Skip to main content

आपण अन्न खातो तसेच बनतो का?

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 16/05/2010 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या... दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उरकल्यावरसुद्धा.... रोज तासभरतरी जिममध्ये जाणारी मी २० मिनिटात परत आले...मग थोड्या वेळाने एक फळ खाल्लं तेव्हा कुठे जरा बरं वाटलं....मग तुमच काय मत आहे? म्हणजे आपण जे खातो तशीच आपली वृत्ती बनते यावर... **************************************************************************** http://shilpasview.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24582
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by मनीषा

मला वाटतं जर वृत्ती समाधानी, आनंदी असेल , अहंकार अथवा द्वेषभावना मनामधे नसेल तर कुठलेही अन्न हे पूर्णब्रम्ह असते.
अतिशय योग्य बोललात. याबाबत माझा अनुभव सांगतो. मी गेल्या वर्षाभरापासुन शुध्द शाकाहाराकडे वळलो आहे (वर्ष पुर्ण व्हायला अजुन ६ दिवस बाकी आहेत, असो). यातले सुरवातीचे काहि महिने (साधारणपणे ५) मी कांदा,लसुण देखील सोडुन दिला होता. शाकाहाराकडे वळण्याआधी मी शुद्ध मांसाहारी होतो. आठवड्यातले जास्तीत जास्त दिवस दोन्ही वेळ मांसाहार करण्याकडे माझा भर असायचा :) गेल्या वर्षाभराचा आढावा घेतला तर माझ्या मनात सात्विक भावाची काही वाढ झाली आहे असे मी (आणि माझ्या जवळच्या परीचयातली लोकं) तरि नाही म्हणु शकत. जन्मापासुन शाकाहारी असलेली अनेक तामसी लोकं माझ्या परीचयाची आहेत. त्याचप्रमाणे मांसाहार करणारी अनेक सात्विक लोकही मी पाहिलेली आहेत. तेव्हा मनीषा यांनी म्हटल्याप्रमाणे सगळे मनाच्या संस्कारांचे खेळ आहेत. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by मनीषा

अगदी बरोबर. अन्न हे पुर्णब्रम्ह. त्याला नावे ठेवू नयेत. आपल्या डोक्यातल्या केमिकल लोच्याचे खापर अन्नावर का फोडतात देव जाणे. कधी ट्रेकला जा, उपास पडल्याशिवाय अन्न/ पाण्याची किंमत कळणार नाही.

In reply to by Pain

नावं कोण ठेवतंय? प्रत्येक गोष्टीचे काही चांगले वाईट परिणाम असतात...पण हे डोक्यात केमिकल लोच्या असणार्यांना काही कळणार नाही... अवांतर...दर शनिवार रविवार hiking ला जायची आमची सवय आहे.... स्वगत : अन्न पाण्याची किंमत सांगणार हे कोण टिकोजीराव....विषय काय...बोलतायेत काय? वरती दिलेले श्लोक वाचायचे कष्ट कशाला घेतील तर ना? तेसुद्धा न कळायला यांच्या डोक्यातला केमिकल लोच्याच कारणीभूत दिसतोय? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

"नावं कोण ठेवतंय? प्रत्येक गोष्टीचे काही चांगले वाईट परिणाम असतात..." जरुर असतात, पण शाकाहारी सात्वीक आहार म्हणजे सात्विक वृत्ती व तामसी आहार म्हणजे तामसीपणा इतकं सरळ गणित नाही आहे. (मटन व पुरण्पोळी खाल्यावर सारखाच जड्पणा अनुभवनारा) शैलेन्द्र.

