प्रतिक्रिया
छान लेख... यू ट्यूबवरची कार्यक्रमाच्या दुव्या बद्धल धन्यवाद.सहमत आहे.. (आर के लक्ष्मणचा चाहता) तात्या.
सुंदर आहे लेख.
हा एकपात्री प्रयोग कुठे झाला? पुन्हा होणार आहे का?
"Great Power Comes With Great Responsibilities"
हा प्रयोग मी काल (१३ ऑगस्टला) 'आयुका'च्या ऑडीटोरियममधे पाहिला. पुन्हा कुठे होणार का कसं याची कल्पना नाही. पण सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे खुद्द आर. के. लक्ष्मण त्यांच्या सौं.बरोबर तिथे आले होते.
आणि एकपात्री संपल्यावर सर्वप्रथम उभं राहून अजित केळकरांना दाद दिली डॉ. श्रीराम लागू यांनी!
अदिती
खुद्द आर. के. लक्ष्मण त्यांच्या सौं.बरोबर तिथे आले होते...
आणि एकपात्री संपल्यावर सर्वप्रथम उभं राहून अजित केळकरांना दाद दिली डॉ. श्रीराम लागू यांनी!
अरे वा!
गेली ५० वर्षे ह्या कॉमन मॅन ने खरच गाजवुन सोडली. हॅटस ऑफ टू आर के लक्ष्मण! त्यांनी देखील गौरवलेला हा कार्यक्रम नक्कीच चांगला असणार.
सुंदर लेख आहे हो बै!
कॉमन मॅन व सौ. कॉमन मॅन असलेले एक व्यंगचित्र
If she manages to stop smiling for just a moment, we can get an idea of what she looks like!
कार्यक्रमाचा परिचय छान.
कार्यक्रमाचा परिचय छान.
एकदा पहावाच लागेल
निखिल
================================
+२
असेच म्हणतो...
एकदा कार्यक्रम... बघायचेच !
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
असेच म्हणतो...
--अवलिया

कार्यक्रमाचा परिचय छान.
एकदा पहावाच लागेल
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
सहमत आहे. कार्यक्रमाची ओळख आवडली.
आर. के. लक्ष्मण यांना मॅगसेसे मिळाले त्याच्या दुसर्या दिवशी थोर व्यंगचित्रकार श्री. श्याम जोशी यांचे म. टा. मध्ये एक सुंदर व्यंगचित्र आले होते. माझ्याकडे ते कात्रण आहे. Scan केल्यावर ते देण्याचा प्रयत्न करीन.
आर. के. लक्ष्मण आपल्या केबिनमध्ये काम करीत बसले आहेत. शेजारच्या टेबलवरील वर्तमान पत्रात आर. के. लक्ष्मण यांना मॅगसेसे मिळाल्याची बातमी दिसते आहे. बाहेर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अनेक जण अक्षरशः फूल ना फुलाची पाकळी घेऊन उभे आहेत. यात सर्व नेते मंडळी आहेत - इंदिरा गांधी, चरणसिंग, राजनारायण, चंद्रशेखर, मोरारजी देसाई इत्यादी. सर्वजण आपापल्या राजकीय उंचीप्रमाणे श्याम जोशी यांनी काढले आहे.
बाहेर उभा असलेला कॉमन मॅन डोकावून आर. के. लक्ष्मण यांना सांगत आहे "ते रॉयल्टी मागायला आले आहेत."
एका थोर व्यंगचित्रकाराने दुसर्या थोर व्यंगचित्रकाराला केलेला हा एक सलाम.
नितीन
वा वा, हा कार्यक्रम आवर्जून बघायला हवा.
ह्या निमित्ताने आर. कें. ची अनेक कार्टून्स आठवून गेली. लेखही चांगला. धन्यवाद!
(आर के लक्ष्मणचा चाहता) कपिल
छान माहीती आहे! त्यांचे मराठीत भाषांतर केलेले (कार्टून्सचे आहेच, आठवणींचे) पुस्तक पण आहे. आत्ता नाव लक्षात नाही. युट्यूबच्या दुव्याबद्दल धन्यवाद (आत्ता त्याच्यावरच तहान भागवावी लागेल!).
