Skip to main content

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 07/09/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो. तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.

वाचने 25332
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

नुसते कोरडे अभिनंदन नको. त्यांना सध्या आहात तिकडून एकेक चिंग ताओ पाठवा.

In reply to by प्रदीप

होहाय स्ट्रीट वरून डायरेक्ट पार्सल ! (पत्ता कळवा पराशेठ, सहज, आणि स्पा.)

In reply to by मिसळभोक्ता

ओ मिभोकाका प्रतिसादकर्त्यांसाठी पण काहीतरी हवं !!

In reply to by मिसळभोक्ता

परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु समोर, पुणे-३० स्पा: मुंबई सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका????

In reply to by पुष्करिणी

नक्कीच नाही. सहजकाका इतकेही काही वाईट नाहीत. शेवटी नाना तो नानाच!!! हे लिहिताना आज चुचुची लै आठवण आली...

In reply to by असुर

सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत, दिसायला देखणे आहेत, त्यांच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा खूपच तरूण दिसतात..... अर्थातच हे त्यांचे स्वतःचे मत आहे!!!! आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे, पण नाना उगाच रागावेल म्हणून पुन्हा सांगत नाही!!!!

In reply to by मस्त कलंदर

सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत, हे सहजकाकांचेच मत नाही, तर मिभोकाका, बिरुटेप्राडॉकाका, सामंतकाका, काळेकाका, अशा सर्व काकांचे मत आहे. (आता, नारायणराव बनू नका, म्हणजे झाले. नाहीतर उगाचा "काका, मला वाचवा" म्हणून झाडावर चढायच्या तुम्ही. तिकडे चोता दोन आहे. त्याला चढायला खूप आवडते.)

In reply to by मिसळभोक्ता

(आता, नारायणराव बनू नका, म्हणजे झाले. नाहीतर उगाचा "काका, मला वाचवा" म्हणून झाडावर चढायच्या तुम्ही. तिकडे चोता दोन आहे. त्याला चढायला खूप आवडते.)
नाही हो... मी अगदी छोटूशा झाडावर ऐसपैस बसलेय. आणि ते झाड चोता दोन यांच्या झाडापासून पुरेसे दूर आहे. उगीच पॉपकॉर्न खाताना मध्ये मध्ये जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!! बाकी, इतर सगळ्या काकांचे ठीक आहे , पण काळे आणि सामंत आजोबा यांनाही तुम्ही काका बनवून वासरांत घेतलेत हे वाचून डोळे अंमळ पाणावले. आणि हो, सहजकाका किती देखणे आणि तरूण दिसतात हे त्यांचे मत आम्ही खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकले असल्याने इतर काका-आजोबांच्या मतास (पक्षी: तुमच्याही) योग्य ठिकाणी मारण्यात आले आहे!!!

In reply to by मस्त कलंदर

जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!! अरारारा.. बाजार उठवला.. दोन्या, तुझ्या जागी मी असतो, तर हे असे काही पाशवी ऐकून नसते घेतले. असो, मके, तुझा प्रतिसाद "समृद्ध व्हावे असे काही" ह्या क्याटेगरीत टाकण्याची नवीन मालकांना विनंती करतो.

In reply to by मिसळभोक्ता

ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात नक्की कोणता व किती वर्ष जुना ज्युस आहे याचा कौल घेतला पाहीजे खरा!

In reply to by सहज

ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात नक्की कोणता व किती वर्ष जुना ज्युस आहे याचा कौल घेतला पाहीजे खरा!
ये तो राजकी बात है सहजजानी!!!! :)

In reply to by मिसळभोक्ता

>>>जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!! अहो ते त्याने डिझाईन केलेल्या इंजिनात पण येतात म्हणे मध्ये मध्ये!!!
असो, मके, तुझा प्रतिसाद "समृद्ध व्हावे असे काही" ह्या क्याटेगरीत टाकण्याची नवीन मालकांना विनंती करतो.
अहाहा.. आज मी धन्य झाले. आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!! (माझे नक्कीच नाही.. स्वतःला बोका समजणार्‍या पराचे)

In reply to by मस्त कलंदर

आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!! हे घे: सर्वांना कबूल करण्यात येतेय, की आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय. (खूष ? आता मीट बघू डोळे.)

In reply to by मिसळभोक्ता

डोळे मिटायचीच बात असेल तर आपण पण "आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय." असे कबुल करतो.

In reply to by छोटा डॉन

डाण्रावांना एक डोळ्यावर येणार्‍या केसांतून समोरचं नीट दिसत नाही, पण काका तुम्हालाही दिसलं नाही का, डोळे परा मिटणार आहे!!! छे:!!! काका, तुमचाही एक फोटू टाकाच इथे.. जरा तुमचाही केशसंभार कितपत लांब आहे पाहून घेत्ये!!! :)

In reply to by मस्त कलंदर

मके, ते काका आहेत. केस उरलेले असतील का आता कपाळावर? नाही म्हणजे आता प्रॉस्पेरिटी वाढण्याची खूण म्हणून केसांनी माघार घ्यायला सुरूवात केली असेल, पण चाळीशीचा चष्मा हरवला असेल. (ढापणी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचे शीक्रेट उघड केल्याबद्दल चायनीज कोर्टात अदितीआत्यांविरुद्ध दावा टाकावा का ? ता. क. प्रॉस्पेरिटी आणि गळत्या केसांचा काहीही संबंध नाही. प्रूफ आहे. अगदी आदरणीय प्रूफ आहे. विधान मागे घ्यावे. धन्यवाद.

In reply to by मिसळभोक्ता

आधी प्रूफ द्या, मग ते आदरणीय आहे का नाही याचा विचार करू आणि नंतर डीलिटमंडळाला सांगू! बाप दाखव नाहीतर ...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रूफ हवे आहे ना ? मग हे घे. ~.. (हा गळलेला केस आहे, हे सांनल, एका कुरलकेशसंभारित काकांचा. हेहीसांनल.)

In reply to by मिसळभोक्ता

तुमचं प्रूफ अमान्य आहे. मगाचाच डॉन्याचा गळलेला केस दाखवून स्वतःचे पांढरे केस लपवण्याचा क्षीण प्रयत्न!!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉन्याच्या केसांच्या लांबीला अंडरएस्टीमेट केल्याबद्दल डाण्रावांच्या राकोतैंचा अंमळ णिशेढ!!!

In reply to by मस्त कलंदर

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हायलाईट करायला विसरू नका.. चावट कुठले. (खुद के साथ बांता: लांबीला महत्त्व नाही, असे जगातील सर्व पाशवी लोक म्हणत असतात, तरी इथल्या पाशवी लोकांना मात्र (केसांच्या) लांबीविषयी भलतीच उत्सुकता !)

In reply to by मिसळभोक्ता

बारा नाही का वाजले तुमचे?

In reply to by मस्त कलंदर

आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे, नाना थोडा सावळट गोरा आहे, उंची मध्यम , कपडे घालतो ,नाक मध्यम ,डोळे तपकिरी काळे , डोक्यावर विरळ केस , चश्मा आहे पण कधितरी चष्मा काढून ठेवतो. अधूनमधून चिरूट ओढतो , किंवा तंबाखू चघळतो , बोलणे संथ लयीत , हॅ हॅ हॅ करून हसण्याची सवय , त्याच्या फोनमधून फक्त प्रभू मास्तर आणि बिका यानाच फोन करता येतो. हा ईसम बरेचदा ठाण्यात गोखले रस्त्यावर आढळतो.

In reply to by मस्त कलंदर

सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका???? "नाना इज अ फूल, आय टेल यू." हे वाक्य गेल्या आठवड्यात कमीत कमी तीनदा ऐकले आहे. आणि नानाविषयी, हेचि फळ काय मम तपाला, असे नानाचे नाना म्हणतात, असे ऐकिवात आहे. त्यामुळे भा पो.

In reply to by प्रदीप

चिंग ताओ - बिअर? शिंताओ की शिंताव नावाची एक अट्टल चिनी बिअर ऐकून आहे. पऱ्या, आलो रे...;)

In reply to by श्रावण मोडक

त्सिंग-ताओ असे स्पेलिंग, शिंगताव असा मेनलँड मँडरिनमध्ये उच्चार, आणि कँटोनीजमध्ये कदाचित चिंग-ताओ म्हणत असतील.

In reply to by प्रदीप

हा धागा पहिल्या पंचविसात येणार ह्याबद्दल कोणी स्पॉट ग्यांबलिंग करायला तयार आहे का ? १:१०० रेट आहे. (मझर मजीद)

In reply to by मिसळभोक्ता

आम्ही शाहिन आफ्रिदीला ... हे आपलं शाहिद आफ्रिदीला गोंडस समजत होतो. आता तुम्हीच फिक्सिंग ? मिभोकाकांना ह्यापुढे मिपाचे 'रणदीव' संबोधावे असा प्रस्ताव मी मांडतो ;) - डॉनरत्ने धुमशान

In reply to by छोटा डॉन

तो कोण रणदीव / समररत्ने / विंटररत्ने आहे, त्याला अनेक इनिशियल्स आहेत, म्हणे. त्याबद्दलः रणदीव ने सर्वात जास्त इनिशियल असण्याचा अभिमान बाळगू नये. आमच्याकडे त्यापेक्ष्या जास्त इनिशियल असलेला क्रिकेट खेळाडू आहे. टी एम एम के वाय रैना. रैनाचे पूर्ण नाव काय, तर म्हणे: "तेरे मेरे मिलन की ये रैना." आत हसा.

In reply to by मिसळभोक्ता

१:१०० रेट आहे.
म्हणजे आमच्या कोणाच्या एका प्रतिसादाला तुमचे १०० प्रतिसाद का कसं?

In reply to by मिसळभोक्ता

मी आहे तयार.... (हो पण कुणी डिलिट बटण वापरले की झालेच कल्याण) पण सध्या तुमच्याकडचेच पैसे लावा माझ्या नावाने!!!

In reply to by मस्त कलंदर

चार संपादक आपल्या बाजूने आहेत. कुणी डिळीट बटन दाबले, की माझे गंगापूरचे तिकीट आधीच बूक केलेले आहे. त्यमुळे स्वतःचेच पैसे लावावे, ही विनंती. नाही तर मिपा फाउंडेशन आहेच. (कुणी त्या "योजनेला" पैसे पाठवलेत काय रे ? सॉरी.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो तो भगिनीफंड होता. त्यावर कमिशन मागता ? अर्थात, आता तो फंड नक्की कुठल्या "भगिनींसाठी" होता, ह्याविषयी शंका आहेच म्हणा.

In reply to by मिसळभोक्ता

अर्थात, आता तो फंड नक्की कुठल्या "भगिनींसाठी" होता, ह्याविषयी शंका आहेच म्हणा.
कोण म्हणते मिभोकाका पाशवी नाहीएत???? होऊन जाऊ द्या आता.. धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड मकुत्सु!!!

In reply to by प्रदीप

घुसखोरीबद्दल क्षमस्व. पण मिभो आमच्या पर्‍याला लारा का म्हणत आहेत? लारा दत्ता आणि पर्‍या यांच्यात सडपातळ (शब्द एकसंध आहे तो तसाच वाचावा) असणे याशिवाय दुसरे काहीच साम्य नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

परा सडपातळ आहे???? गेल्यावेळेस भेटला तेव्हा तर "देशा"वरच्या संपादक-आनंदयात्री-सहजकाका यांच्यासोबत आकारमानात स्पर्धा करतोय असे म्हणाला रे मला तो..

प्रतिसादांची शंभरी पार केल्याबद्दल मिभोकाकांचेही अभिनंदन. कुणीतरी असे म्हणावे यासाठी हा धागा काढला असेल तर उगीच जास्त वाट पाहायला लागू नये यासाठी त्वरित 'अपेक्षित' प्रतिसाद दिला आहे

In reply to by मिसळभोक्ता

हा कसला आवाज हे तुमच्यासारख्या संशोधकांना सांगायला नकोच.
नक्कीच!!!! तो मनावर न घेण्याइतक्या पाशवी आणि उर्मट आम्ही नक्कीच आहोत!!!

In reply to by मस्त कलंदर

ए मके, तू गं कधी संशोधक झालीस गं? मला नाही बोल्लीस ते! बाकी तुझ्या झाडावर थोडी जागा ठेव गं माझ्यासाठी, मी आलेच आणखी एक पॉपकॉर्नचा पुडा घेऊन! आणि काय म्हणे सहजकाका देखणे आहेत? तू चष्मा काढला होतास का झोप कमी झाली होती तुझी??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू चष्मा काढला होतास का झोप कमी झाली होती तुझी??
नाही गं.. हे त्यांचे स्वतःचे मत आहे म्हणून सांगितले ना!!! ते केस आधी बांध बघू नीट... सगळ्यांना वाईट सवयी लागल्या आहेत. आणि तेव्हा मी टक्क जागी होते.. आता बॅकग्राउंडला काहीतरी आवाज येत होता.. त्यामुळे मला नीट ऐकूच आले नव्हते आधी.. तो गं तो आवाज.. मी रेकॉर्ड करून व्यनि केलेला... आता मात्र लै मार खाणार आहे मी.. कुठल्या काकांना शरण जाऊ???? :(

In reply to by मस्त कलंदर

तू आज रंगरावांना शरण जा! तेही सहजकाकांना 'देखणे' म्हणताहेत आणि रेकॉर्ड केलेल्या आवाजात त्यांचा काही हातही नाहीये. माझे केस ना? व्यवस्थित बांधून घेतले आहेत आणि मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तू आज रंगरावांना शरण जा! नको. रंगरावांना कुणी पाशवी व्यक्ती शरण गेल्याचे रेवतीआत्यांना आवडणार नाही.

In reply to by मिसळभोक्ता

हा हा हा... रेवतीतै या स्त्री या न्यायाने त्याही पाशवीच की हो... आता तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ते स्पष्ट करा... रेवतीआत्या पाशवी नाहीत की त्या रंगाकाकांना शरण जात नाहीत... ;) (आता सगळे मिळून मारतील मला.. पळाssssssss)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. पाशवी शक्तींमुळेच मिभोंना हे शक्य झाले. २० जणांनी मिळून हा धागा टोप २५ मधे आणला. नेहमीचे ही & ही मिपाकर (पक्षी: परा, नाना वगैरे वगैरे) नसुनही हे शक्य झाले याचाच अर्थ पाशवी शक्तींचा प्रभाव. आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली! ही म्हण मिपाच्या समृद्ध भांडारात यायला प्रत्यवाय नसावा. मिभोकाकांचे अभिनंदन!

बोर्डात आलेल्या सर्व गुणीजनांचे हार्दिक अभिनंदन ...बंगलोर, बिजिंगवर लक्ष ठेवता ठेवता मिपा बोर्डावर पण डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणार्‍या मिभोंचेही अभिनंदन.

In reply to by पुष्करिणी

+१ बोर्डात आलेली व्यक्तीच बोर्डात आलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना पाहून गळॅ दाटूण आला, डॉळॅ पाणावले. लाराकथेतील पराकुमार यांचे उत्तुंग अभिनंदन. आपल्या पुढील लेखनाससुद्धा भरभरुन प्रतिसाद लाभो ही इश्वरचरणी प्रार्थना! सहजकाकांचे जोरदार अभिनंदन. उसाच्या देशात असा मान मिळवल्याबद्दल ऑफशोअर वरील तमाम मिपाकरांचा ऊर दाटून आला असेल याची खात्री! जर परा हे लारा असतील सहजकाकांना 'व्हिव रिचर्ड्स'अशी पदवी मिळावी ही विनंती! स्पा यानी एक लेखनाचा एक नवा आयाम खुला करुन दिला आणि त्याद्वारे पदार्पणातच दैदीप्यमान सेन्च्युरी ठोकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! या सगळ्या सांख्यिकीबद्दल मिभोकाकांचे वैयक्तिक आभार! सार्वजनिक आभाराचे लिखाण करण्यासाठी जागा राखून ठेवत आहे. --असुर

स्वगत मोड : च्यायला, गेला काय आमचा पहिला नंबर. खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल, पब्लिक कायबी धागे काढते आणि लोक त्याला टाळ्या वाजवतात... काय ३०० चे कौतुक करायचे ? पराचे स्वतःचे प्रतिसादच ५० असतील, शिवाय नान्या आणि पुप्याची बेरीज पण ८० च्या खाली नाही. तसे बरेच अवांतर प्रतिसादही आहेत, लोकांना पण नुस्ता दिखावा लागतो. क्वालिटी बघा लेको क्वालिटी, छ्या, साला आपला मुडच गेला एकदम .... मिभोकाकांना प्रतिसाद देणे आता बंद करतो, फुडच्या वेळी झाडावरच जाऊन बसतो. लगेच धागा काढायची काय गरज होती का ? च्यायला आपल्या कंपुतल्या माणसाला संभाळुन घ्यायचे राहिले बाजुला, जाऊ दे, आपला मुडच गेला साला ! जाहिर मोड : पराचा पहिला नंबर आला ह्यात आम्हाला आनंदच आहे, 'इतिहासाचे पुनर्लेखन' ह्यासारख्या धाग्याने पहिला नंबर गाठणे हे मिपासाठी भुषणास्पद बाब आहे. मी तर म्हणेन की ह्या धाग्यामुळे त्या गुणवत्ता यादीचा सन्मानच झाला. मी गुणवत्ता अशासाठी म्हणतो आहे की प्रतिसादांच्या संख्येपेक्षा मला त्यातला कन्टेन्ट अधिक भावला, एक ऐतिहासिक काम झाले व अशा धाग्याचा प्रवर्तक असणार्‍या पराचा उचित सन्मान करण्याचे औचित्य दाखवणार्‍या मिभोकाकांचेही मी शतशः आभार मानतो. धन्य ते मिपा ... धन्य तो परा आणि धन्य ते मिभोकाका !!! - ( दुटप्पी ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अगदी पुलंच मी आणि माझा शत्रु पक्ष आठवल ब्वॉ!

In reply to by छोटा डॉन

खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल, पब्लिक कायबी धागे काढते आणि लोक त्याला टाळ्या वाजवतात...
काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय?

In reply to by श्रावण मोडक

>>काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय? ह्या बाबीवर आम्ही "टाळ्या आणि दणके" ह्या शेप्रेट लेखाद्वारे भाष्य करु ;) आज काही आमची मनस्थिती ठीक नाही, तुर्तास रजा घेतो :)

In reply to by छोटा डॉन

"टाळ्या आणि दणके"
टाळ्यांच्या संदर्भात, दणके? :) त्याविषयी लिहितात? ते देतात ना फक्त? पण लिही. लिही. वाट पाहतोय. ता. क. (म्हणजेच नंतर सुचलेलं) : प्रतिसादातील दणके याविषयी लिहिताना मिभोकाकांचंच व्यक्तिचित्र व्हायचं. तसं नको करू. व्यक्तिचित्र हा एक कॉपीरायटेड प्रकार आहे!

In reply to by श्रावण मोडक

टाळ्या? म्हण्जे श्रामो, ते "एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है" ते काय हो?? (स्पष्टलाडू) अदिती

In reply to by छोटा डॉन

वा बंगलोरला असणारा धोका, म्हणजेच,चोता दोन, आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर ! भविष्य उज्ज्वल आहे.

In reply to by मिसळभोक्ता

>>आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर ! तयारी चालु आहे ... सध्या पुण्यातल्या 'घराच्या वाढत्या किमती, घरमालकांची वाढती मग्रुरी आणि मस्तवालपणा' आदी विदाचे संकलन चालु आहे. सकाळीच फेसबुकावरुन मदतीचे आश्वासन आले आहे, लेट्स सी काय होते ते. फक्त आता पुण्यात आमचा 'थातुरमातुर करुन गंडवण्याचा धंदा' चालतो की नाही इतकीच काळजी आहे, कारण तिकडे सगळेच तसे, मग आम्हाला कोण विचारणार ? ;) - ( धावपळीतला ) छोटा डॉन