लोकहो,
झुरळ्या पक्षाने नव्या दिल्लीत जंतरमंतरवर नुकत्याच जुलै अखेरीस केलेल्या आंदोलनाच्या मागील शक्ती कशा प्रकारे काम करतात यांविषयी दोन चलचित्रे पाहण्यात आली. म्हंटलं की यावर एक स्वतंत्र लेखंच लिहायला हवा. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असलं तरी त्यांत इतर अवांछित शक्ती घुसल्या आहेत. हे वेगळे सांगणे नलगे. मात्र या शक्ती नेमक्या कशा काम करतात यावर स्वाती तोरसेकरांनी बराच प्रकाशझोत टाकला आहे. त्यात माझी अधिकची माहिती मिळवून लेख लिहिला आहे. तर मुद्द्यांकडे वळूया.
१. इंदिरा गांधींची १९७८ सालची मुलाखत ( ०८:०० ते १०:०० मिनिटांचा तुकडा ) : https://www.youtube.com/watch?v=q8aETK5pQR4&t=8m
सदर चलचित्रात जोनथन डिमलबी इंदिरा गांधींना प्रश्न करतो की मोरारजी देसाईंना अटक का केली. यावर बाईंचं उत्तर मोठं रोचक आहे. त्या म्हणतात की मोरारजींनी प्रकटनोंद ( = ऑन रेकॉर्ड ) म्हटलेलं की "आम्ही जर निवडणुका जिंकू शकंत नसलो तर आंदोलनामार्गे सरकार खाली खेचू. पंतप्रधानांच्या घराबाहेर घेराव घालून त्यांची वर्दळ बंद पाडू. जेणेकरून त्यांना काहीही काम करता येणार नाही". हे जर पन्नासेक वर्षांपूर्वी १९७० च्या दशकात घडवायचे मनसुबे असतील तर आज तरी काय वेगळं घडतंय बरं? मोदींच्या विरोधांत निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून आंदोलनाच्या मार्गे छळाबळाने शासनास जर्जर करायचा हेतू उघड दिसतो. जंतरमंतरवरील निदर्शनं शांततेत चालू होती. तिथे काही गडबड झाली नाही की कसलाही लाठीमार झाला नाही. तिथनं जवळंच असलेल्या संसद भवन परिसरात मात्र हिंसक जमाव कसाकाय गोळा झाला? शांततामय आंदोलनात आडमार्गे समाजकंटक घुसवून सनदशीर निदर्शकांचं हिंसक जमावात रुपांतर करायची क्लृप्ती बरीच जुनी आहे.
या क्लृप्तीचा मोदींनी कसा सामना केला ते स्वाती तोरसेकरांचं खालील चलचित्रं स्पष्ट करतं.
२. स्वाती तोरसेकरांचं चलचित्र( १७ मिनिटे ) : https://www.youtube.com/watch?v=PfkpgYpyylw
सदर चलचित्रांतला मला वाटलेला कळीचा मुद्दा सांगतो. स्वातीताई म्हणतात की आंदोलन चालू असतांना बाहेर दोन महत्त्वाचे प्रसंग घडले. पहिला म्हणजे गंगानगर येथे बनावट गणवेश बनवणारा कारखाना उघडकीस आला. आणि दुसरा म्हणजे पश्चिम बंगालात काही देशद्रोही पकडले गेले. त्यांच्याकडून झुरळ्या आंदोलनात जैशचे आतंकी घुसणार आहेत अशी बहुमोल माहिती मिळवण्यात आली. यावरून मोदींनी झुरळांना माफ का केलं हे दिसून येतं. मोदींचं खरं लक्ष्य भुंकत्या कुत्र्याकडे नसून त्याच्या बोलवित्या धन्याकडे आहे. पुढे तोरसेकर बाई स्पष्ट करतात की श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या तीन ठिकाणी सत्ताधाऱ्याच्या निवासस्थानी केलेली घुसखोरी सफल झाली आणि सत्तेतनं पायउतार व्हावं लागलं. बांगलादेशी शेख हसीना तर म्हणतात की गोळीबाराचे आदेश मी दिलेलेच नव्हते. मग गोळीबार केला कोणी? बनावट गणवेश कुठवर पोहोचू शकेल हे या विधानातनं कळतं. नेपाळी संसद जशी जाळली तसं काही भारतात होऊ दिलं गेलं नाही. मोदींनी अतिशय बिकट परिस्थिती तितक्याच कुशलतेने हाताळली आहे. पण हे तथ्य कोणी प्रसारमाध्यमं स्पष्ट करून सांगंत नाहीयेत. उलट मोदी कसे घाबरले, यावर झुरळांची पाठ थोपटण्यांत मग्न आहेत. चालायचंच !!!
माझं मत :
संसद जाळणं ओळखीचं वाटलं. म्हणून जरा शोध घेतला. तेव्हा हिटलरने वा नाझींनी अशीच राईशस्टाग ( = जर्मन संसद ) वास्तू जाळली होती ते आठवलं. जाळपोळीची पावती मात्र साम्यावाद्यांच्या नावांवर फाडली. बनावट कथनीची ( = फेक नरेटिव्हची ) किमया काही औरंच असते, नाहीका? राईशस्टाग जळाल्याच्या निमित्ताने नाझींनी साम्यवाद्यांची कोंडी केली आणि जर्मनीत आपली सत्ता बळकट केली. तर मग भारतीय संसदेच्या आसपास नाझींप्रमाणे हुल्लडबाजी व दंगेधोपे करणारे कधी भारतीय लोकशाहीचे बचावकर्ते असू शकतील काय?
इथे महाराष्ट्रातही काही पोलिसांनी मर्यादा ओलांडल्याची वृत्तं झळकली आहेत. यापैकी एक इथे आहे : https://www.instagram.com/reel/Da92uz-lOtm/
( स्रोत : https://www.misalpav.com/comment/1208372#comment-1208372 )
बनावट गणवेशाची घटना तर नाही ना ही?
लेख चिमुकला आहे. गदारोळामध्ये कुठेतरी बारीकसं सत्य लपलेलं असतं, असं म्हणाना ! वाचकांच्या मनांत घटनांचा मागोवा घेऊन सत्य हुडकून काढायची इच्छा आणि क्षमता उत्पन्न व्हावी हा लेखामागील हेतू आहे. झुरळ्यांनी मोदींना आणि कुणाकुणाला कसल्या शिव्या घातल्या आणि कसकसले विक्षेप केले, यांत मला बिलकुल रस नाही. सदर आंदोलनामागील शक्तींच्या कार्यप्रणाल्यांत मला रस आहे. त्या ध्यानी आल्या की त्यावरून त्या शक्ती कोण आहेत ते अजमावणं सुलभ व्हावं.
सजग आणि सतर्क राहणे ही काळाची गरज नेहमीच होती, आज जरा जास्तंच आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
मिसळपाव
प्रतिक्रिया
conspiracy theorist
conspiracy theorist
A conspiracy theorist is a person who believes or spreads the idea that a major event or situation is the secret plot of a powerful, malevolent group.
तेव्हा आपला नम्र गामा पैलवान, लगे रहो. कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं.
आणि हो, मध्यपूर्व, साउथ अमेरिका, सी.आय.ए - हेही येऊ द्या.
-
कांडकथा उपपत्ती नव्हेत
In reply to conspiracy theorist by भृशुंडी
भृशुंडी,
Conspiracy is NOT a theory. It is a set of facts the paid media CHOSE to ignore.
कांडकथा उपपत्ती नव्हेत. धनांकित प्रसारमाध्यमांनी जाणूनबुजून दुर्लक्षिलेली तथ्ये आहेत.
आ.न.,
-गा.पै.
यापुढे आणखीही झुरळ, घुशी, उवा, मधमाश्या, डास वगैरेंच्या पिलावळी
अगदी बरोबर. शोध घेत रहा आणि त्यात काय काय गवसते ते इथे लिहीत रहा.
झुरळांच्या मते त्यांना 'पूर्ण यश' मिळाले असल्याने यातून प्रेरणा घेत यापुढे आणखीही झुरळ, घुशी, उवा, मधमाश्या, डास वगैरे वगैरेंच्या 'झुकानेवाल्या' पिलावळी बाहेर येत रहातील, याची खात्री वाटते आहे.
**निर्विवाद तथ्य*** - नीट…
**निर्विवाद तथ्य***
- नीट परीक्षेंत घोटाळा झाला. पेपर फुटला.
- नीट परीक्षेची आखणीच चुकीची होती. त्यामुळे पेपर फुटणे हे अपेक्षित होते.
- २०२४ मध्ये पेपर फुटीची अफवा होती. पण तिथे सरकारने विषय दाबून ठेवला पण परीक्षेची आखणी बदलली नाही.
- सरकारची चूक झाली आणि ह्या चुकीला मंत्री नैतिक दृष्ट्या जबाबदार होते.
- आदोलनकर्त्यांची भूमिका सरकार विरोधांत असल्याने सरकारवर विविध कारणांनी खार खाऊन असलेली सर्व मंडळी आंदोलनात भाग घेती झाली.
- आंदोलनकर्त्यांचे चारित्र्य, वागणूक इत्यादी कशीही असली तरी मूळ मुद्दा "accountability" हा रास्त होता.
- मूळ मुद्दे मान्य करून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला, प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आदोंलनाला acknowledge केले आणि आंदोलन संपले. आता राहिलेल्या बाटल्या, उष्टे खाऊन जगणारी कुत्री, सतरंजी वाले वगैरे मागे राहतील पण ती कुठेही असतात. आंदोलन सध्या तरी संपले आहे.
- आंदोलनाच्या कालावधींत मंत्री संत्री, बाबू आणि भक्तमंडळी ह्यांनी अनेक उर्मट वक्तव्ये केली ह्याच्या उलट room reading ची उकृष्ट स्किल असलेल्या प्रधान मंत्र्यांनी भावुकता दाखवली.
**कदाचित सत्य**
- पेपर मागील वर्षें सुद्धा फुटत असावा आम्हाला ठाऊक नव्हते.
- आंदोलनात विदेशी शक्ती, अंतर्गिक शत्रू ह्यांनी नेहमी प्रमाणे शिरकाव करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला.
- आंदोलनाचे नेते म्हणून दिपके आणि वांगचुक हे संधीसाधू आहेत.
**असत्य**
- आंदोलनात प्रचंड हिंसा होती ह्या हिंसेने प्रमुख सरकारी अधिकारी, प्रमुख नेते जसे प्रधान मंत्री इत्यादी ह्यांच्या जीवाला किंवा पदाला धोका होता.
- सरकार पडण्याची आणि नेपाळ मध्ये झाली वगैरे तासली क्रांती होण्याची शक्यता किंवा मनीषा होती.
**षड्यंत्र सिद्धांत**
- डीप स्टेट नावाचा कुठलाही खलनायक नाही. तमराज किलविष प्रमाणेच हा खोटा अस्तित्वांत नसलेला बागुलबुवा आहे.
- ट्रम्प ह्यांचा विविध भ्रष्टाचार उघडकीस येत होता तेंव्हा त्यांनीच आपल्या अंथरूण आणि फॉक्स न्युज ला खिळून असलेल्या म्हाताऱ्या मतदात्यांना मूर्ख करण्यासाठी असले नसते बागुलबुवे उभे केले. त्याकाळी ट्रम्प ह्यांच्या पौरुषावर भाळलेल्या संघीय भक्तमंडळींनी हे टर्म देशांत आयात केले स्वतःची आणि स्वतःच्या नेत्याची इमेज मोठी करण्यासाठी.
- सुपरमेन साठी लेक्स पाहिजे, बॅटमॅन साठी जोकर त्याच प्रमाणे विश्वघबरूला उगाच विश्वनेता वगैरे दाखविण्यासाठी हा भंपक डिप स्टेट चा खलनायक प्रस्तुत केला गेला.
- ट्रम्प साहेबानी भक्ती २.० मध्ये खोडा घालून पेकटांत लाथ घातल्यानंतर ह्याना आता गंगाधर हि शक्तिमान है प्रमाणे ट्रम्प डीप स्टेट वाटतो.
