Skip to main content

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 01/07/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : १. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा. २. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत. वि. सु. : फुटबॉल वर्ल्डकपच्या निकालानंतर इथे निवडल्या गेलेल्या "बेस्ट टीम ऑफ मिपाकर फॉर फुटबॉल" ह्याला मिपाच्या 'फिफापानाच्या मुखपॄष्ठावर ( जमल्यास ) " स्थान दिले जाईल. असो. काय मग ? फुटबॉल वर्ल्डकपची मज्जा घेत आहात ना ? तुमची कोणती तरी फेव्हरिट टीम असेल, आवडते खेळाडु असतील, आवडते फॉर्मेशन असेल, आवडता गेम्-प्लान असेल वगैरे वगैरे ... अहो मग तेच सगळे निकष लावा ना आपल्या मिपाकरांबद्दल. येऊ द्यात तुमची 'फुटबॉल टीम आपल्या मिपाकारांचा समावेश असलेली' , सोबत तुम्हाला एक फॉर्मेशन आणि त्या टीमचे प्लेयरच्या पोझिशन्स आणि इतर डिटेल्स द्यावे लागतील. माझी टीम झाली देतोच आहे व त्यातल्या दिलेल्या माहितीच्या आधारावर शेम टु शेम तशीच तुमची टीम येऊद्यात. जस्त स्पष्टीकरण जमत नसेल तर निदान नावे आली तरी हरकत नाही त्यांच्या पोझिशन्ससह. तुम्हाला एकुण " ११ + ७ ( राखिव आणि ऐच्छिक ) = १८ खेळाडु" इथे द्यायचे आहेत. दुसर्‍या संघात आलेले खेळाडु पुन्हा वापरायला परवानगी आहे. सोबत फॉर्मेशन आल्यास उत्तम ... येऊ द्या मग तुमची टीम ... खास आपल्या मिपाकरांनी बनलेली !!! :) *** आमची टीम : १. फॉर्मेशन : आमचे नेहमीचे आवडते ४-४-२. त कसे असते आणि त्यात कोण कुठे असतो ते खालिल चित्रात पहा म्हणजे त्या आधारे आम्ही कोणते प्लेयर त्यांच्या कुठल्या क्ल्वालिटीसाठी निवड्ले ह्याचा तुम्हाला अम्दाज येईल व तुम्हाला तुमची टीम बनवणे सोपे जाईल. ;)
* गोली / किपर : १. नीलकांत : सांगायची गरज नाही, मिपाचे रक्षण करण्यात ह्या माणसाएवढे कष्ट घेणारा अजुन दुसरा कोणी माझ्या पाहण्यात नाही २. तात्या अभ्यंकर : अगदीच गरज पडली तर नीलकांतची रिप्लेसमेंट म्हणुन आम्ही पोझिशनला तात्यांना खेळवु .. बाकी तात्यांची स्वतःची अशी खास वेगळी पोझिशन आहे ती पुढे येईलच ;) * सेंटर बॅक डिफेंडर्स : ह्यांचे काम असते ते हल्ले रोखणे व ते गोली किंवा गोलपोस्टापर्यंत जाऊ न देणे. तसेच चाली रचण्याची व डाव खेळण्याची सुरवात ह्यांच्यापासुनच होते. कुठलाही संघ 'मजबुत' हवा असेल तर त्यात चांगले सेंटर बॅक असणे आवश्य्क असते. १. बिपिन कार्यकर्ते २. रामदासकाका ३. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे एकदम मजबुत बचवफळी, कुठल्याही वेळेला हमखास 'बचाव' करुन बाजु संभाळतील असा विश्वास. मुख्य सामन्यात आम्ही ह्यातले २ जण खेळवु ... * साईड बॅक : हे पण खरे तर डिफेंडर्सच, ह्यांचेही काम बचाव करणे हेच असते. पण ह्यांच वेगळा रोल अशासाठी की जेव्हा वेळ येते तेव्हा बचाव सोडुन ह्यांना "आक्रमण" ही संभाळावे लागते, समोरच्याला एखादा 'झटका' देऊन त्याची बोलती बंद करावी लागते, मधल्या फळीशी ताळमेळ ठेवावा लागतो, असे हे बहुआयामी 'साईड बॅक्स' ... १. चतुरंग ( राईट बॅक ) २. विकास ( लेफ्ट / राईट बॅक ) ३. नितीन थत्ते ( आवर्जुन लेफ्ट बॅक ) * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : ह्यांचे एकच काम, सगळीकडे लक्ष ठेवणे आणि कुठे काय कमी पडते आहे हे पाहुन त्यानुसार योग्य ती अ‍ॅक्शन घेणे. बचावफळीला अणि आघाडीला सारखेच महत्व देणारे टीमचे मजबुत खांदे. हे जर चांगले नसतील तर टीमचा बाजार उठलाच समजा ... १. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम ) २. मुक्तसुनित ह्यातला '१' आम्ही फायनलला खेळवनार * मिडफिल्डर्स : मधल्या फळीतले आणि संघाच्या 'प्रगती'चे काम पाहणारे धुरंदर, मधली फळी दमदार असेल तरच संघ उभा राहतो. नवनवीन चाली रचणे, डावपेच रचणे, आघाडीला प्रोत्साहन आणि मदत देणे, गरज पडल्यास स्वतः आघाडीला धावणे, आघाडीच्या योग्य त्या आसामीस पाठिंबा देणे व त्याच्याकडुन हवा तो रिझल्ट मिळवणे. मिडफिल्डर्स म्हणजे संघाचा कणा, मजबुत असायलाच हवा ... १. सहजराव २. भडकमकर मास्तर ३. धमाल मुलगा ( ह्यात अज्जिबात पार्शिलिटी नाही, जरा त्याच्या खव पहा आणि सांगा त्याने किती माणसे जोडली आहेत व तो कसे सगळ मॅनेज करतो ते ) ह्यातले आम्ही "२ " जण मुख्य सामन्यात खेळवणार * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : नावातच सगळे आहे, म्हणले तर मिडफिल्डर्स पण कधी पुढे जाऊन 'हल्ला' करुन समोरच्याचा डोक्यावर शॉट काढतील ह्याची खात्री नाही. सपोर्ट आणि अ‍ॅटॅक ह्याचा उत्तम समतोल असणारे हे आसामी ... १. अवलिया ( सर्वात बेश्ट, खरे तर स्ट्रायकरच व्हायचा पण मधुन आधुन 'विधायक' कामे करतात म्हणुन मिडफिल्डला टाकला ) २. अदिती ह्यातला "१" जण मुख्य सामन्यात खेळेल. * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : बेधडक घुसणे, कसलाही विचार न करता समोरच्यावर बिनधास्त हल्ला करुन मैदान मारणे, खेळ गाजवणे, समोरच्याचा पार चिंध्या चिंध्या करणे, मध्येच एखादा धडाकेबाज फटका मारुन 'प्लेयर ऑफ द डे' होणे अशी ह्या स्ट्रायकर्सची नाना कौशल्ये. माणुस मात्र दमदारच हवा, बाकी थोडे "अ‍ॅडज्स्ट" करता येते. तापट आहे, हरकत नाही. पटकन निराश होतो, हरकत नाही, पण माणुस रिझल्ट ओरियंटेडच हवा ... असे हे स्ट्रायकर्स १. तात्या अभ्यंकर ( जेव्हा गोली असलेला कांता फीट असतो तेव्हा हे बिनधास्त स्ट्रायकर म्हणुन खेळु शकतात व समोरच्यावर आरामात हल्ले करु शकतात ) २. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर ) ३. टारझन ( एक भरपुर टॅलेंट असलेला एकदम तरुण स्ट्रायकर, पण जरा 'पेशन्स' कमी, बर्‍याच वेळा रेडकार्ड घेऊन बाहेर जातो व पुढची मॅचही बेंचवर बसुन पहातो , पण ज्या दिवशी खेळेल तो दिवस त्याचाच ) मेन सामन्यात आम्ही ह्यातले "२ जण" खेळवु ... तर अशी आहे आमची टीम ! कोण आहे का आम्हाल चॅलेंज देऊन आमच्या टीमशी २ हात करायला ? आहे का कुणाची हिंमत ? असेल तर येऊद्यात तुमची टीम, वाट पहातो आहे ... - ( मॅनेजर ) डॉन्या मुर्‍हिनो तळटीप : वर नावे घेतल्यापैकी कुणाला आक्षेप असल्यास तसे आम्हाला कळवावे, माफीसह नाव मागे घेतले जाईल. आपल्यातल्या क्वालिटीज ओळखुन आपला समावेश आमच्या टीममध्ये केलेला आहे. असो. वि.सु. : धागा केवळ मौजमजेपुरताच मर्यादित रहावा ही पुन्हा एकदा आग्रहाची विनंती !!!