In reply to by शैलेन्द्र

वरचा विकास यांचा प्रतिसाद वाचवा...शिळे, उष्टे ( आणि आताच्या काळातील greasy : हे माझे मत ) तामसप्रिय जेवण असे म्हंटले आहे...म्हणजेच रोज ताजे, रसदार अन्न खावे...चित्त प्रसन्न राहते...हासुद्धा माझा अनुभव.... फळ, भाज्या खाल्ल्याने शरीर व्यवस्थित काम करते...म्हणजे पोट,हृदय..डॉक्टरला विचारावे...मांसाहार कधी कधी ठीक आहे.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

कोणत्याही गोष्टीच अस जनरलायझेशन नसतं, काय खाणे चांगले, हे मुख्यत: तेथील हवामानावर ठरते. साधा सोपा उपाय म्हणजे "स्थानीक" पदार्थ खावेत. ध्रुवावर राहनारे एस्कीमो ९९% मांस खातात, आणी तो पृथ्वीवरील एक दिर्घायु वंश आहे. त्यांनी फळ्/भाज्या खाल्ल्या तर त्यांची आइसकँडी होइल. किंबहुना, वेगवेगळ्या हवामानात राहणारे लोक काय खातात हे पाहणे धक्कादायक असते, जसे नागपुर, सोलापुर, हैद्राबाद या अतीउष्ण प्रदेशातील लोक अती-तीखट पदार्थ खातात, जे शास्त्राप्रमाने चुकीच आहे. पण त्या लोकांना त्याचा काही त्रास होतो असं जाणवत नाही. थोडक्यात, चांगला आणी वाईट आहार हा स्थळ-काळ-व्यक्ती सापेक्ष असतो. अन्न हे पुर्णब्रम्ह आहे, ते कधीही वाइट नसते.(डीस्क्लेमर- जर ते वाइट असेल तर आमचे अन्न नसते.)

In reply to by शिल्पा ब

म्हणजेच रोज ताजे, रसदार अन्न खावे...
पुरणपोळी ताजीहून कितीतरी गुना शिळी अच्छी लागते हे आम्ही तुम्हाला सांगायला हवे काय? (पुरणपोळी सात्त्विक की तामसी?) - पंडित गागाभट्ट

In reply to by शिल्पा ब

मांसाहार कधी कधी ठीक आहे..
कधी कधी म्हणजे नेमका कधी कधी? वीकली / मंथली कोटा कितना? त्याचे परमिट / राशन कार्ड वगैरह साठी कोठे अर्ज़ी करणे लागेल? - पंडित गागाभट्ट

In reply to by शिल्पा ब

शिळे, उष्टे ( आणि आताच्या काळातील greasy : हे माझे मत ) तामसप्रिय जेवण असे म्हंटले आहे...
ते खूप सारे लोक रातचा बासी चावल या रोटी या डबल रोटी (ब्रैड)चे सकाळीसकाळी फोडणी भात, फोडणी पोळी, फोडणी ब्रैड वगैरह बनवून खातात, ते सारे तामसी? (ताज़ा बासमती चावलचे फोडणी भात कोणी बनवते काय?) वैसे आम्हाला पण हे फोडणी भात, फोडणी पोळी, फोडणी ब्रैड वगैरह खूप आवडते. खास करून दहीबरोबर... मतलब आम्ही तामसी. गर्व से कहो... - पंडित गागाभट्ट

In reply to by शिल्पा ब

सल्ला कधी दिला ? आणि hiking नाही, मला वेगळेच सांगायचे होते पण तो दुसरा विषय होइल. १ मिनिट, ते खोडतो. च्यायला फक्त त्याच प्रतिसादावर संपादनाची सुविधा नाहीये! अस कस ? जाउदे. आपण जे खातो तशीच आपली वृत्ती बनते हा वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे प्लेसिबो इफेक्ट आहे. अन्न आणि आरोग्य यांचा सम्बन्ध असतो, व्रुत्तीचा नाही.

