Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/03/2010 - 09:14
  • Log in or register to post comments
  • 35288 views
  • कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते
  • कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
  • कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली
  • कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १

Book traversal links for कवितेची पाककृती १ : जीवदर्शी आशासूक्ते

  • कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते ›

प्रतिक्रिया

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 03/03/2010 - 09:39

Permalink

आत्ताच बनवली

पाकृ आवडली. लगेच बनवायला घेतली. खाली देत आहे. अस्तित्त्व म्हणजे एक राडा असतो नेटाने रोज रोज भोगायचा असतो अस्तित्व म्हणजे एक गाडा असतो फार जड पण ओढायचा असतो
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 03/03/2010 - 22:47

In reply to आत्ताच बनवली by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

गृहपाठ : प्रगत शिक्षणार्थी स्तरावरची कलावादी कविता

क्ष : सृजन, लेखन, कविता, गाणे, कलाकार (य, क, व) : (गोल, जोडणे, कडबोळी) (मोल, चुकवणे, पुरते) (बोल, बडवणे, तिरकिटधा) (तोल, सावरणे, थोडक्यात) (रोल, वठवणे, हुबेहूब) शैली : प्रश्नात्मक ओळी - - - सृजन म्हणजे काय मोल असते? पुरते कधीतरी चुकवायचे असते? लेखन म्हणजे काय गोल असतो? कडबोळी साच्याने जोडायचा असतो? कविता म्हणजे काय बोल असतो? उगाच तिरकिटधा बडवायचा असतो? गाणे म्हणजे काय तोल असतो? नाचताना थोडक्यात सावरायचा असतो? कलाकार म्हणजे काय रोल असतो? तात्पुरता हुबेहूब वठवायचा असतो? - - -
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 01:16

In reply to गृहपाठ : प्रगत शिक्षणार्थी स्तरावरची कलावादी कविता by धनंजय

Permalink

दहापैकी साडेनऊ

गृहपाठ म्हणजे एक खात्मा आहे त्यात या धड्याचा आत्मा आहे पूर्ण मार्क कधीच देत नाहीत म्हणून...
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 03/04/2010 - 01:20

In reply to गृहपाठ : प्रगत शिक्षणार्थी स्तरावरची कलावादी कविता by धनंजय

Permalink

प्रश्न, मदत

क्ष: स्वातंत्र्य (य, क, व): (आज, उगवणे, प्रकाश) (माज, उतरणे, जमिन) (लाज, वाटणे, विहिर) (खाज, असणे, विकार) (बाज, झोपणे, अंधार) ...... हे सर्व असूनही कविता प्रणालीप्रमाणे बनवता येत नाही. कोणी मदत करू शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 01:35

In reply to प्रश्न, मदत by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

हिंट

डागडुजी करताना पादपूरकं बदलावी. प्रश्नांतून उत्तरे शोधावी. स्वातंत्र्य कुठे आहे आज? वगैरे..
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 03/04/2010 - 02:38

In reply to हिंट by राजेश घासकडवी

Permalink

प्रयत्न

स्वातंत्र्य कुठे आहे आज? उगवलेल्या वर्तमानास पूसतो परवशतेत का प्रश्नांचा माज? उतरतांना जमिनीस पूसतो पारतंत्र्यात कसली असावी लाज? खचतांना थिजून पूसतो का व्यक्त करण्याची खाज? 'चिरंतन' मुक्त उत्तरतो --------- कृपया प्रयत्नपूर्वक पाडलेल्या वरील ओळींचे गुणांकण करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 03:47

In reply to प्रयत्न by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

सामाजिक आशय

हा प्रयत्न निश्चितच चांगला आहे. पण गहन सामाजिक आशय असलेल्या कविता करण्याची स्थलकालाची मर्यादा तुम्ही ताणता आहात असं वाटतं. मुळात कवितकचा धडा गोड, हलकंफुलकं काव्य कसं करावं हे शिकवणारा आहे. असे तिखटजाळ प्रश्न पुसण्याने अश्रू पुसण्याची पाळी न येवो. तोंड भाजणार नाहीत, पण जिभेला तर्रारी येईल अशा बेताच्या ज्वलंत कविता करण्याचे धडे नंतर येतीलच.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 03/04/2010 - 04:01

In reply to सामाजिक आशय by राजेश घासकडवी

Permalink

कदाचित क्ष चूकला असावा

हिंटप्रमाणे कशीबशी कविता तयार केली. सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे केल्या. त्यावर असा शेरा. प्रयत्नांसाठी तरी काही गुण दिले जावेत. 'क्ष' चूकलेला दिसतोय. क्ष कसा निवडावा यावर विस्तारपूर्वक मार्गदर्शन करावे.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 03/04/2010 - 07:06

In reply to आत्ताच बनवली by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

आमचा पण गृहपाठ.

