Skip to main content
लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत. इथे अनेकांना विरोधी भूमिका घ्यायची असते पण ते घेऊ शकत नाहीत. शिवाय विरोधक कोणी सामान्य नागरिक नसतात, तर ते असतात दादा, भाऊ अशा नगरसेवक राजकारण्यांचे कार्यकर्ते. त्यांना यांच्यातूनच भावी नेते व कट्टर कार्यकर्ते मिळत असतात. तर अशा सगळ्या वातावरणात...

पुणे महापालिका गणेशोत्सवाबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी एक सभा आयोजित करते. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट तिथे जातात आणि ध्वनिवर्धक (लाऊड स्पीकर) मुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने व गणेशोत्सवाच्या मंडपांमुळे रहदारीस अडथळा होत असल्याने या दोन्हीवर संपूर्ण बंदी घाला असे मत मांडतात. अर्थातच त्यांना सुरक्षा रक्षकांच्या कड्यात सभागृहाबाहेर काढले जाते. हे पूर्वीही काही वेळा झाले असेल, पण यावेळी...

बापट गप्प बसणे तर सोडाच, अधिकच बोलू लागले आहेत. जवळजवळ प्रत्येक वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी त्यांचे आक्षेप सविस्तर व करकरीत तर्काचा आधार घेऊन मांडले आहेत. त्यासाठी कायदा, लोकशाही, धर्मस्वातंत्र्य, संस्कृती, परंपरा, इतिहास याचा आधार घेऊन ते अजिबात बोटचेपी, तडजोडीची भूमिका न घेता आपले म्हणणे मांडत सुटले आहेत. भाजपाचे शहर प्रमुख बापटांना काळं कुत्रंही विचारत नाहीत असे म्हणाले. त्यावर बापटांनी संस्कृत वचन वापरून त्यांना प्रसिध्दी का नको आहे ते सांगितले आहे...

काही म्हणा बापटांचं ऐकायला मजा येते आहे. एक स्पष्ट विचार असणारा नास्तिक केवळ बुध्दीच्या व तर्कसंगत युक्तीवादाच्या जोरावर बलाढ्य झुंडीसमोर न घाबरता उभा आहे. आणि तथाकथित दांडगट गल्लीदादा त्यांचं अजून तरी काही वाकडं करू शकलेले नाहीत. बापट नास्तिक असल्याने त्यांनी द्वैत अद्वैत वादाला चक्क बौध्दिक हस्तमैथुन म्हणण्याचे धाडस दाखवले आहे. दुवा: अस्खलित बापट ‘मराठीतले शशी थरूर’! DJ विरोधात घणाघात! CM फडणवीसांची नरोवा कुंजरोवा भूमिका!

जंतरमंतरवरील निर्भय जेन झी नंतर असे एक एक निर्भय लोक समोर येत आहेत. कुठे ना कुठे अनेक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. 


वाचने 5749
प्रतिक्रिया 162

प्रतिक्रिया

आपल्या नदी, तलावे स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपली आहे, कालच एकाने सिंधू नदीचा व्हिडिओ नेटवर टाकलेला पाहिला प्रचंड स्वच्छ होती, तो रोस्ट करत होता की गंगा नदीसारखे करोडो रुपये स्वच्छतेला लागत नाहीत, पाकिस्तानातला व्हिडिओ होता. 

 नदीत निर्माल्य टाकू नका, गणपायी मूर्तीही पाण्यात एकदा बुडवून अनिस किंवा एखाद्या समाजसेवी संस्थेच्या ताब्यात द्या. आम्ही नगरपालिकेचा हौदात विसर्जन करून मूर्ती त्यांच्या ताब्यात देतो. नद्या तलावे स्वच्छ ठेवायची जबाबदारी पार पाडा. जागृत हिंदू बना मूर्ख हिंदू नाही.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

More than 90 percent of plastic waste from the sample sites in Upper Indus Basin ends up in the river, wreaking havoc on the aquatic life and surrounding communities. 

 

बुद्धिप्रामाण्य स्थितप्रज्ञ राहावे म्हणून फोटो प्रूफ 

 

अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन - पाकिस्तानातील डायरिया मुळे होणाऱ्या बाल मृत्यूंपैकी २१.६% मृत्यू हे सिंधू नदीचे दूषित पाणी प्यायल्याने होतात

एखादा पाकिस्तानी म्हणाला अन् आपण सिंधू स्वच्छ आहे माानले इतका बाळबोध समज दुसरा नसेल.कारण वर्ल्ड बँक आणि इतर सोर्सेस काहीतरी वेगळेच सांगतात.  

उद्या आपण गंगोत्री जवळ जाऊन गंगेचे व्हिडिओ काढले तर पाणी नितळ दिसणारच आहे. मुळात भारतीय उपखंडात लोकसंख्या महास्फोट, पराकोटीचे औदासिन्य आणि सिव्हिक सेन्सची टोटल वानवा ह्यामुळे आपण लोक इतक्या सुंदर नद्या आणि इतर नैसर्गिक संसाधने वापरायला तद्दन नालायक लोक आहोत. 

हे जितके खरे भारतासाठी आहे, तितकेच सोळा आणे सच ते पाकिस्तान आणि सिंधूसाठी आहे , कंबोडिया आणि मेकाँग नदीसाठी आहे, बांगलादेश आणि पद्मा नदीसाठी आहे, आणि अगदी थायलंड अन् चाओ फराया नदीसाठी आहे.

(पाणक्या) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

पाकिस्तानातील डायरिया मुळे होणाऱ्या बाल मृत्यूंपैकी २१.६% मृत्यू हे सिंधू नदीचे दूषित पाणी प्यायल्याने होतात >> सर मी स्वच्छ म्हटले आहे, पाणी पिण्यालयल एकदम फिल्टर्ड पाणी आहे सिंधूचे असे म्हटलेले नाही. स्वच्छ ह्याचा अर्थ गंगेत जसे निर्माल्य, फुले, नारळ, कचरा घाण असे काही दिसले नाही असे सांगतो आहे. एखादी नदी चांगली आहे तिकडच्या लोकांनी चांगली ठेवली आहे मान्य करायला काय हरकत आहे? 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

एखादी नदी चांगली आहे तिकडच्या लोकांनी चांगली ठेवली आहे मान्य करायला काय हरकत आहे? 


https://www.lgsonic.com/insights-the-worlds-most-polluted-river-a-2024-…

रिपोर्ट पहा. सिंधू नदी गंगा-ब्रह्मपुत्रा च्या दुप्पट प्लास्टिक समुद्रांत नेवून टाकते. जगातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी ती एक आहे. गंगा नदी नंबर १ वर असली तरी सिंधू नदी टॉप १० मध्ये नेहमीच राहिली आहे. काही कारणास्तव प्लास्टिक मध्ये मात्र ती नंबर १ राहिली आहे.

सिंधू नदीला स्वच्छ म्हणजे कुमार गौरव आणि राहुल रॉय ह्यांनी सुपरस्टार कोण  भांडणे होय. 


In reply to by साहना

पेय जलप्रदूषण याचे तीन मानक आहेत

१) प्रत्यक्ष ( physical) purity  
२) रासायनिक  CHEMICAL)
३) जैविक ( BACTERIOLOGICAL)

१) माती किंवा इतर पदार्थ मिसळल्यामुळे  पाणी गढूळ दिसते  पिण्यासाठी असुरक्षित असेल असे नाही. साधं  थोडा वेळ  एका भांड्यात ठेवले कि हा गाळ खाली बसून   वरील पाणी स्वच्छ होते.


२) रासायनिक पदार्थ मिसळलेले असतील तर त्याचे शुद्धीकरण हे जास्त कठीण असते. उदा पाण्यात अतिरिक्त फ्ल्युओराइड किंवा इतर क्षार असतील जे जमिनीतून आलेले असतील. किंवा कारखाने आणि फॅक्टऱ्या यातून सोडले जाणारे पाणी यात विविध प्रकारचीORGANIC/ INORGANIC (सेंद्रिय किंवा निरिंद्रिय) रसायने असू शकतात   यासाठीच रसायने वापरणाऱ्या कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण करणारे संयंत्र बसवणे कायद्याने बंधनकारक केलेले असते.

३) जैविक- पाण्यात विविध तर्हेचा जैविक कचरा मिसळला गेला उदा जनावरांचे शेण किंवा मानवी विष्ठा जी गोष्ट पावसाळ्यात होते तर त्या पाण्यात घटक जिवाणू मिसळून पाणी पिण्यास अयोग्य होते.  

तिन्ही गोष्टींसाठी जलशुद्धीकरण आवश्यक असते.

