Skip to main content

सार्वजनिक गणेश उत्सव २०१०

लेखक मदनबाण यांनी रविवार, 12/09/2010 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या कॉलनीतली जितकी पण गणेश मंडळ होती (प्रत्येक सोसायटीमधे बसवलेले ) त्यातले गणपती बाप्पा टिपले आहेत... (हौशी फोटु ग्राफर...) मदनबाण.....

वाचने 8523
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

काल माझ्या कॉलनीतली जितकी पण गणेश मंडळ होती अरे होती का आहेत? आणि कॉलनीतली की कॉलनीत ?? छ्या ! धार्मिक लोकांना "नेटके" कधी लिहिता येईल त्या बाप्पालाच ठाउक :) घे योग्य वाक्य - काल, मी माझ्या कॉलनीत जितकी गणेश मंडळ आहेत (प्रत्येक सोसायटीत असलेले ) त्यांनी केलेल्या देखाव्यातले गणपती बाप्पा टिपले आहेत... :) बाकी फटु मस्त !!

In reply to by अवलिया

छ्या ! धार्मिक लोकांना "नेटके" कधी लिहिता येईल त्या बाप्पालाच ठाउक
खरंय! उपाय म्हणून धार्मिक लोकांनी फोटो टिपावेत कारण एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हटले जाते. ;) बाकी बाप्पाचे फोटो मस्तच. :)

फोटु छान आहेत. पण शिर्शकामुळे वाटले होते की "नेमेची येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव या विषयावर चर्चा असावी. त्यामुळे पॉपकॉर्नची ऑर्डर दिली होती. पण जाउ देत. रद्द करून टाकतो.

फोटो "नेटके" आले आहेत!

सार्वजनिक गणेशोत्सवातील सजावटीचे, श्री गणेशाचे फोटो अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे

एका कॉलनीत इतके गणपती?! गणपती छानच आहेत. पण वरून दुसरा गणपती फारच आवडला. गणपतीची मूर्ती बैठी आणि छान आहे, सजावटही साधी, आणि सुंदर आहे. मी बक्षीस दिले तर पहिला नंबर या सजावटीला.

In reply to by चित्रा

अगं हो! आजकाल अगणित मंडळे झाली आहेत. 'बाल तरूण मंडळ' नावाची तर फारच असतात. प्रत्येकाने 'सुखकर्ता' पासून सुरुवात करून रात्री धडाकेबाज गाण्याने सांगता करायची असते.;)

बाणा फोटू छानच रे! मागल्यावर्षी तू दिवाळीच्या रांगोळ्यांचेही फोटू चढवले होतेस. यावर्षी पुढचे काम म्हणजे दसरा आणि दिवाळीचे फोटू!