- आता कुणा रिकामटेकड्या महिलेने सवंग लोकप्रियतेसाठी भंपक अर्धवट विडिओ करून आपल्यातील डॉक्टर साळुंखे जागृत करून त्याला ACP प्रद्युमन ची फोडणी दिली आणि नसते ऐतिहासिक संदर्भ, त्यांत बी ग्रेड वर्तमानपत्रांतील बकवास गुन्ह्याची सांगड दिली आणि भक्त मंडळींच्या मेंदूची प्रचंड पोकळी ह्या षडयंत्रानी भरली.
- थोडा तरी विवेक असता तर ह्या तथाकथित विडिओ मधील मूर्खपणा दिसून येतो. इंदिरा गांधींनी मोरारजी देसाई वर आरोप करून आणीबाणी लावली. प्रत्यक्षांत आणीबाणी आपली खुर्ची वाचविण्यासाठी लावली होती हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्या आरोपांत काहीही तथ्य नव्हते. मोदींनी आणीबाणी लावली नाही किंवा बळाचा अवास्तव वापर करून कुणाला तुरुंगांत टाकले नाही. किंवा मोरारजी प्रमाणे सरकार पाडणे हे आपले धोरण आहे असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले नाही. कुणी एखाद्या दुसर्याने मोदींना दूषणे दिली असली तरी सरकार पडण्याची शक्यता इथे शून्य होती.
- "माझं मत" म्हणून सदर लेखक हिटलर चे उदाहरण देतात. महिलेचा इतिहासाचा अभ्यास शून्य आहे. हिटलर ने सत्तेत असताना स्वतः पार्लमेंट ला आग लावली. आणि नन्तर आपल्या हातातील सत्त्तेचा प्रयोग करून विरोधकांना लक्ष्य केले. ती analogy इथे वापरायची तर मोदी ह्यांनी स्वतः पेपर लीक केला. दिपके ह्यांना आपणच प्लांट केले आणि नंतर हिंसा घडवून आणली आणि ह्या हिंसेला जबाबदार ठरवून, राहुल गांधी प्रभृतींना तुरुंगांत टाकले ते म्हणावे लागले असते. पण तसे काहीही घडले नाही.
- कुठे तरी म्हणजे खोट्या गणवेशाची फॅक्टरी सापडली आणि तिकडे कुठेतरी कुणा तथाकथित दहशवाद्यांना अटक झाली ह्याचा बादरायण संबंध जोडायचा साळुंखे आणि प्रद्युमन प्रमाणे. म्हणजे कुणाला अजीर्ण झाले आणि कुठे कुत्रे मेले म्हणून "कृपा अटकी हुयी है" हि निर्मल बाबा छाप भोळी भक्ती.
- तरी हडप्पा मोहेंजदरो मध्ये सापडलेला प्रिस्ट किंग हा मोदी प्रमाणे दिसतो हा दुवा इथे आणला नाही.
नसते बादरायण संबंध पाहिजेत तर मी एक समर्पक संधर्भ देते.
punic युद्धांत हॅनिबल कॅनो च्या युद्धांत ने आपल्या पेक्षा प्रचंड मोठ्या रोमन सैन्याचा धुव्वा उडवला. ते पाहून त्याच्या घोडदळ प्रमुखाने त्याला सल्ला दिला कि त्यांनी ताबडतोप रोम वर चालून जावे आणि एका आठवड्यांत रोमचा ताबा त्याच्या हातांत असेल. रोम सारख्या शहरावर आक्रमण करणे कठीण आणि रसदपुरवठ्याच्या दृष्टीने कठीण असल्याने हॅनिबल ने त्याला नकार दिला तेंव्हा घोडदल प्रमुखाने त्याला म्हटले.
Verily, the gods have not given all gifts to the same man. You know how to win a victory, Hannibal; but you do not know how to use it.
--
सध्या भक्तमंडळी गोबीभक्तीच्या गटारांत लोळत आहे आणि कुणी ते जाणवून दिल्यास, हाच वास कस्तुरीमृगाला येतो. हीच गंगा आहे आणि तुम्हाला आमचा मत्सर वाटतो वगैरे अश्या गोड गैरसमजुती हि मंडळी करून घेत आहे. हे सर्व ५ वर्षांच्या मुलाना प्रेटेन्ड प्ले करताना शोभते. इतरांना शोभत नाही.
ह्या भंपक कॉन्स्पिरसी थेअरी म्हणजे विशुद्ध कोपियम Copium आहे स्वतःच्याच बालमनाला समजावण्यासाठी.
प्रतिसाद आवडला! गामाजी…
In reply to **निर्विवाद तथ्य*** - नीट… by साहना
प्रतिसाद आवडला! गामाजी ह्यांचा लेख विनापुरावा आहे.
आपण हि चर्चा सीट आऊट करावी…
In reply to प्रतिसाद आवडला! गामाजी… by अमरेंद्र बाहुबली
आपण हि चर्चा सीट आऊट करावी ह्यांतच शहाणपणा आहे ! सुज्ञास अधिक सांगणे न लगे, पण ते सुज्ञास ! तुम्हाला स्पष्ट सांगते !
धन्यवाद!
In reply to आपण हि चर्चा सीट आऊट करावी… by साहना
धन्यवाद!
मोदीळ... चालू द्या...
In reply to **निर्विवाद तथ्य*** - नीट… by साहना
मोदीळ... चालू द्या...
अहो
In reply to मोदीळ... चालू द्या... by नावातकायआहे
तुम्ही काविळ भगवी केलीत हो, सहसा पिवळी असते म्हणतात ती. बघा बुवा काय ते. (दारू न पिता लिव्हर जाणकार) खोंड्या
जबरदस्त
In reply to **निर्विवाद तथ्य*** - नीट… by साहना
जबरदस्त
>>> सदर चलचित्रात जोनथन…
>>> सदर चलचित्रात जोनथन डिमलबी इंदिरा गांधींना प्रश्न करतो की मोरारजी देसाईंना अटक का केली. यावर बाईंचं उत्तर मोठं रोचक आहे.
आणिबाणीच्या कालखंडात इतर हजारो नागरिक व नेत्यांसहित मोरारजी देसाईंना सुद्धा कारागृहात डांबले होते. याव्यतिरिक्त कधीही मोरारजींना, इंदिरा गांधींनी अटक केली नव्हती.
