Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 16/10/2026 16:11 या दिवशी प्रकाशित केले.

सहज जिल्बी पाडतोस  तू
जे सुचतं तुझ्या मनास...
मी कपाळ बडवतो अन्
शोधतो नव्या शिx मात्र...

बोंबलत फिरतोस इथे तिथे
अन् लिहितोस भटकंतीत
भेटलास कधी फेस-टु-फेस तर
बातमी येईल चौकटीत मात्र

सहज लिहितोस काव्य कधी
गण - मात्रांवर सूड उगवत
चार कडव्यांत थांबलास म्हणून
आभार मानत राहतो मात्र...

मनातलं जनांत आणायला
कधी लिहितोस काही-बाही
अर्धे वाचतो कसे तरी
बाकी वाचवत नाही मात्र

अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यामुळेच मिपावर येणे
सहज राहिले नाही मात्र...!!


वाचने 82
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?

पैजारबुवा, 

 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?

+१०८

आवडलं हेही विडंबन! 
 

 


वृत्त छंदांच्या नादी कोण लागतं?

यमक,रुपक अंलकार कोण वाचतो?

गोल,गोल वाटोळी जिल्बी,

तळून ,हलवाई पाकात  टाकतो.

 

उद्यमी, मुक्तछंदी नवकवींना नेहमीच प्रताडीत केले गेले आहे.