वाचने 19589
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by छोटा डॉन

कोणते नियम??? आम्ही फिफाचे विश्वस्तरीय नियम पाळलेले आहेत.... बाकीचे फाट्यावर..

गुर्जींनी म्हणे एकदा गोल करायचा ट्राय केला ... पण तो हांपर लोकांना कळलाच नाय .... तं गुर्जी त्यांना "मठ्ठ" म्हणाले =)) त्यानंतर गुर्जींना काय हुक्की आली .. त्यांनी हांपरच्या खीशातनं रेडकार्ड काढलं आणि स्वतःलाच देऊन घेतलं =)) =)) =)) सगळ्या प्रेक्षकांचे गैरसमज झाले :) बाकी आम्ही "णवख्या" पिलियर्स ला घेऊन टिम बनवतोय ... तेंव्हा थोडावेळ थांबा ... टीम जिंकण्यासाठी खेळत नाही आमची :) - टारझन कापुर

आमचा गोलटी : तात्या तात्याला आम्ही गोलामधे एक पोतंभरुन पानं भरुन देणार ... म्हणजे तात्या सरकार गोलच्या आजुबाजुला पच्याकपच्याक थुंकुन ठेवणार =)) सगळे प्लेयर्स घसरुन आपटणार आणि रिटायर्ड हर्ट होणार ... थोड्यावेळानं कळलं समदे खपलेत आणि फक्त दोन गोल्टी उरलेत =)) म्याच ड्रा =)) हा ड्रा आमच्यासाठी विजयासारखा आहे. रक्षक गटात : नाडीकांत रॉक नाडिकांत बचाव करताना लोकांच्या नाड्या बांधणार =)) ना रहेगा स्ट्रायकर .. ना होंगा गोल =)) ड्रा !! रँडम खेळाडु : अमिबा२१० ह्याला आम्ही डोळ्यांना पट्टी बांधुन गोलगोल फिरवुन मैदानात सोडणार .. कुठे जायचं कुठे गोल करायचा कश्श्शाचाही पत्ता नसताना ड्रंकन मंकी टेक्निक ने फुटबॉल खेलुन रेफ्रीसकट सगळ्यांना कनफ्युज करुन ९० च्या ९० मिनीटं (एक्स्ट्रा टाईम सकट) पुर्ण वाया घालिवणार गोल करण्याचे पोकळ प्रयत्न करण्यासाठी : गोलकर्मी ह्यांना आम्ही स्पेक्टेटर्स ची संख्या मोजणे , कोणत्या देशातनं किती प्रेक्षक्स आले ... शिवाय जाहिराती करुन सपोर्टर्स जमवने आणि जमल्यास खेळल्यासारखे करणे अशा रणनीतीने उतरवु :) टिम पिलियर्स ला टॉवेल पाणी पुरवायला एका IIहमालII -( शक्यतो ||श्री म्हसोबा प्रसन्न|| असावा) ची गरज आहे ... कुठे मिळेल काय ? सापडुन दिल्यास प्यार्टी मिळेल संपली आमची टिम :) आहे का आव्वाज ?

* गोली / किपर : १. नीलकांत २. रावसाहेब (हे आमचे रॉबर्ट ग्रीन) * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. श्रावण मोडक २. रामदासकाका ३. विजुभाउ * साईड बॅक : १. इनोबा म्हणे (हा आमचा सर्जिओ रॅमॉस) २. विकास ३. धनंजय ४. विशाल कुलकर्णी * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. बिपिन कार्यकर्ते २. चतुरंग ३. केशवसुमार * मिडफिल्डर्स : १. सहजराव २. भडकमकर मास्तर ३. धमाल मुलगा ४. छोटा डॉन ५. हलकट नायल्या ६. मेघवेडा ७. गणपा ८. निदे * अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर : १. अवलिया २. परा ३. मास्तर ४. जेपी * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १. तात्या अभ्यंकर २. मिभोकाका ३. टारझन ४. प्रभो

In reply to by Nile

म्हणुन म्हंटलो होतो ... एका म्याणेजर नी घेतलेल्या प्लेयर ला दुसर्‍या टिम मधी जागा नगं ... कितीतरी प्लियर्स दुर्लक्षित राहिले ... आता त्यांनी काय पिपाण्या वाजवायच्या ? की कवतिकं करायची इतर प्लियर्स ची ? :) बोला निले बोला

In reply to by टारझन

तुम्ही चारच प्लेअर घेउन त्यांना मदत केल्याबद्दल तुम्हाला हॅपी बड्डे. ;) बाकी राजकारण सगळीकडे चालायचंच, मैदानावर येउ देत की त्यांना मग दाखवु, बसलेत सगळे सुमडीत! -Nile

In reply to by ब्रिटिश टिंग्या

भादरणीय टिंग्या, टीम फकत ११+७ = १८ ची असावी. बाकी गावच्या गप्पा नकोत. उगाच ड्युप्लिकेट आयडी काढल्यासारखी नावे भरु नकात. टीम एडित करा किंवा मग ती डिस्क्वालिफाय करण्यात येईल. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

टिंग्या हा लोकशाहीप्रेमी आहे त्यामुळे त्याने सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा विडा उचलला आहे. ( अवांतरः टिंग्या तुझे के जी चे शिक्षण बारामतीत झाले का? आख्खे गाव टीममध्ये घेतले आहेस)

आधी चीअरगर्ल म्हणून नाव टाका तरच मी खेळीन . (मग दुसर्‍या क्लबाची माणसं पण आमचीच.) म्हणजे मग माझ्या नातवंडांना बोर्ड खेळाचे पंचवीस गुण देईल. (दोन मॅच्या खेळलो तर जास्तीचे पंचवीस धमालच्या मुलाला देईन.) असो. अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी. कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा. अव्वल नंबर वन. आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!

निषेध नोंदवायचा राहीलाच की. आमच्या मास्तरांना विसरल्याबद्दल सगळ्यांचा त्रिवार निषेध.

In reply to by रामदास

प्रभु मास्तर आमच्या टीमचे कोच. साला बेंचावरुन असल्या कथा ऐकवतील की लोकांच्या चिंबोर्‍या गायब! ;) -Nile

जेंव्हा दोन टिम मध्ये खेळ चालू होईल तेंव्हा त्या दोन्ही टिम्समधे असलेल्या "कॉमन" खेळाडूंनी कुणाकडून खेळायचे? :? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

आम्ही २, ४, ४ फॉर्मेशनवाले. आमची टीम - गोली (१) - नीलकांत (पर्यायच नाही), निखिल देशपांडे. बॅक (२) - बिपिन कार्यकर्ते, रामदासकाका, मुक्तसुनित, अक्षय पुर्णपात्रे. मिड (४) - आळश्यांचा राजा, नंदन, घासकडवी - हे किंचित मागं; पुण्याचे पेशवे, इनोबा, सहज - हे दोन पावलं पुढंच. फॉरवर्ड (४) - धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल. मिड आणि फॉरवर्डमध्ये कुणाला सामन्यात खेळवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय तसा अवघड. त्यावरून कुणी नाराज न होणं महत्त्वाचं. म्हणजे हा निर्णय घेणारा जो असेल तो खमक्या पाहिजे. मॅनेजर/कोच - पिवळा डांबीस प्रसिद्धी - तात्या.

