Skip to main content

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 07/09/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो. तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

वाचने 25413
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

मिभो यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आज विरझणाऐवजी त्यांनी आम्हाला फ्रोजन योगर्ट (मराठीत दह्याचे आईस्क्रीम) दिले आहे त्याकरता मी त्यांचा आभारी आहे. बाकी मसंस्थळावर प्रतिसादांचा खरा लुफ्त जर चित्रीत करायचा झाला तो काहीसा असा दिसेल. एन्जॉय!

In reply to by मिसळभोक्ता

आले, आले! मिभोकाकांना माझी आठवण झालेली पाहून डोळ्यात पाणी आलं, एकदम अलका कुबल ष्टाईल! ते पुसतपुसत प्रतिसाद द्यायला अंमळ उशीरच झाला!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

येवढ्या उशीराने येऊन काय उप्योग ? भाशान तर कवाच संपले, आता घ्या सतरंज्या उचलायला ...

In reply to by छोटा डॉन

अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात वेळ गेला ... फुलं बडवून झाल्यावर मगच वेळ मिळतो ना कीबोर्ड बडवायला! मिभोकाका पळाले का काय? ओ मिभोकाका, पहिल्या धारेची नारायणगावाची वाईन आहे हो माझ्याकडे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तारीख : १९ सप्टेंबर २०१०. स्थळः तुम्ही ठरवा. अधिक माहितीसाठी : केशवसुमारांना भेटा.

In reply to by मिसळभोक्ता

अदिती, ठरव गं.. मला प्यायची नसली तरी प्यायलेल्यांची विमाने उडालेली पाहायला आवडेल!!!

In reply to by मस्त कलंदर

स्थळः या आमच्या गरीबाच्या होस्टेलात कधीतरी! -- अदितीयात्री अधिक माहितीसाठी बिकाकांना व्यनी करा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचा १ बीएचके नाही..... त्यामुळे तुमच्या आमंत्रणास पुढे काही लिहिले नाही.. लागले लग्गेच हायलाईट करून वाचायला!!!!

In reply to by मस्त कलंदर

हे पहा, यायचं असेल तर या! पण तरीही, आमच्याकडे "प्यार्टी" नसणारे!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

२१ मिनिटांच फारच मनावर घेतलस की काय ?

In reply to by पुष्करिणी

नाही गं! पण फुलं बडवल्यावर तशीच आले असते कीबोर्ड बडवायला तर धाग्यालाही घाम लागला असता! ;-)

In reply to by सहज

मिभो यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
सहमत सहमत सहमत. आज आम्ही धन्य झालो. आमचा आनंद आम्ही आज सदाशीव पेठेत बालुशाही (शाहीन न्हवे) वाटून व्यक्त करणार.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बालुशाही (शाहीन न्हवे) ऐकताच तोंडाला पाणी सुटले. लाळ गळायला लागली आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

काय ? १२ वर्षाची जुनी शिवास रिगल ? मिभोकाका मारतील बरं का, कमीत कमी १६ वर्षे जुनी आणा नायतर तुम्ही कटाप ह्या खेळातुन ;) - ( १२ चा ) छोटा डॉन

In reply to by मिसळभोक्ता

सहमत आहे, कानाखाली वाजवण्याला नव्हे तर वर्षांच्या हिशेबाचा. पण आम्ही गणितात पहिल्यापासुन कच्चे असल्याने काहीतरे थातुरमातुर कारणे सांगुन असेच दुसर्‍याला गंडवत असतो. बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो ;) ( पळा, आता खातोय मार ... ) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

थातुरमातुर कारणे सांगुन असेच दुसर्‍याला गंडवत असतो
यासाठी गणीत पक्कं असावं लागतं. टक्केवारी काढायची असते ना! माहिती घ्या थोडी कोणा माहितगारांकडून.