>>> मोदींनी अतिशय बिकट परिस्थिती तितक्याच कुशलतेने हाताळली आहे.
संपूर्ण सहमत.
_______________
लेखातील इतर षडयंत्र सिद्धांताविषयी माहिती नसल्याने माझी काहीच प्रतिक्रिया नाही.
गामा पैलवान श्रीगुरुजी यान्च्याशी पूर्णपणे सहमत
गामा पैलवान श्रीगुरुजी यान्च्याशी पूर्णपणे सहमत .. अजून ऐफ.सी.आर.ऐ चा मुद्दा तुम्ही घेतला नाही
गामाजी उत्तम आढावा.
गामाजी उत्तम आढावा.
आभार
In reply to गामाजी उत्तम आढावा. by राज जोशी
राज जोशी,
प्रशंसेबद्दल आभार. बहुतांश मुद्दे स्वाती तोरसेकरांच्या चलचित्रावरून घेतलेले आहेत.
आ.न.,
-गा.पै.
धर्मेंद् प्रधान यांनीच काय…
धर्मेंद् प्रधान यांनीच काय खुद्द मोदींना जरी राजीनामा द्यावा लागला असता तरी तोरसेकर पती पत्नीचं मत एकच राहील असतं, ते म्हणजे मोदी शाहांचा मास्टरस्ट्रोक.
आशयाशी सहमत
In reply to धर्मेंद् प्रधान यांनीच काय… by रात्रीचे चांदणे
प्रतिसादाच्या एकूण आशयाशी सहमत आहे, पण -
तोरसेकर पती पत्नीचं मत एकच राहील असतं
माझ्या माहितीनुसार व समजुतीनुसार, भाऊ तोरसेकर यांच्या स्वाती तोरसेकर ह्या कन्या आहेत.
चुभुदेघे.
- (साशंक) कांदा लिंबू
सहमत
In reply to धर्मेंद् प्रधान यांनीच काय… by रात्रीचे चांदणे
पण त्यात तोरसेकरांचा अगदीच दोष आहे असे म्हणता येणार नाही. आयुष्यभर पोटाची खळगी भरायला भाऊ झटतच राहिले, आधी समाजवादी मग कैक वर्षे शिवसेना, मग भाजप अन् औटघटकेला शिंदे शिवसेना असा त्यांचा प्रवास आहे.
अन्य पत्रकार, युट्युबर्स काय वेगळे करतात?
In reply to सहमत by वृषभ खोंडे
दिल्ली ते गल्ली सगळे पत्रकार पोटाची खळगी भरण्यासाठीच तर आपापल्या परीने झटताना दिसतात. भाऊ त्यांच्या वैचारिक परिवर्तनाबद्दल सविस्तर खुलासे करतात, मी मोदी भक्त आहे असे उघडपणे बोलतात, काही लपवून ठेवत नाहीत किंवा आडवळणाने बोलत नाहीत हे मला तरी स्तुत्य वाटते.
वाटू दे की
In reply to अन्य पत्रकार, युट्युबर्स काय वेगळे करतात? by मूकवाचक
तुम्हाला काय स्तुत्य किंवा त्याज्य वाटते ते तुमचा प्रश्न झाला साहेब, मला सुद्धा काही खास राग लोभ भय वितराग काहीच नाही तोरसेकरांचा. फक्त त्यांचे काही काही ॲनालिसिस हे मला वैयक्तिक पातळीवर बाळबोध वाटते इतकेच. स्वाती तोरसेकरांचे जास्तच थोडेसे.
भाऊंचे ज्ञान आपल्या पेक्षा…
भाऊंचे ज्ञान आपल्या पेक्षा जास्त आहे. तीन निवडणूकी पूर्वीच त्यांनी 200 + जागा मिळणार हे आधीच संगितले होते. बाकी झुरळ हे आप पक्षाचे नवीन अपत्य आहे आणि सर्व देश विरोधी शक्तींचे समर्थन आहे. हे जनतेसमोर पूर्णपणे उघड झाले. बाकी मेटा ने सत्यच बाहेर काढले. बहुतेक जगातील एकमेव आंदोलन ज्यात सर्वच भाडोत्री होते.
विशिष्ट कार्यपद्धती
सदर आंदोलनामागील शक्तींच्या कार्यप्रणाल्यांत मला रस आहे. त्या ध्यानी आल्या की त्यावरून त्या शक्ती कोण आहेत ते अजमावणं सुलभ व्हावं.
या शक्तींची एक विशिष्ट कार्यपद्धती (modus operandi?) असते.
कोणत्याही काळात, देशात काही ना काही लहानसहान समस्या असतातच. त्यामुळे कोणते ना कोणते समाजगट कायम समस्याग्रस्त असतात. त्यातील एखादी समस्या शोधायची. समस्या शोधून सापडत नसेल तर एखादा non issue समस्या शोधून तिला फुंकर घालून मोठे करायचे. आपली इकोसिस्टिम वापरून, प्रचंड प्रसिद्धीतंत्र वापरून, जणू काही संपूर्ण देश या समस्येमुळे ग्रस्त आहे अशी वातावरण निर्मिती करायची. त्या प्रोजेक्टपुरती हवी ती प्यादी वापरायची. अनेक लहान मोठ्या प्यादांना आपण वापरले जात आहोत हेच शेवटपर्यंत कळत नाही. आधी अगदी साळसूद, चटकन नकार न देता येणाऱ्या मागण्या करायच्या. हळूहळू संपूर्ण जन्मात आपल्या बाजूने आहे असे दाखवायचे. पुढच्या टप्प्यात शासनावर दबाव आणून, शक्य झाल्यास शासनातील दगाबाज लोकांना हाताशी धरून शासनास नमते घेण्यास भाग पडायचे. शेवटच्या टप्प्यात सरकार उलथून टाकून सत्ता हाती घ्यायची.
अर्थात प्रत्येक वेळी त्यांचा हा उद्देश साध्य होतोच असे नाही.
सजग आणि सतर्क राहणे ही काळाची गरज नेहमीच होती, आज जरा जास्तंच आहे.
पूर्णतः सहमत.
