रविवार......
आज "रवी ",सुद्धा सुट्टीवर होता....
पावसाळी हवा,झाकोळल आकाश...
"आकाश पांघरून, घर शांत झोपलेले'
दबक्या आवाजात भ्रभ्रमणध्वनीवर गाणे लावून...
आजोबा मात्र,डोलणार्या खुर्चीत बसून "पुणे मिरर"चे डोके खात होते.
घरातले रविवार "मोड", वर होते...संथ,
मोबाईल प्रत्येक खोलीत कंठशोष करत होता.
पण कुणालाच ढिम्म फरक पडत नव्हता.
गरीब बिचारा.... कोण? 🤫
आहो मोबाईल.
एवढ्यात हाकामारी घंटी कर्कश्श आवाजात ओरडली.
सगळ्या घराला खडबडून जाग आली.
आळसावलेले चेहरे घेऊन आळोखे पिळोखे देत झाडून सर्व सजीव दिवाणखान्यात जमा झाले.(अगदी कामवाली बाई सुद्धा) .
पुन्हा एकदा हाकामारी घंटीने (काॅल बेल) बाहेर कुणीतरी उभे आहेत याची जाणीव करून दिली.
"अरे,मेल्यांनो,कुणीतरी दार उघडा ना!",आजीबाईची मुक्ताफळं.
"मेड",(कामवाली बाई नाही म्हणायचे ) ने दार उघडले,
"या,या",असे अगांतुकांचे प्रेमाने स्वागत केले गेले.
आजोबा तिरकस नजरेने सर्व बघत होते.
दाखवायचा कार्यक्रम सुरू झाला.
"आय्या, कित्ती छान ", "सुंदर", आणी आशाच प्रकारचे उद्गारवाचक शब्द हवेत पसरले.
रंग,रूप खानदान इत्यांदींची आगांतुकानी तोंडभरून स्तुती केली.
सर्वांनी माना डोलवत पसंती दर्शवली.
"कधी करायचे? ",एकाने प्रश्न उपस्थित केला.
"लवकरच", सूनबाईंनी अंतिम शिक्कामोर्तब केले.
इतका वेळ आजोबा गप्प होते.
"आजोबा,तुम्हांला कशी वाटली?"इती लाडकी नात....
हुश्श.....
आजोबा म्हणाले जोडी चांगली दिसेल,मलाही पसंत आहे.
शेवटी आयुष्यभर एकत्र राहायचंय ना !.....
.
.
.
.
.
..
.
चला, झाला ना "बाथरूमचा साखरपुडा", आता मस्तपैकी गरमागरम कांदेपोहे आणी चहा घेऊन या....
आगांतुकांच्या खांद्यावरची ओझे कमी झाले. न्हाणीघरात जमीनवर आणी भिंतींवर लावण्यासाठी टाईल्स चे नमुने घेऊन आले होते. ........ते.....
मिसळपाव
प्रतिक्रिया
घर म्हटले की जोड्या…
घर म्हटले की जोड्या शोधाव्याच लागतात. निदान घराच्या बांधकामाला तरी चुकीच्या जोड्या नको मिळायला 😃
अरे वा!!
विंटरेष्टिंग शशक आहे.
मात्र परफेक्ट जोड्या फक्त चपलांच्या, बाकी सगळ्या अंधश्रद्धा!! हाकानाका
मिपाचे फेसबुक/वाटसप झाले…
मिपाचे फेसबुक/वाटसप झाले आहे.. वाट्सप-फेसबुकावर जसे लोक सकाळी सकाळी मला आज पातळ शी झाली असल्या टाईपाचे स्टेटस टाकतात तसेच... आज अमच्याकडे हे झालं ते झालं टाईप लेखन सुरु झाले आहे.
मजा नाही हो करनल सायबा... सॉरी मैन.
राजो माय ब्वाय
In reply to मिपाचे फेसबुक/वाटसप झाले… by राज जोशी
१०,०००% सहमत.
फेसबुक, वर्डप्रेस इत्यादी सोयी असताना सुद्धा मालक चालकांनी मिसळपाव अप अँड रनिंग ठेवले आहे कारण काहीतरी चांगले लेखन अन् त्याची रिपॉझिटरी तयार व्हावी. हे असे आज बाथरूमच्या फरश्या फायनल केल्या अन् उद्या काय पावशेर पालक आणला टाईप डेली लाईफ ब्लॉग लिहायला वर्डप्रेस बेस्ट आहे असे माझे माझ्या भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसणारे मत आहे बुवा.
(प्रेम बिहारी नारायण रायजादा) खोंडे
जोशी साहेब......
तुम्ही कोण?
तुम्ही म्हणजे काय आय एस आय?
नका त्रास घेऊ.
जास्त त्रास होत असेल तर इनो घ्या.
अजून दुपट्यातच शी करत आहात...डु आय डी अहात का?
In reply to जोशी साहेब...... by कर्नलतपस्वी
तुमच्या सारखे ए आय च्या कुबड्या....घेऊन लिहीत नाही.
आपला "गेम चेंजर......", लेख पुन्हा एकदा वाचा.
ओ कर्नल साहेब
In reply to जोशी साहेब...... by कर्नलतपस्वी
मी काय म्हणतो, एखाद टोकाचे उदाहरण दिले असेलही जोशींनी पण मुद्दा त्यांचा चूक नाही. जोशी आय एस आय आहेत का नाहीत हे त्यांचे त्यांना माहिती पण त्रयस्थ नजरेतून तुम्ही पण इनो वाटप ठेकेदारी करताय असे दिसते आहे. रिटायर होताना बंदूक इत्यादी कोत मधे जमा केली होती ना ? नाही जरा कोणी काय बोललं का डायरेक्ट फायर ऍट विल करत सुटले आहात म्हणून विचारतोय सर (कृपया हलके घेणे).
(कॅप्टन बाजीराव रणगाडे) खोंडे
मी काय म्हणतो, एखाद टोकाचे उदाहरण....
In reply to ओ कर्नल साहेब by वृषभ खोंडे
म्हणजे त्यांनी LOC क्राॅस केली हे आपल्याला मान्य आहे.
मग आमची बंदूक गरजली त्यात काय चुकलं!
बाकी, मिपाचे फेबु किवा कायप्पा होत आहे हे बघायला महाराज निलसेन आणी प्रशुसेन समर्थ आहेत. त्याची काळजी इतरांनी करायची गरज नाही.
प्रत्येकाच्या लेखनावर फुटपट्टी लावायची गरज नसते. नाही पटले सोडून द्यावे. फुकट तोंड पाटिलकी करू नये.
माझा लेख वाचायला कुणाला निमंत्रण दिले नाही.
रिटायर होताना बंदूक इत्यादी कोत मधे जमा केली होती ना ?
तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे कृपया उगाच खा. ख. काढू नका.
एके ठिकाणी आपणच म्हणलात की जशी समोरच्याची भाषा असेल तसेच उत्तर मिळेल.
असो,आपण पण हल्केच घ्या.
आवांतर-एका जुन्या जाणत्या मिपाकराने लिहून ठेवले आहे...
आपल्या घरातील गप्पा, शेजारच्या छोट्या गोष्टी, रस्त्यावर घडलेली एखादी घटना— यात किती मजेशीर किस्से दडलेले असतात, नाही का? या छोट्याशा प्रसंगात विनोदही असतो, शिकवणही असते आणि जीवन हलकंफुलकं करण्याची ताकदही असते.
याच तत्वावर असे हलके फुलके लेख मी आणी इतर मिपाकर लिहीतात. त्यात मला तरी काही वावगे वाटत नाही.
बाकी शेवटी प्रत्येकाचा परिप्रेक्ष वेगळा असणारच.
