✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपांगी ज्योतिष -केशसंभार

प
प्रा.विद्याधर घैसास यांनी
Wed, 09/15/2010 - 20:23  ·  लेख
लेख
लांब ,तजेलदार ,काळेभोर केस हे स्त्री सौंदर्याचे आणखी एक लक्षण आहे. लक्ष वेधणारे असे हे लक्षण. क्षणोक्षणी लक्ष देऊन जपावे लागते , जोपासावे लागते.केसांच्या मुळांनी शोषलेली पोषक द्रव्ये व डोक्याच्या कातडीचे आरोग्य यावर केसांचे सौंदर्य अवलंबून असते. केसाची मुळे शनी दर्शवतो ,तर दर्शनी केस शुक्राच्या अंमलाखाली येतात. मेष ही डोक्याची राशी (स्काल्प स्किन दर्शक) तर चंद्र व वृश्चिक रास हे पोषणदर्शक घटक आहेत. या घटकापैकी कोणता घटक बिघडला आहे हे शोधणे पत्रिकेत फारसे कठीण नसते व एकदा समस्येचे कारण समजले की प्रभावी उपाययोजना करता येते उदा: राहूमुळे केसात कोंडा होतो. व केस निस्तेज होऊ लागतात ,तर शनी-रवी यांच्या युतीमुळे केसांच्या मुळाशी उष्णता अधिक होऊन केस गळण्याची तक्रार उदभवते. हर्षलाचे शुक्राशी कुयोग केसांची टोके दुभंगीत करतात, तर नेपच्यूनच्या कुयोगांमुळे केसांमध्ये अधिक घाम साठून राहतो व डोक्याच्या कातडीचे आरोग्य व पर्यायने केसांचे सौंदर्य कालांतराने धोक्यात आणतो. केसांचा रंग हा गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली येतो व म्हणूनच गुरुच्या अन्य गुणधर्मांचा (स्मरणशक्ती ,तर्कज्ञान )अतिरीक्त वापर प्रदीर्घ काळ चालू राहील्यास केस पांढरे पडू लागतात. गुरु ग्रह मुळातच दुर्बळ असणे हे ही केस लवकर पांढरे होण्याचे कारण ठरते. केसांचे सौंदर्य हे सुयोग्य आहार ,निद्रा व निगा यावर संपूर्ण अवलंबून आहे. शारीरीक तापमानाचे संतुलन .रक्ताभिसरण ,स्वच्छता व मानसिक स्वास्थ्य या सर्वांचा केसांच्या सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने विशिष्ट व्यक्तीचा प्रकृतीधर्म ओळखून उपाय केल्यास विकृती दूर होते. केस दाट ,काळेभोर व तजेलदार रहावेत ,रसरशीत व जीवनशक्तीने परिपूर्ण व्हावेत यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. केसांमध्ये कोंडा होणार नाही ,घाम साचून रहाणार नाही यासाठी स्वच्छतेचे उपाय करायला हवेत. डोक्याच्या भागात रक्ताभिसरण उत्तम तर्‍हेने होण्यासाठी मानेला व डोक्यावरील काही भागांना प्रेरक मसाज करावा. डोक्याच्या भागाचे तापमान नियंत्रीत ठेवणे ही आवश्यक आहे . पावलांना व पाठीच्या कण्याला मसाज करून हे तापमान नियंत्रीत करता येते. मासिक पाळीच्या आधी तापमान एक ते दोन अंशाने वाढते हे लक्षात घेऊन उपाय करावेत.दिनचर्या आखावी. प्रोटीन्स हा अन्न घटक केसांच्या आरोग्याला पोषक आहे ,परंतू पत्रिकेत रविच्या (प्रोटीन्सचा कारक )स्थान व राशीवरून कोणत्या स्वरुपात प्रोटीन्स घ्यावीत हे ठरवता येते. पुढील भागात सुडौल बांध्याचा वविचार करू.

