शौर्य हा खरोखरच खुप छान चित्रपट आहे. मुळात मला राहूल बोस आवडत असल्यामुळे या हा चित्रपट पाहणार हे नक्की होतं. केके मेनन (ब्रिगेडीअर प्रताप) चा अभिनय तर उत्तमच. शेवटी ब्रि. प्रतापची साक्ष घेतानाचा त्याचा एक १० -१२ मिनीटाचा सलग संवाद आहे. एका संतूलित, सर्वं गोष्टी आपल्या पकडी खाली असायला हव्यात आणि आपण म्हणजे मुर्तीमंत शौर्य आहोत असं मानणार्या ब्रि. प्रतापचा एका दुखावलेल्या बापात आणि त्याच मुळे मुस्लीमद्वेष्ट्या अधिकारार्यात झालेला बदल त्याच्या चेहर्यावर दिसतो. ( पैसे वसूल )
एकूनच चित्रपट छान झाला आहे. मनिषा लांबाचा लुक नवा आहे. जावेद जाफरी कसलाही आचरटपणा न करता काम करतो. चित्रपटात दोन तीन आणि तीही समयोचित गाणी आहेत.
शेवटचं शाहरूखच्या आवाजातील शौर्य क्या है तर एकदम झकास.
नीलकांत
उत्तम परीक्षण...पण कथा उघड झाल्यामुळे प्रत्यक्ष पहाताना तेवढी उत्सुकता राहणार नाही.
केके हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे पहायलाच हवा.
तर आता प्रश्न असा येतो की शौर्याचा याच्यशी काय संबंध ? ........
हे विश्लेशण आवडले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
चांगला पिक्चर दिस्तोय्,पण इथे अजुन वितरित झालेला नाहिये.
एकुण ष्टोरि लाइन पाहिली तर आणखी एक "हट के" सिनेमा आठवतो
"एक रुका हुआ फैसला" तिथेहि काही ज्युरि मिळून एका केसच्या फारश्या खोलात न जाता
एका आरोपिला बेधडक फाशीचि शिफारस करणार असतात .पण नेमका एक ज्युरी,डोके
ताळ्यावर ठेउन विचार करतो आणि एक एक घटना उलगडत जाते.
तसचं लष्करातील (जातीय)भेद भावावर आधारीत एक नाटक "सह्याद्रि" चॅनेल वर १५ औगष्ट ला
लागलं होतं २-५ वर्षा पूर्वि.
साठ्यांचे कार्टे.
अहो छोटा डॉन साहेब,
समीक्षा चांगली आहे पण सगळी केल उलगडून सांगितल्यामुळे चित्रपटगृहात पैसे खर्च करून आणि घरी सीडी पाहायची म्हंटली तरी वेळ खर्च करून तो पाहण्याची उत्सुकताच तुम्ही संपविलीत. प्लीज, पुढच्या वेळी असे करू नका. रहस्यभेद केल्याशिवाय समीक्षा करून वाचकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याच्या कौशल्याला प्राधान्य द्या. बाकी समीक्षेमागील भावना समजण्यासारखी आहे.
वर दिलेल्या कथेवरून हे "अ फ्यू गुड मेन" या टॉम क्रूझ, जॅक निकल्सनच्या चित्रपटाचं भारतीयीकरण (हिंदू-मुस्लिम,जातीय दंगली वगैरे) वाटतं आहे, पण डॉन्याने रेकमेंड केलाय तर जरूर सीडी बघू....
-डांबिसकाका
भारतीय सैन्यदलाच्या काहीश्या काळ्याबाजूला उघड करणारा (कि॑वा भारतीय सैन्याधिकार्याला खलनायक दाखविणारा) चित्रपट सेन्सॉरने म॑जूर कसा काय केला? शिवाय सैन्याशी निगडित चित्रपट असल्याने निर्मितीत प्रत्यक्ष सैन्याचीसुद्धा मदत (व स॑रक्षण म॑त्रालयाची परवानगी) लागली असणारच..कारण भारत सरकारचे सर्वसाधारण धोरण असेच आहे..मला आठवते आहे 'माचिस' ला पुष्कळ पोलिस अधिकार्या॑नी (विशेषतः केपीएस गिल) आक्षेप घेतला होता.
मला असा प्रश्न पडण्याचे मुख्य कारण माझ्या (व इतर शेकडो मराठी वाचका॑च्या) अत्य॑त आवडीच्या 'रार॑ग ढा॑ग' काद॑बरीवर आधारित चित्रपटास आर्मीने दिलेला नकार हे होय. मी ती काद॑बरी वाचता॑ना एखादा चित्रपटच पाहतो आहे असे वाटले होते (कारण अर्थात प्रभाकर पे॑ढारकर हे उत्तम दिग्दर्शकही आहेत) व मला ह्या कथानकावर कुणीतरी चित्रपट काढावा असे तीव्रतेने वाटले होते. मी नेमका हाच प्रश्न प्रत्यक्ष लेखका॑ना जे॑व्हा विचारला ते॑व्हा मला त्या॑नी असे सा॑गितले की एका निर्मात्या॑नी हे कथानक (स्क्रिप्ट) स॑रक्षण मुख्यालयात परवानगीसाठी दिले होते पण आर्मी इ॑टलिजन्स विभागाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्यातील एक अधिकारी पुढे लेखका॑स प्रत्यक्ष भेटले ते॑व्हा कथानक त्या॑ना व्यक्तिशः आवडल्याची कबूलीही दिली पण हेही आवर्जून सा॑गितले की 'ही कथा टिपिकल आर्मी मानसिकतेवर प्रहार आहे जो आर्मीला रुचणार नाही, सबब प्रकरण नाम॑जूर'.
