✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(बट डोईवरि बट झुलते तरि)

र — राजेश घासकडवी, Wed, 07/28/2010 - 06:25

प्रतिक्रिया द्या
4506 वाचन

💬 प्रतिसाद (16)

छान चालू आहे........!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/28/2010 - 07:23 नवीन
डान्याच्या बटा कविताचा विषय झाल्याचा पाहून आनंद झाला. :) केले कर्तन, पुरे एवढे घाव बटांवर दिले केवढे दे राहू काही बटांना, न्हावीलाला रे हे तर भारीच आहे. :) अवांतर : ’न्हावीलाला रे ला न्हावीलाल” वाचल्यावर ’नंदलाला रे नंदलाला” असे वाचतोय असे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डानरावांनी हलकेच घेणे ही विनंती

राजेश घासकडवी
Wed, 07/28/2010 - 08:00 नवीन
लिहायची राहून गेली. खेळीमेळीत, थोडी गंमतजंमत करण्याच्या उद्देशानेच लेखन केलेलं आहे. स्वसंपादनाची सोय नसल्यामुळे 'डानरावांना आवडली नाही तर उडवीन' म्हणण्याची सोय नाही. परंतु त्यांनी एका अक्षराने देखील तसं कळवलं तर 'संपादक मंडळ'ला उडवण्याची विनंती करीन.
  • Log in or register to post comments

त्याच उच्चाराचा दुसरा इंग्रजी

विजुभाऊ
Wed, 07/28/2010 - 16:33 नवीन
त्याच उच्चाराचा दुसरा इंग्रजी शब्द butt - नितंब, ढुंगण, पार्श्वभाग या अर्थाचा आहे. योग्य अर्थ वापरला जावा म्हणून ही तळटीप हा अर्थ लावून सर्व कविता वाचू नये अशीही एक तळटीप द्यावी म्हाराज =)) 'संपादक मंडळ'ला उडवण्याची विनंती करीन. या वाक्यात "ला " वाचलाच नाही :D .....वाचून मी बसल्या जागी उडालो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

=)) =)) लै भारी गुर्जी.

Nile
Wed, 07/28/2010 - 08:14 नवीन
=)) =)) लै भारी गुर्जी. प्रस्तावनेच फुटलो.;-) बट ह्या शब्दाचे इतर अर्थ लावुनही कविता अर्थपुर्ण झाली आहे. =)) म्हणजे बट, पण परंतु वगैरे. ;-) बाकी आख्ख्या मराठी आंतरजालावर प्रसिद्ध अश्या बट बद्दल कविता निर्माण होणे क्रमप्राप्तच होते. आज ते झालेले पाहुन डोळे पाणावले. ;)
  • Log in or register to post comments

कर्तनकाव्य आवडले

अडगळ
Wed, 07/28/2010 - 08:22 नवीन
कर्तनकाव्य आवडले. आजपर्यंतचा आमचा अनुभव असला लिरिकल वगैरे नाही . म्हणजे पुरुषमनाची कुतरओढ (की कातरओढ )चित्रित करणे वगैरे. थेट, कट कानावर , कट मानेवर, मारी रंधा , न्हावीदादा , न्हावीदादा रे . उजळुन दे बा माझी कवटी, परज तुझी वस्तारा वाटी, सोडू नको एकाला ,न्हावीदादा , न्हावीदादा रे .
  • Log in or register to post comments

जेव्हा तुझ्या बटांना ...

मुक्तसुनीत
Wed, 07/28/2010 - 08:24 नवीन
हाहाहा डॉन्या तुझ्या बटांना म्हणती "मुजोर" मामा वर्षांत नाही वारी , न्हावी बसे रिकामा ! आरशापुढे सदैव , करिशी बटेची नक्षी वरडून बोंब येई, "फूटबॉल खेळ आक्षी !" कार्ट्यांस नाही झोपा , मीपावरी हमामा वर्षांत नाही वारी , न्हावी बसे रिकामा ! ;-)
  • Log in or register to post comments

च्यायला ...

छोटा डॉन
Wed, 07/28/2010 - 08:31 नवीन
धन्य ते गुर्जी आणि धन्य ती गुर्जींची अभिव्यक्ती ... कविता पाहुन अंमळ थोडे केस गळाले. :( ( काय म्हणता, पुण्यात युनिव्हर्सिटी चौकात मिठाई वाटण्याच कार्यक्रम चालु आहे ? ) बाकी चालु द्यात, आज आम्ही किंचित बिझी आहोत ... दुपारनंतर येऊ आरामात, आज केसाने एकेकाचा गळाच कापतो ;) अवांतर : आक्षेप असायचे कारणच नाही, खेळीमेळीतच घेतले आहे, चालु द्यात.
  • Log in or register to post comments