Book traversal links for रुपांगी ज्योतिष -केशसंभार

  • ‹ ते वास्तवाच्याजवळच हॉटेल.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15369 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

मेघवेडा
Wed, 09/15/2010 - 20:35 नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत. इसमे मजा नै आया. :(
  • Log in or register to post comments

असणारच पुढील भागाच्या प्रतीक्षेत तू

चतुरंग
Wed, 09/15/2010 - 20:39 नवीन
सुडौल भाग असणार आहे नं तो! ;) (बेडौल)चतुरंग अवांतर - बाकी केशसंभार वगैरे वरुन आमचे एक विडंबन आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ग्रहमान

मीनल
Wed, 09/15/2010 - 20:45 नवीन
ग्रहमानाचा आरोग्यावर परिणाम होतो हे ऐकून आहे. पण इतका बारकावा कधीच कळला नाही. वैद्यकिय उपचार आणि ग्रहमान ठिक झाले तर आरोग्य निट होते. तसेच ग्रहमान ठिक झाले की पांढ-याचे काळे केस नैसर्गिक रित्या होतात का?? नसतील होत बहुधा. अमेरिकेत तर केस खूप गळतात. येथिल पाण्याचा परिणाम आहे. वैयक्तिक ग्रहमानाच कुठचं काय माहित????
  • Log in or register to post comments

मनोरंजक ...

छोटा डॉन
Wed, 09/15/2010 - 20:45 नवीन
पत्रिकेतल्या ग्रहांचा आपल्या केसांच्या आरोग्यावर फरक पडतो आणि त्यापुढे इतर उपाय 'झक मारतात' ही माहिती मनोरंजक वाटली. बाकी टेक्निकल डिटेल्स कळाले नाहीत / कळवुन घेण्याची इच्छा नाही. एक शंका : ग्रहांच्या बदलत्या स्थानांनुसार केसातली बदल होत जातो का ? म्हणजे समजा एखाद्या अलाण्या फलाण्या ग्रहच्या जागाबदलामुळे केस डायरेक्ट निस्तेज होऊन गळु लागले व अलमोस्ट टक्कल पडले आणि नंतर काही काळानंतर तो ग्रह आपल्या फेव्हरमध्ये आल्यावर हे केस पुन्हा तजेलदार बनतात व टक्कल पडलेल्या जागी पुन्हा केस उगवतात असे आहे का ? तसे नसल्यास मग दुसर्‍या कुठल्या ग्रहाला बाबापुता करुन त्याच्याकडुन हे काम करवुन घेता यईल का ? अर्थात ह्या उगाच जनरल शंका आहेत, माझ्यासाठी नव्हेतच, माझ्या केसांच्या आरोग्यासाठी मजा कुठल्या ग्रहाच्या फेव्हरची गरज नाही. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

शेम २ शेम हीच शंका आली माझ्या

गणपा
Wed, 09/15/2010 - 21:20 नवीन
शेम २ शेम हीच शंका आली माझ्या डोक्यात. टंकायचे कष्ट वाचवल्या बद्दल चोताचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

डान्याचे केशसंभार विषयक

Nile
गुरुवार, 09/16/2010 - 03:13 नवीन
डान्याचे केशसंभार विषयक प्रश्न पाहुन, "ज्याचे (केस) गळतात, त्यालाच (ग्रह) कळतात" ह्या म्हणीचा उगम कळला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

चोता दोनचे तर ठीक आहे.. पण मग

मस्त कलंदर
गुरुवार, 09/16/2010 - 09:13 नवीन
चोता दोनचे तर ठीक आहे.. पण मग बिचार्‍या नंदनचे काय? ती तर अगदीच गॉन केस आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मकी आणि डॉन्याच्या केसमधे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 09:45 नवीन
मकी आणि डॉन्याच्या केसमधे ग्रह सारखे आहेत का हे पहायला हवं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हा हा.. माझा केशसंभार

मस्त कलंदर
गुरुवार, 09/16/2010 - 10:03 नवीन
हा हा.. माझा केशसंभार डॉन्याच्या केसांपेक्षा (निदान अजूनतरी)केसभर जास्तच आहे!!! त्यामुळे माझे ग्रह अधिक चांगले असायला काही हरकत नसावी ब्वॉ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्छा म्हणजे तुझे ग्रहतरी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 10:04 नवीन
अच्छा म्हणजे तुझे ग्रहतरी किमान जास्त उंचीचे आहेत तर! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