कोठुन येते मला कळेना प्रसवता ही कविवर्याला कसे सुचते ते समजेना कॅलफोर्न्याच्या घासकडव्याला लेखे नाही काव्ये नाही काय राहीले डकवायाला? धडे काही कळले नाही काय जाहले प्रसवायाला? खुळ्या मनाचे खुळे बोल हे भोके पडीती पण कवितेला शीघ्र रचना करिती, परि ती दिव्य कसबे कसली त्याला? बालकवींची क्षमा मागुन.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 03/04/2010 - 08:22

In reply to आमचा पण गृहपाठ. by Nile

Permalink

हाहा

निळुभाऊ ! लगे रहो !
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 03/04/2010 - 12:57

In reply to हाहा by मुक्तसुनीत

Permalink

चालू द्यात

चालू द्यात ... =)) =)) =)) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Wed, 03/03/2010 - 09:40

Permalink

छान!

छान आहे पदार्थ. खुसखुशीत वाटला हातावर घेऊन नुसताच चाटला ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 03/03/2010 - 09:44

Permalink

किती दिवस

किती दिवस लागले भौ लेख कंप्लिट करायला ? :) हळु हळु वाचून पुर्ण करून प्रतिक्रिया देतो .. अंमळ १३% च वाचलंय ! सुंदर आणि अभ्यासपुर्ण लिहीलंय हो ! -(क्रमश: वाचक) टारेश किबोर्डबडवी
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/03/2010 - 09:49

In reply to किती दिवस by टारझन

Permalink

काळ

खदखदती भावना आणि (इतरांच्या) अस्तित्वाच्या जहरी बोचण्या असतील तर असा लेख चार ते पाच तासात सहज पडून जातो...;) शिवाय, आमच्याकडे "लेखनिक" प्रणालीदेखील आहे, त्याने काम सुकर होतं. राजेश
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 03/04/2010 - 00:01

In reply to काळ by राजेश घासकडवी

Permalink

इतरांच्या अस्तित्वाच्या =))

इतरांच्या अस्तित्वाच्या जहरी बोचण्या =)) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 03/03/2010 - 09:46

Permalink

हाहाहा

चालू द्या. मस्त मापं काढणं सुरू आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 03/03/2010 - 10:14

Permalink

कवितकची आवृत्ती

दुव्यावरील कवितकाच्या आवृत्तीबरोबर काही होमवर्कही होता. एक प्रश्न पुढीलप्रमाणे: खालील कवितेत गाळलेल्या जागा भरा ती आरशाकडे रिक्त बघते, आवर्तनांच्या वेदनांचे प्रतिबिंब शोधते तोच दिसतो खिन्न -------- --------- -------------- ---------------- हा प्रश्न कसा सोडवावा याबाबत मार्गदर्शन अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/03/2010 - 10:27

In reply to कवितकची आवृत्ती by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

प्रतिबिंबाचे मंत्रभास

तुम्ही खूपच पुढच्या वर्गातले प्रश्न विचारता आहात. आत्ता मी उत्तर देतो, पण वर्गाबरोबर राहा. नाहीतर प्रायव्हेट ट्यूशन लावा. ती आरशाकडे रिक्त बघते, आवर्तनांच्या वेदनांचे प्रतिबिंब शोधते तोच दिसतो खिन्न आनंदी खिन्न नाही दिसत पण गवसले बिंब तृप्तीच्या आचमनांनी भरलेला आरसा ती पाहतो
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 03/03/2010 - 10:35

In reply to प्रतिबिंबाचे मंत्रभास by राजेश घासकडवी

Permalink

बरोबर आहे

चुकून पुढच्या धड्याखालचा (धड्याचे नाव: कवितेतील लिंगभान (Gender Identity in Poetry)) प्रश्न वाचला.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 03/03/2010 - 10:27

Permalink

ती आरशाकडे

ती आरशाकडे रिक्त बघते, आवर्तनांच्या वेदनांचे प्रतिबिंब शोधते तोच दिसतो खिन्न ..... .... क्लिन्नमनोगती मोटारीच्या उध्वस्त धर्मशाळॅतला संध्यासूक्ताच्या यात्रिकाचा काजळमायांकित डोहकाळीम्यातला शीतयुद्धाच्या सदानंदाचा नियतीच्या बैलाचा हरित बिलोरी वेलबुटीवरचा शहनाझी सावित्री दोल्यातला रणांगणी कोसल्यावरच्या राजसी मृद्गंधजातकी सलामी पापडामधला आणि ब्रवाचक नातिचरामी शाळेकडचा ताम्रपट.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 03/03/2010 - 10:42

In reply to ती आरशाकडे by मुक्तसुनीत

Permalink

हा हा

श्री सुनीत, कवितकाची पुढील आवृत्ती तुम्हाला संपादीत करण्याचे निमंत्रण आहे का? 'राजसी मृद्गंधजातकी सलामी पापडामधला' या ओळीत 'मृद्गंधजातकी'च्या जागी 'पद्मासक्त' शब्द योग्य वाटेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 03/03/2010 - 10:43

In reply to ती आरशाकडे by मुक्तसुनीत

Permalink

=))

=)) 'भिन्न'चं 'क्लिन्न' झालं की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 03/03/2010 - 10:45

In reply to ती आरशाकडे by मुक्तसुनीत

Permalink

ह्यो बाबा

ह्यो बाबा मराठीत का नाय लिवत? असो. आमचे एक (शहीद) मित्र पूर्वी काही क्लिष्ट शरदिन्या लिहायचे त्याची आठवण झाली, पर्र डर्र बर्र! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 03/03/2010 - 11:25

In reply to ती आरशाकडे by मुक्तसुनीत

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/03/2010 - 11:02

In reply to ती आरशाकडे by मुक्तसुनीत

Permalink

दहापैकी सहा मार्क

तुम्ही अनेक वेगवेगळ्या शहांची (मी चार तरी मोजले) मयुरासनं मोडून त्यांची शब्दरत्नं खुबीने मिसळल्याबद्दल तुम्हाला विशेष गुण मिळाले. पण प्रतिबिंबाचा जादूटोणा वापरता न आल्यामुळे, आशयगर्भतेला योग्य किनार लावता आली नाही असंच म्हणावं लागतं. आकारबंध विस्कळीत झाला. तुम्हीदेखील वेगळ्याच वर्गातल्या प्रश्नाचा विचार करत असावात असं वाटलं. खिन्नशी क्लिन्नचे ध्वनिमाधुर्य तुम्ही ठेवलं आहे, आणि दुर्गमतेचं ओझं तुम्हाला पेललं नाही, तरी वाचकाला त्याहूनही पेलणार नाही इतपत भान ठेवलेलं आहे. त्याचीही गुणवाटपात नोंद केलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 03/03/2010 - 10:47

Permalink

आणखी एक

मिसळपाववर जाऊन विसोबाला कळवा तो घासोबुवा कडवा आला म्हणून एकीकडं घेऊन कानात सांगा हळू कोणालाबी कळू देऊ नका खेचरांवरती कालच निघाला तांडा एकशे सात Xण्डा (फुल्या भरा !) जनातल्या मनात उतरला "घाशा" त्याची चांगली सेवा झाली पायजे काथ्याकूटी मठात उतरतील बुवा त्यांचे चांगली सेवा झाली पायजे सगळ्या संपादकां आताच सांगून ठेव मंडाळीना सगळ्यां "चांदण्या वाटप " यांना सगळं माफ शिव्याबिव्यांसकट तात्या म्हणतो माझी माणसं आहेत कळता कामा नये अनुस्काला अक्षर नाहीतर लष्कर बोलवील बया विसोबाच्या कानात सांगितलेली गोष्ट ऐकू गेली स्पष्ट अनुस्काला (पुन्हा एकदा कोलटकरांची क्षमा मागून !)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 03/03/2010 - 10:52

In reply to आणखी एक by मुक्तसुनीत

Permalink

=))

=)) काय चाललंय काय? चालू द्या!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 03/03/2010 - 21:06

In reply to =)) by श्रावण मोडक

Permalink

सुनीतराव लै दिसांनी

किडा चावला तुम्हाला, त्यो बी विडंबनाचा! ;) क्या बात है!! =)) =)) (विटेवरी विटेवरी विटेवऽऽरी)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 03/03/2010 - 10:56