मला वाटते ह्याच विषयावर पे॑ढारकर या॑नी २००७ सालच्या कुठल्याश्या दिवाळी अ॑कात लेखही लिहिला आहे.
मला मु॑बई-पुणे द्रुतगती मार्गाचे बा॑धकाम पाहण्याची स॑धी मिळाली होती तेव्हा रार॑ग ढा॑गची खूप आठवण आली. असे वाटून गेले की अनायसे पहाड फोडून रस्ता करण्याचे काम चालूच आहे ते॑व्हा रार॑ग ढा॑गवरील चित्रपटाचे चित्रिकरण का करू नये :)
अरे काय आठवण करून दिलीत तुम्ही डॉक्टर.. खरच ह्या कादंबरीवरचा सिनेमा अफलातून होईल..
धनंजयच्या जुन्या दिवाळी अंकात (२००५) पेंढारकरांनी एअरफोर्स साठी पॅरा ट्रेनिंग वर लघुपट केला होता त्याचे अनुभव लिहिले आहेत,ते पण असेच थ्रिलिंग आहेत..
स्वाती
मस्तच रे!
आयला, तू आपल्या अभिजीत भाऊच्या पोटावर पाय द्यायच्या विचारात आहेस की काय?
निस्तं परिक्षणांवर परिक्षणं !! ती पण व्यवस्थित...फुटकळ प्रतिक्रियांसारखी नव्हे! छान छान...अशीच प्रगती कर हो :)
बाकी, के के मेनन आपल्याला आवडतोच...राहूल बोसच्या बाबत तर काय बोलायचं?
तू ष्टोरी उलगडवली असलीस तरी हरकत नाही..आपण फक्त के के आणि राहूल बोसचं काम बघायला जाणार!!!
-(फुटकळ प्रतिक्रियेपुरता उरलेला) ध मा ल.
यावेळेस लेखनशैलीतला फरक वाखाणण्या जोगा आहे, अंडरलाईन्स - बोल्ड फेसिंग वापरण्याचा मोह टाळला आहे, त्यामुळे यावेळेसचा लेख अधिकच आवडला. अभिनंदन. कथा सांगुन चुक नाही केलिस पण 'स्पॉईलर अलर्ट' टाकायला हवा होता. पुढचे परिक्षण टाक लवकर.
शौर्य : सुंदर चित्रपट
मी वरील लेख न वाचता, मुव्ही पाहीला..
छोटा डॉन यांनी परीक्षण छान केले आहे, पण शेवटचा परिच्छेद त्यांनी टाळायला हवा होता.....
कारण त्यामुळे सिनेमाचा सस्पेन्स कळतो..:)
सिनेमा पाहताना कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. सर्वांची कामे मस्त झाली आहेत, राहुल बोस चे काम छान, कधी नव्हे ते जावेद जाफरी चे काम आवडले.
२ गाणी श्रवणीय आहेत.
बर्याच वर्षापूर्वी "ब्रिगेडीयर प्रतापचा" अख्ख्या कुटुंबाची एका जातीय दंगलीत त्यांचाच नोकराकडून म्हणजे "जमाल" कडून निर्घूण हत्या होते
ते नाव जमील आहे.
कालच शौर्य पाहिला. अतिशय सुरेख चित्रपट. कुठल्याही दृश्यात भडकपणा, सवंगपणा जाणवत नाही. राहुल बोस, केके मेनन यांनी नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केलाच आहे पण जावेद जाफ्रीनेही आचरटपणा केलेला नाही कुठेही, अर्थात त्याला अशी भूमिका तरी कुठे मिळालीय म्हणा आधी!!
न्यायालयातल्या शेवटच्या दृश्यात केकेने अप्रतिम अभिनय केलाय!! एकदम सही!! त्याच्या चेहर्यावरचे झरझर बदलणारे भाव म्हणजे, अभिनय कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणायला हरकत नाही!! मोझर बेअरने या सिनेमाची डीव्हीडी काढली आहे. संग्रही ठेवावा असा चित्रपट आहे.
प्रतिक्रिया
उत्तम चित्रपट
डॉनराव
अरे वा!
हम्म..
शौर्य....
सहमत
जरुर पाहीन
जरुर पाहीन
:))
येस, मलाही असेच वाटत होतं डांबिसकाका!
:))
:))
सुभानल्ला!
आश्चर्य आहे
रारंगढांग!
सुरवातीला आवडला...
अभिनयसंपन्न
हे काय परिक्षण आहे?
डॉन्या....
असेच म्हणतो
खरे आहे...
कालच शौर्य