केस

पैसा
गुरुवार, 09/16/2010 - 22:02 नवीन
ते फक्त स्त्रियांच्या केसांबद्दल बोलतायत! +१, आजकाल काही नट्या टक्कलवाल्या दिसतात त्याचं कारण काय असावं बॉ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

भरघोस अक्षरक्षः विपुल विपुल

शुचि
Wed, 09/15/2010 - 21:01 नवीन
भरघोस अक्षरक्षः विपुल विपुल आणि पायापर्यंत लांबसडक केस माझ्या पहाण्यातील एका बाईंचे आहेत = उत्तम स्थितीचा शुक्र (असं मी मानते) पण शुक्र हा वैवाहीक सौख्याचा देखील निदर्शक आहे. या बाईंची २ लग्न होऊन त्या दोनदा विधवा झाल्या आहेत. = शुक्र तितकासा चांगला नसावा. मग हा विरोधाभास कसा? ____ अर्थात मंगळी पत्रिका आहे, कन्या कग्न आणि कन्या रास आहे - हे सर्व एकाकी आयुष्य दर्शवत असेल कदाचित. पण तुम्हाला काय वाटतं?
  • Log in or register to post comments

केसांमध्ये कोंडा होणार नाही

अनामिक
Wed, 09/15/2010 - 21:07 नवीन
केसांमध्ये कोंडा होणार नाही ,घाम साचून रहाणार नाही यासाठी स्वच्छतेचे उपाय करायला हवेत. स्वच्छतेचे उपाय का करायचे म्हणे? हे सगळं जर ग्रहांमुळे होत असेल तर त्यांचीच शांती केली तर नाही चालणार का? अवांतरः मला या ग्रहांचा खूप खूप राग यायला लागलाय. रिकामटेकडे आहेत नुसते! उगा अंतराळात फिरत राहण्याशिवाय काही काम नसल्याने भूतलावरील लोकांच्या जीवावर उठतात! यांचा एकवेळ बंदोबस्तं केलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/15/2010 - 23:22 नवीन
भिक्कारडे ग्रह कुठचे! (गुर्जींकडून उधारीवर वाक्य घेऊन) ही ग्रहमाला माजली आहे फार साला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

निदान भौतिकशास्त्र आणि

अनामिक
Wed, 09/15/2010 - 23:39 नवीन
निदान भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांनी ग्रहांना शिव्या घालू नये म्हणतात... शनी-मंगळ युतीचा कोप होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मंगळ आमच्या टेलिस्कोपला दिसत

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/15/2010 - 23:41 नवीन
मंगळ आमच्या टेलिस्कोपला दिसत नाही, त्यामुळे शनी-मंगळ युतीला मी नाही घाबरत! गुरू शनी म्हणाल तर मज्जा येईल! त्यावरून आठवलं, शनिवारी, गणेशचतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्र-शुक्र युती होती. पाहिली का कोणी? काय झक्कास दिसत होती ही जोडगोळी आकाशात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि

अनामिक
गुरुवार, 09/16/2010 - 00:13 नवीन
गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि चंद्रदर्शन?... या अल्ला! आता हिच्यावर बाप्पापण नाराज झाले म्हणायचे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे मागच्या वर्षी कोणीतरी

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 09:45 नवीन
अरे मागच्या वर्षी कोणीतरी गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केल्यास काय टाईपचा धागा काढला होता ना! माझं अजूनपर्यंत काहीही वाईट झालं नाहीये (अजून काय वाईट होणार म्हणा! ;-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

ती गणेश चतुर्थी नाय रे....

विजुभाऊ
गुरुवार, 09/16/2010 - 13:17 नवीन
ती गणेश चतुर्थी नाय रे.... गणेश चतुर्दशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

तोड दिया ना, अब पूरा पैसा भरो.

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/16/2010 - 10:44 नवीन
(गुर्जींकडून उधारीवर वाक्य घेऊन) ही ग्रहमाला माजली आहे फार साला!
वाक्य उधार घेऊन त्याची मोडतोड केलीत तर पूर्ण पैसे भरावे लागतील. मूळ वाक्य 'ही **** फार माजली आहे साली' असं होतं. **** च्या जागी ग्रहमाला, लग्नसंस्था, परवानापद्धत, गाडीसंस्था वगैरे शब्द बसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही पुणेरी का?