मी कोण हे अजिबातच महत्वाचे…
In reply to जोशी साहेब...... by कर्नलतपस्वी
मी कोण हे अजिबातच महत्वाचे नाही. मी एक अतिशय सुमार मनुष्य आहे याबाबत मला तरी शंका नाही, तुम्हालाही नसावी. मी एआय वापरुन लिहिण्याचा प्रयत्न करतो कारण मी तुमच्यासारखा लेखक नाही. त्यामुळे मला बाह्य स्रोतांचा आधार घ्यावा लागतो आणि मला तो गैर वाटत नाही.
आता तुम्ही कोण यावर विचार केला तर https://www.misalpav.com/discuss/50035 हा लेख लिहीणारे कर्नल आणि वरचा लेख लिहिणारे कर्नल यात फरक दिसतो...
अस्खलित वत्कृत्वाची देणगी मिळालेल्या व्यक्तीने बोबडे बोल बोलून त्याला टाळ्या अपेक्षिल्या तर श्रोते वैतागणार...
इथे वाचक वैतागतात. असो.
तुम्हीच पर्याय दिला आहे... तुमचे लेखन न वाचण्याचा. बघु या तसे करुन..
अवांतर : दोन कर्नल एकंच का हवेत?
In reply to मी कोण हे अजिबातच महत्वाचे… by राज जोशी
अवांतर :
राज जोशी,
तुमची अपेक्षा रास्त आहे. पण दोन्ही कर्नलांची पातळी सदैव एकंच हवी, हा त्यांच्यावर केलेला एक प्रकारचा अन्याय नाही का?
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद गा पै...
In reply to अवांतर : दोन कर्नल एकंच का हवेत? by गामा पैलवान
समजूतदार प्रतिसाद.
शक्य आहे... आम्ही पातळी…
In reply to अवांतर : दोन कर्नल एकंच का हवेत? by गामा पैलवान
शक्य आहे... आम्ही पातळी सुधारत रहावी अशा विचारांचे आहोत त्यामुळे असे झाले असावे... हरकत नाही.
तुम्ही लेख आवडला नाही एव्हढेच प्रतिसादले
In reply to मी कोण हे अजिबातच महत्वाचे… by राज जोशी
तुम्ही लेख आवडला नाही एव्हढेच प्रतिसादले असते तरी भावना पोहचल्या असत्या. जी थेट अलंकारिक भाषा वापरून मला मिपा फेबु,कायप्पा बनवण्याचा भागीदार केलेत ते खटकले.
मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मिपावर चांगले मराठी वाचायला मिळते म्हणूनच आलो. मी लेखक नाही. माझे मराठी चांगले नाही. माय मराठी पासून जवळपास चाळीस वर्ष ताटातूट झाली होती त्यामुळे मराठी साहीत्य फारसे वाचनात आले नाही.
पण जे काही लिहीतो ते प्रामाणिक पणे....
कवीवर्य सुधीर मोघे म्हणतात,
शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते.
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते."
तुम्हीं तुमची व्यथा शब्दाद्वारे पोहचवली आणी मी माझी...
कदाचित ओझे वहाणारे शब्द चुकीचे असावेत.
कवी ग्रेस, कवी वा रा कांत हे आवडते कवी .यांच्या काही कवीता आवडल्या म्हणून कवितासंग्रह विकत घेतले. त्यामधल्या सर्वच कवीता आवडल्या असे नाही म्हणून ते मनातून उतरावेत असेही काही नाही.
असो......
कळावे लोभ असावा.
>>>कदाचित ओझे वहाणारे शब्द…
In reply to तुम्ही लेख आवडला नाही एव्हढेच प्रतिसादले by कर्नलतपस्वी
>>>कदाचित ओझे वहाणारे शब्द चुकीचे असावेत.
असो. त्या वादात आता पडू नये.. झाले गेले संपले.
:)
सर्व वाचक,प्रतिसादक
यांचे मनापासून आभार.