सहज जिल्बी पाडतोस तू
जे सुचतं तुझ्या मनास...
मी कपाळ बडवतो अन्
शोधतो नव्या शिx मात्र...
बोंबलत फिरतोस इथे तिथे
अन् लिहितोस भटकंतीत
भेटलास कधी फेस-टु-फेस तर
बातमी येईल चौकटीत मात्र
सहज लिहितोस काव्य कधी
गण - मात्रांवर सूड उगवत
चार कडव्यांत थांबलास म्हणून
आभार मानत राहतो मात्र...
मनातलं जनांत आणायला
कधी लिहितोस काही-बाही
अर्धे वाचतो कसे तरी
बाकी वाचवत नाही मात्र
अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यामुळेच मिपावर येणे
सहज राहिले नाही मात्र...!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
82
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
@अनन्त यात्री
हा हा हा
भारीच जमलीय🤣😂
बाबो.....
बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?
पैजारबुवा,
बाबो......🫢तुमीबी त्या…
In reply to बाबो..... by ज्ञानोबाचे पैजार
बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?
+१०८
आवडलं हेही विडंबन!
🤣
🤣
🤓🤣😂
🤓🤣😂
कुणाबद्दल त्रागा करत आहात माहीत नाही पण.
वृत्त छंदांच्या नादी कोण लागतं?
यमक,रुपक अंलकार कोण वाचतो?
गोल,गोल वाटोळी जिल्बी,
तळून ,हलवाई पाकात टाकतो.
उद्यमी, मुक्तछंदी नवकवींना नेहमीच प्रताडीत केले गेले आहे.