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 10:46 नवीन
तुम्ही पुणेरी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

न सांगता उधार....

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/16/2010 - 10:51 नवीन
मुळात तुम्ही न सांगता उधार घेतलंत. वर ते तोडून टाकलं... तुम्हालाच पुणेरी भामटी (गावकुसाबाहेर राहाणारी) का म्हणू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आक्षेप

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 10:55 नवीन
न सांगता: वरचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा गुर्जी! व्यवस्थित सांगून सवरून, जाहीर करून वाक्य आणलं आहे. त्यातून मूळ वाक्य आशयानुसार थोडं बदलून, अर्थपूर्ण ठेवलं तरीही ती शिवीगाळ होते असं मानायची नवीन (अर्थातच पुणेरी) पद्धत तुम्हाला माहित नाही? कसं काय हो मराठी बोलणारे म्हणवता तुम्ही स्वतःला?? बाकी तुम्ही व्यक्तीगत टीका टिप्पणी करत आहात याचा अर्थ समजला! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

दिवसाढवळ्या

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/16/2010 - 11:16 नवीन
चोरी करायची आणि वर म्हणायचं 'सर्वांच्या समक्ष नेलं, म्हणून ती चोरी नाही'. अजब तर्कशास्त्र आहे. जाऊदेत, नेलं आणि मोडलं. मी माझ्या सध्याच्या रेटप्रमाणे तुम्हाला व्यनिने बिल पाठवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

निषेध, निषेध, निषेध

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 11:18 नवीन
ही चोरी नव्हे, कृपया हा प्रतिसाद नीट वाचा! तुमच्याकडून वाक्य उधार घेऊन मी ते माझ्या पद्धतीने मांडलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

न सांगता उधार

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/16/2010 - 11:46 नवीन
तुम्ही उधार घेतल्याचं जाहीर केलंत. मला अर्थातच आधी विचारलं नव्हतंत. मालकाला न विचारता उधार म्हणजे चोरीच. खुलासा संपला. आता मुकाट्याने व्यनित कळवल्याप्रमाणे पैशे भरा नाहीतर पुढची बोलणी माझ्या वकिलांशी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कैच्याकैच!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 11:48 नवीन
पुढची बोलणी माझ्या वकिलांशी करा.
शी! कोणाशीही काय बोलायचं? तुमचा रेट काय ते इथे सांगा नाहीतरी आमचे(ची) केस स्ट्राँग असल्यामुळे आम्ही कोणत्याही साल्या माजलेल्या ग्रहमालेला घाबरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जाहीर करता येत नाही..

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/16/2010 - 12:09 नवीन
समजून घ्या थोडं. हा नाजूक मामला आहे. रेट काय आहे हे केस बाय केस ठरतं. नक्की काय इन्व्हॉल्व्ह्ड आहे यावरूनही ठरतं. असा जर जाहीर रेट सांगितला तर सगळे तोच मागतील की. तुम्हाला म्हणून थोडं कन्सेशन दिलं आहे. व्यनितच बोलू. काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं मग केस बाय केस रंग आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 12:41 नवीन
बरं मग केस बाय केस रंग आणि रेट कसा बदलतो ते सांगा! (हे म्हणजे कसं एकदम चोख झालं ना, केसांच्या लांबीवरून रंगाचा रेट बदलतो तसं!) आत्ता समजलं मला, हा जेंडर बायस आहे म्हणून तुम्हाला केस करायची आहे. सालीच्या ऐवजी साला म्हटलं म्हणून या केसमधे एवढा रस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

केस(रा) सरा

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/16/2010 - 13:21 नवीन
चला आता कशी गाडी मूळ विषयावर, म्हणजे केसावर आली. उगाच कोणाला अवांतराचा आरोप करण्याची संधी नको. (जज्ज : वकीलसाहेब, तुमच्या या प्रश्नांचा मूळ गुन्ह्याशी काय संबंध आहे? वकील : जज्जसाहेब, मला थोडी अजून मोकळीक दिली, तर लवकरच हा संबंध मी प्रस्थापित करेन. जज्ज : ठीक आहे. पण लवकर आटपा माझा लंचटाईम व्हायची वेळ आलेली आहे) केस म्हणजे धागा. तो कसा वाढतो? भांग सरळ पडतो, की वाह्यात प्रतिसादांप्रमाणे तिरका तिरका जातो? (ये नोट किया जाय की तिरके प्रतिसादोंका उदाहरण उपरीच दिया गया है) कुठचे ग्रह हे धागे वाढवतात, व कुठचे वक्री होऊन अचानकपणे ते नष्ट करतात? केव्हा हेअर स्प्लिटिंग जाणूनबुजून होतं व केव्हा पुरेसं खाद्य न मिळाल्यामुळे स्प्लिट हेअर होतात? शिवाय लांबलचक धागे करायचे असतील - (३३६ मिमी) तर कोणाला किती सुपारी काय रेटने द्यावी लागते? हे सगळे गहन प्रश्न आहेत. माननीय प्राध्यापक घैसास सरांनी हा केसांवरचा धागा काढला आहे. हे सर्व ग्रहांच्याच हाती असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याला आता केसरा सरा (व्हॉटेव्हर विल बी विल बी...) म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. का असं आहे की प्रोफेसरांचे ग्रहांच्या शांती करण्याचे रेट ठरलेले आहेत? तसं असेल तर ते या धाग्यावर इथे जाहीर करतील का? (अदितीचा प्रश्न...) तुम्हाला काय वाटतं? बटांविषयी आम्ही इथे आधी लिहिलेलं असल्यामुळे पुनरुक्ती करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बघ, आला ना आळ

पुष्करिणी
गुरुवार, 09/16/2010 - 13:03 नवीन
बघ, आला ना आळ चोरीचा...सांगितलं होत नको बघूस म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ते तू उघडपणे सांगितलंस

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/16/2010 - 13:14 नवीन
ते तू उघडपणे सांगितलंस म्हणून! आणि तसंही हा आळ नेहेमीप्रमाणे खोटाच आहे. तू या पुर्षी काव्याला बळी पडू नकोस! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

प्राध्यापक घैसासांचे हे तद्दन

Nile
गुरुवार, 09/16/2010 - 13:31 नवीन
प्राध्यापक घैसासांचे हे तद्दन तकलादु (श्रेयअव्हेर) लेखन दुर्बिटणे बाईंना पुरुषी काव्या*प्रमाणे भासले याला घैसासांचे यश समजावे की अपयश या द्विधेत मी अडकलो आहे. प्राध्यापकांना एक प्रश्नः द्विधा ही कुठल्या ग्रहाच्या अधीन असते? द्विधेत पडल्यावर डोके खाजवुन गळणारे केस नक्की केशग्रहांच्या अधिपत्याखाली येतात की द्विधाग्रहांच्या? आधीच सांगुन ठेवा ब्वॉ. नाहीतर च्यायला एका ग्रहाची शांती करायचो आणि नंतर तो इंडियन पोलिसांप्रमाणे 'आमाला पावर नाय' म्हनुन पचकायचा. हे काव्य* काय आहे रवी न देखणार्‍या विभागात जाउन उचकावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख वाचून मला पडलेले प्रश्न

सूड
Wed, 09/15/2010 - 21:10 नवीन
१) मेष ही डोक्याची राशी (स्काल्प स्किन दर्शक) तर चंद्र व वृश्चिक रास हे पोषणदर्शक घटक आहेत. वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ मेषेत व्ययात असेल तर त्यांच्या केसांवर काय परिणाम होतो ? २)राहूमुळे केसात कोंडा होतो. व केस निस्तेज होऊ लागतात. राहू गुरुसोबत भाग्यात असेल तर गुरुमुळे हे दुष्परिणाम कमी होऊ शकतात का ? गुरु राहूसोबत एकाच स्थानी असल्याने दुष्परिणाम वाढतात. ३) दर्शनी केस शुक्राच्या अंमलाखाली येतात शुक्र त्रिक स्थानी (६, ८, १२)असल्यास अशा लोकांचे दर्शनी केस लवकर गळतात का ??
  • Log in or register to post comments