बाकी विकीपिडीयावर काही गंमतशीर माहीती/निरीक्षणे कळली ती येथे चिकटवतो:
- He has never kept a diary nor worn a wrist watch in his entire life
- The Common Man in his cartoons never speaks anything.
- The Common Man has even travelled to Antarctica once in a cartoon.
- The Common Man speaks once in an early cartoon about Nehru. He tells Nehru even as he doesn't recognize him, "...Don't know all that Sir, but I'm voting for that man...!", pointing to Nehru's statue. (from the book 'Brushing Up the Years')
कार्यक्रमाचा परिचय छान करुन दिलात. कार्यक्रम पाहण्याची उत्सुकता आहे.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
अदिती, कार्यक्रमाची ओळख लेखातून छान करून दिलीस. आता हापिसात असल्याने दुवा उघडत नाही. दुवा आणि कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे.
-अनामिक
अदिती, कार्यक्रमाची ओळख लेखातून छान करून दिलीस. आता हापिसात असल्याने दुवा उघडत नाही. दुवा आणि कार्यक्रम पाहण्यास उत्सुक आहे.अस्सेच म्हणतो छान ओळख.. पुन्हा कुठे हा कार्यक्रम आहे कळलं तर कळव ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ६वाजून १५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हसते हसते, कट जाए रस्ते..."
अदिती,
कार्यक्रमाची छान माहिती दिली आहेस.
आम्हाला १२ वीत असताना कॉमन मॅन वर एक चॅपटर होता. :)
अदिती, कार्यक्रमाची ओळख छानच करुन दिली आहेस, कसं बोलतात, यु सेड इट ची आठवण झालीच आणि लक्ष्मणरेखा नावाचं त्यांच आत्मचरित्रपर पुस्तकही आठवलं.
स्वाती
यु ट्युबवरची क्लिपही पाहिली, झलक पाहतानाच वाटले अफाट दिसतो आहे कार्यक्रम, लाइव्ह/डीव्हीडी पहायचा योग कधी येतो आहे त्याची वाट पहाविशी वाटते आहे,
स्वाती
छान लेख. दुव्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद!
अदिती ! सुरेख परिचय ! मनःपूर्वक धन्यवाद !
२८ जानेवारी १९८०
आजचा दिवस मला साजरा करू दे.
आज आर्. के. लक्ष्मणने लिहिली
आधुनिक भारताची सर्वश्रेष्ठ विद्रोही कविता
अर्धी रेषांत, अर्धी शब्दांत :
"नगरपालिकेने स्वच्छतेपोटी
कचर्याचे ढीग इथून हालवले
तर आम्ही भुकेने मरू."
आजचा दिवस मला साजरा करू दे.
कचर्यातील अन्नांश उचलून
जिवंत राहण्याचा हा हक्क
आपल्या घटनेत अंतर्भूत आहे का?
तसे नसल्यास,
सर्वजनिक वस्तूची चोरी केल्याबद्दल
आपले सरकार या लोकांवर
फिर्याद घालू शकेल की नाही?
-- हे प्रश्न जाणकारांनी धसाला लावण्यापूर्वी
आजचा दिवस मला साजरा करू दे.
- विंदा करंदीकर
ओह्ह्ह्ह !!
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
आर. के. लक्ष्मण पुण्यात् औन्धमधे वास्तव्याला असायचे २००२-०३ चा काळ असेल. मी जेथे राहयचो त्यासमोरच्या बिल्डींग मधे; अर्थातच नेहमीच ग्यालरीत दिसायचे व अभिवादन करायचे. बरे वाटायचे.
लेख आवडला !
मस्तच परिचय करून दिलास ग अदिती कार्यक्रमाचा! झलकही पाहिली. अगदी छान! आता कार्यक्रम प्रत्यक्ष पहायची उत्सुकता आहे.
[कॉमनमॅनची पंखी] क्रान्ति
अग्निसखा
रूह की शायरी
आत्ताच ओळख वाचुन वर क्लिपही पाहिली.
कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण आवडले, एवढा सुंदर परिचय दिल्याबद्दल अदितीचे आभार ...
