Skip to main content

झुरळपक्ष आंदोलनामागील शक्तींची कार्यप्रणाली

लेखक गामा पैलवान यांनी गुरुवार, 06/08/2026 01:08 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

झुरळ्या पक्षाने नव्या दिल्लीत जंतरमंतरवर नुकत्याच जुलै अखेरीस केलेल्या आंदोलनाच्या मागील शक्ती कशा प्रकारे काम करतात यांविषयी दोन चलचित्रे पाहण्यात आली. म्हंटलं की यावर एक स्वतंत्र लेखंच लिहायला हवा. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असलं तरी त्यांत इतर अवांछित शक्ती घुसल्या आहेत. हे वेगळे सांगणे नलगे. मात्र या शक्ती नेमक्या कशा काम करतात यावर स्वाती तोरसेकरांनी बराच प्रकाशझोत टाकला आहे. त्यात माझी अधिकची माहिती मिळवून लेख लिहिला आहे. तर मुद्द्यांकडे वळूया.

१. इंदिरा गांधींची १९७८ सालची मुलाखत ( ०८:०० ते १०:०० मिनिटांचा तुकडा  ) : https://www.youtube.com/watch?v=q8aETK5pQR4&t=8m

सदर चलचित्रात जोनथन डिमलबी इंदिरा गांधींना प्रश्न करतो की मोरारजी देसाईंना अटक का केली. यावर बाईंचं उत्तर मोठं रोचक आहे. त्या म्हणतात की मोरारजींनी प्रकटनोंद ( = ऑन रेकॉर्ड ) म्हटलेलं की "आम्ही जर निवडणुका जिंकू शकंत नसलो तर आंदोलनामार्गे सरकार खाली खेचू. पंतप्रधानांच्या घराबाहेर घेराव घालून त्यांची वर्दळ बंद पाडू. जेणेकरून त्यांना काहीही काम करता येणार नाही". हे जर पन्नासेक वर्षांपूर्वी १९७० च्या दशकात घडवायचे मनसुबे असतील तर आज तरी काय वेगळं घडतंय बरं? मोदींच्या विरोधांत निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून आंदोलनाच्या मार्गे छळाबळाने शासनास जर्जर करायचा हेतू उघड दिसतो. जंतरमंतरवरील निदर्शनं शांततेत चालू होती. तिथे काही गडबड झाली नाही की कसलाही लाठीमार झाला नाही. तिथनं जवळंच असलेल्या संसद भवन परिसरात मात्र हिंसक जमाव कसाकाय गोळा झाला? शांततामय आंदोलनात आडमार्गे समाजकंटक घुसवून सनदशीर निदर्शकांचं हिंसक जमावात रुपांतर करायची क्लृप्ती बरीच जुनी आहे.  

या क्लृप्तीचा मोदींनी कसा सामना केला ते स्वाती तोरसेकरांचं खालील चलचित्रं स्पष्ट करतं.

२. स्वाती तोरसेकरांचं चलचित्र( १७ मिनिटे ) : https://www.youtube.com/watch?v=PfkpgYpyylw

सदर चलचित्रांतला मला वाटलेला कळीचा मुद्दा सांगतो. स्वातीताई म्हणतात की आंदोलन चालू असतांना बाहेर दोन महत्त्वाचे प्रसंग घडले. पहिला म्हणजे गंगानगर येथे बनावट गणवेश बनवणारा कारखाना उघडकीस आला. आणि दुसरा म्हणजे पश्चिम बंगालात काही देशद्रोही पकडले गेले. त्यांच्याकडून झुरळ्या आंदोलनात जैशचे आतंकी घुसणार आहेत अशी बहुमोल माहिती मिळवण्यात आली. यावरून मोदींनी झुरळांना माफ का केलं हे दिसून येतं. मोदींचं खरं लक्ष्य भुंकत्या कुत्र्याकडे नसून त्याच्या बोलवित्या धन्याकडे आहे. पुढे तोरसेकर बाई स्पष्ट करतात की श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश या तीन ठिकाणी सत्ताधाऱ्याच्या निवासस्थानी केलेली घुसखोरी सफल झाली आणि सत्तेतनं पायउतार व्हावं लागलं. बांगलादेशी शेख हसीना तर म्हणतात की गोळीबाराचे आदेश मी दिलेलेच नव्हते. मग गोळीबार केला कोणी? बनावट गणवेश कुठवर पोहोचू शकेल हे या विधानातनं कळतं. नेपाळी संसद जशी जाळली तसं काही भारतात होऊ दिलं गेलं नाही. मोदींनी अतिशय बिकट परिस्थिती तितक्याच कुशलतेने हाताळली आहे. पण हे तथ्य कोणी प्रसारमाध्यमं स्पष्ट करून सांगंत नाहीयेत. उलट मोदी कसे घाबरले, यावर झुरळांची पाठ थोपटण्यांत मग्न आहेत. चालायचंच !!!

माझं मत :

संसद जाळणं ओळखीचं वाटलं. म्हणून जरा शोध घेतला. तेव्हा हिटलरने वा नाझींनी अशीच राईशस्टाग ( = जर्मन संसद ) वास्तू जाळली होती ते आठवलं. जाळपोळीची पावती मात्र साम्यावाद्यांच्या नावांवर फाडली. बनावट कथनीची ( = फेक नरेटिव्हची ) किमया काही औरंच असते, नाहीका? राईशस्टाग जळाल्याच्या निमित्ताने नाझींनी साम्यवाद्यांची कोंडी केली आणि जर्मनीत आपली सत्ता बळकट केली. तर मग भारतीय संसदेच्या आसपास नाझींप्रमाणे हुल्लडबाजी व दंगेधोपे करणारे कधी भारतीय लोकशाहीचे बचावकर्ते असू शकतील काय?

इथे महाराष्ट्रातही काही पोलिसांनी मर्यादा ओलांडल्याची वृत्तं झळकली आहेत. यापैकी एक इथे आहे : https://www.instagram.com/reel/Da92uz-lOtm/
( स्रोत : https://www.misalpav.com/comment/1208372#comment-1208372 )

बनावट गणवेशाची घटना तर नाही ना ही?

लेख चिमुकला आहे. गदारोळामध्ये कुठेतरी बारीकसं सत्य लपलेलं असतं, असं म्हणाना ! वाचकांच्या मनांत घटनांचा मागोवा घेऊन सत्य हुडकून काढायची इच्छा आणि क्षमता उत्पन्न व्हावी हा लेखामागील हेतू आहे. झुरळ्यांनी मोदींना आणि कुणाकुणाला कसल्या शिव्या घातल्या आणि कसकसले विक्षेप केले, यांत मला बिलकुल रस नाही. सदर आंदोलनामागील शक्तींच्या कार्यप्रणाल्यांत मला रस आहे. त्या ध्यानी आल्या की त्यावरून त्या शक्ती कोण आहेत ते अजमावणं सुलभ व्हावं.

सजग आणि सतर्क राहणे ही काळाची गरज नेहमीच होती, आज जरा जास्तंच आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान 
 


वाचने 350
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

conspiracy theorist
A conspiracy theorist is a person who believes or spreads the idea that a major event or situation is the secret plot of a powerful, malevolent group.

 

 

 तेव्हा आपला नम्र गामा पैलवान,  लगे रहो.  कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं.

आणि हो, मध्यपूर्व, साउथ अमेरिका, सी.आय.ए - हेही येऊ द्या. 


-


सदर आंदोलनामागील शक्तींच्या कार्यप्रणाल्यांत मला रस आहे.

... सजग आणि सतर्क राहणे ही काळाची गरज नेहमीच होती, आज जरा जास्तंच आहे

अगदी बरोबर. शोध घेत रहा आणि त्यात काय काय गवसते ते इथे लिहीत रहा. 

झुरळांच्या मते त्यांना  'पूर्ण यश' मिळाले असल्याने यातून प्रेरणा घेत  यापुढे आणखीही झुरळ, घुशी, उवा, मधमाश्या, डास वगैरे वगैरेंच्या 'झुकानेवाल्या' पिलावळी बाहेर येत रहातील, याची खात्री वाटते आहे. 


 


**निर्विवाद तथ्य*** 
- नीट परीक्षेंत घोटाळा झाला. पेपर फुटला. 
- नीट परीक्षेची आखणीच चुकीची होती. त्यामुळे पेपर फुटणे हे अपेक्षित होते. 
- २०२४  मध्ये पेपर फुटीची अफवा होती. पण तिथे सरकारने विषय दाबून ठेवला पण परीक्षेची आखणी बदलली नाही. 
- सरकारची चूक झाली आणि ह्या चुकीला मंत्री नैतिक दृष्ट्या जबाबदार होते. 
- आदोलनकर्त्यांची भूमिका सरकार विरोधांत असल्याने सरकारवर विविध कारणांनी खार खाऊन असलेली सर्व मंडळी आंदोलनात भाग घेती झाली. 
- आंदोलनकर्त्यांचे चारित्र्य, वागणूक इत्यादी कशीही असली तरी मूळ मुद्दा "accountability" हा रास्त होता.
- मूळ मुद्दे मान्य करून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला, प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आदोंलनाला acknowledge केले आणि आंदोलन संपले. आता राहिलेल्या बाटल्या, उष्टे खाऊन जगणारी कुत्री, सतरंजी वाले वगैरे मागे राहतील पण ती कुठेही असतात. आंदोलन सध्या तरी संपले आहे.  
- आंदोलनाच्या कालावधींत मंत्री संत्री, बाबू आणि भक्तमंडळी ह्यांनी अनेक उर्मट वक्तव्ये केली ह्याच्या उलट room reading ची उकृष्ट स्किल असलेल्या प्रधान मंत्र्यांनी भावुकता दाखवली.

**कदाचित सत्य** 
- पेपर मागील वर्षें सुद्धा फुटत असावा आम्हाला ठाऊक नव्हते. 
- आंदोलनात विदेशी शक्ती, अंतर्गिक  शत्रू ह्यांनी नेहमी प्रमाणे शिरकाव करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. 
- आंदोलनाचे नेते म्हणून दिपके आणि वांगचुक हे संधीसाधू आहेत.

**असत्य**
- आंदोलनात प्रचंड हिंसा होती ह्या हिंसेने प्रमुख सरकारी अधिकारी, प्रमुख नेते जसे प्रधान मंत्री इत्यादी ह्यांच्या जीवाला किंवा पदाला धोका होता. 
- सरकार पडण्याची आणि नेपाळ मध्ये झाली वगैरे तासली क्रांती होण्याची शक्यता किंवा मनीषा होती.

**षड्यंत्र सिद्धांत** 
- डीप स्टेट नावाचा कुठलाही खलनायक नाही. तमराज किलविष प्रमाणेच हा खोटा अस्तित्वांत नसलेला बागुलबुवा आहे. 
- ट्रम्प ह्यांचा विविध भ्रष्टाचार उघडकीस येत होता तेंव्हा त्यांनीच आपल्या अंथरूण आणि फॉक्स न्युज ला खिळून असलेल्या म्हाताऱ्या मतदात्यांना मूर्ख करण्यासाठी असले नसते बागुलबुवे उभे केले. त्याकाळी ट्रम्प ह्यांच्या पौरुषावर भाळलेल्या संघीय भक्तमंडळींनी हे टर्म देशांत आयात केले स्वतःची आणि स्वतःच्या नेत्याची इमेज मोठी करण्यासाठी.
- सुपरमेन साठी लेक्स पाहिजे, बॅटमॅन साठी जोकर त्याच प्रमाणे विश्वघबरूला उगाच विश्वनेता वगैरे दाखविण्यासाठी हा भंपक डिप स्टेट चा खलनायक प्रस्तुत केला गेला. 
- ट्रम्प साहेबानी भक्ती २.० मध्ये खोडा घालून पेकटांत लाथ घातल्यानंतर ह्याना आता गंगाधर हि शक्तिमान है प्रमाणे ट्रम्प डीप स्टेट वाटतो. 
- आता कुणा रिकामटेकड्या महिलेने सवंग लोकप्रियतेसाठी भंपक अर्धवट विडिओ करून आपल्यातील डॉक्टर साळुंखे जागृत करून त्याला ACP प्रद्युमन ची फोडणी दिली आणि नसते ऐतिहासिक संदर्भ, त्यांत बी ग्रेड वर्तमानपत्रांतील बकवास गुन्ह्याची सांगड दिली आणि भक्त मंडळींच्या मेंदूची प्रचंड पोकळी ह्या षडयंत्रानी भरली. 
- थोडा तरी विवेक असता तर ह्या तथाकथित विडिओ मधील मूर्खपणा दिसून येतो. इंदिरा गांधींनी मोरारजी देसाई वर आरोप करून आणीबाणी लावली. प्रत्यक्षांत आणीबाणी आपली खुर्ची वाचविण्यासाठी लावली होती हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्या आरोपांत काहीही तथ्य नव्हते. मोदींनी आणीबाणी लावली नाही किंवा बळाचा अवास्तव वापर करून कुणाला तुरुंगांत टाकले नाही. किंवा मोरारजी प्रमाणे सरकार पाडणे हे आपले धोरण आहे असेही आंदोलनकर्त्यांनी म्हटले नाही. कुणी एखाद्या दुसर्याने मोदींना दूषणे दिली असली तरी सरकार पडण्याची शक्यता इथे शून्य होती. 
- "माझं मत" म्हणून सदर लेखक हिटलर चे उदाहरण देतात. महिलेचा इतिहासाचा अभ्यास शून्य आहे. हिटलर ने सत्तेत असताना स्वतः पार्लमेंट ला आग लावली. आणि नन्तर आपल्या हातातील सत्त्तेचा प्रयोग करून विरोधकांना लक्ष्य केले. ती analogy इथे वापरायची तर मोदी ह्यांनी स्वतः पेपर लीक केला. दिपके ह्यांना आपणच प्लांट केले आणि नंतर हिंसा घडवून आणली आणि ह्या हिंसेला जबाबदार ठरवून, राहुल गांधी प्रभृतींना तुरुंगांत टाकले ते म्हणावे लागले असते. पण तसे काहीही घडले नाही. 
- कुठे तरी म्हणजे खोट्या गणवेशाची फॅक्टरी सापडली आणि तिकडे कुठेतरी कुणा तथाकथित दहशवाद्यांना अटक झाली ह्याचा बादरायण संबंध जोडायचा साळुंखे आणि प्रद्युमन प्रमाणे. म्हणजे कुणाला अजीर्ण झाले आणि कुठे कुत्रे मेले म्हणून "कृपा अटकी हुयी है" हि निर्मल बाबा छाप भोळी भक्ती. 
- तरी हडप्पा मोहेंजदरो मध्ये सापडलेला प्रिस्ट किंग हा मोदी प्रमाणे दिसतो हा दुवा इथे आणला नाही.