गुरु राहू एका स्थानात असतील

शुचि
Wed, 09/15/2010 - 21:15 नवीन
गुरु राहू एका स्थानात असतील तर माहीत नाही पण जर एका स्थानी आणि युतीत असतील तर त्याला चांडाळ योग म्हणतात. गुरु देवांचा गुरु आणि राहू दानव मंत्री. हे एकमेकांना भेटले तर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ते माहित आहे, पण केसांवर

सूड
Wed, 09/15/2010 - 21:18 नवीन
ते माहित आहे, पण केसांवर त्याचा काय परिणाम होतो ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

स्वत:हाचे केस स्वहस्ते उपटले

शेखर
गुरुवार, 09/16/2010 - 01:46 नवीन
स्वत:हाचे केस स्वहस्ते उपटले जातात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा

सूड
गुरुवार, 09/16/2010 - 07:42 नवीन
हा हा मस्त !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

आरं माज्या द्येवा

रुपी
Wed, 09/15/2010 - 22:30 नवीन
आरं माज्या द्येवा .. माजे सगळे ग्रह खराब हायेत म्हंजे :(
  • Log in or register to post comments

>>>>पुढील भागात सुडौल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/15/2010 - 23:45 नवीन
>>>>पुढील भागात सुडौल बांध्याचा वविचार करू. कृपया लवकर टाका पुढचा भाग आणि तेवढे फोटूचे विसरु नका. :) >>>>केसांचे सौंदर्य हे सुयोग्य आहार ,निद्रा व निगा यावर संपूर्ण अवलंबून आहे. असे असेल तर ग्रहब्रिहाचा आणि केशसंभाराचा काही संबध नाही असे म्हणावे काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रा. साहेब, लेख तद्दन तकलादू

पाषाणभेद
गुरुवार, 09/16/2010 - 08:49 नवीन
प्रा. साहेब, लेख तद्दन तकलादू वाटला. आपल्यासारख्या प्राध्यापक असणार्‍याचा अशा प्रकारे ग्रहतार्‍यांवर विश्वास वैयक्तिक रित्या असणे समजू शकतो पण त्याचे जाहीर प्रदर्शन म्हणजे आपल्या ज्ञानावर आपला विश्वास आहे की नाही हे दाखवते. अहो जग चालले कुठे अन तुम्ही अजूनही डोक्यातील कोंड्यासाठी ग्रहगोलांवर अवलंबून राहतात? >>>> प्रोटीन्स हा अन्न घटक केसांच्या आरोग्याला पोषक आहे ,परंतू पत्रिकेत रविच्या (प्रोटीन्सचा कारक )स्थान व राशीवरून कोणत्या स्वरुपात प्रोटीन्स घ्यावीत हे ठरवता येते. अहो प्रोटीन्स का घेतात मग? केसांत अंगठ्या का नाही घालू देत तुम्ही? केसांची शांती केली तर? प्रोटीन्स हा घटक मग वैज्ञानीक नाही का? की तुम्ही म्हणाल की ते पृथ्विवर आधीच होते वैगेरे. चालूद्या. एखाद्या समाजात जर वैज्ञानीक दॄष्टीकोनाच्या व्यक्तींची संख्या जास्त वाढली की तो समाज प्रगतीशील होतो. याच्या विपरीत झाले की अधोगती होते. आपले (भारताचे) आता तसे होत तर नाही ना? कारण आजकाल देव देव, ज्योतिषीपण, बुवा महाराजपणा, वास्तूशास्त्रवाले, फेंगशुयीवाले, धर्मभोळेपणा, धार्मीकता खुपच वाढलेली आहे. एक परखड सुचना: पुढील सुडौल बांध्याच्या लेखात असला काही उल्लेख नसेल तरच पुढचा लेख टाका. नाहीतर नाडीग्रंथासारखा विनोदाने वाचू की नाही ही शंका आहे.
  • Log in or register to post comments