पाहु कार्यक्रम पाहण्याचा योग केव्हा येतो ते.
------
छोटा डॉन
वा! अदिती ह्या कार्यक्रमाची ओळख चांगली करून दिलीस.
मात्र अजित केळकर जे म्हणाले....हा कॉम्या मला गावा-गावात,घरा-घरात पोचवायचा आहे ...तर तो त्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये यायला हवा....नाहीतर फक्त इंग्लीश समजणार्या मूठभर लोकांतच तो प्रसिद्ध होईल...आणि मग तो कॉम्या न ठरता स्पेमॅ(स्पेशल मॅन)म्हणूनच ओळखला जाईल.
सुंदर परिचय करुन दिल्याबद्द्ल ३_१४ विक्षिप्त आदिती यांचे आभार.
(संक्षिप्त)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
कॉमन मॅन हा अगदी घरातल्या माणसासारखाच होता...
यू ट्युबवरची चित्रफीत जरूर पाहीन...
एका वेगळ्याच विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन!
आमच्याबद्दल्च्या कार्यक्रमाची माहीती दिल्याबद्द्ल धन्यवाद. नक्कीच पहायला हवा.
रसिकांनी आर. कें.चा इतिहास वाचावा. मालगुडी डेज-कार आर. के. ह्यांचे लक्ष्मण हे धाकटे बंधु.
अनेक वेळा चपला मिळुनही चालु न पडणार्या कॉमनमॅनला सलाम.
--कॉमन मॅन.
करुन दिलीएस कार्यक्रमाची.
कधी झालाच कार्यक्रम इकडं पुण्यात, तर आवर्जुन जाइन.
आपलाच,
कॉमन मॅनोबा
यू ट्यूबवर झलकही पाहिली. प्रत्यक्ष बघायचा योग कधी येईल माहीत नाही पण अशी झलक तरी दिल्याबद्दल आभार.
'यू सेड इट'ने कित्येक वर्षे हसवले, अंतर्मुख केले होते त्याची आठवण झाली.
(कॉमनमॅन)चतुरंग
पेपर उघडला कि पहिल कॉमनमॅन काय म्हणतोय हे बघितल्याशिवाय पेपर चाळला नाहि. नक्कि नक्कीच पहायला हवा हा कार्यक्रम.
सुंदर लेख. अभिनंदन.
आर. के. ... एक प्रतिभासंपन्न व्यंगचित्रकारास प्रणाम.
अजित केळकर यांना मिपाची लिंक पाठवली होती. त्यांनी इमेलमधे मुंबईमधल्या दोन शोजची माहिती दिली आहे.
Wed.19th August 2009 at 7-00p.m. at Sathaye College, Vile Parle(East)
Sat.22nd August at 7-00p.m. at the NCPA Experimental Theatre.
अदिती
जुना धागा उकरून काढल्याबद्दल क्षमस्व.
श्री. अजित केळकर यांनी त्यांच्या पुढच्या कार्यक्रमांची माहिती कळवली आहे, ती पुढीलप्रमाणे:
स्थळ: एस.एम. जोशी ऑडीटोरियम, गंजवे चौक, पत्रकार भवनाजवळ, नवी पेठ, पुणे
"R.K.Laxman's Common Man"- in English on Saturday 10th October at 7-00 P.M.
"गडकरी ते मतकरी", रविवार, ११ ऑक्टोबर, सकाळी ११ वाजता.
दोन्ही कार्यक्रमांची तिकिटे ८ ऑक्टोबरपासून सकाळी १० ते १२ मधे आणि संध्याकाळी ५-७ या वेळात उपरोल्लेखित ठिकाणी उपलब्ध आहेत. फोनवर तिकीटे बुक करण्यासाठी ८ ऑक्टोबरनंतर 09819253511या नंबरवर संपर्क साधावा.
(तात्या, अजित केळकर यांनी स्वतःच इथे लिहीण्याचा प्रयत्न केला, पण पूर्वपरवानगीशिवाय खाते उघडता येत नसल्यामुळे त्यांनी इमेल करून कळवले आहे. यासाठी काही करता येईल का?)
अदिती
छान