In reply to by श्रावण मोडक

टक्केवारी काढायची असते ना! माहिती घ्या थोडी कोणा माहितगारांकडून.
तुम्हाला मिळाली तर मलाही द्या.. मलाही दोन टक्के ट्यार्पीचं गणित अजून समजलं नाहीए. ;)

In reply to by मस्त कलंदर

हितं ट्यार्पीचा न्हवं, याजाचा इषय चाललाय बाई! आनी आमी काय याजावर पैसं द्येत नाय. ते डान्रावांनाच इचारा! ;)

In reply to by श्रावण मोडक

याजाचं गणित तर आहेच हो.... पण डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली. तुम्ही रिकामटेकडे नसल्याने तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही.. तेव्हा, मोठे व्हा!!

In reply to by मस्त कलंदर

>>>>डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली. अरे हो, या ट्यार्पी वरुन आठवण झाली. मीपाचा ट्यार्पी केवळ आमच्यामुळेच वाढतो असे समजणारे, असे धागे आणि भलते प्रतिसाद पाहून आफ्रिकेतील जंगलात मोठमोठ्या झाडांना धडका मारत असतील. :) छ्या, काय धागे आणि काय प्रतिसाद. कुठे गेलं रं आपलं डिलीटमंडळ ! -दिलीप बिरुटे

In reply to by छोटा डॉन

बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो आश्वासक डॉनरावांचे भवितव्य बंगलोरलाच उज्ज्वल आहे, त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता.

In reply to by मिसळभोक्ता

>>त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता. इन दॅट केस "आंतरजालीय आत्महत्या करावी वाटते ..." असा चिंतनात्मक धागा काढतो लगेच ;) हा हा म्हणता म्हणता ५-५० प्रतिसाद घेईन. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मग ५१ व्या प्रतिसादात कोणीतरी विचारेल की अरे चोता तु तर जीवनाचा खरा अर्थ समजुन दिला होतास, आता एकदम आत्महत्येची वेळ कशी आली? मग मिभो काहीतरी उपप्रतिसाद देतीलच! मग पुन्हा डिट्टेल धागा काढायचे वचन वायदे आझम देतील. अशी प्रोसीजर आहे बर का!

In reply to by सहज

अहो मग 'छोटा डॉन यांचे खाते का उडवले' हा धागा कोणी आणि कसा काढायचा त्याबद्दलही मार्गदर्शन करावे ही विनंती!

In reply to by छोटा डॉन

वय कमीतकमी अठरा अहे.. हे विसरू नको म्हणजे झाले.. बंगळूरुचा गाशा गुंडाळून पुण्याला येणामागचे छुपे कारण आम्हाला माहिती आहे.. म्हणून हा 'सावधान'तेचा इशारा.. (सुचक)केशवसुमार

In reply to by मिसळभोक्ता

अठराच्च का हो मिभोकाका? ते काय संमतीवय आहे काय??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी बरोबर.. १८ ला आमची संमती आहे. त्यामुळे हे संमतीदर्शक वय मानावे.

In reply to by मिसळभोक्ता

अठरा !!! सोळा नाही !! अष्टादशेपेक्षा षोडशेत जास्त मजा असते असं ऐकलं आहे. अनुभव नाही बॉ.

या धाग्याबद्दल अभिनंदन करणारा धागा तयार करावा काय? :)

In reply to by श्रावण मोडक

>>या धाग्याबद्दल अभिनंदन करणारा धागा तयार करावा काय? ह्या धाग्याचे अभिनंदन करण्याइतके प्रतिसाद यावेत अशी सुपारी निघाली होती काय ? असल्यास काय रेटने गेली ? असो, तुर्तास श्रामोंना अनुमोदन देतो. :)

>>परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे यातील 'लारा' या शब्दाबाबत अधिक खुलासा आवश्यक. उगाच नसत्या शंका यायला नको. ;)

In reply to by नितिन थत्ते

२००३-२००७ च्या विश्वचषकातली एक सूत्रसंचालिका आठवली! :D अवांतर : ती म्हणे केळं आडवं खात असे!

