Skip to main content
लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 15/07/2026 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

आपणास माहिती आहे १५ मे रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता आणि  या वक्तव्याचा निषेध म्हणून, १६ मे रोजी अभिजीत दिपके यांनी समाज माध्यमांवर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंग्यात्मक सामाजिक चळवळीची स्थापना केली होती. भारतात या चळवळीची तरुणांमधे खूप चर्चा  आहे,  व्यवस्थेविरुद्ध तरुण एकत्र होऊन आपली भूमिका मांडायला एकत्र झाले आहेत.  सामाजिक माध्यमांवर या विविध विषयांचा,  मिम्ससहित सध्या बोलबाला आहे. आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही,  आमच्या या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी असे आवाहन  आंदोलकांनी  केले, सरकारने तरुणांच्या मागण्यांवर विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांना आहे. 

सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर  बोलण्यासारखं तसं नवं काही नाही. परीक्षांचे  पेपर फुटणे, मंदिर गळणे, मंदिरातील पैशांचा अपहार करणे,  युवकांची बेरोजगारी,  वाढती महागाई या विषयांवर सरकारकडे फारशी समाधानकारक उत्तरं नाहीत. भारतीयांची ससेहोलपट सुरु आहेच.  सध्या,  दिल्लीतील जंतरमंतरवर सध्या  सुरु असलेले  आंदोलन प्रामुख्याने NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांविरुद्ध सुरू आहे, सदरील आंदोलनात आंदोलक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी करत आहेत, अशा वेळी सरकार या आंदोलनाकडे अजूनही गांभीर्याने पाहात नाही, सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. 
 
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केले आहे.  आज सतरा दिवसानंतर त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.  काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या पत्रांमुळे आंदोलन  चर्चेत राहिले. यातील एका पत्राद्वारे 'सीजेपी'ने राजकीय नेत्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली, तर दुसऱ्या पत्रात देशभरातील १,८०० मान्यवरांनी गेल्या १७दिवसांपासून उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि इतर विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
 

आंदोलनात विविद्य विद्यार्थी त्यांचे पालक या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता सरकार या आंदोलकांच्या मागण्यांकडे चर्चा अथवा उपायांबाबत कोणीही चर्चा करायला आलेले नाही.  काही मोजक्याच राजकीय पक्षांनी पेपरफूटीबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे, आजचे तरुण काहीच करीत नाही, व्यवस्थेविरुद्ध लिहित अथवा बोलत नाही.  अशा वेळी तरुण आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत असतील तर, अशा वेळी सरकारची जवाबदारी काही असेल की नाही ? या आंदोलनाचं पुढे काय होईल ?  या आणि विविध  प्रश्न आणि संभाव्य उत्तरासाठी  चर्चेसाठी हा धागा. आपण आपली मतं मांडत राहूया....

 


वाचने 6468
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता.

 

बिरुटे मास्तर

मुदलातच  खोट  आहे.

एक न्यायाधीश नव्हे तर भारताचे सरन्यायाधीश 

Chief Justice of India (CJI) Surya Kant remarked

"There are youngsters like cockroaches, who don’t get any employment and don’t have any place in the profession... they start attacking everyone." 

हे मूळ वाक्य आहे त्यांनी भंपक अर्ज केलेल्या एका वकीला वर टिप्पणी करताना म्हटले होते  
his comments were aimed specifically at individuals holding fake and bogus degrees who enter professions like law and media to attack institutions, and were not a criticism of the nation's youth.

मास्तर जरा  नीट वाचत चला हो.

पहिलंच वाक्य अर्धवट सत्यावर आधारित आहे.    


In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे,

आपला उल्लेख सर्वजण नेहमी आदरपूर्वक 'डॉक्टर' असा करतात. मते बहुतेकवेळा पटत नसली तरी आपल्याविषयी आदर आहेच. बिरुटे सर हे प्राध्यापक व डॉक्टरही आहेत. आपण त्यांचा उल्लेख नेहमी 'मास्तर' असा का करता? कुठेतरी ते तुच्छतादर्शक वाटते. 

आता 'मास्तर' हेही आदरार्थीच आहे असे कृपया सिध्द न करता आपणही त्यांचा आणि सर्व सभासदांचा उल्लेख आदरपूर्वक करावा, ही विनंती. शेवटी तुमच्यावर आहे.


