Skip to main content

कर्वेतले दिवस ११: “पीआरए" साठी दुर्गम गावांचा अभ्यास दौरा

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/10/2026 16:01 या दिवशी प्रकाशित केले.

✪ रिसर्च जणू जीवनाचं रूपक- प्रत्येकाच्या गोष्टी होणार आहेत 

✪ पीआरए- Participatory Rural Appraisal 

✪ गावांचा अभ्यास आणि सामाजिक विश्लेषण 

✪ आंदर मावळची गावं आणि वाड्या 

✪ प्रभात फेरी, थाळी फेरी आणि गांव फेरी 

✪ फिल्ड वर्कमध्ये मनासारखे प्रयत्न केल्याचं समाधान 

तूच कर्ता आणि करविता

लेखक मनस्विता यांनी बुधवार, 30/09/2026 21:11 या दिवशी प्रकाशित केले.

आमच्या आर्ट किट्टीमध्ये सहभागी होऊन मला आता पाच महिने होऊन गेले. पहिले चार महिने वेगवेगळे कलाप्रकार शिकत-करत सप्टेंबर महिना आला आणि सगळ्यांना गणपतीचे वेध लागले. त्यामुळे आम्ही सप्टेंबर महिन्यात शाडूच्या मातीचा गणपती घडवायचा ठरवलं.

 

बेभरवश्याचा निसर्ग

लेखक psajid यांनी गुरुवार, 24/09/2026 11:02 या दिवशी प्रकाशित केले.

संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठंही पाऊस नाही. विधाता कोपलाय ? का ऋतुचक्र बदललंय ? हे कळेनासे झालंय. सगळीकडे ऐन पावसाळ्यात चक्क ऊन पडलंय, ढगांचा पत्ता नाही, आक्टोबर हिट आतापासून जाणवू लागली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. चार महिन्यांच्या पावसाळ्यावर पुढचे आठ महिने जगण्याचं गणित मांडणारा शेतकरी आज त्या निरभ्र आकाशाकडे आशाळभूतपणे डोळे लावून पाहतोय. पोटच्या लेकरांसारखं जपलेल्या जित्राबांच्या काळजीनंही शेतकरी हवालदिल झालाय… कारण शेतात उभं असलेलं पीक हे शेतकऱ्यासाठी केवळ पीक नसतं.

शब्द झाले मोती : ३

लेखक गणेशा यांनी सोमवार, 21/09/2026 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द झाले मोती : ३

जवळजवळ १०-११ वर्षे झाली, “शब्द झाले मोती” लिहायला घेतलेलं ते...

आता मागे वळून पाहताना वाटतं,
माणूस ३० मधून चाळिशीकडे येताना किती स्थित्यंतरांतून जातो...

या भागात मात्र मला चाळिशीतल्या माझ्या मनाला उमटणारे भाव शब्दांत उतरवायचे आहेत. जसं वाटेल, तसं लिहिणार आहे...

आधी वाटलं होतं, FIRE, Finance, Health, चाळीशी, अशा माझ्या आत्ताच्या विचारांवर लिहावं.
पण इतक्या वर्षांनी पुन्हा लिहायला घेतलं आणि आठवणींचे दरवाजे आपोआप उघडू लागले...

मग म्हटलं, 
“शब्द झाले मोती” म्हणजे मनात येईल ते.

आठवण

लेखक चक्कर_बंडा यांनी रविवार, 28/06/2026 20:35 या दिवशी प्रकाशित केले.

 

"आठवणींनाही ऋतू असतात, काही उन्हाळ्यासारख्या कोरड्या, काही 'शीतल' गोड-गुलाबी तर काही पावसासारख्या अनाहूत". 

तू माझा सांगाती..

लेखक आजी यांनी शुक्रवार, 26/06/2026 17:53 या दिवशी प्रकाशित केले.

माझा गुडघा दुखतो. उजवा गुडघा. खरं तर पूर्वीच म्हणजे मी पन्नाशी ओलांडली तेव्हा तो थोडा थोडा कुरकुर करायला लागला होताच. पण मी म्हटलं इतक्या लहान वयात (!?) गुडघा कसा दुखेल बरं! आणि दुखून चालणारच नाही (शब्दशः). आपल्याला तर अजून किती तरी कामं करायची आहेत.

तेव्हा असं वाटलं की, खूप काही अचिव्ह करायचं आहे. आपण काही म्हातारे झाले नाही आहोत. आपण ज्येष्ठ नागरिक व्हायला अजून दहा वर्षं बाकी आहेत. 

 

पण माझ्या या मताशी माझा उजवा गुडघा सहमत नव्हता. तो आपला दुखतच होता.