In reply to by श्रावण मोडक

फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.
झालं ना! आता डॉन्या काय मी+मकी विरूद्ध कधी धमु कधी निळ्या अशी तुमच्या इस्टेटीची भांडणं सोडवत बसणार का फॉरवर्ड, पक्षी पुढाकार, घेऊन! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ, श्रामोंची टीम आवडली, मकी आणि अदितीचं 'नाव लावुन' ऐन वेळी त्यांना न खेळवण्याची कल्पना पण भारी, अन सगळं खापर पिडां काकांवर! जिओ श्रामो! ;) -Nile

In reply to by Nile

निळू, तू मोठा न झाल्याने कोरडा, आपलं मैदानाच्या बाहेरच रहाशील रे! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल. =)) =)) ओ श्रामो, कशाला मला ह्या घोळात घालता आहात ? च्यायला ते धम्या बॉल पास कर म्हटले तर 'जोहार मायबाप, काय म्हणतेय मग तुमची ती?' म्हणुन गप्पांचा फड लावायचा, तिकडे बॉल गुडुप्प. टार्‍याचे तर नावच नको, उगाच मला दर ५ मिनिटाला "काय रे, मगाशी मी दिलेला पास कुणी मध्येच उडवुन लावले रे?' म्हणुन माझ्याच डोक्यावर शॉट काढायचा. मी इकडे गोल करायला अलमोस्ट गोलपोस्टच्या जवळ जायचो व अदिती म्हणेल "ओ राको, जरा आमच्याकडे लक्ष असु द्या !", आता कसला गोल करणार सांगा. मकचे तर काय बोलायलाच नको, उगाच मलाच घाबरुन घाबरुन रहावे लागेल एखाद्या कोपर्‍यात, उगाच समजा स्कोर ०-० झाला तर " ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ? आन ते नाईल्या, फोकलीचं मॅचच्या मध्येच मला त्याच्या खिषात ठेवलेले "तसले" फोटो दाखवणार, मग कसला गोल करता राव ! ------ (ज्याम फसलेला)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

=)) =)) =)) =)) =)) =)) लै बेक्कार पास होता हा डान्या! अदिती

In reply to by छोटा डॉन

छोटा डॉन, अदिती, नाईल यांना समज देण्यात येत आहे की, आपल्या अडचणींबाबत, मुद्यांबाबत पिवळा डांबिस यांच्याशी टीममिटिंगमध्ये चर्चा करावी. संघाचे आतले विषय असे जाहीर करू नयेत. अन्यथा तात्या यांचे काम आणखी अवघड होत जाईल. ;)

In reply to by छोटा डॉन

ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ?
=)) =)) =)) =)) लै बेक्कार... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आज छोटा डॉन यांनी दंगा करतायेण्याजोगा धागा काढून समस्त संपादकवर्गाचे काम हलके केले आहे व आमचा दुवा घेतला आहे. रोज असा एखादा धागा काढल्यास बाकिच्या धाग्यांवर उगीच गोंधळ उडणार नाही. बरे, हा खेळही सगळ्यांच्या आवडीचा! कोण कश्याला वाईट लिहितय?;) रेवती