- (सजग) कांदा लिंबू
सहमत आहे गामा
In reply to विशिष्ट कार्यपद्धती by कांदा लिंबू
फक्त ही कार्यपद्धती उजवे, डावे, उरफाटे, सुरफाटे, सगळ्यांना लागू पडते.
प्रत्येक समाजाचे काहीतरी ट्रिगर असतात त्यातले काही एका बाजूला बरे पडतात अन् विशिष्ट समाजगटाला आपलेसे वाटतात काही दुसऱ्या बाजूला साजेसे वाटतात. भावनाशील असतो लोकसमूह अन् डावे, उजवे, उरफाटे, सुरफाटे ह्यांना सगळ्यांना एकच ध्येय असते ते म्हणजे सत्तेत बसणे बाकी काही नाही.
(रामशास्त्री) खोंडे
झारखंड मध्ये पेपरफुटीवरून…
झारखंड मध्ये पेपरफुटीवरून विद्यार्थि आंदोलन चालू आहे.
मात्र झुरळ पार्टी , केजरीवाल आणि राहूल गांधी यानी त्याकडे सपशेल पाठ फिरवली आहे
दुर्लक्ष
In reply to झारखंड मध्ये पेपरफुटीवरून… by विजुभाऊ
सगळ्या सेलेब्रिटी, विचारवंत, एन.जी.ओ वाले, इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर्स इतकेच काय इथले प्राडॉ आणि स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धी फार जागृत आहे असे म्हणविणाऱ्या लोकांनीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
झारखंडच्या विद्यार्थ्यांचा कदाचित दोष हा की त्यांनी आंदोलन केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या मुद्द्यापुरते सिमीत ठेवले, त्यात देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत, सिर्फ नाम रहेगा अल्लाका, ** राममंदिर वगैरे प्रकार नव्हते, अरूंधती रॉय सारख्या किळसवाण्या हडळीला तिथे स्थान नव्हते, कोणालाही घाणेरड्या शिव्या दिल्या नाहीत.....
बाकी ते आंदोलन कव्हर केले म्हणून एका पत्रकाराला झारखंड सरकारच्या पोलिसांनी जेवणाच्या ताटावरून उचलून नेले म्हणे.
तरीही मोदी तेवढे हुकूमशहा.
कधीकधी वाटते मोदींनी खरोखरच हुकूमशहा होऊन या घाणेरड्या लोकांना हुकुमशाही म्हणजे नक्की काय असते ते दाखवून द्यायला हवे.
काही मुद्दे
In reply to दुर्लक्ष by चंद्रसूर्यकुमार
बाकी ते आंदोलन कव्हर केले म्हणून एका पत्रकाराला झारखंड सरकारच्या पोलिसांनी जेवणाच्या ताटावरून उचलून नेले म्हणे.
अमन चोप्रा नाव त्याचे आणि त्याला "उचलून" इत्यादी नेले नाहीये तर चल म्हणून घेऊन गेले आहेत, त्याने झारखंड पोलिसांना झाडल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय तो सुद्धा पहा (चांगला आहे अतिशय संयत पद्धतीने हॅण्डल केले आहे त्याने पोलिसाला)
बाकी, इथे प्रा. डॉ. काय बोलतील किंवा विवेकबुद्धीवादी कोणाला रोखून तुम्ही म्हणाला आहात किंवा त्यांना काय बोलायचे आहे ह्या भानगडीत मी तरी पडणार नाही. निरीक्षण एकच नोंदवणे आहे. विद्यार्थी आंदोलन प्रा. डॉ. किंवा विवेकबुद्धी जागृत जनतेने चर्चिले नाही पण एकंदरीत त्या झारखंड आंदोलनात सहभागी विद्यार्थी हे "परकीय शक्ती" "स्पॉन्सर होऊन आलेले" "निर्लज्ज" इत्यादी जाहीर केलेले पण दिसले नाहीत कोणीच. विद्यार्थ्यांचे नुकसान होणे कायम निषेधार्ह असेलच. मग ते नीटचे असेना का सरकारी नोकरीसाठी अर्ज करणारे गरीब झारखंडी विद्यार्थी का असेनात.
आंदोलन
In reply to दुर्लक्ष by चंद्रसूर्यकुमार
त्यात देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत, सिर्फ नाम रहेगा अल्लाका, ** राममंदिर वगैरे प्रकार नव्हते, अरूंधती रॉय सारख्या किळसवाण्या हडळीला तिथे स्थान नव्हते, कोणालाही घाणेरड्या शिव्या दिल्या नाहीत.....
छान भाषा आहे तुमची, ते एक असो. कोणालाही शिव्या बसल्या नाहीत म्हणजे तुमच्या लाडक्या कोणाला बसल्या नाहीत असेच न ? मग चांगलेच आहे की ते ! विद्यार्थ्यांना तितकी किमान अक्कल आहे एकंदरीत ! जिथे जो जबाबदार आहे तिथे त्याला शिव्या बसणार. उगाच नीट परीक्षा जबाबदारी केंद्राची अन् शिव्या काँग्रेसला द्यायच्या इतकी मूर्ख आजची पिढी नाही ह्याचा आनंदच आहे. अन् तसेही हेमंत सोरेनला शिव्या बसल्या अन् त्या कव्हर झाल्या तरी तुम्ही त्याचा निषेध करणार आहात का ? 🤣🤣🤣🤣
दिल्लीतले आंदोलन मीडियाने कव्हर केले नव्हते ना म्हणून बाकी लोकांनी कव्हर केले असेल
दिल्लीच्या आंदोलनात जे कोणी फालतू घोषणा देऊन गेले असतील, त्याचा अतिरिक्त वापर रेटोरिक मध्ये करून नीट विद्यार्थ्यांचे प्रश्नच फाट्यावर मारणारे सुद्धा तितकेच निषेधार्ह असतील. मग त्यात मीडिया आला अन् स्वघोषित पाजी बुद्धिवंत पण आले.
दुनिया जब जलती है हाय रे…
In reply to आंदोलन by वृषभ खोंडे
दुनिया जब जलती है हाय रे बड़ा मजा आता है
डरो मत!
संसद नाहीं का आएंगे.
विचारवंत हे नेहमी डावे च का…
In reply to दुर्लक्ष by चंद्रसूर्यकुमार
विचारवंत हे नेहमी डावे च का असतात.