नसते बादरायण संबंध पाहिजेत तर मी एक समर्पक संधर्भ देते.

punic युद्धांत हॅनिबल कॅनो च्या युद्धांत  ने आपल्या पेक्षा प्रचंड मोठ्या रोमन सैन्याचा धुव्वा उडवला. ते पाहून त्याच्या घोडदळ प्रमुखाने त्याला सल्ला दिला कि त्यांनी ताबडतोप  रोम वर चालून जावे आणि एका आठवड्यांत रोमचा ताबा त्याच्या हातांत असेल. रोम सारख्या शहरावर आक्रमण करणे कठीण  आणि रसदपुरवठ्याच्या दृष्टीने कठीण असल्याने हॅनिबल ने त्याला नकार दिला तेंव्हा घोडदल प्रमुखाने त्याला म्हटले.

Verily, the gods have not given all gifts to the same man. You know how to win a victory, Hannibal; but you do not know how to use it.

--

सध्या भक्तमंडळी गोबीभक्तीच्या गटारांत लोळत आहे आणि कुणी ते जाणवून दिल्यास, हाच वास कस्तुरीमृगाला येतो. हीच गंगा आहे आणि तुम्हाला आमचा मत्सर वाटतो वगैरे अश्या गोड गैरसमजुती हि मंडळी करून घेत आहे. हे सर्व ५ वर्षांच्या मुलाना प्रेटेन्ड प्ले करताना शोभते. इतरांना शोभत नाही.

ह्या भंपक कॉन्स्पिरसी थेअरी म्हणजे विशुद्ध कोपियम Copium आहे स्वतःच्याच बालमनाला समजावण्यासाठी. 


In reply to by साहना

प्रतिसाद आवडला! गामाजी ह्यांचा लेख विनापुरावा आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपण हि चर्चा सीट आऊट करावी ह्यांतच शहाणपणा आहे ! सुज्ञास अधिक सांगणे न लगे, पण ते सुज्ञास ! तुम्हाला स्पष्ट सांगते ! 


>>> सदर चलचित्रात जोनथन डिमलबी इंदिरा गांधींना प्रश्न करतो की मोरारजी देसाईंना अटक का केली. यावर बाईंचं उत्तर मोठं रोचक आहे.

 

आणिबाणीच्या कालखंडात इतर हजारो नागरिक व नेत्यांसहित मोरारजी देसाईंना सुद्धा कारागृहात डांबले होते. याव्यतिरिक्त कधीही मोरारजींना, इंदिरा गांधींनी अटक केली नव्हती.‌

 

 

>>> मोदींनी अतिशय बिकट परिस्थिती तितक्याच कुशलतेने हाताळली आहे.

 

संपूर्ण सहमत.

 

_______________

 

लेखातील इतर षडयंत्र सिद्धांताविषयी माहिती नसल्याने माझी काहीच प्रतिक्रिया नाही.‌


गामा पैलवान श्रीगुरुजी यान्च्याशी पूर्णपणे सहमत .. अजून ऐफ.सी.आर.ऐ चा मुद्दा तुम्ही घेतला नाही