Skip to main content

(नको तेच झाले)

(नको तेच झाले)

Published on शनीवार, 12/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
क्रान्ति यांची ही कविता आकारबंधासाठी प्रेरणा ठरली. पण खरा दोष आहे इतर अनेक कवितांचा ज्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावरून पदच्युत केलं... पुन्हा काव्य आले; असेही, तसेही नको तेच झाले; असेही, तसेही जरा सोडतो मी; विडंबन नशेला पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही किती जाऊ द्यावे? हे फुल्टॉस सारे अन् हाफ व्हॉली; असेही, तसेही मुके राहणे हे प्रलोभामध्येही अशक्यच ठरावे; असेही, तसेही फुका बोलबाला कवीतक धड्यांचा कुणी नाही शिकले; असेही, तसेही कशाला जपू मी कवीभावनांना? मुर्दाड सारे; असेही, तसेही जया वाचताना कळेना कुणाला हसावे रडावे; असेही, तसेही अशा काव्यपंक्तींचे खंबे नी चपट्या खुणावती मनाला; असेही, तसेही फुलीमध्ये जावो डब्लू ए* चे वादे ढोसतो मी प्याले; असेही, तसेही (* विडंबक्स अॅनॉनिमस)

याद्या 2746
प्रतिक्रिया 12
काव्यरस

जरा सोडतो मी; विडंबन नशेला पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही .. हा...हा..., मस्तंच.

*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

म्हटलं की ग्लास यायलाच हवेत का? :?

नेहमी प्रमाणे सुमार लेखण :) तिन कडवी वाचे पर्यंतंच झोप लागली ... आर्जेंटिणा वाल्याला फ्रि हिट मिळाला .. न जोराचा आवाज आला ... तेंव्हा उठलो =)) - टारेश सुमारकवी

विडंबन आवडले. अभिज्ञ.

पुन्हा घास आले असेही तसेही नको तेच झाले असेही तसेही नशिबी रवंथ अमुच्या असाही तसाही तो कडबा सुटेना असाही तसाही || -तिरशिंगराव बैलघाणे हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

आगायायाया =)) =)) =)) एकदम चाबुक्क !!! - एकशिंगराव गेंडाघाणे हर सहिका मजाक उडाके देख लिया करेंगे हम विडंबण ये दिलमें ठाणे है|

In reply to by तिमा

(सेमि)कोलायटिस - अर्थात (सेमि)कोलनचे इन्फ्लमेशन - कुठ्ठाय? - (रेफरी) पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

(सेमि)कोलनचे विडंबण होऊन ते (ब्लँक)स्पेस मधे परावर्तित झालेले दिसते. -(जज) पिडित डावापक्ष

फुका बोलबाला कवीतक धड्यांचा कुणी नाही शिकले; असेही, तसेही असं काही नाही हं... आम्ही शिकत आहोत... अजून कवितक धडे यायला हवेत.... विडंबक्स अनॉनिमससुद्धा आवडले

छान! बहुतेक पब्लीक रजेवर/विकांतात आहे नाहीतर ह्या मुळ कवितेची किमान पाच विडंबने एव्हाना यायला पाहीजे होती. घासुगुर्जी अजुन एक दोन आरामात करु शकतील. :-)

अशा काव्यपंक्तींचे खंबे नी चपट्या खुणावती मनाला; असेही, तसेही
विशेष आवडले. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.