बेसिक शंका

नितिन थत्ते
गुरुवार, 09/16/2010 - 10:41 नवीन
आमची एक बेशिक शंका आहे. माणसाच्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीराचे आणि अवयवांचे काही प्रमाण असते. त्याप्रमाणाच्या थोडेफार पुढेमागे अवयवाचे माप असणे ठीक असते. त्यापेक्षा अधिक उणे माप झाल्यास त्याला विकृती समजली जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे डोके खूप मोठे असणे किंवा पायांची लांबी धडाच्या मानाने खूप कमी असणे अशा गोष्टी विकृती समजल्या जातात. माणसाच्या केसांबाबत पाहिले तर पाठीच्या मध्यापासून कमरेपर्यंत लांब केस हे केसांच्या लांबीचे सामान्य प्रमाण असते. यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे केस लांब असतील तर ती विकृती का समजू नये? त्यावर उपाय करून (वेगवेगळी तेले, लोशने लावून किंवा ग्रहांची शांत करून) ते अ‍ॅव्हरेज लांबीचे होतील असे उपाय करायला हवेत. ;) [ज्यांचे केस असे लांब असतील त्यांनी हा प्रतिसाद हलके घ्यावा]
  • Log in or register to post comments

फसू नका तुम्ही फसू नका ही

पाषाणभेद
गुरुवार, 09/16/2010 - 11:09 नवीन
फसू नका तुम्ही फसू नका ही लिंक बघा.
  • Log in or register to post comments

भारी हां...

चिगो
गुरुवार, 09/16/2010 - 11:41 नवीन
हाणा त्या Head&shoulder, Sunsilk, Pantene, Garnier वाल्यांच्या **वर लाथा.. ती शिल्पा शेट्टी, आसीन, करीना, जॉन अब्राहम, शारुख ह्यांच्या झिंज्या उपटा.. शँपुच्या अ‍ॅड्स करताहेत हरामखोर. प्रां. ना भेटलात तर सुटतील कि केसांच्या सगळ्या केसेस..!
  • Log in or register to post comments

जिंन्हें हरएक धागेपे नाज हैं,

यशोधरा
गुरुवार, 09/16/2010 - 12:06 नवीन
जिंन्हें हरएक धागेपे नाज हैं, वो कहां हैं! धागारक्षक हाजिर होssssssssssss!!!
  • Log in or register to post comments

सदस्य क्रमांक ८७३ म्हणजे

अवलिया
गुरुवार, 09/16/2010 - 12:12 नवीन
सदस्य क्रमांक ८७३ म्हणजे बर्‍याच जुन्या आणि जाणत्या ( जुण्या आनि जानत्या) सदस्या असुनही तुम्ही भलती अपेक्षा का ठेवता? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हॅ हॅ हॅ, हल्लीच काही

यशोधरा
गुरुवार, 09/16/2010 - 12:21 नवीन
हॅ हॅ हॅ, हल्लीच काही धागारक्षकांनी आमच्यावर हल्ले केले त्यावरुन परिस्थितीत फरक पडका की काय असे वाटले होते, पण नेहमीप्रमाणेच "all are equal, but some are more equal" ह्या धोरणाची अंमलबजावणीच सुधारीत आवृत्तीत सुरु आहे हे बघून जीव अंबळ भांड्यात पडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅ हॅ हॅ काय आहे एकाच्याच

अवलिया
गुरुवार, 09/16/2010 - 12:28 नवीन
हॅ हॅ हॅ काय आहे एकाच्याच मागे लागले तर ते डोळ्यात येते म्हणुन ऋतु बदलला की टार्गेट बदलले जाते. आम्हाला अकारण फटके मारुन त्यांचा आत्मा शांत झाला नसावा म्हणुन आता तुमचा नंबर ;) घ्या गेंड्याची कातडी पांघरुन. लहानपणी सर्दी झाली की खिडकीतुन पावसाची मजा पाहत बसायचो, इतर मुले हुंदडतांना पहायचो तेव्हा वाईट वाटायचे त्याची आठवण झाली. फक्त तेव्हा सर्दी खरोखर झालेली असायची. इथे सक्तीने बाजुला केले जाते येवढाच काय तो मोठा आणि मुलभूत फरक. उडेल हा प्रतिसाद नक्कीच म्हणुन खवत सुद्धा पेस्ट करुन ठेवतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(विषय दिलेला नाही)

यशोधरा
गुरुवार, 09/16/2010 - 12:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

केस

विनायक प्रभू
गुरुवार, 09/16/2010 - 12:11 नवीन
ग्रहांचा फक्त डोक्याच्या केसावंरच परिणाम होतो का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा