Skip to main content

एक पाहुणी पोरगी ...

लेखक वैभव देशमुख यांनी शनिवार, 31/07/2010 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक पाहुणी पोरगी पाणी शेंदायला येते आणि जराश्या उन्हानं फूल पळसाचं होते कसे खुणावती डोळे कसे खुणावती हात जणू अंधार राहतो आजूबाजूच्या डोळ्यात आडापुढची खिडकी मुका हवेत सोडते आणि पाहुण्या पोरीच्या मनी मोहोळ फुटते ..सारा दीस आडावर तरी भरे ना घागर एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर.. वैभव देशमुख
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4981
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

In reply to by लिखाळ

पुणेकर स्व् तःक्डे नसलेली वस्तु माग् णर मी पुणेक़र नाही

जराश्या उन्हानं फूल पळसाचं होते ही ओळ फारच आवडली बॉ. पण ही पाहुणी ओळखीची का वाटते आहे हे कळत नाही. आधी जालावर प्रसिध्द केली होती का ? कदाचीत मनातल्या पाहुणीला शब्दरुप मिळाल्याने ओळखीची वाटत असावी.

In reply to by चित्रा

बाय द वे, सहमत असण्याला "+१" चे रूप देण्यात आमच्या एका परममित्राचा हात आहे, असे कळते.

पहिलं आणि चौथं कडवं विशेष आवडलं. थोड्याशा उन्हाने मोहरून जाणं... वा. दुसऱ्या कडव्यात मात्र डोळ्यांत ती उन्हं देणारा सूर्य न राहाता अंधार का राहातो हे कळलं नाही. असंच ताजंतवानं लिहीत राहा.