पाणी थोडा वेळ ठेवून नंतर गाळले असता त्यातील भौतिक प्रदूषण दूर करता येते. पाण्याचे क्लोरिनेशन करणे किंवा उकळणे याने जैविक प्रदूषण दूर करता येते. रासायनिक प्रदूषण सहजासहजी दूर करता येत नाही. यासाठी मुंबई सारख्या मोठ्या शहरात पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आयॉन एक्सचेंज रेसिन्स वापरले जातात. ज्यात कॅटायन आणि ऍनायन एक्सचेंज रेसिन्स यांनी  ( inorganic) निरिंद्रिय प्रदूषण दूर करता येते. पण कीटकनाशकांसारखे पदार्थ काढून टाकण्यासाठी ओझोन किंवा हायड्रोजन पेरॉकसाईड किंवा विजेच्या साहाय्याने ते काढून टाकावे लागतात.            


गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात बॅक्टरिओफाज म्हणजेच जिवाणूंचा नाश करणारे विषाणू असल्याने गंगेच्या पाण्यात स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळेच ६६ कोटी लोकांनी २०२५ च्या कुंभ मेळ्यात भाग घेऊनही मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली नाही. The world's largest religious gathering, the Maha Kumbh Mela 2025, took place at the Triveni Sangam in Prayagraj (formerly Allahabad), Uttar Pradesh, India, from January 13 to February 26, 2025, spanning 45 days. It drew around 660 million devotees from all over the world. There was a risk of waterborne illnesses due to this high-level gathering. Still, the risk was mitigated by the Ganga River's capacity to purify itself through its bacteriophage population, which is present (natural phage therapy). Devotees rarely get serious diseases despite considerable contamination due to mass gatherings, as per the literature. A range of bacteriophages has harnessed the Ganga River's capacity for self-cleaning to manage the risk of waterborne infections caused by various bacteria, as highlighted here.

The antibacterial properties of Ganga water have also been studied in relation to Vibrio cholerae, the bacterium that causes cholera and is killed within three hours in Ganga water but survives for forty-eight hours in distilled water.

The variety of bacteriophages that fight infectious organisms in the Ganga River significantly contributes to the water's natural sterility and therapeutic properties.

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S3050456225000136    

गंगेच्या पाण्यात स्वतः शुद्ध होण्याची क्षमता असली तरी आपण त्यात सर्व तर्हेचा कचरा टाकून त्याची कमाल मर्यादा कधीच पार केलेली आहे.

 

 

  
          


In reply to by अमरेंद्र बाहुबली

फक्त सिंधू मधे प्लास्टिक प्रदूषण हे जगातील सगळ्यात जास्त असल्याचा विदा दुवा आपण वाचण्याचे विसरलात असे दिसते. असो ! एखाद गोष्ट चांगली असता चांगली म्हणायला हरकत नाही - कोक स्टुडिओ पाकिस्तान बद्दल जर हे म्हणले तर नाकबूल करायला मी अरसिक नाही पण सिंधू नदी त्या ब्रॅकेट मधे बसतच नाही ना भाई.


स्वतः हिंदू असल्याचा दावा करणारे लोक्स् अंनिस सारख्या धर्मविरोधी संघटनाच्या समर्थनार्थ आवाहन करताना आढळून आले आहेत. त्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका. असले भुरटे नमुनेवादी कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गणेशोत्सवासारख्या पवित्र प्रसंगी अपशकुन करायला उगवतात. त्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका.

वर लिहिल्याप्रमाणे, सामाजिक संकेत, नियम, कायदे पाळा. गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन  करा. कुणीही इसम "मूर्ती आमच्या ताब्यात द्या" अशी जबरदस्ती करण्याचा हीन प्रयत्न करत असेल तर तसल्या भ्याड प्रवृत्तीचा बीमोड करा. हिंदू धर्म कायम प्रागतीक राहिलेला आहे. त्यात असल्या उपटसुंभांची काही गरज नाही. 

 

गणपती बाप्पा मोरया. 


बिहार गणेशोत्सवांत संस्कृतीक कार्यक्रम : 
अश्लीलता आहे. 
https://x.com/JayantBhandari5/status/2100586863757238715 (NSFW काठाउन कामाच्या ठिकाणी उघडू नये) 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

हो ! भारतांत ट्विट ब्लॉक केला पण प्रत्यक्ष घटना भारतांत घडली त्याचे काय ? 


In reply to by साहना

हे तर फारच सॉफ्ट आहे, ह्यापेक्षा भयंकर प्रकार असतात. गाई वाचवा बाई नाचवा ह्या धोरनानुसार महाराष्ट्रातही मुली नाचवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत, पुढे जाऊन अशी प्रगती होईलच.