Skip to main content

गंमत

आमी तर ब्वा sin, cos, tan असलं काय वापरत नाय!

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 26/06/2026 21:18 या दिवशी प्रकाशित केले.

आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत  शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?

 

खरंच काही नाहीये का?        

 

पाभे की बात ४

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/05/2026 22:26 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ४ 

मिटरों, 

मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार. 

तर मिटरों, 

मिपाकरांच्या सेलेब्रिटीज, प्रथितयश, मोठ्या लोकांच्या जवळीकतेचा सर्व्हे - २०१८

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 06/04/2018 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
तर दोस्तानु, प्रत्येकाची रुची वेगवेगळी असते. छंद वेगवेगळे असतात. अस्मिता वेगवेगळ्या असतात. तसंच प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. सर्वसाधारणपणे मी स्वतःला एक सामान्य माणूस मानतो. आपल्यापैकी अनेक मिपाकर देखील असंच मानत असणार असं वाटतं. पण आपल्यापैकी प्रत्येकास प्रसिद्ध, मोठ्या लोकांवद्दल एक कुतुहल असतं. (साहेबांच्या केबिनमधे देखील कोणी बिनकामाचा एक तास जास्त बसला तर इर्ष्या वाटते.). म्हणजे इतकं कि थेट त्यांचेशी भिडायची, भेटायची, वैयक्तिक ओळख करून घ्यायची, इ इच्छा होते. अर्थात आपण ती दाबून टाकत असतो.

श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान - विडंबन

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 16/10/2017 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ नास्तिक आहेत. ते मला सोमवारी (दि.१६ ऑक्टो 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न त्यांना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "राइट टू प्रायवसी" या संविधानात्मक वचनावर त्यांचा हक्क असतो. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे खासगीपण भंग होते, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " भाजीवाल्याकडे जात आहे." " पण आज तर बाजारचा दिवस नाही. रविवार आहे." " अहो, आज वांग्याचे भाव पडलेत. तुम्हा दोडके खाणारांना त्याचे काय म्हणा !

(वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये)

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 11/04/2017 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
डिअर ऑल, मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Embarrassment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझी ग्राफिक डिझायनर मुलगी करेल.