच ब्लॉक करु शकतात. बाकी चालु द्यात ;) - छोटा डॉन

आयला काय खत्तरनाक धागा आहे. डॉनयज्ञात आमच्याही समिधा: १. दोन नवी पुस्तके येत आहेत: "हा (केसांच्या) तेलाचा इतिहास आहे" आणि "एका केसियाने" २. दोन नव्या कविता येत आहेतः "न्हालेल्या ह्या डॉनरावसम..." आणि "ह्या केसांच्या रंगकोशी.." ३. दोन नवे चित्रपट येत आहेतः "केस बाय केस" आणि "पुणे-बंगळूर-पुणे एक लांबलचक प्रवास" ४. मंगळागौरीच्या गाण्यांवरही डॉनचा प्रभावः "केस बाई केस, डॉन्याचे केस, लांबसडक केस, तोंडास फेस...आणून सोड बाई आणून सोड"

डॉन राव जिथे बॉल फेकतात तिथे त्रिफळा आपोआप जातो, डॉन राव एकदा रेल्वे रुळाच्या मध्य भागी उभे राहिले, आगगाडी डॉन रावांना भेदत पुढे गेली, आणि तिचे दोन तुकडे झाले, एक तुकडे उजवीकडे, एक डावीकडे. डॉन राव ज्या विमानात बसतात, त्याला इंधनाची गरजच भासत नाही, डॉन राव विमानाच्या इंजिनात बसून फक्त फुंकर मारत राहतात. डॉन रावांना एकाला मारायचे असले तर ते त्याचे सगळे अणु रेणू, प्रोटोन, nutron वेगळे करतात. डॉन राव पाण्यात श्वास घेत नाहीत, H2O घेतात, आणि H2 सोडून देऊन फक्त O ठेवतात.

डॉनराव काय हो हे... पार आठवडी बाजार पण उठाव्लाय तुमचा...!! बाकी लई मज्जा येतेय वाचायला... तसा धागा अखंडच राहील...!!! अर्थात तुमच्या कृपेने...

डान्राव सॅटेलायीट हाताने अवकाशात फेकुन देतात, आणि ते सुद्धा इतके अचुक फेकतात कि ते बरोबर योग्य जागी जाउन स्थिर होते. escape velocity ची गणित मनातल्या मनात करतात.

In reply to by गांधीवादी

डान्राव असले तरीही सॅटेलाईटला escape velocity दिली तर तो निसटून जाईल, पृथ्वीभोवती फिरणार नाही हो!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>डान्राव असले तरीही सॅटेलाईटला escape velocity दिली तर तो निसटून जाईल, पृथ्वीभोवती फिरणार नाही हो! तेवढे चालुन जाते हो "गांधीवादा"त, तुम्ही नका टेन्शन घेऊ राको.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो ताई, ते मनातल्या मनात पक्कि गणिते करुनच फेकतात असे मला बापड्याला सांगायचे व्हते. (नक्कि कुठलि गणिते करतात ते माहित नाहि, मनात करतात ना) आणि हो, त्या सॅटेलाईटच्या तुकड्याला कोणत्याहि वेगाने फेका हो, त्याची काय बिशाद आहे पृथ्वी सोडुन जान्याची. डान्रावांना तुम्हि काय नासा समजले काय ? अपमान घोर अपमान. कुठे डान्राव आनि कुठे ते फडतुस नासा शास्त्रज्ञ.

In reply to by गांधीवादी

डान्राव शिंकले की कतरिना (कैफ नव्हे) वादळे येतात. हा हा हा या वरून मिपाच्या एका सदस्याने केलेली " वारा ( णे ) आणि हिमवादळे अशी एक गल्लीच्छा कॉमेन्ट आठवली