Skip to main content
लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 16/10/2026 16:11 या दिवशी प्रकाशित केले.

सहज जिल्बी पाडतोस  तू
जे सुचतं तुझ्या मनास...
मी कपाळ बडवतो अन्
शोधतो नव्या शिx मात्र...

बोंबलत फिरतोस इथे तिथे
अन् लिहितोस भटकंतीत
भेटलास कधी फेस-टु-फेस तर
बातमी येईल चौकटीत मात्र

सहज लिहितोस काव्य कधी
गण - मात्रांवर सूड उगवत
चार कडव्यांत थांबलास म्हणून
आभार मानत राहतो मात्र...

मनातलं जनांत आणायला
कधी लिहितोस काही-बाही
अर्धे वाचतो कसे तरी
बाकी वाचवत नाही मात्र

अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यामुळेच मिपावर येणे
सहज राहिले नाही मात्र...!!


वाचने 262
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?

पैजारबुवा, 

 


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाबो......🫢तुमीबी त्या क्वितेच्या नादी लागला?

+१०८

आवडलं हेही विडंबन! 
 

 


वृत्त छंदांच्या नादी कोण लागतं?

यमक,रुपक अंलकार कोण वाचतो?

गोल,गोल वाटोळी जिल्बी,

तळून ,हलवाई पाकात  टाकतो.

 

उद्यमी, मुक्तछंदी नवकवींना नेहमीच प्रताडीत केले गेले आहे. 

 


In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल, हे तर  
फक्त विडंबन
कसला त्रागा?
कसे प्रताडन?

विडंबनांची
तीट लागता
"सहज मात्र"
खुलते ना कविता?


हा हा 😂 बर झालं बाई माझ्या पाकृ विभागाविषयी नाही लिहिलं 😂

 

सहज डोकावी पाकृ विभागात

आमटी उकळते, शेंगोळे तळून,

आंबोळी गरम, चिंगोळे कुरकुर,

नाक मुरडूनही, तोंडा पाणी सुटत सहज मात्र...


In reply to by अनन्त्_यात्री

सुरेख पा.कृ.

प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी