Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 08/14/2009 - 14:38
  • Log in or register to post comments
  • 8986 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 08/14/2009 - 15:03

Permalink

छान

छान लेख... यू ट्यूबवरची कार्यक्रमाच्या दुव्या बद्धल धन्यवाद. काल इ-टिव्ही मराठी वर लागणार्‍या कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमात या कॉमन मॅनला रेल्वे विषयक विषयावर बोलताना पाहिले. (वाचक) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 08/14/2009 - 15:48

In reply to छान by मदनबाण

Permalink

छान

छान लेख... यू ट्यूबवरची कार्यक्रमाच्या दुव्या बद्धल धन्यवाद.
सहमत आहे.. (आर के लक्ष्मणचा चाहता) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Fri, 08/14/2009 - 15:08

Permalink

वा.

सुंदर आहे लेख. हा एकपात्री प्रयोग कुठे झाला? पुन्हा होणार आहे का? "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 08/14/2009 - 16:34

In reply to वा. by ज्ञानेश...

Permalink

हा प्रयोग

हा प्रयोग मी काल (१३ ऑगस्टला) 'आयुका'च्या ऑडीटोरियममधे पाहिला. पुन्हा कुठे होणार का कसं याची कल्पना नाही. पण सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे खुद्द आर. के. लक्ष्मण त्यांच्या सौं.बरोबर तिथे आले होते. आणि एकपात्री संपल्यावर सर्वप्रथम उभं राहून अजित केळकरांना दाद दिली डॉ. श्रीराम लागू यांनी! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 08/15/2009 - 03:53

In reply to हा प्रयोग by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अरे वा!

खुद्द आर. के. लक्ष्मण त्यांच्या सौं.बरोबर तिथे आले होते... आणि एकपात्री संपल्यावर सर्वप्रथम उभं राहून अजित केळकरांना दाद दिली डॉ. श्रीराम लागू यांनी! अरे वा!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 08/14/2009 - 15:18

Permalink

गेली ५० वर्षे

गेली ५० वर्षे ह्या कॉमन मॅन ने खरच गाजवुन सोडली. हॅटस ऑफ टू आर के लक्ष्मण! त्यांनी देखील गौरवलेला हा कार्यक्रम नक्कीच चांगला असणार. सुंदर लेख आहे हो बै! कॉमन मॅन व सौ. कॉमन मॅन असलेले एक व्यंगचित्र Image removed. If she manages to stop smiling for just a moment, we can get an idea of what she looks like!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 08/14/2009 - 15:13

Permalink

परिचय...

कार्यक्रमाचा परिचय छान.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 08/14/2009 - 16:51

In reply to परिचय... by श्रावण मोडक

Permalink

+१

कार्यक्रमाचा परिचय छान. एकदा पहावाच लागेल निखिल ================================
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 08/14/2009 - 16:59

In reply to +१ by निखिल देशपांडे

Permalink

+२ असेच

+२ असेच म्हणतो... एकदा कार्यक्रम... बघायचेच ! *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 08/14/2009 - 18:16

In reply to +२ असेच by दशानन

Permalink

+३

असेच म्हणतो... --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 08/14/2009 - 18:19

In reply to +२ असेच by दशानन

Permalink

+३...

कार्यक्रमाचा परिचय छान. एकदा पहावाच लागेल मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 08/14/2009 - 23:07

In reply to +२ असेच by दशानन

Permalink

+५

सहमत आहे. कार्यक्रमाची ओळख आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by नितीनमहाजन on Fri, 08/14/2009 - 15:41

Permalink

कॉमन मॅन, आर. के. लक्ष्मण यांच्यावरील व्यंगचित्र

आर. के. लक्ष्मण यांना मॅगसेसे मिळाले त्याच्या दुसर्‍या दिवशी थोर व्यंगचित्रकार श्री. श्याम जोशी यांचे म. टा. मध्ये एक सुंदर व्यंगचित्र आले होते. माझ्याकडे ते कात्रण आहे. Scan केल्यावर ते देण्याचा प्रयत्न करीन. आर. के. लक्ष्मण आपल्या केबिनमध्ये काम करीत बसले आहेत. शेजारच्या टेबलवरील वर्तमान पत्रात आर. के. लक्ष्मण यांना मॅगसेसे मिळाल्याची बातमी दिसते आहे. बाहेर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक जण अक्षरशः फूल ना फुलाची पाकळी घेऊन उभे आहेत. यात सर्व नेते मंडळी आहेत - इंदिरा गांधी, चरणसिंग, राजनारायण, चंद्रशेखर, मोरारजी देसाई इत्यादी. सर्वजण आपापल्या राजकीय उंचीप्रमाणे श्याम जोशी यांनी काढले आहे. बाहेर उभा असलेला कॉमन मॅन डोकावून आर. के. लक्ष्मण यांना सांगत आहे "ते रॉयल्टी मागायला आले आहेत." एका थोर व्यंगचित्रकाराने दुसर्‍या थोर व्यंगचित्रकाराला केलेला हा एक सलाम. नितीन
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on Fri, 08/14/2009 - 16:26

Permalink

वा वा, हा

वा वा, हा कार्यक्रम आवर्जून बघायला हवा. ह्या निमित्ताने आर. कें. ची अनेक कार्टून्स आठवून गेली. लेखही चांगला. धन्यवाद! (आर के लक्ष्मणचा चाहता) कपिल
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Fri, 08/14/2009 - 16:33

Permalink

मस्त!

छान माहीती आहे! त्यांचे मराठीत भाषांतर केलेले (कार्टून्सचे आहेच, आठवणींचे) पुस्तक पण आहे. आत्ता नाव लक्षात नाही. युट्यूबच्या दुव्याबद्दल धन्यवाद (आत्ता त्याच्यावरच तहान भागवावी लागेल!). बाकी विकीपिडीयावर काही गंमतशीर माहीती/निरीक्षणे कळली ती येथे चिकटवतो:
  1. He has never kept a diary nor worn a wrist watch in his entire life
  2. The Common Man in his cartoons never speaks anything.
  3. The Common Man has even travelled to Antarctica once in a cartoon.
  4. The Common Man speaks once in an early cartoon about Nehru. He tells Nehru even as he doesn't recognize him, "...Don't know all that Sir, but I'm voting for that man...!", pointing to Nehru's statue. (from the book 'Brushing Up the Years')
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 08/14/2009 - 16:55

Permalink

कार्यक्रम

कार्यक्रमाचा परिचय छान करुन दिलात. कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता आहे. -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Fri, 08/14/2009 - 17:00

Permalink

अदिती,

अदिती, कार्यक्रमाची ओळख लेखातून छान करून दिलीस. आता हापिसात असल्याने दुवा उघडत नाही. दुवा आणि कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे. -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 08/14/2009 - 18:16

In reply to अदिती, by अनामिक

Permalink

अस्सेच

अदिती, कार्यक्रमाची ओळख लेखातून छान करून दिलीस. आता हापिसात असल्याने दुवा उघडत नाही. दुवा आणि कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे.
अस्सेच म्हणतो छान ओळख.. पुन्हा कुठे हा कार्यक्रम आहे कळलं तर कळव ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ६वाजून १५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हसते हसते, कट जाए रस्ते..."
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 08/14/2009 - 17:21

Permalink

वा !

अदिती, कार्यक्रमाची छान माहिती दिली आहेस. आम्हाला १२ वीत असताना कॉमन मॅन वर एक चॅपटर होता. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 08/16/2009 - 19:46

Permalink

लक्ष्मणरेखा..

अदिती, कार्यक्रमाची ओळख छानच करुन दिली आहेस, कसं बोलतात, यु सेड इट ची आठवण झालीच आणि लक्ष्मणरेखा नावाचं त्यांच आत्मचरित्रपर पुस्तकही आठवलं. स्वाती यु ट्युबवरची क्लिपही पाहिली, झलक पाहतानाच वाटले अफाट दिसतो आहे कार्यक्रम, लाइव्ह/डीव्हीडी पहायचा योग कधी येतो आहे त्याची वाट पहाविशी वाटते आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Fri, 08/14/2009 - 17:42

Permalink

छान लेख.

छान लेख. दुव्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Sun, 08/16/2009 - 06:58

In reply to छान लेख. by स्वाती२

Permalink

हेच...

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 08/14/2009 - 17:43

Permalink

सुरेख परिचय

अदिती ! सुरेख परिचय ! मनःपूर्वक धन्यवाद ! २८ जानेवारी १९८० आजचा दिवस मला साजरा करू दे. आज आर्. के. लक्ष्मणने लिहिली आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत : "नगरपालिकेने स्वच्छतेपोटी कचर्‍याचे ढीग इथून हालवले तर आम्ही भुकेने मरू." आजचा दिवस मला साजरा करू दे. कचर्‍यातील अन्नांश उचलून जिवंत राहण्याचा हा हक्क आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का? तसे नसल्यास, सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल आपले सरकार या लोकांवर फिर्याद घालू शकेल की नाही? -- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी आजचा दिवस मला साजरा करू दे. - विंदा करंदीकर
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 08/14/2009 - 17:52

In reply to सुरेख परिचय by मुक्तसुनीत

Permalink

ओह्ह्ह्ह

ओह्ह्ह्ह !! -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Fri, 08/14/2009 - 18:04

Permalink

आठवण!

आर. के. लक्ष्मण पुण्यात् औन्धमधे वास्तव्याला असायचे २००२-०३ चा काळ असेल. मी जेथे राहयचो त्यासमोरच्या बिल्डींग मधे; अर्थातच नेहमीच ग्यालरीत दिसायचे व अभिवादन करायचे. बरे वाटायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/14/2009 - 18:12

Permalink

मस्त !

लेख आवडला !
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Fri, 08/14/2009 - 18:22

Permalink

वा!