In reply to by मेघवेडा

अवांतर : ती म्हणे केळं आडवं खात असे! अरे भाड्यांनो, नीट पिऊ द्या रे. साली ६५ यूएस डॉलरची बाटली आहे, ड्यूटी-फ्रीत घेतली तरी !

सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे आल्यामुळे आम्हाला प्रतिसाद लिहावा लागतोय. अनुक्रमे सहज,परा,स्पा यांचे अभिनंदन...! :) अवांतर : खरा धोका विदर्भाकडून असा एक धागा कोणीतरी काढा रे...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>अवांतर : खरा धोका विदर्भाकडून असा एक धागा कोणीतरी काढा रे...! :) एक अल्पशी दुरुस्ती सुचवतो. "मराठवाड्याला धोका विदर्भाचा" असा धागा काढा अशी सुचना करतो ( म्हणजे आम्ही प. महाराष्ट्रीय मज्जा बघायला मोकळे ) ;)

In reply to by छोटा डॉन

म्हणजे आम्ही प. महाराष्ट्रीय मज्जा बघायला मोकळे 'आम्ही "नीतिशून्य" प. महाराष्ट्रीय' असे हवे.

In reply to by मिसळभोक्ता

>>'आम्ही "नीतिशून्य" प. महाराष्ट्रीय' असे हवे. बरं बरं. आम्ही प. महाराष्ट्रीय मिभोकाकांसमोर 'इंचा इंचाने माघार घेत आहोत' असे कबुल करतो ;) - छोटा डॉन

In reply to by श्रावण मोडक

हा व्यनीखरडहृदयसम्राट सहजकाका ह्यांनी (सर्वो)हुच्च छोटा डॉनचा केलेला अपमान समजावा का ? तसे असल्यास आंतरजालीय श्रामो पवारांना होणारा आनंद अनपेक्षित नाही

In reply to by छोटा डॉन

इंचा इंचाने माघार घेत आहोत' ह्म्म.. काळेकाकांचा धागा फारसा मागे नाही. (सध्या क्रमांक पाच.) चोता दोन ला सदर धाग्याचा मुद्दाम उलेख करून तिथले प्रतिसाद वाढवावे, आणि पर्‍याला इंगा दाखवावा, असे वाटत असल्यास नवल नाही. पण काहीही म्हणा. "इंचा इंचाने माघार" हे विज्युअलाईज करणे म्हणजे जरा पॉर्नोग्राफिक वाटते. नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परा आणि सहजकाकांना विदर्भाची भीती कसली???

In reply to by मस्त कलंदर

>>आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परा आणि सहजकाकांना विदर्भाची भीती कसली??? ऑ ? पुण्याचा परा पश्चिम महाराष्ट्राचा कसा झाला ? पुणेकरांना पुण्याशिवाय इतर काही अस्तित्वात आहे हे मान्य आहे का ? तसे असल्यास त्वरित बिजींग, बेंगलोर आणि बे-एरियासह 'संयुक्त महाराष्ट्र' व्हावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत :)

In reply to by छोटा डॉन

तसे असल्यास त्वरित बिजींग, बेंगलोर आणि बे-एरियासह 'संयुक्त महाराष्ट्र' व्हावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत सहमत आहे. (आता खुद्द संपादकशिरोमणी चोता दोन ह्यांनी पराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मिभोकाकाचा धागा ३१५ पार नेण्याची प्रतिज्ञाच केली आहे, तर आम्ही कोण नाही म्हणणार ? शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त ह्या नेताजीप्रणित न्यायाने आम्हाला चोता दोनने दोस्त केलेले पाहून आनंद झाला.)

In reply to by मिसळभोक्ता

>>शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त ह्या नेताजीप्रणित न्यायाने आम्हाला चोता दोनने दोस्त केलेले पाहून आनंद झाला.) ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना की तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या काढणार नाही ;) मग असे का का काका ?