In reply to by स्वधर्म

आपला उल्लेख सर्वजण नेहमी आदरपूर्वक 'डॉक्टर' असा करतात. मते बहुतेकवेळा पटत नसली तरी आपल्याविषयी आदर आहेच. बिरुटे सर हे प्राध्यापक व डॉक्टरही आहेत. आपण त्यांचा उल्लेख नेहमी 'मास्तर' असा का करता? कुठेतरी ते तुच्छतादर्शक वाटते.

आता 'मास्तर' हेही आदरार्थीच आहे असे कृपया सिध्द न करता आपणही त्यांचा आणि सर्व सभासदांचा उल्लेख आदरपूर्वक करावा, ही विनंती.

 

हं.

हे आदरणीय प्रा. डॉ. दिलीप बिरुटे इतरांना मनुवादी, गोबरवादी म्हणतात तेव्हा कोठे जात असतो राधासूता तुझा धर्म? 


In reply to by कांदा लिंबू

असा यांचा धर्म. 

 

तसेही बिना दवाईवाल्या  डाॅक्टरांचे पेव फुटलय. आदरणीय  कैलासवासी जसपाल भट्टी यांनी बरेच वर्षापुर्वी सत्य परिस्थिती दाखवून दिली होती.

 

 केजी ते पिजी सगळेच मास्तर.  फक्त बाह्यरूप वेगळे.

 

तेंव्हा......

 

 

 


In reply to by स्वधर्म

डॉ. सुबोध खरे व्यक्तीगत म्हणून जितका परिचय आहे तितका आणि एक डॉक्टर म्हणून माझा अनुभव चांगला आहे. बाकी काय लिहायचं ते लिहू  द्या.

 

बाकी, डॉ.सुबोध खरे ही व्यक्ती म्हणून बघायचं नाही तर, तो सामाजिक गट म्हणून बघायचा. अशी माणसं गट कधी कधी चांगलं लिहिता लिहिता काहीही लिहायला लागतात ते सामाजिक फस्ट्रेशन आहे असे मला वाटते. जेव्हा सरकारकडून अपेक्षा असते की ते समाजासाठी काम करतील, आपलं म्हणून आपला काही फायदा करुन देतील, पण  तिथे फक्त दुर्लक्ष दिसते, तेव्हा खूप हताश वाटते. सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो, जेव्हा आपण ज्यांना आदर्श वगैरे मानायला लागतो किंवा ज्यांचे आपण फॉलोअर्स आहोत, तेच आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, त्यावर खरे उतरत नाहीत, काही कारणास्तव आपल्याला त्यांचीच बाजू घ्यावी लागते, हेच अशा गटाचं आजचं खरं मानसिक द्वंद्व आहे, त्यात अशा गटांची नाव फसलेली आहे. एवढंच.. 

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

https://www.misalpav.com/story/53645

पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे

प्रथम ग्रासे मक्षिका पात:

प्रथम १९४७  ते १९७७ सलग ३० वर्षे काँग्रेस ची सत्ता होती.  

मग १९७७ ते २०११ अशी सलग चौतीस वर्षे कम्युनिस्ट पक्षाची राजवट होती.

मग सलग १५ वर्षे तृणमूल काँग्रेसची.

काय बिरुटे मास्तर?

७९ वर्षे फक्त तीन पक्षांची सत्ता आणि दोन वेळेस सत्ता बदल झाला असताना  

येथे राजकारणात बदल हि परंपरा कशी काय होते?    

पहिल्याच घासाला खडा लागला  

 

 

https://www.misalpav.com/discuss/53612

जलमूरीचे दुकानातला माल-बरण्या पाकिट  मात्र खचाखचं भरले होते. जसे काय आजच दुकानाची ओपनिंग आहे.

नौटँकीची काय लिमिट राहिली नाही.

दिलीप बिरुटे

( मिपावरील मुरमु-यावाला )

विक्रांत जहाजा वरची एक कहाणी आठवते आहे.

श्रीमती इंदिरा गांधी (पंतप्रधान असताना) येणार म्हणून नौसैनिकांबरोबर "बडा खाना" आयोजित केला होता.