In reply to by Pain

कधी ट्रेकला जा
= 'Go take a hike'??? ;) - पंडित गागाभट्ट

धागा कसाही असू दे, पण प्रतिसाद भरकटू नयेत अशी विनंती. तसेच मराठीचा जास्तीत् जास्त वापर व्हावा ही अपेक्षा. मधेच दुसरी भाषा वाचायला खटकते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

उगाच 'पंगा' सुरू करतात काही लोक 8} बाकी अन्नावर स्वभाव अवलंबून असतोच शिवाय आजूबाजूची परीस्थितीही आपला प्रभाव पाडत असतेच. किंबहुना परीस्थितीच जास्त परिणामकारक असते असे माझे मत आहे. उदा. शाकाहारी हिटलर-क्रूरकर्मा जय महाराष्ट्र

In reply to by भारद्वाज

या पंग्याला मी मागे दोन तीन वेळा "मराठीत लिही", "मराठीत लिही" असे बजावले होते. त्या बेट्याला मराठी लिहीलेले समजते. त्याचा प्रतिसादही तो हिंदीत अनूषंगीक देतो. येथील मराठी अन हिंदी टाईप करण्याची पद्धत एकच असतांना तो हिंदीतच का लिहीतो ते समजत नाही. संपादकांनी मनावर घेणे. नाहीतर मला लॉगईन आय डी द्या. मी उडवतो ते हिंदाळलेले प्रतिसाद. हिंदी च्या भरपूर साईटी आहेत. जा तिकडे म्हणावं. पंगा भाऊ, काय रे? तुला समजत नाही का रे? क्या हिंदी में बोलू की, यहाँ मराठी में लिखीए, भाई| यह मराठी संकेतस्थल है| The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

मिपावर मराठीत लिहीणेच योग्य आहे. एखाद्यावेळेस संदर्भ देताना, तो प्रत्यक्ष संदर्भ, हिंदी, इंग्रजी मधे दिला तर समजू शकते पण प्रतिसादच्या प्रतिसाद हिंदी/इंग्रजीत देऊ नये हे योग्य. अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. असे या संकेतस्थळाच्या स्वगृहावर लिहीलेले आहे ते याच साठी. :) बाकी प्रत्येकाचे विचार एकमेकांशी जुळले पाहीजेत अशातला भाग नाही. त्यातून थोडीफार मस्करी होणे पण समजू शकते. एका अर्थाने तो मिपाचा स्वभावधर्मच आहे पण मस्करीची कुस्करी होणार नाहीना याची देखील काळजी घ्यावी. संपादकांनी ती नंतर, घेण्यापेक्षा सभासदांनी लिहीतानाच ती घेतली तर उत्तम! ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

मिपावर मराठीत लिहीणेच योग्य आहे. एखाद्यावेळेस संदर्भ देताना, तो प्रत्यक्ष संदर्भ, हिंदी, इंग्रजी मधे दिला तर समजू शकते पण प्रतिसादच्या प्रतिसाद हिंदी/इंग्रजीत देऊ नये हे योग्य.
ठीक आहे सरजी. खालील प्रतिसादांतल्या / लेखांतल्याप्रमाणे प्रमाण मराठी भाषेत यापुढे प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घेण्यात येतील. काळजी नसावी. http://www.misalpav.com/node/12235#comment-193286 http://www.misalpav.com/node/12337#comment-195309 http://www.misalpav.com/node/11039#comment-177068 (या प्रतिसादातल्याप्रमाणे व्याकरणाचे नियम पाळण्याची विशेष खबरदारी घेतली जाईल.) http://www.misalpav.com/node/11661 (हा धागा काही मराठीत नसावा, जवळजवळ आख्खा लेख उर्दूत आहे अशी शंका येते. तसे असेल तरी उर्दू शेरोशायरीबद्दल आहे म्हणून बहुतेक खपून जाईल. मात्र मराठीत असेल तर तशी मराठी लिहिण्याची यापुढे कल्जि घेत्लि जैल. खत्रि बल्गवि.)
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.
'अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी' बोले तो 'फक्त अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी'? आणि 'अस्सल मराठी' बोले तो? 'शुद्धलेखन फाट्यावर मारणे' = अस्सल मराठी? 'कल्जि घेने' = अस्सल मराठी? 'मोकलाया दाहि दिशा' = अस्सल मराठी? वरच्या लेखांमधली / प्रतिसादांमधली भाषा अस्सल मराठी? मग खालिस हिंदी काय वाईट? आणि कोणी चांगल्या हिंदीत लिहिले तर तो एकदम भय्या? मराठी माणूस चांगली हिंदी लिहू/समजू शकतच नाही याबद्दल ठाम 'आत्मविश्वास', हं? =)) पण पंगा घ्यायला जाम मजा आली हां! ;) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