In reply to आणखी एक by मुक्तसुनीत

Permalink

मूळ कविता "निरोप"

पंढरपूरला जाऊन विठोबाला कळवा तो बळवंतबुवा भडवा येतोय म्हणून एकीकडं घेऊन कानात सांगा हळू रख्माईला कळू देऊ नका मुंबईहून कालच निघाला तांडा एकशेसात रांडा संगती आहेत कबीराच्या मठात उतरतील बुवा त्यांची चांगली सेवा झाली पायजे च्यावाल्यांना सगळ्या आत्ताच सांगून ठेव मंडळीना शेव गाठ्या फुकट यांना सगळं फुकट शेव पुरी भाजी विठ्ठल म्हणतो माझी माणसं आहेत कळता कामा नये यातलं रख्माईला अक्षर नाहीतर ती लष्कर बोलवील बया विठोबाच्या कानात सांगिरलेली गोष्ट ऐकू गेली स्पष्ट रख्माईला
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/03/2010 - 11:05

In reply to आणखी एक by मुक्तसुनीत

Permalink

मार्क वगैरे नाहीत

फक्त सलाम!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 03/03/2010 - 11:11

In reply to आणखी एक by मुक्तसुनीत

Permalink

क्या बात है!

'निरोप' पोहोचला! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 03/04/2010 - 01:01

In reply to आणखी एक by मुक्तसुनीत

Permalink

निषेध

कवितेच्या वर्गात विडंबन केल्याबद्दल श्री सुनीत यांचा निषेध. त्यांच्या दोन्ही प्रतिसादात वर दिलेल्या प्रणालीचे पालन झालेले नाही. या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीही या प्रकारामुळे त्रासलो आहे. धागाप्रवर्तकांनी या प्रकाराविरुद्ध मोहीम सुरू करावी. श्री सुनीत यांनी वरच्या वर्गातल्या मुलांसमोर प्रतिभेचे कसब दाखवावे. उगाच आम्हा नवशिक्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 03/04/2010 - 01:43

In reply to निषेध by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

बरं तर पूर्वप्राथमिक वर्गातला धडा ...

अक्षय, कवन कर. घाशा, कवन कर . धना, कवन कर. कवन कवन कवन. हा पहा मुसु आला. त्याला श्री. जोडा. शालजोडीतला हाणा. या बालांनो या रे या शेंबूड पुसुनि सारे या काव्य करा रे काव्य करा वेळ फुकट दवडा खरिचा काम करे , तोचि फसे बरि नाही, वृत्ती अशी ! जालावरती पडीक असा ! सुंदर काव्याची शाळा ! या बालांनो या रे या ....
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 02:30

In reply to बरं तर पूर्वप्राथमिक वर्गातला धडा ... by मुक्तसुनीत

Permalink

तरल

त्याला श्री. जोडा. शालजोडीतला हाणा. एकाच शब्दाने अनेक अर्थ सांगणं ही कला आहे. त्यामुळे ते शिकण्याची कवितक कडून अपेक्षा ठेवू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 03/04/2010 - 02:38

In reply to बरं तर पूर्वप्राथमिक वर्गातला धडा ... by मुक्तसुनीत

Permalink

वा वा मस्त धडा!

सुरुवातीला मजा आली मग अवघड वाटू लागले. काम करे , तोचि फसे बरि नाही, वृत्ती अशी ! म्हणजे काम केल्यास माणूस फसतो, असे काही सांगायचे आहे का? माणूस फसल्याशिवाय काम करूच शकत नाही, असा एक सर्वमान्य समज आहे. त्यामुळे वरची कविता एकाचवेळी बंडखोर वाटते पण शेवटी मूख्य प्रवाहात येण्याचे आमंत्रण देऊन कविता उपलब्ध चौकटीस मान्यही करते. (रसग्रहणाचीही प्रायवेट ट्युशन चालू असल्याने वरचे लिहिले.)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतातुर जंतू on Wed, 03/03/2010 - 11:26

Permalink

अय्या किती गोड

हा पदार्थ खूप गोड गोड, खुसखुशीत व हलकाफुलका लागतो. त्यात कोलेस्टरॉल वगैरे हृदयाला त्रास देणारे घटक नसल्याने तो कितीही वेळा खाता येतो. पोटात आगही होत नाही
पण गोड गोड असल्याने तोंडास मिठी बसते. दीर्घकालीन परिणाम - शाळकरी भावुकतेने लडबडलेले चिकट बाप्ये/पोट्ट्या प्रेमात पडतात. अर्थात आपणही तसेच असाल, तर मग समानशीले व्यसनेषु... - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

Submitted by नंदू on Wed, 03/03/2010 - 11:37

Permalink

कविता Decoded.