In reply to by छोटा डॉन

ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना की तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या काढणार नाही पुणे कराराच्या प. म्हाराष्ट्रीय नकला पाहून काहीच णवीण वाटले नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चालायचंच हो पेशवे! तुम्ही नका मनाला लावून घेऊ! (आपलं ठरल्याप्रमाणे मी तुमची खोडी काढलेली नाही याची कृपया नोंद घेणे!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो मनाला कसलं लागतंय. अंबळ गम्मत वाटली इतकेच. :) (कंसाची नोंद घेतली आहे)

In reply to by छोटा डॉन

वाचलं नाहीस का, माझ्या घरी माझी बिघडलेली भेंडी न खाणारी म्हैस ही खरंतर सांगलीहून भेट म्हणून आली होती. आणि तिच्या शिंगांत "आमच्या घरी नातू आल्याने आता कोणत्याही जनावराची गरज नाही" अशी चिठ्ठी अडकवली होती!!!! छे:, दहावेळा पराची खव लिहून आण अशी शिक्षा द्यायला हवी तुला!!!! ढ कुठचा!!!

In reply to by सूड

साली काढणारे देवरुखकर साहेब, अभिनंदनपर धाग्याचे अभिनंदन करण्याचा धागा काढण्याचा उत्कृष्ट विचार केल्या बदल अभिनंदन करण्याचा धागा आम्ही काढायच्या आधी तुम्हीच काढा.

In reply to by मिसळभोक्ता

धागा आम्ही काढण्यात काही मजा नाही, मिपावरील जुन्याजाणत्या लोकांना हा मान मिळावा. सध्या तरी आम्ही प्रतिसादच देऊ म्हणतोय.

In reply to by मिसळभोक्ता

चालेल हो काका !! नाहीतर नंतर कोणत्या तरी धाग्यात, काय पण म्हणा राव या धाग्यात काकांनी कुणाला शिंगताव ऑफर नाय केली असा रिप्लाय येईल. किंवा कुणीतरी निव्वळ डोळे मिटण्यासाठी शिंगताव मागेल. त्यामुळे नकोच. शिंगताव वर तुम्ही ताव मारा.

In reply to by सूड

चिनी मालावर बंदी घालायचे धोरण मिपावर एकदा स्वीकारले म्हणजे स्वीकारले. नो शिंगताव ऑन मिपा.

पण काय पण म्हणा राव, आख्ख्या धाग्यात मिभोकाका कुणाचेच 'फॅन' झाले नाहीत ह्याचे फार वाईट वाटले.

In reply to by छोटा डॉन

जरा इतरत्र बघा. साला कॉपीरायटेड व्यक्तिचित्रात (श्रेयः श्रामो, अव्हेरः मी) लावलेल्या फोटोचा फ्यान झाल्यापासून हे सगळे संकेतस्थळ वगैरे झूट वाटते. साला, तिकडे फोरास रोडवर गणेशोत्सवात सदा सर्वदा म्हणायला बोलवावे ह्या आशेत आहोत सध्या ;-) (बाकी, बीजिंग्मध्ये एक महिला क्यान्सरग्रस्त आहे, तिला वाचवायला पैसे मागतोय. आणि बंगलोरच्या बोलबच्चनांचा पराभव करणारी बीजिंगमधली कंपनी, आहे. त्यात गुंतवणुकीची गरज आहे. महिन्याभरात तीन टक्के. पैसे पाठवताय ना डॉनराव ? वाटल्यास अकाउंटनंबर पाठवतो.)

In reply to by मस्त कलंदर

ह्म्म्म्म.. असो. पाशवी, कुठल्या ! (योग्य ठिकाणी स्वल्पविराम घालावा, असे नानाचा उपदेश पाळतो आहे.)

In reply to by मिसळभोक्ता

अहो त्या मकताई पश्चिम महाराष्ट्राच्या आहेत. पुन्हा अभ्यास कमी पडू देऊन 'कुठच्या' असं विचारू नका!