सहज जिल्बी पाडतोस तू
जे सुचतं तुझ्या मनास...
मी कपाळ बडवतो अन्
शोधतो नव्या शिx मात्र...
बोंबलत फिरतोस इथे तिथे
अन् लिहितोस भटकंतीत
भेटलास कधी फेस-टु-फेस तर
बातमी येईल चौकटीत मात्र
सहज लिहितोस काव्य कधी
गण - मात्रांवर सूड उगवत
चार कडव्यांत थांबलास म्हणून
आभार मानत राहतो मात्र...
मनातलं जनांत आणायला
कधी लिहितोस काही-बाही
अर्धे वाचतो कसे तरी
बाकी वाचवत नाही मात्र
अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यामुळेच मिपावर येणे
सहज राहिले नाही मात्र...!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
262
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
@अनन्त यात्री
हा हा हा
भारीच जमलीय🤣😂
बाबो.....
बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?
पैजारबुवा,
बाबो......🫢तुमीबी त्या…
In reply to बाबो..... by ज्ञानोबाचे पैजार
बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?
+१०८
आवडलं हेही विडंबन!
🤣
🤣
🤓🤣😂
🤓🤣😂
कुणाबद्दल त्रागा करत आहात माहीत नाही पण.
वृत्त छंदांच्या नादी कोण लागतं?
यमक,रुपक अंलकार कोण वाचतो?
गोल,गोल वाटोळी जिल्बी,
तळून ,हलवाई पाकात टाकतो.
उद्यमी, मुक्तछंदी नवकवींना नेहमीच प्रताडीत केले गेले आहे.
कर्नल, हे तर
In reply to कुणाबद्दल त्रागा करत आहात माहीत नाही पण. by कर्नलतपस्वी
कर्नल, हे तर
फक्त विडंबन
कसला त्रागा?
कसे प्रताडन?
विडंबनांची
तीट लागता
"सहज मात्र"
खुलते ना कविता?
बाडीस
In reply to कर्नल, हे तर by अनन्त्_यात्री
🤣
विडंबन आवडले
विडंबन आवडले
हा हा 😂 बर झालं बाई माझ्या…
हा हा 😂 बर झालं बाई माझ्या पाकृ विभागाविषयी नाही लिहिलं 😂
सहज डोकावी पाकृ विभागात
आमटी उकळते, शेंगोळे तळून,
आंबोळी गरम, चिंगोळे कुरकुर,
नाक मुरडूनही, तोंडा पाणी सुटत सहज मात्र...
स्वारी भक्तीतै,
In reply to हा हा 😂 बर झालं बाई माझ्या… by Bhakti
पा कृ वर नाय घसरलो.
पाकृ बद्दल थोडा हळवा आहे कारण https://aisiakshare.com/node/6010
सुरेख पा.कृ.प्रथम ब्रह्माण्ड…
In reply to स्वारी भक्तीतै, by अनन्त्_यात्री
सुरेख पा.कृ.
प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी
हाहा 🤣
In reply to हा हा 😂 बर झालं बाई माझ्या… by Bhakti
हाहा 🤣
Mast aahe
Mast aahe