मालिकेची सुरुवात तर छान झाली आहे. बाकी या अशा लेखासाठी ( Content & Quality both) किती माकडं टंकायला (आणि कितीवेळ ) लागतील देवजाणे ? जाता जाता, तुमच्या मयूरसिंहासनाच्या जनाकाचं Decoding केंव्हा करताय? :? नंदू
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 03/03/2010 - 18:24

Permalink

उच्च

उच्च दर्जाची साहित्यिक चर्चा..! घासकडवी, मुक्तराव आणि इतर मान्यवरांचे अभिनंदन आणि आभार.. :) --विसोबा.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 03/03/2010 - 23:52

Permalink

हा हा

>> म्हणजे आपल्याच विश्वशोधी हुरहुरीपायी काट्यांशी झुंज देऊन निगरगट्ट झालेल्या टाचांखाली एक एक अनुभूतींचा दाणा घेऊन तो चिरडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.>> काय सुंदर ओळ आहे. अहो कविता कविता म्हणतात ती हीच की!! :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 03/04/2010 - 01:37

Permalink

साला

साला हा ग्रासस्टांझाज एक नंबरचा वाय झेड आहे. लय भारी लेख राव ! संदीप खरेची सगळी सीक्रेट्स कळली. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 03/04/2010 - 01:55

In reply to साला by मिसळभोक्ता

Permalink

+ १ तर काय!

ह्या ग्रासस्टांझाच्या नीलगर्भ भाषेतला लेख वाचून आता हेमगर्भाची मात्रा उगाळायला घ्यावी की काय ह्या विचाराप्रत आलोय मी! :D (वैद्य)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 03/05/2010 - 07:25

In reply to साला by मिसळभोक्ता

Permalink

+१ सहमत. लै

+१ सहमत. लै भारी लेख. लेखकास साष्टांग ...../\..... अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 03/04/2010 - 04:15

Permalink

कवितक वापरून माझाबी एक प्रयत्न

ती गेली तेव्हा रिमझिम घन ओथंबोनि झरती घनव्याक्कुळ मीही रडलो नदीलाही सागर भरती वार्‍याने हलविले रान असा वारा हा बेभान नदीलाही पूर मग आले उतरून नभा अन गेले ती नव्हती संध्यामधुरा माझिया व्यथेचि पूर्ति माझिया मृत्युतच होते येते ती आणखी जाते स्वर्गंगेच्या त्या तीरी जांभूळ पिके तरुवरी हा ढोल कुणाचा वाजे अन स्कंधि कुणाचे ओझे (मुसु भावसर्गमी रमता प्रतिभेची पडली लत्ता ! हृदयस्थ वाजती तारा बाळुचे वाजती बारा !) * संपादित : काही यतिभंगांची दुरुस्ती ** येथे "यति" ही वैयाकरणी संज्ञा आहे. तेथील यतिंनी घाबरू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 03/04/2010 - 04:42

In reply to कवितक वापरून माझाबी एक प्रयत्न by मुक्तसुनीत

Permalink

शो युवर वर्क फॉर क्रेडिट

क्ष, य, क, व पायर्‍या दाखवाव्या. नाहीतर क्रेडिट दिले जाणार नाही. दुसर्‍या वर्गमित्राकडून फक्त आउटपुट घेतल्याचे समजले जाईल. वर्गमित्राकडून आउटपुटसह अल्गोची पूर्ण प्रतही घेण्याची तसदी घेतल्याशिवाय परीक्षार्थ्याला अभ्यासातले गांभीर्य कळले, हे लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 05:13

In reply to शो युवर वर्क फॉर क्रेडिट by धनंजय

Permalink

तेच म्हणतो मी

बरं, जे दिलंय ते तर तपासून पाहू.... यमकांचा क्रम वेगवेगळ्या कडव्यांत वेगवेगळा आहे. यावरून प्रणाली नीट वापरली नाही - डागडुजी करताना ताजमहालाला विटा लावल्या हे कळतं. -२ वर्गमित्रांच्या काही मूळ ओळी बदलून न साधलेल्या छंदात बसवण्याचा कवीला नाद दिसतो. त्यामुळे ते कवितेच्या खांद्यावरचे ओझे होते -२ कविता कुणाविषयी आहे हे नीट कळत नाही. मध्येत ती असते, थोडा निसर्ग भटकल्यावर मी येतो, एक ओझंवाला येऊन जातो. आणि शेवटी एकदम मुसु, बाळु, आणि यतीन येतात. भरकटलेली. -२ कवितेचा संदेश एकदम शेवटच्या ओळींत आल्यासारखा वाटतो. मग या दोन वेगवेगळ्या कविता एकत्र करण्याचे प्रयोजन कळत नाही. निदान सर्वांना तरी नाही. -२ हस्ताक्षर सुंदर आहे. +२
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 03/04/2010 - 06:10

In reply to कवितक वापरून माझाबी एक प्रयत्न by मुक्तसुनीत

Permalink

संज्ञामग्न पुरुषाची लक्षणे

थोडे वै'चित्र्यं' असले तरी हे कवितक ग्रेसफुल आहे. 'भय इथले संपत नाही' ची मात्र अकारण आठवण झाली ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 03/04/2010 - 05:01

Permalink

क्रेडीटासाठी लढविली

क्रेडीटासाठी लढविली खिंड कवतिकि राग ये "वैद्या"च्या चित्ती बैसला रागे तो हट्टी "बाळु"च्या गाण्याची ही रीत जी जी जी जी जी जी परि मुसु नाही डगमगे पेटिला धगें तमा ती नाही "पायर्‍यां"ची स्फूर्तिला नाही क्रेडीटाची इन्स्पिरेशनच्या नावाचा घोळ हो जी जी जी जी जी जी
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 06:00

Permalink

अरे मिस्सळपाव (झुक झुक झुक झुक झुक झुक झुक झुक)

मिस्सळपाव... मिसळपाव मिसळपाव, भलतीच चवदार खाण्यास राव उसळ तर्री, कांदा शेव ताटलीमध्ये घालून ठेव कोथिंबिर लिंबू वरतून पिळ आणि ओरपून खाव अरे मिस्सळपाव.... अरे हाटेलीत आले.. हाटेलीत आले चकाट्या पिटाया कवितेची पाकृ शिकून घ्याया विडंबनांचं फुटलं पेव पहिली बिगरी बाजूला ठेव एकदम म्याट्रीक पीएचडी कर अन् मिरवून दाव अरे मिस्सळपाव... अरे प्रोफेसर घास्की प्रोफेसर घास्की चष्मा सावरतात वर्गातल्या कार्ट्यांचे पेपर तपासतात धनंजयाचा गृहपाठ चोख बाकी सर्व आगाऊ लोक प्रायव्हेट ट्यूशन्स सगळ्यांना लाव आणि पैसा कमाव अरे मिस्सळपाव... मुसु आणि बाळू मुसु आणि बाळूची जमली गट्टी कविता पाडायला पेटली भट्टी कोणी हट्टी कोणाची कट्टी स्वातंत्र्याची, पवाड्याची पट्टी वाचनं वाढव ट्यार्पी सुधार आणि बोर्डावर लाव अरे मिस्सळपाव
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 03/04/2010 - 07:32

Permalink

तक्रार

प्रस्तुत वर्गचालकाने प्रस्तुत वर्गातल्या सर्व नियमांना धाब्यावर बसवून काही शिष्ट आणि थोराड विद्यार्थ्यांना हाताशी धरून विडंबने लिहिण्यास सुरूवात केलेली आहे. प्रस्तुत धाग्यावर होत असलेल्या प्रस्तुत हैदोसाने कासाविस होऊन प्रस्तुत प्रतिसादलेखक मुख्याध्यापकांकडे तक्रार नोंदवण्यासाठी निवेदन तयार करत आहे. कृपया प्रस्तुत विचाराशी सहमत असल्यास प्रस्तुत प्रतिसादलेखकास व्यनिने कळवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 03/04/2010 - 08:35

In reply to तक्रार by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

आक्षेप...

वरील कवितेला विडंबन म्हटल्याबद्दल आक्षेप. ती मूळ कविता आहे - अग्निरथ छंदातली. जरूर मुख्याध्यापकांकडे तक्रार करावी. अभिजात आणि स्वसिद्ध काव्य विद्यार्थ्यांपुढे ठेवणे हे कवितानिर्मितीविषयक पाठ्यक्रमाला अनुसरूनच आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com