गोली / किपर : १. नीलकांत २. निखील देशपांडे ( ठाण/औरंगाबादची अभेद्य भिंत पोस्टसमोर असताना कुनाची बिशाद आहे गोल करायची) * सेंटर बॅक डिफेंडर्स : १. श्रावण मोडक २. बिपिन कार्यकर्ते ३. विजुभाउ * साईड बॅक : १. विसोबा खेचर ( एकदा का बॉल ऑपोसिशनच्या डी मधे गेला की आम्ही कवीता करयाला मोकळे ) २. विकास * डिफेंसीव्ह मिडफिल्डर : १. बिपिन कार्यकर्ते २. चतुरंग ३. केशवसुमार * मिडफिल्डर्स : १. सहज ( सहज म्हनता म्हनता गोल करुन यायचे, कुनाला माहीत..) २. निले / नायले / नाइल़ ( क्रुपया योग्य तो उच्चार करावा.. इंग्रजीची शिकवनी चालु आहे.. चु भु घ्यावी / द्यावी ) ३. धमाल मुलगा ४. छोटा डॉन * स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर : १) टारझन ( यांनी गोल नाही केला तरी चालेन पण किमान अपेक्शा ही की प्रतीस्पर्धी संघाचे कमीत कमी २ खेळाडु मैदानाबाहेर घालवावेत.. ) २) ३_१४ विक्षिप्त अदिती ( एकदा का टारुभाउंनी आपले काम केले की यांचा 'तिरक्या' गोलांचा पाउस चालू ) उदास नोकरदार, वाटलाव्या व्यवस्थापक, घाटकोपर एफ सी

अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी. कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा. अव्वल नंबर वन. आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!

बर झाल माझ नाव कुणी ह्या टिम मध्ये टाकल नाही. कारण मी फुटबॉल बद्दल माझे ज्ञान खुप कमी आहे. मला कसलेच नियम माहीत नाहीत.

माझी टीम ५-४-१-१ फॉरमेशन ने खेळेल. फॉरवर्ड लाईन १ सेंटर फॉर्वड - तात्या. २. इनसाईड राईट - रामदास ३. इनसाईड लेफ्ट - प्रभू सर ४. राईट विंगर - अवलीया ५. लेफ्ट विंगर - श्रामो ही सगळी मंडळी किक-ऑफलाच आपला कट्टा चालू करुन बसतील. समोरचे स्ट्रायकर कुठे असतील असे वाटते ? परत यमनालाच घडाभर .... घालणारच त्यामुळे वूवूझेलांवर फक्त "क्या बात है" चा गोंगाट ऐकू येईल. मीडफील्डर्स १. शशीकांत ओक २. परा ३ धमु ४ अदितीबाई दुर्बिटणे कट्ट्यातून सुटलेल्यांच्या नाड्या बांधून ठेवण्याची जबाबदारी. कट्ट्याला समयोचीत सप्लाय करत राहणे. कट्टेकर्यांवर बारिक नजर ठेवणे. वेळ पडल्यास पुढचा गोली, रेफ्री,लाईनमन लोकांनासुध्दा पकडून पकडून कट्ट्यास घेवून येणे. ब्याक १.नीलकांत - म्याच चालू राहील याची हाच खबरदारी घेवू शकतो. गोलकीपर १. टारझन आहे कोणाची बिषाद गोल करायची. अरे गोल जवळ जरी कोणी फिरकला तर ... असो. या सगळ्या मधे बहूतेक रेफ्रीच गोल करून सामना संपल्याचे जाहीर करेल. मोहन

झाल्यामुळे मला पण फुटबॉलच्या चार भिडूंची ओळख झाली आणि नियम कळले.नाहीतरी माझं ज्ञान डेंपो साळगावकर मोहन बगान आणि इस्ट बेंगालच्या पलीकडे नव्हतं.

ये आपने कहर बरपाया कुछ ना कहकर हमे तडपाया वो वक्त ही कुछ ही अलग था हर शख्स हमे शाख पर बैठा उल्लु नजर आ रहा था

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आता सावकाश वाचून मग प्रतिसाद देतो जे पी

लेख खुप भावुक होता....... ________________________________________________ 'मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे http://www.fl