ठीक आहे सरजी. खालील प्रतिसादांतल्या / लेखांतल्याप्रमाणे प्रमाण मराठी भाषेत यापुढे प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घेण्यात येतील. धन्यवाद :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

वर दिलेल्या प्रतिसादांतली / लेखांतली भाषा ही 'प्रमाण मराठी' आहे याची खातरजमा करून दिल्याबद्दल (कन्फ़र्म केल्याबद्दल) तुम्हालाही धन्यवाद! यापुढे अशाच 'प्रमाण मराठी'त प्रतिसाद लिहिण्याचे प्रयत्न केले जातील. (म्हणजे आधी याहून नेमके वेगळे काय करत होतो? :?) - (खुंटा हलवून बळकट्ट) पंडित गागाभट्ट

In reply to by विकास

('सवाल' हा शब्द मराठीत चालून जाईल, नै?)
मस्करीची कुस्करी होणार नाहीना याची देखील काळजी घ्यावी.
'फाटकी हिंदी भाषा', 'एकमेकांचे मुके घेत खपणे' वगैरे वगैरे ही मस्करी, की कुस्करी? :? - पंडित गागाभट्ट

"....रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात.... आपल्या लेखातील हा एक मुद्दा बराचसा पटण्यासारखा आहे. मन ताजे राखण्यासाठी आईने केलेली एक गरम गरम भाकरी, भरपूर कांदा घातलेला झुणका, साथीला घट्ट दह्याची वाटी... इतके जरी असले तरी माझा दिवस अत्यंत उत्साहात जातो. (मी दुपारच्या भोजनात भात घेत नाही... )... आता हे आईने ताजे ताजे करून दिले म्हणून मला उत्साह आला कि त्या पदार्थांचाच स्थायी भाव आहे याबद्दल दुमत होऊ शकेल, पण हेही तितकेच खरे कि इतकेच जर खायचे असेल तर ते 'ताजे' का असू नये असेही वाटते. तुम्ही म्हणता तसा पिझ्झा प्रकार इकडे कोल्हापुरातही बराचसा बोकाळला आहे, आणि ती खाणारी मंडळी देखील. "....दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले..." याला कारण आदले दिवशीचा पिझ्झाच असेल तर तुमचा मुद्दा नक्कीच विचार करण्याजोगा आहे. पण डिप्रेशन हे अन्य पदार्थ खाल्लामुळेदेखील येते. मी तर एकदा वास्तुशांती कार्यक्रमाला गेलो असता तिथे तर जिलेबी मसालेभाताचे चमचमीत जेवण होते. पण तिथून आल्यानंतर का कोण जाणे उरलेला दिवस मला अतिशय डीप्रेसिव्ह गेला, त्याला कारण म्हणजे आमचाही प्लॉट त्या एरीयातच आहे.... आणि ज्याने आता बंगला बांधला त्याचा शेजार आम्हाला नको आहे. जागा चांगली, पण आता आमच्या नजरेत त्याची किंमत शून्य. कदाचित यामुळेदेखील इतके चांगले अन्न खाऊनदेखिल उदासिनता आली असेल. थोडक्यात विविध कारण मीमांसा असू शकतात. (अती आहार हे देखील एक कारण आहे....) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शिल्पा, अगं मला एक वचन आठवले : पिंडे पिंडे मतिर्भिनः | म्हणजे प्रत्येकाची मती त्याचा जसा पिंड असतो त्याप्रमाणे बनत जाते. त्यात अन्नाचा भाग महत्त्वाचा व मोठा असावा असे मला तरी वाटते. पण त्याचबरोबर तुमची संगत, सवयी, आचार-विचार, वातावरण यांचाही बराच मोठा वाटा आहे. चांगल्या माणसांच्या संगतीत आपल्यालाही छान वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात प्रसन्न वाटते. खूप झोपा काढल्या किंवा अति जागरणे झाली की मलूल झाल्यासारखे वाटते. तसेच हलका, पाचक व सत्त्वयुक्त आहार घेतला की दिवसभर एक प्रकारचा ताजेपणा राहातो. ज्या अन्नात प्राण ऊर्जा अधिक ते अन्न उचित प्रमाणात ग्रहण केले असताना चांगलेच वाटते. आयुर्वेदात अन्न कोठे, कसे, कोणी बनवलेले, कशा प्रकारचे, कोणत्या भांड्यात बनवलेले खावे इ.इ. गोष्टींवर भरपूर विचार केलेला दिसतो. आता आधुनिक पाश्चात्य जगतातही त्या प्रकारचे विचार रुजू लागले आहेत. ह्यावर अजून संशोधन होण्याची, खास करून मॉडर्न सायन्सेसच्या निकषांवर, गरज मात्र आहे असे वाटते. ई- सकाळ मध्ये बालाजी तांबे यांनी ह्या विषयावर भरपूर लिहिले आहे. ''अन्नयोग'' सदराखाली त्यांचे बरेच लेख आहेत. अवश्य वाच. अजून एक विचार : अन्न कोणी बनवले आहे ह्याबरोबरच ते कोणत्या विचारांनी, भावनांनी बनवले आहे त्याचाही सूक्ष्म पातळीवर शरीरावर परिणाम हा होतच असतो. उदा : सणावाराला, पूजेला देवासाठी जो नैवेद्य बनवला जातो त्याची चव इतर अन्नापेक्षा फार वेगळी व उत्तम असते, असे का? तर ते जेवण/ प्रसाद देवासाठी बनवत आहोत ही भावना त्या फरकास कारण ठरते, असे मला माझी आई सांगते. आईने मुलांसाठी बनवलेले अन्न म्हणूनच रुचकर होते. आणि तेच जेवण तुम्ही चिडचिड, आदळआपट, वैताग करत बनवलेत तर ते खाणार्‍याला समाधान लाभत नाही. म्हणूनच आई, मावशी वगैरे स्वयंपाक करताना अन्नपूर्णेचा श्लोक म्हणत करतात : खास करून सणासुदीचा स्वयंपाक : जेणेकरून मन त्या मंत्रोच्चारात मग्न राहते व इकड-तिकडचे विचार मनात येत नाहीत. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

अजून एक विचार : अन्न कोणी बनवले आहे ह्याबरोबरच ते कोणत्या विचारांनी, भावनांनी बनवले आहे त्याचाही सूक्ष्म पातळीवर शरीरावर परिणाम हा होतच असतो. उदा : सणावाराला, पूजेला देवासाठी जो नैवेद्य बनवला जातो त्याची चव इतर अन्नापेक्षा फार वेगळी व उत्तम असते, असे का? तर ते जेवण/ प्रसाद देवासाठी बनवत आहोत ही भावना त्या फरकास कारण ठरते, असे मला माझी आई सांगते. आईने मुलांसाठी बनवलेले अन्न म्हणूनच रुचकर होते. आणि तेच जेवण तुम्ही चिडचिड, आदळआपट, वैताग करत बनवलेत तर ते खाणार्‍याला समाधान लाभत नाही.
आम्ही सांगू? प्लासिबो इफ़ेक्ट!
म्हणूनच आई, मावशी वगैरे स्वयंपाक करताना अन्नपूर्णेचा श्लोक म्हणत करतात : खास करून सणासुदीचा स्वयंपाक : जेणेकरून मन त्या मंत्रोच्चारात मग्न राहते व इकड-तिकडचे विचार मनात येत नाहीत.
फिरून तोच प्लासिबो इफ़ेक्ट! रेस्तराँचा बावर्ची नेमके काय विचार करत आणि कोणचे श्लोक म्हणत रसोई करतो, किस ने देखा है? किसी ने सही फ़रमाया है: दोज़ हू लव सासेज ऐंड रिस्पेक्ट दी ला, शुड नाट सी ईदर वन बीइंग मेड़| (सुना है कि साइलंट मूवी के ज़माने में कुछ बुज़ुर्ग हिंदुस्तानी ऐक्टर लोग डाइलाग की जगह खालिस हिंदुस्तानी-पंजाबी-उर्दू गालियों की कांपिटिशन मनाते थे| वैसे भी आवाज रिकार्ड होती तो थी नहीं, और इन बंदो को और भी जोश आते हुए इन की ऐक्टिंग और भी बढ़िया बनती थी|) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