मस्तच परिचय करून दिलास ग अदिती कार्यक्रमाचा! झलकही पाहिली. अगदी छान! आता कार्यक्रम प्रत्यक्ष पहायची उत्सुकता आहे. [कॉमनमॅनची पंखी] क्रान्ति अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Sun, 08/16/2009 - 11:11

In reply to वा! by क्रान्ति

Permalink

+१,

आत्ताच ओळख वाचुन वर क्लिपही पाहिली. कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण आवडले, एवढा सुंदर परिचय दिल्याबद्दल अदितीचे आभार ... पाहु कार्यक्रम पाहण्याचा योग केव्हा येतो ते. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Fri, 08/14/2009 - 18:30

Permalink

छान ओळख!

वा! अदिती ह्या कार्यक्रमाची ओळख चांगली करून दिलीस. मात्र अजित केळकर जे म्हणाले....हा कॉम्या मला गावा-गावात,घरा-घरात पोचवायचा आहे ...तर तो त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये यायला हवा....नाहीतर फक्त इंग्लीश समजणार्‍या मूठभर लोकांतच तो प्रसिद्ध होईल...आणि मग तो कॉम्या न ठरता स्पेमॅ(स्पेशल मॅन)म्हणूनच ओळखला जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 08/14/2009 - 18:48

Permalink

सुंदर परिचय

सुंदर परिचय करुन दिल्याबद्द्ल ३_१४ विक्षिप्त आदिती यांचे आभार. (संक्षिप्त) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 08/14/2009 - 21:00

Permalink

लेख आवडला!

कॉमन मॅन हा अगदी घरातल्या माणसासारखाच होता... यू ट्युबवरची चित्रफीत जरूर पाहीन... एका वेगळ्याच विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 08/15/2009 - 00:30

Permalink

आमच्याबद्

आमच्याबद्दल्च्या कार्यक्रमाची माहीती दिल्याबद्द्ल धन्यवाद. नक्कीच पहायला हवा. रसिकांनी आर. कें.चा इतिहास वाचावा. मालगुडी डेज-कार आर. के. ह्यांचे लक्ष्मण हे धाकटे बंधु. अनेक वेळा चपला मिळुनही चालु न पडणार्‍या कॉमनमॅनला सलाम. --कॉमन मॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Sun, 08/16/2009 - 15:28

Permalink

मस्त ओळख

करुन दिलीएस कार्यक्रमाची. कधी झालाच कार्यक्रम इकडं पुण्यात, तर आवर्जुन जाइन. आपलाच, कॉमन मॅनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 08/16/2009 - 17:21

Permalink

अदिती सुरेख माहिती दिली आहेस कार्यक्रमाची!

यू ट्यूबवर झलकही पाहिली. प्रत्यक्ष बघायचा योग कधी येईल माहीत नाही पण अशी झलक तरी दिल्याबद्दल आभार. 'यू सेड इट'ने कित्येक वर्षे हसवले, अंतर्मुख केले होते त्याची आठवण झाली. (कॉमनमॅन)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Sun, 08/16/2009 - 17:42

Permalink

छान माहिती अदिती

पेपर उघडला कि पहिल कॉमनमॅन काय म्हणतोय हे बघितल्याशिवाय पेपर चाळला नाहि. नक्कि नक्कीच पहायला हवा हा कार्यक्रम.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 08/16/2009 - 23:08

Permalink

सुंदर ...

सुंदर लेख. अभिनंदन. आर. के. ... एक प्रतिभासंपन्न व्यंगचित्रकारास प्रणाम.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 08/17/2009 - 09:26

Permalink

अजित केळकर

अजित केळकर यांना मिपाची लिंक पाठवली होती. त्यांनी इमेलमधे मुंबईमधल्या दोन शोजची माहिती दिली आहे. Wed.19th August 2009 at 7-00p.m. at Sathaye College, Vile Parle(East) Sat.22nd August at 7-00p.m. at the NCPA Experimental Theatre. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/30/2009 - 12:01

Permalink

जुना धागा उकरून काढल्याबद्दल क्षमस्व.

जुना धागा उकरून काढल्याबद्दल क्षमस्व. श्री. अजित केळकर यांनी त्यांच्या पुढच्या कार्यक्रमांची माहिती कळवली आहे, ती पुढीलप्रमाणे: स्थळ: एस.एम. जोशी ऑडीटोरियम, गंजवे चौक, पत्रकार भवनाजवळ, नवी पेठ, पुणे "R.K.Laxman's Common Man"- in English on Saturday 10th October at 7-00 P.M. "गडकरी ते मतकरी", रविवार, ११ ऑक्टोबर, सकाळी ११ वाजता. दोन्ही कार्यक्रमांची तिकिटे ८ ऑक्टोबरपासून सकाळी १० ते १२ मधे आणि संध्याकाळी ५-७ या वेळात उपरोल्लेखित ठिकाणी उपलब्ध आहेत. फोनवर तिकीटे बुक करण्यासाठी ८ ऑक्टोबरनंतर 09819253511या नंबरवर संपर्क साधावा. (तात्या, अजित केळकर यांनी स्वतःच इथे लिहीण्याचा प्रयत्न केला, पण पूर्वपरवानगीशिवाय खाते उघडता येत नसल्यामुळे त्यांनी इमेल करून कळवले आहे. यासाठी काही करता येईल का?) अदिती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com