झक्या, लेका मस्त फोटो टाकलेस की :)
शिवनेरी गड मस्तच. आज तुझ्या (तिसर्या) डोळ्यानं पाहिला इथे मिपावर :)
आभार!
बाकी,
>>कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे.
ते काहीतरी मला २ डोकी असलेल्या गरुडासारखं दिसलं... (च्छ्या: हल्ली स्कॉटीश राईट फारच डोक्यात घुमतंय.)
इथले इतिहासाचे अभ्यासक ह्यावर प्रकाश टाकतील तर फार उत्तम. :)
सहमत ! मस्तच रे भाऊ ! ती पीडीएफ फाईलही पाठव ना मला.
छत्रपती शिवाजी महाराजकी जय...!
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
श्री झकासराव, सुरेख चित्रे. जुन्या इदगाहाच्या भिंतीवर उथळ ग्राफिती दिसत आहे पण हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा किंवा छत्रपतींच्या जन्मस्थानाची इमारत यांवर असे आढळत नाही (असलेली प्रयत्नपूर्वक काढण्यात आलेली दिसते.) इदगाहदेखिल ऐतिहासिक वास्तू आहे, त्यावर असा प्रयत्न झालेला दिसत नाही, हे लक्षनीय आहे.
(चित्रांची लांबी थोडी कमी करता येईल का?)
सुंदर माहीती आणी फोटोही....मजा आली...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
फोटो क्लासच आलेत...
मला फक्त एकाच गोष्टीचा खुन्नस येतो ते म्हणजे प्रेम वीरांच्या स्वाक्षर्या... वाट लावतात असल्या अमुल्य वास्तुची !!!
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
मस्त लेख आणि सुरेख छायाचित्रे.
गडाचा इतिहास लिहिण्यासाठी मला मेलवर आलेल्या माहितीचा संदर्भ घेतला आहे. त्या एका पीडीएफ मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांचा इतिहास, गडावर बघण्यासारखी ठिकाणं, जाव कसं, गडावर काय काय सोय होउ शकेल इत्यादी माहिती आहे. ही माहिती एकत्र करणार्या सगळ्या अज्ञात मंडळीना माझा साष्टांग दंडवत. ह्या माहितीचा खुप उपयोग होतो.
ही पिडीएफ मला पाठवाल का? गुगल निरोप्याचा पत्ता व्यनी ने देतो.
अगाऊ धन्यवाद.
महेश हतोळकर
अप्रतिम रे!!! शिवनेरी दर्शन, घरबसल्या.
इदगाहच्या भिंतीवर अरेबिक मजकूर आहे. वाचायचा प्रयत्न करतोय. बहुतेक कबर या शब्दापासून सुरू होणारे वाक्य आहे.
बिपिन कार्यकर्ते
>ही अशी चिन्हं विजयाच, सामर्थ्याच प्रतिक म्हणून वापरली जात असावीत का? कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे.>
पुढच्या पायातला तो प्राणी की पक्षी कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्ट च्या (K.S.R.T.C) लोगो मधे दिसतो.
मस्त चित्रमय सफर ,
---- आनंद
धन्यवाद मित्रहो.
http://www.esnips.com/web/maharashtratilgadkillemahiti
ह्या इथे ती पीडीएफ अपलोड केली आहे. तिथुन उतरवुन घ्या.
<<<<अरेबिक मजकूर आहे. वाचायचा प्रयत्न करतोय. बहुतेक कबर या शब्दापासून सुरू होणारे वाक्य आहे.>>>
फोटु काढतानाच ठरवल होत की तुम्हाला विचाराव अस. :)
व्वा झकासराव अहो आपली माणस तुम्ही जरा जुन्नर लेण्याद्रीची सफर घडवा हो लोकांना !!!
आंबेगाव निवासी कोतवाल
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
मस्त छोटेखानी सफर !!
उगाचच म्हणुन नाही तर फोटोग्राफी चांगलीच आहे झकासराव !!
बाकी मदनबाणाशी सहमत ...साल ते प्रेम वीरांच्या स्वाक्षर्यांची विडंबन पण नाय पाडता येत तिथे ...टार्याला सांगीतले तर तो दात पाडेल तिथे जाउन आणी म्हणेल हॅ हॅ हॅ ...
सू हा स...
प्रतिक्रिया
लय भारी रे!
सहमत !
सुरेख
सुंदर
फोटो
मला फक्त
झकासराव
अप्रतिम
छानच ....
नतमस्तक...!
शाळेच्या ट्रिपच्या
सुरेख फोटो
मस्त वाटल शिवनेरी पाहून
झकास
मस्त लेख.
मस्त
झकास्या!!!
अप्रतिम...
मस्तच आहेत
झकास , मस्त,
>ही अशी
सु रे ख !!!!
धन्यवाद
धन्यवाद
व्वा
मस्त
धन्यवाद
मस्त रे