तो चालला असताना एक आगाऊ नौसैनिक श्रीमती गांधी  याना म्हणाला मॅडम आज आप आ रही है इस लिये ऐसा खान बनाया है रोज ऐसा खाना नही होता है!

हे ऐकून वातावरण थोडेसे  तंग झाले. पण श्रीमती इंदिरा गांधी त्याला म्हणाल्या बेटे आपके घर कोई मेहमान आते है तो उनके लिये कुछ अच्छा खास खाना बनता है  कि नही? या आप उसे भी दाल चावल हि खिला देते हो?

सर्व नौसैनिक हसले आणि वातावरण एकदम बदलले.

आता प्रत्यक्ष पंतप्रधान तेथे येणार म्हटल्यावर एखादा सामान्य माणूस सुद्धा आपली घर किंवा दुकान स्वच्छ करून रंग रंगोटी करेल सर्व सामान भरून ठेवेल कि नाही?

त्यात नौटंकी दिसण्यासारखे काय आहे?

 

आणि या धाग्यावर

 

सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता.

 

बिरुटे मास्तर

मुदलातच  खोट  आहे.

एक न्यायाधीश नव्हे तर भारताचे सरन्यायाधीश

Chief Justice of India (CJI) Surya Kant remarked

"There are youngsters like cockroaches, who don’t get any employment and don’t have any place in the profession... they start attacking everyone."

हे मूळ वाक्य आहे त्यांनी भंपक अर्ज केलेल्या एका वकीला वर टिप्पणी करताना म्हटले होते  
his comments were aimed specifically at individuals holding fake and bogus degrees who enter professions like law and media to attack institutions, and were not a criticism of the nation's youth.

मास्तर जरा  नीट वाचत चला हो.

पहिलंच वाक्य अर्धवट सत्यावर आधारित आहे.    

 

 

आता ज्यांना प्राध्यापक आणि डॉकटर म्हणायचे त्यांनी लेख लिहिताना मूलभूत माहिती तरी करून घेतलेलीच असावी कि नाही?

ती जर नसेल तर मला पु ल नि लिहिलेलें शब्द आठवतात.
त्यांच्या आजोबानी त्यांना उद्देशून  पत्र लिहिले होते. अरे पुरुषोत्तम तू आता प्राध्यापक झालास थोडं गंभीरपणे वागायला शिक.

आता असे  जर नसले तर प्राध्यापक आणि डॉक्टर पेक्षा मास्तर म्हणणे सोपे आहे.

खोटे बेलाशक पणे खरे म्हणून सांगणे हा शाळा मास्तरांचा स्थायीभाव आहे असे काही तरी म्हैस या कथेत पुलंनीच लिहिलेलं आहे( शब्दशः आठवत नाहीये)  

त्यानुसार मी त्यांना मास्तर म्हणु लागलो.

ते गाय गोबर बद्दल काय लिहितात ती त्यांची पातळी आहे.          

मला वैयक्तिक रित्या कोणाबद्दलही आकस नाही/ नसतो. हे वैचारिक मतभेद आहेत.  

जे जालावर आहे ते जालावरच राहते.    


In reply to by सुबोध खरे

आपण ज्या कष्टाने माझे लेखन लक्षात ठेवून इथे कोट्स केले त्याबद्दल आभार... लिहीते राहा..   :)

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by सुबोध खरे


In reply to by सुबोध खरे

his comments were aimed specifically at individuals holding fake and bogus degrees who enter professions like law and media to attack institutions, and were not a criticism of the nation's youth.

हायला.... फेक डिग्री असणारे इंडिव्हीज्युल्स, जे कायदा आणि माध्यमाच्या क्षेत्रात येऊन संस्थांवर आक्रमण करतात आणि त्यांना भारतीय युवा मनाचा अंदाज नसतो...

असे आहे होय?. राजकारण राहिले काय् ह्यात चीफ ज्युडीशिअरी कडून?

ज्यांना हा टॉन्ट सिरियसली स्वत:वर घ्यायला पाहिजे ते निवांत आहेत आणि जे खरे डिग्रीवाले आहेत ते जळताहेत. तळ्मळताहेत, खऱ्या भाषेत जळजळताहेत.

अवघड आहे.....


Swara Bhasker joins Cockroach Janta Party stir at Jantar Mantar, backs Sonam Wangchuk & Abhijit Dipke

Read more at: https://www.deccanherald.com/entertainment/swara-bhasker-joins-cockroach...

