Skip to main content

कौटुंबिक

बाथरूमचा साखरपुडा.

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 02/09/2026 05:48 या दिवशी प्रकाशित केले.

रविवार......

आज "रवी ",सुद्धा सुट्टीवर होता....

पावसाळी हवा,झाकोळल आकाश...

"आकाश पांघरून, घर शांत झोपलेले'

दबक्या आवाजात भ्रभ्रमणध्वनीवर गाणे लावून...

आजोबा मात्र,डोलणार्‍या खुर्चीत बसून "पुणे मिरर"चे डोके खात होते.

घरातले रविवार "मोड", वर होते...संथ,

मोबाईल प्रत्येक खोलीत कंठशोष करत होता. 

पण कुणालाच ढिम्म फरक पडत नव्हता. 

गरीब बिचारा.... कोण? 🤫

आहो मोबाईल. 

वृद्धाश्रमाबद्दल माहिती

लेखक विमल यांनी शुक्रवार, 04/08/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! विषय थोडा गंभीर आहे. माझ्या ओळखीत एक वृद्ध आणि विधवा बाई आहेत. अगदी तरूणपणातच वैधव्य आल्यानंतर अत्यंत गरिबीत कष्ट करून बाईंनी मुलांना सांभाळलं, मोठं केलं. परंतु आता त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना मुलं-सुना नीट सांभाळत नाहीत. घरातली नक्की कारणं मला माहिती नाहित पण बाईंशी अनेक दिवस कोणी एक शब्दही बोलत नाही हे मात्र खात्रीने माहिती आहे. औषधीसुद्धा आणून दिली जात नाहीत. बाई आर्थिक दृष्ट्या परावलंबी नाहीत, पुरेसं पेन्शन आहे. बाईंची या वयात अशी स्थिती माझ्याने बघवत नाही पण त्यांना माझ्या घरी आणणंही शक्य नाही.

teen age बालक आणि त्यांचे पालक!!!

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 12/07/2017 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
teen age बालक आणि त्यांचे पालक!!! "chill मॉम! उग्गाच चिडू नकोस. किती वेळा आवरायला सांगशील?" "अग किती सारखा पसारा करतेस. मग नको सांगू आवरायला?" "आई, परत होणारच आहे न माझा पसारा?" "हो! करशीलच परत दोन दिवसात." "अग, मग आवरून ठेवूच कशाला? तूच म्हणतेस ना वेळ वाया घालवू नये! मग जर मी परत पसारा करणार आहे तर आवरू कशाला?" "कमाल आहे ह तुझी!" (नवऱ्याकडे वळून) "अरे तू तरी बोल काहीतरी." "हे काय ग सानु? आई आवर म्हणते आहे तर आवर की एकदा." वडिलांच नरो वा कुंजरो वा! "अहो बाबा.... पण माझा मुद्दा बरोबर आहे न? परत पसारा होणारच आहे तर का आवरू मी? तुम्हाला पण पटत आहे.