आजतागायत एकाही उजव्या माणसाला विचारवंत म्हण्ल्याचे ऐकिवात नाही
आहेत की मोदीजी 🤣
In reply to विचारवंत हे नेहमी डावे च का… by विजुभाऊ
आहेत की मोदीजी 🤣
डावी विचारसरणी आणि उजवी…
In reply to विचारवंत हे नेहमी डावे च का… by विजुभाऊ
डावी विचारसरणी आणि उजवी विचारसरणी या राजकीय संज्ञांची सुरुवात १७८९ मध्ये फ्रान्समधील फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान झाली. नॅशनल असेंब्लीच्या बैठकांमध्ये राजाचे आणि पारंपरिक सामाजिक व्यवस्थेचे समर्थन करणारे सभागृहाच्या उजव्या बाजूला बसत असत या उलट मोठे बदल घडवून आणू पाहणारे आणि राजाचे अधिकार कमी करण्याची इच्छा असणारे डाव्या बाजूला बसत असत.
कोणत्याही गोष्टीचे समर्थन करण्यासाठी ती गोष्ट आपल्यासमोर आधीच मांडलेली असते, पण विरोध करायचा असेल तर आपला विरोध का आहे याचा विचार करावा लागतो म्हणून डाव्यांना विचारवंत म्हटले जाते. प्रत्येकाचे विरोधाचे कारण वेगळे असू शकते, विचार वेगळा असू शकतो. ही ढोबळमानाने व्याख्या केली आहे. सध्याच्या काळात डाव्यांना खोडण्यासाठी उजव्यांनादेखील विचार करावाच लागतो, पण उजव्यांचे विचार डाव्या शक्तीसमोर कमीच पडताना दिसतात.
विचार करणे, वैचारिक मंथन,…
In reply to विचारवंत हे नेहमी डावे च का… by विजुभाऊ
विचार करणे, वैचारिक मंथन, बुद्धिमत्ता, बुद्धिवाद, पुरोगामित्व ही केवळ आपलीच मक्तेदारी आहे या भ्रमात डावे व खांग्रेसी अजूनही आहेत. प्रत्यक्षात डाव्यांइतके व
खांग्रेसींइतके पोथीवादी, प्रतिगामी, अंधश्रद्धाळू इतर कोणीही नाही.
एक कारण म्हणजे "institutions…
In reply to विचारवंत हे नेहमी डावे च का… by विजुभाऊ
एक कारण म्हणजे "institutions". कुठल्याही विषयावर सखोल चिंतन, सांगोपांग विचार आणि टीकात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी संस्था असणे आवश्यक आहे. मग ह्या संस्थांत ज्या व्यक्ती आहेत त्यांना वैचारिक स्वातंत्र्य असण्याची गरज आहे. ह्या संस्थांची निर्मिती करणे, त्यांना वाढवणे आणि हे सर्व करताना high human capital लोकांची गरज आहे. मग ह्या संस्थांच्या आश्रयातून विचारवंत निर्माण होतात. Credentials देण्याची क्षमता संस्थाकडे असल्याने विचारवंताचा ठप्पा देणे सोपे जाते.
संस्था निर्माण करणे किंवा आधीपासून असलेल्या संस्थांवर आपले वर्चस्व निर्माण करणे ही डाव्या बाजूचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे डाव्या लोकांना Credentialism निर्माण करणे सोपे जाते.
ह्याला दोन कारणे आहेत.
१. High human capital उजवे लोक हे पराकोटीचे स्वतंत्र मनोवृत्तीचे असतात. त्यामुळे ह्या व्यक्ती डिग्री, प्राध्यापक पद वगैरेंच्या नादी न लागला आपली स्वतंत्र ओळख आपल्या क्षेत्रांत निर्माण करतात. ह्या व्यक्ती बहुतेक करून बिसिनेस, विज्ञान इत्यादी क्षेत्रांत जातात. अरुण शॉरी, कॉनरॅड एलस्ट, सीताराम गोयल, राम स्वरूप, मीनाक्षी जैन, वर्षा भोसले, राजीव मल्होत्रा, निलेश ओक इत्यादी अनेक व्यक्ती ह्याचे चांगले उदाहरण आहे.
२. Low human capital उजवे लोक हे कंपूवादी आणि व्यक्तिपूजक बनतात. त्यांच्या मध्ये खुल्या विचाराना थारा नसतो त्याशिवाय डाव्या लोकांप्रमाणे "विचारसरणी" हा प्रकार नसतो. त्यामुळे कुठल्याच विषयावर मूलभूत सिद्धांत पाहून भूमिका घेतली असे होत नाही. वारे वाहते त्या दिशेने सूप लावले जाते. त्यामुळे हळू हळू संस्था निर्माण करण्याची क्षमता असलेले लोक ह्यांना निराश होऊन सोडून जातात. संघ परिवार हे ह्याचे चांगले उदाहरण आहे. Low human capital असल्याने श्रमदान, कुठे चप्पल रांगेने मांडून ठेवणे, कुणाला पाण्याच्या बाटल्या वाटणे इत्यादी गोष्टी ह्यांच्या संस्था खूप चांगल्या प्रकारे करतात तरी वैचारिक output शून्य आहे. मूलभूत प्रश्नावर ठोस भूमिका नाही. प्रत्येक विषयावर गुळमुळीत न रो वा कुंजरोवा भूमिका. आणि ह्या कंपूवादी, व्क्तीपूजक मंडळींना स्वतंत्र विचारांच्या लोकांची भीती वाटते. त्यामुळे त्यांना शक्यतो दूर ठेवले जाते.
ह्यामुळे डाव्या बाजूला "credential inflation" झाले आहे. ज्यांची लायकी नाही अश्याना सुद्धा विचारवंत म्हणून मिरवता येते आणि उजव्या बाजूला ज्या मंडळींना विचारवंत म्हणून मिरवण्याची क्षमता आहे त्यांना संस्थात्मक आधार नसल्याने credential निर्माण करणे कठीण जाते.
डावे लोक हे सुद्धा कंपूवादी आहेत पण व्यक्तिपूजक नाहीत. डाव्या विचारसरणीच्या तंबूच्या खाली वैचारिक विविधता आहे. अनेक लोक आपल्या भूमिका किंवा मते बदलतात.
अरुण शौरी ह्यांनी आपल्या Eminent Historian ह्या पुस्तकांत रोमिला थापर आणि इरफान हबीब ह्यांचे वाभाडे काढले. आपले credentials वापरून ह्या मंडळींनी आपली तथ्य नसलेली मते भारतीय इतिहासाच्या अभ्यासांत कशी घुसवली, इरफान हबीब ह्यांनी इतर कुणाचा रिसर्च प्रोजेक्ट चोरून असंख्य विध्यार्थ्यांना Phd कशी दिली इत्यादी इत्यादी. हे सर्व करताना शौरी ह्यांना शून्य संस्थात्मक समर्थन होते. त्याशिवाय कॉनरॅड एलस्ट ह्यांनी रोमिला थापर आणि इतर इतिहासतद्न्य मंडळींच्या राम मंदिर विषयीच्या दुष्प्रचाराला योग्य तो प्रतिवाद दिला. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी संघ परिवाराकडे काहीच वैचारिक साहित्य नव्हते तेंव्हा अडवाणी ह्यांनी कॉनरॅड एलस्ट ह्यांचे पुस्तक मीडिया पुढे "पुरावा" म्हणून धरले होते.
रोमिला थापर ह्यांच्यावर प्रचंड टीका एलस्ट सारख्या विचारवंतांनी केली असली तरी, त्यांनी थापर ह्यांच्या पुस्तकांची स्तुती सुद्धा केली आहे. थापर ह्यांच्या पुस्तकांना देशांत पर्याय नाही. थापर ह्यांनी आर्यन invasion theory पासून आपली सुरुवात केली असली तरी पुरावे पाहून आपले मत बदलले आणि आर्यन migration थेअरी कडे त्यांचा कल गेला. संघ परिवारांत तुम्हाला चुकून एखादा थापर दर्जाचा तद्न्य दिसेल आणि मत बदलणारा तर कधीच नाही.
सीता राम गोयल ह्यांचे जुने पुस्तक आहे : Time For Stock Taking Whither Sangh Parivar. ह्यांत संघ परिवाराच्या वैचारिक दिवाळखोरीवर विवेचन केले आहे.
त्यांत पहिले प्रकरण श्री डेव्हिड फ्रोली ह्यांनी लिहिले आहे "A Call for an Intellectual". त्यांत तुमच्या प्रश्नाचे उत्तर फ्रोलि ह्यांनी दिले आहे.
https://archive.org/details/time-for-stock-taking-whither-sangh-parivar…
विचारवंतांच्या प्रतिसादाच्या…
In reply to एक कारण म्हणजे "institutions… by साहना
विचारवंतांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ... :)
पुस्तकाबद्दल आभार, माझं मत सांगतो ....
In reply to एक कारण म्हणजे "institutions… by साहना
साहना,
पुस्तकाच्या दुव्याबद्दल धन्यवाद. ते वाचून उत्तर द्यायचं म्हंटलं तर बराच वेळ लागेल. सदर पुस्तकाची रूपरेखा वाचून मला काय वाटतं ते लिहितो.
समजा एका विशिष्ट ठिकाणी एक अतिविशिष्ट जनावर कापून टाक, असं कुणालातरी सांगितलं. तर सचिन तेंडुलकर ते काम नाही करू शकणार. पण वीरू सेहवाग धडाक्याने करेल. म्हणूनंच वीरू तीन त्रिशतकाच्या जवळपास खेळ्या करू शकला. आणि सचिन २५० पर्यंत दोनदाच पोहोचला. त्रिशतकी खेळ्यांसाठी जो चांडाळपणा ( = ब्रूटालिटी ) लागतो तो सचिनकडे कधीच नव्हता, असं कपिलदेवचं मत आहे. याबाबत अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.cricinfo.com/story/kapil-dev-sachin-tendulkar-never-became-a-ruthless-batsman-1228016
याच धर्तीवर म्हणेन की संघाकडे चांडाळपणा नाही. इस्लाम आणि ख्रिश्चनीटी यांना संघवाले धर्म समजून चालतात. प्रत्यक्षांत या दोन्ही राजकीय विचारप्रणाल्या आहेत. संघाला जर कोणी हे तथ्य समजावून सांगितलं तर ते संघवाल्यांना नक्की समजेल. पण उमजेल का, याची खातरी नाही. जे आहे ते असं आहे आणि असंच आहे. हे थोडंसं हिंदू समाजाचंच प्रतिबिंब आहे.
आ.न.,
-गा.पै.
@ गामा पैलवान: प्रतिसाद मननीय आहे. आवडला.
In reply to पुस्तकाबद्दल आभार, माझं मत सांगतो .... by गामा पैलवान
चांडाळपणा ( = ब्रूटालिटी ) हे तर लई भारी.
संघाकडे चांडाळपणा नाही. इस्लाम आणि ख्रिश्चनीटी यांना संघवाले धर्म समजून चालतात. प्रत्यक्षांत या दोन्ही राजकीय विचारप्रणाल्या आहेत.
- अतिशय चपखल.
याच धर्तीवर म्हणेन की…
In reply to पुस्तकाबद्दल आभार, माझं मत सांगतो .... by गामा पैलवान
चीन सोबत युद्ध हरल्यानंतर नेहरूंनी पंत्रात वैफल्याने लिहिले होते कि "we deceived ourselves". ह्यांत नेहरू कडे चांडाळ पणा नव्हता ह्या पेक्षा सत्य पाहण्याची क्षमता नव्हती असे म्हणावे लागेल. त्यांच्या चारित्र्यातील कमतरतेची किंमत भारताला देश म्हणून मोजावी लागली.
आपण जे लिहि त्याशी मी पूर्णतः सहमत आहे फक्त "चांडाळ" शब्द सोडून. सत्य न पाहता त्याच्याकडे डोळे बंद करणे हा सद्गुण नसून दुर्गुण किंवा चारित्र्याची कमतरता आहे. एखाद्या संघटनेत तशी कमतरता असावी ह्यांत अनपेक्षित असे काही नाही पण फक्त लोकांनी त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये हे महत्वाचे आहे तसेच सदर संघटनेने सुद्धा तसा आव आणणे बरोबर नाही.
झाडून सगळे TV anchors अचानक…
झाडून सगळे TV anchors अचानक झारखंडला पोचले! जंतरमंतर बहुधा ऑस्ट्रेलियात किंवा मंगळ ग्रहावर असल्यामुळे तिथे कॅमेरा घेऊन जाणं त्यांना शक्य झालं नसेल. https://www.youtube.com/watch?v=gZstFasMBXs
सरकारला एका मुद्यावर विरोध करणे हे आंदोलनाचं उद्दिष्ट होतं.
कार्यपद्धती जोमदार आणि दमदार होती. मंत्र्यांचा राजीनामा झाला. सफल. सरकार हरलं. पण त्याचबरोबर प्रस्थापित विरोधी पक्ष आणि नेते उघड्यावर पडले, निष्प्रभ ठरले. एक नवीनच नेता म्हणून दिपके भारताच्या राजकारणात उदयास आले.
कार्यपद्धती यशस्वी.
त्यांच्या पक्षाचं झुरळ नाव आता मात्र बदलायला हवे.
मंत्री गेला पण ....
In reply to सरकारला एका मुद्यावर विरोध करणे हे आंदोलनाचं उद्दिष्ट होतं. by कंजूस
कंजूस,
ज्या मंत्र्याने पेपर फोडणाऱ्या जास्तीत जास्त दोषींवर जास्तीत जास्त कारवाई केली त्याच मंत्र्यास घरी पाठवून नेमकं काय साध्य केलं या आंदोलनाने, असा प्रश्न मला पडलाय.
आ.न.,
-गा.पै.
2024 पेपरफुटीचा मास्टरमाईंड…
In reply to मंत्री गेला पण .... by गामा पैलवान
2024 पेपरफुटीचा मास्टरमाईंड निर्दोष सुटलाय! आणी आपल्या कार्यकाळात दणादण पेपर फूटताहेत, आपण आपले कर्तव्य निभवायला लायक नाही हे माहीत असूनही राजीनामा न देता पदलालसेने खुर्चीला चिटकून बसणे कुठल्या नैतिकतेत बसते?
काय ठरलं मग शेवटी?
काय ठरलं मग शेवटी?
cjp ने आवाहन केल्यानंतर…
cjp ने आवाहन केल्यानंतर देशभरातून सरकारी शाळांची दुरवस्थात असलेले व्हिडिओ प्रचंड प्रमाणत येऊ लागले आहेत, इतक्या वाईट परिस्थितीत असतील गाव खेड्यात शाळा हे पाहून मला तरी धक्का बसला! ह्या आवाहनाला घाबरून up भाजप सरकारने घाईघाईत सर्कुलर काढले आहे की शाळा नीट करा, म्हणजे एवढे दिवस फक्त राममंदिरातच नव्हते पैसे खात वाटते! तर राजस्थान सरकारने ह्यावर कडी केली, त्यांनी राजस्थानातील शाळांमध्ये परिस्थिती दाखवणारे व्हिडिओ काढण्यास बंदी घातल्याचे सर्क्युलर काढले आहे जेणेकरून विकास दाबला जावा. म्हणजे शाळा सुधारवनार नाही तर लपवू. :)
बंगालात शाळांची दुरावस्था दाखवणाऱ्या अब्दुल नामक समाजसेवकाच्या वडिलांना मारहाण करून मारून टाकण्यात आले आहे, मारणारे भाजपचे गुंड आहे सांगितले जातेय, इतके दिवस ममताचे गुंड म्हणून उर बडवणारे आता वाळलून तोंड खुपसून बसले आहेत. एकंदरीत कठीण आहे ह्या देशाचे!
https://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/bankura-cjp-mans-dad-beaten-to-death-by-bjp-men-neta-among-8-held/amp_articleshow/133281909.cms
https://www.newindianexpress.com/amp/story/states/rajasthan/2026/Aug/17…
आतंकी गोट कह्यात
दिनांक १२ ऑगस्ट रोजी भारतीय दलांनी अनेक राज्यांत एकसमयावच्छेदेकरून धाडी घालून भला थोरला आतंकी गट ताब्यांत घेतला आहे.
इंग्रजी बातमी : https://www.reuters.com/world/asia-pacific/india-says-it-thwarted-attacks-by-pakistan-backed-militants-arrested-over-200-2026-08-17/
हाच गोट झुरळांच्या आंदोलनांत घातपात घडवून आणणार होता. अमित शहांनी पडद्याआड राहून बरोब्बर गुपचूपपणे कार्यभाग साधला आहे.
-गा.पै.
झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली
झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली दाखविणारी ही फेबु पोस्ट -
अभिजीत दीपकेचा हा बुरखा फाटला 😂
अभिजीत लातूरच्या एका शाळेत गेला. पण तिथं पोरंच नव्हती.
मीडियाला आधीच बोलावलं होतं, मग सहानुभूती कशी मिळवणार? म्हणून कॅमेऱ्यासमोर गर्दी हवीच होती.
CJP चा "दबदबा" दाखवायच्या नादात त्याच्या लोकांनी शेजारच्या शाळेतून पोरं आणली. त्यांना समोर बसवलं, जेवण दिलं. सगळं सेटिंग सुरू होतं.
पण एका गावकऱ्याने एकाच वाक्यात बिंग फोडलं - "ह्या पोरांची शाळा ही नाहीच"
बास! कॅमेऱ्यासमोर नाचक्की झाली. काय बोलावं, काय करू हे त्याला कळेचना. थेट लाईव्ह चालू होतं आणि तो जागेवरच बावचळला 🙏
https://www.facebook.com/groups/287309018054859/permalink/2783651005270…;
जेन वाय झी
In reply to झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली by कांदा लिंबू
जेन वाय झी
ती जुनी जनरेशन! ही फक्त gen…
In reply to जेन वाय झी by श्रीगुरुजी
ती जुनी जनरेशन! ही फक्त gen z
वाट्टेल ते पसरवू नका
In reply to झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली by कांदा लिंबू
वाट्टेल ते पसरवू नका
आधी बातमी नीट माहीत करुन घ्या आणि मग बोला