पंगांशी सहमत! अगदी लहानपणपासूनच सत्यनारायणाचा शिरा डालडात बनवलेला असला तर चिमूटभर खाऊन चव घेऊन मी आई-बाबांच्या हातात देऊन टाकायचे! घरी बनवलेला शिरा मात्र अजिबात भूक लागलेली नसतानाही दिसला तरी अर्धी वाटीतरी खायचेच... आणि त्याचा प्रचंड आनंद व्हायचा. आजही मला आवडतं आणि पचतं अशा चवीचं जेवण बसल्या जागी खायला मिळालं तर मला लगेच छान वाटतं! स्वतःला एकटीसाठीच जेवण बनवायचं असेल तर पौष्टीक आणि कमीतकमी वेळात जेवण उरकून, नव्हे उडवून टाकून, इतर आवडीच्या गोष्टी करण्यात जास्त मजा वाटते. (भडक डोक्याची शाकाहारी आणि तेल-मिरच्या-मसालेद्वेष्टी) अदिती

माझे स्पश्ट मत आह "होय " पण थोडे समजुन घ्यावे लागेल. आपण अन्न खातो ते कोठुन येते त्यावर सर्व अवलंबुन असते,कोठुन म्हनजे कुठ्ल्या प्रकारच्या कमाइतुन.मेहनतीच्या , कामाच्या मोबदल्याच्या (हलाल) पैश्यांचा अन्न घेतल्यास माणसाला सात्विक विचार येतात.आनि कुनाला फसवुन हक्क हिसकावुन चोरिच्या पैश्यांचे ( हराम ) अन्न असल्यास त्याने बननारा व्यक्ति चांगले क्रुत्य कसे करु शकतो. आता यात शाकाहार मांसाहार पिझ्झा फळ याने काही फरक पडत नाही. ता.क.= अती तेथे माती . कुठलिही गोश्ट प्रमाणात जेवल्यास उत्तम.

आमच्याकडे आई जेवण झाल्यावर ताटाला नमस्कार करुन " अन्नदाता पाककर्ता तथा भोक्ता सुखी भव। " असे म्हणायला लावते, म्हणजे वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाचा अन्नाच्या दर्जावर परिणाम होत असणार हे नक्की! मग फक्त अन्नाचा कस किंवा शाकाहार की मांसाहार यावरुन आपल्या घडणीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे सांगणे कठिण आहे...यासगळ्यांचा combined effect लक्षात घेणे इष्ट!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

  • हे हिंदी पिल्लू इथे कशाला आलय ? लिहायचं तर मराठी लिहा नाहीतर फुटा.
  • बरं म्हंटल असं तर काय बिघडतंय?
  • मूळ विषयाला सोडून कोणी इतरच काही बोलायला लागले कि एक मराठी म्हण आहे.."कोणाला कश्याच आणि बोडकीला केसाचं".
  • आम्ही कोणाला काय प्रतुत्तर द्यायचे ते प्रतिसादावर अवलंबून आहे...
  • ..आपण काय लिहितोय याचे तरी भान ठेवायचे?
  • पण हे डोक्यात केमिकल लोच्या असणार्यांना काही कळणार नाही...
आपण अन्न खातो तसेच बनतो का?? तुम्ही काय खाताय दोन दिवसापासुन?

या प्रत्युत्तराआधीचे प्रतिसाद वाचा...कदाचित काही कळेलसुद्धा ...बाकी एवढा वेळ हाताशी असताना हेच बरं सुचलं *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/