झक्कास

क्रेमर
Wed, 07/28/2010 - 09:15 नवीन
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा बटबटीत आविष्कार आवडला. _____ Sticking feathers up your बट does not make you a chicken. - (बटकेस) Chuck Palahniuk
  • Log in or register to post comments

भीषण, भयानक

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/28/2010 - 10:12 नवीन
गुर्जींकडून भयानक विडंबन, वर अडगळ आणि मुसुमास्तरांकडून त्याला भीषण विडंबनरूपी पाठींबा! बरं गुर्जी, ते कवितकाच्या धड्यांचं पुढे कुठवर आलंय? =)) =)) =)) डान्रावांच्या बटा येवढ्या प्रसिद्ध झालेल्या पाहून आम्हाला व्यक्तिशः अतिशय आनंद झाला. अर्थातच त्यांचे जुने दु:खद अनुभव (लिंक आहे) आठवून तेवढेच किंबहून केसभर जास्त दु:खही झाले -- राको. अदितीताई अवखळकर पाटील.
( काय म्हणता, पुण्यात युनिव्हर्सिटी चौकात मिठाई वाटण्याच कार्यक्रम चालु आहे ? )
हे मात्र तद्दन चुकीच्या माहितीवर आधारलेले अतिशय बेसलेस विधान आहे याची कृपया डान्रावांनी नोंद घ्यावी. डान्रावांनी आपले 'चारों तरफ फैले हुए आदमी' नीट पारखून मगच त्यांची निवड करावी ही नम्र विनंती!
अवांतर : ’न्हावीलाला रे ला न्हावीलाल” वाचल्यावर ’नंदलाला रे नंदलाला” असे वाचतोय असे वाटले.
प्राडॉ, तुम्हाला "नंदलाला" आठवलं आम्हाला "डिंगूलाला"! तुमचा अभ्यास कविता, गाण्यांचा, आमचा खरडवह्यांचा!! शेवटी ज्याचा त्याचा अभ्यास .... हेच खरं नाही का? ;-)
  • Log in or register to post comments

मास्तर

श्रावण मोडक
Wed, 07/28/2010 - 13:17 नवीन
मास्तर बिघडेल आहे हा ठार! ;) बंटास लिवलंय.
  • Log in or register to post comments

श्री. घासकडवी!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/28/2010 - 14:09 नवीन
आजवर केवळ पुरूषांच्या मंगळागौरीतच अडकून पडलेला पण समस्त पुरूषवर्गाच्या जिव्हाळ्याचा असलेला हा विषय तुम्ही असा जाहिर पणे चर्चिला आणि ऐरणीवर आणल्यामुळे तुमचे अभिनंदन. आम्ही लवकरच 'बटीफटीच्या गुजगोष्टी' हे नवीन मुक्तनाट्य बघायला जाणार आहोत. त्यात म्हणे प्रेक्षकांना पण 'बट!!! बट!!!' असे जोरात ओरडावे लागते. आता आम्हाला तसे चारचौघात बोलताना अजिबात लाज वाटणार नाही. आपण एक महान काम केले आहेत. धन्यवाद. अवांतर: आणि बट डोईजड होता कामा नये, शेवटी डोक्याने मी विचार करतो ना... डान्रावांना प्रेमाचा सल्ला... विचार शेवटी करण्यापेक्षा आधीच केला तर आयुष्य बरेच सुखकर होईल. ;)
  • Log in or register to post comments

'बटीफटीच्या गुजगोष्टी'

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/28/2010 - 16:17 नवीन
'बटीफटीच्या गुजगोष्टी' बटीतोटीच्या जुजगोष्टी कशे वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खल्लास

नंदन
Wed, 07/28/2010 - 14:15 नवीन
विडंबन. अशा प्रसंगी न्हाव्याला मात्र या 'कातर'वेळी हे गाणंच बहुतेक सुचत असेल ;)
  • Log in or register to post comments

कवितेपेक्षा शेवटचे डिस्क्लेमर

मराठमोळा
Wed, 07/28/2010 - 16:35 नवीन
कवितेपेक्षा शेवटचे डिस्क्लेमर वाचुन फुटलो... (वाचकांना मुद्दाम प्रोत्साहन दिल्यासारखे वाटले.. ) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हुच्च रे राजेशा!!

चतुरंग
Wed, 07/28/2010 - 17:47 नवीन
खंप्लीट वंटास लिखाण! ;) बटरंग
  • Log in or register to post comments

हा हा..

केशवसुमार
Wed, 07/28/2010 - 19:59 नवीन
राजेशशेठ, मस्त विडंबन.. बट डोईवरि बट झुलते तरि हे आम्ही बट डोईवर बट डोळ्यावर असे वाचले आमच्या घट पोटावर घट कमरेवर विडंबनाची आठवण झाली मुसुशेठ, वर्षांत नाही वारी , न्हावी बसे रिकामा ! ज ब रा आहे..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा