(नको तेच झाले)
क्रान्ति यांची ही कविता आकारबंधासाठी प्रेरणा ठरली. पण खरा दोष आहे इतर अनेक कवितांचा ज्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावरून पदच्युत केलं...
पुन्हा काव्य आले; असेही, तसेही
नको तेच झाले; असेही, तसेही
जरा सोडतो मी; विडंबन नशेला
पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही
किती जाऊ द्यावे? हे फुल्टॉस सारे
अन् हाफ व्हॉली; असेही, तसेही
मुके राहणे हे प्रलोभामध्येही
अशक्यच ठरावे; असेही, तसेही
फुका बोलबाला कवीतक धड्यांचा
कुणी नाही शिकले; असेही, तसेही
कशाला जपू मी कवीभावनांना?
मुर्दाड सारे; असेही, तसेही
जया वाचताना कळेना कुणाला
हसावे रडावे; असेही, तसेही
अशा काव्यपंक्तींचे खंबे नी चपट्या
खुणावती मनाला; असेही, तसेही
फुलीमध्ये जावो डब्लू ए* चे वादे
ढोसतो मी प्याले; असेही, तसेही
(* विडंबक्स अॅनॉनिमस)
याद्या
2746
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
विडंबन आवडले
गुरजी
विडंबन....
नेहमी
विडंबन
पुन्हा
आगायायाया
In reply to पुन्हा by तिमा
फाऊल!
In reply to पुन्हा by तिमा
फाउल डिस्कार्डेड
In reply to फाऊल! by पंगा
कवितक उत्तम... विडंबन मस्त
:-)
विशेष आवडले