आले

सगळॆ संधीसाधू वाममार्गी फुरोगामी आपली पोळी भाजून घ्यायला.


The Manifesto.
Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.

01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.

02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.

04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.

05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.

 

हा झुरळांचा जाहीरनामा.

 

इतका भंपक कुठला जाहीरनामा नसेल  

 

हा तरी वाचलाय का 


२०११ मधील अण्णा हजारेंचे उपोषण ११-१२ दिवस चालले होते. लोकशाही पध्दतीत उपोषण करणे या प्रकारालाच माझा पूर्ण विरोध आहे- कारण कोणतेही असो. हे मी त्यावेळेस मिपावर लिहिलेही होते. मला कितीही आवडत नसले तरी अण्णांच्या उपोषणामुळे देशातील वातावरण बऱ्यापैकी ढवळून निघाले होते हे मी पण नाकारत नाही. कदाचित तसे काहीतरी होईल अशी या मंडळींची अपेक्षा असावी. २०११ मध्ये अण्णा हे बुजगावणे उपोषणाला बसविले होते आणि आता सोनम वांगचुक. त्यावेळेस अण्णांना देशात जितके लोक ओळखत होते त्यापेक्षा सोनम वांगचुकला अधिक लोक ओळखतात असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अण्णांच्या उमेदीच्या काळात सोशल मिडिया नव्हता तर आता आहे त्याचा तसेच थ्री इडिअट्स मध्ये सोनम वांगचूकवर आधारीत पात्र आहे त्याचाही फायदा सोनम वांगचूकला नक्कीच झाला असावा असे म्हणायला जागा आहे. 

 

काहीही असले तरी २०११ मध्ये अण्णांच्या उपोषणाच्या काळात जसे वातावरण ढवळून निघाले होते त्याच्या चतकोरही वातावरण आता नाही. खरं तर त्यावेळेस आंदोलन भ्रष्टाचाराविरोधात होते- आणि आंदोलन एकूणच भ्रष्टाचाराविरोधात असले तरी रस्त्यावरचा मामा चिरीमिरी घेतो तसल्या भ्रष्टाचाराविरोधात नाही तर सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात अधिक होते. लोकपाल त्यासाठीच हवा होता. सरकारमधील भ्रष्टाचाराचा समाजाला त्रास होत असला तरी प्रत्यक्ष वैयक्तिक त्रास झालेले लोक दाखवता येणे कठीण आहे. त्याउलट आता नीट परीक्षा आणि इतर परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाचा फटका बसलेले विद्यार्थी आणि त्यांच्या घरचे आपल्या आजूबाजूला पण दिसतील. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की त्यावेळेस होता त्यापेक्षा आताचा मुद्दा अधिक लोकांना वैयक्तिकपणे त्रासदायक होता. तरीही तेव्हाच्या तुलनेत आता या उपोषणाची फारशी कोणी दखलही घेत नाहीये हे कोडे कसे सोडवायचे?

 

मला वाटते परिस्थितीत फरक मोठा आहे. सगळ्यात मोठा फरक हा की नरेंद्र मोदींची अगदी टेफलॉन कोटेड असल्यासारखी प्रतिमा आहे. या प्रकरणी शिक्षणमंत्री चुकले नाहीत असे म्हणणारे फार लोक नसतील तरीही मोदींच्या नावावर लोकांचा विश्वास असल्याने लोक रस्त्यावर उतरले नाहीत असे मला वाटते. ४० वर्षांपूर्वी सोशल मिडिया नसतानाही राजीव गांधींची प्रतिमा बोफोर्स प्रकरणामुळे डागाळली होतीच- इतकी की कोणी कसले कांड केले तर त्याने बोफोर्स केले हा शब्दप्रयोग अनेक वर्षे वापरात होता. आता त्यापैकी काहीही होताना दिसत नाहीये. असे का होत आहे? विरोधक याचा विचार न करता नुसत्या नव्या नव्या मुद्द्यांवरून मोदींविरोधात वातावरण होईल, लोक रस्त्यावर उतरतील, नेपाळमध्ये झाले तसे आपल्याकडे होईल वगैरे स्वप्ने बघत असतील तर ती दिवास्वप्नेच राहतील. आतापर्यंत २०१५ मध्ये सूटबूटकी सरकारपासून कित्येक मुद्दे विरोधकांनी आणले. तेवढ्यापुरते काही मुद्द्यांना यश मिळाले- उदाहरणार्थ शेतकरी आंदोलनात सरकारला माघार घ्यायला लागली, २०२४ च्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी गोट अती आत्मविश्वासात गेला त्यावेळेसच संविधान बदलणार हा अपप्रचार चालू होता त्याला बऱ्यापैकी यश आले वगैरे. पण गेल्या १२ वर्षात मोदी सरकार चांगलेच कोंडीत पकडले गेले आहे असे काही झालेले नाही. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कधीतरी येतोच- प्रत्येक नव्या मुद्द्यावरून तेच तेच यशस्वी कलाकार (केंद्रात राहुल गांधींपासून महाराष्ट्रात उध्दव ठाकरे- इतकेच काय तर मिपावर बिरूटे मास्तर) रान उठवायला गेल्यावर- या लोकांचा पूर्वीप्रमाणेच फुसका बार असणार असे लोकांना वाटले तर ती चूक कोणाची? मोदींची?   

 

दुसरे म्हणजे उपोषण या मार्गाला माझा विरोध असला तरी सोनम वांगचुकचा (वरकरणी दाखविला गेलेला) मुद्दा चुकीचा आहे असे मला तरी वाटत नाही. वेगवेगळ्या परीक्षांच्या आयोजनात मोदी सरकारने अक्षम्य घोळ घालून ठेवला आहे हे नक्कीच. पण लगेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला कोण कोण धावून गेले? तर अरूंधती रॉय सारखे लोक- हो तीच अरूंधती रॉय जिने आपल्या हवाई दलाच्या जवानांना आणि काश्मीरात हिंदूंना ठार मारणाऱ्या, (किमान) एका काश्मीरी स्त्रीवर बलात्कार करून तिला करवतीने चिरायच्या घृणास्पद प्रकारात हात असलेल्या यासिन मलिकवर स्तुतीसुमने उधळली होती आणि तुकडे तुकडे वाल्यांना पाठिंबा दिला होता. दुसरा तो सगळ्या शाद्यांमध्ये दिवाना होणारा अब्दुल्ला- योगेन्द्र सलीम यादव. असले लोक जर कोणत्याही आंदोलनात सामील झाले तर त्या आंदोलनापासून दूर राहावे- भले वरकरणी दाखविला गेलेला मुद्दा योग्य असला तरी- असेच बहुसंख्यांना वाटले तर त्यात त्यांचे काय चुकले? केंद्रात राहुल गांधींपासून मिपावरील बिरूटे मास्तरांना काहीही वाटले तरी देशातील सामान्य लोकांचे देशावर प्रेम असते त्यामुळे असले लोक (ज्यांना देशातील सामान्य लोक देशद्रोहीच मानतात) असतील तर त्यापासून सामान्य लोक चार हात दूर राहतात. तसेही नेहमीचे डापु गॅंगमधील विचारजंत सोडल्यास अरूंधती रॉय वगैरे लोकांची कोणाला काही पडली आहे असे वाटत नाही. अवांतर- अण्णांच्या उपोषणाच्या वेळेस कोणीही बोलावले नसतानाही स्टेजवर पुढेपुढे करून स्वत:चा उदो उदो करत तिरंगे नाचविणाऱ्या त्या मेधा पाटकर अजून कशा त्यात आल्या नाहीत? 

 

आणि तिसरे म्हणजे- हा मुद्दा मी अगदी केजरूके गुलाममध्ये पण मांडला होता. त्यापुढे आता ११ वर्षे उलटली आहेत आणि मधल्या काळात तो मुद्दा अधिकच दृगोच्चर झाला आहे. अण्णांचे आंदोलन हायजॅक करून केजरीवाल या लुच्च्या लबाड लफंग्याने स्वत:ही स्वार्थाची पोळी कशी भाजून घेतली हे सगळ्यांनीच बघितले. त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन, भ्रष्टाचार विरोध वगैरे वगैरे किंवा तत्सम मुद्दे मांडून कोणी मोठे आंदोलन उभे करू बघत असेल तर त्यातून नवा कोणता केजरीवाल येऊन लोकांना यडं बनवून स्वत:ची स्वार्थाची पोळी भाजून घेणार हा भयावह विचार आला की ते आंदोलन बाराच्या भावात गेलेच म्हणून समजा. बिहारमध्ये प्रशांत किशोरचा पचका का झाला? त्याचे कारणही केजरीवालच आहे असे मला वाटते. कारण तो पण साधारण तसेच मुद्दे घेऊन निवडणुक लढवत होता आणि तो दुसरा केजरीवाल होणार का ही भीती लोकांना वाटली असेल तर त्यात त्यांची काही चूक आहे असे वाटत नाही. अशा प्रकारच्या आंदोलनांचे कधी न भरून येणारे नुकसान केजरीवाल टोळीने केले आहे हे नक्की.

 

झुरळांच्या या आंदोलनाला आणि उपोषणाकडे सरकारने अजूनपर्यंत ढुंकूनही बघितलेले नाही हे चांगलेच झाले. समजा सोनम वांगचुक मरायला टेकला म्हणून त्याच्या मागण्या मान्य केल्या तर मग उपोषणे केल्यास सरकार झुकते हा चुकीचा संदेश जाईल. मग ३७० परत आणा, सीएए रद्द करा वगैरे वगैरे नवे नवे मुद्दे घेऊन वेगवेगळ्या बुजगावण्यांना उपोषणाला बसवून त्यामागचे बोलविते धनी कचोऱ्या हाणत आपला स्वार्थ साधायचा आणि सरकारला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतील हे नक्की.

 

तेव्हा.. पडा झुरळांनो निपचित आणि तसेच पडून राहा.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुसरे म्हणजे अभिजीत दीपकेने भारतात आल्यानंतर व्होटचोरी वगैरे तेच तेच घिसेपिटे मुद्दे मांडले तेव्हाच  हे आंदोलन म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू आहे आणि विद्यार्थ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याच्याशी त्या आंदोलनाचा काडीमात्र संबंध नाही तर खरा अजेंडा वेगळाच आहे हे लोकांच्या लक्षात आले नसेल असे अजिबात नाही. 

 

मी शिक्षणक्षेत्राशी निगडीत असल्याने परीक्षांमध्ये चाललेले घोळ बघून मनस्वी दु:ख होते. मोदी सरकारने आणलेल्या एन.टी.ए या संस्थेने इतके म्हणजे इतके घोळ घातले आहेत की काही विचारूच नका. या सगळ्या प्रकारांमध्ये सुधारणा व्हावी असे मलाही वाटते. त्यामुळे झुरळांचे आंदोलन फुसके ठरत असेल तर त्यामुळे मला आनंद झाला आहे असे मी तरी म्हणणार नाही. जर का या आंदोलनात अरूंधती रॉय वगैरे घृणास्पद मंडळी उतरली नसती,  कोणतेही राजकारणी त्यात आले नसते, आंदोलनात केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे असते तर कदाचित त्या आंदोलनाला अधिक समर्थन मिळाले असते. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी बरेच दिवस वाचन मात्र होतो

दीपक ने जेव्हा नीट परीक्षेच्या दिवशी नवीन आंदोलन ठेवले तेव्हाच हे स्पष्ट होतेकी याला परीक्षेशी काहीही देणेघेणे नाही याला राजकारण हवे आहे . खरे विद्यार्थी त्याच दिवशी आंदोलनाून बाहेर पडले  असणार

 

बाकी तो मफलरलाल च्या मार्गावर जात आहे  हे सांगायला तज्ञाची गरज नाही

त्याने वांगचुकचा अण्णा केला . फरक इतकाय  की अण्णांना आपला वापर होतोय हे माहीत नव्हते . याला माहीत आहे 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंसूकु,

तुंम्ही तर बिरुटे सरांच्या मूळ धाग्यापेक्षाही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात बहुतांशी झुरळ जनता पार्टी व सोनम वांगचुक यांचे प्रतिमा हनन आहे. ते अपेक्षित आणि ठीक. परंतु महत्त्वाचा मुद्दा तुंंम्ही सोयीस्करपणे बाजूला ठेवला आहे, तेही अपेक्षितच. पण सगळेच तुमच्या लिखाणाबरोबर वहात नाही ना जाऊ शकत. म्हणून...

क्षणभर मान्य करू की ज्यांना परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याबद्दल वाईट वाटते, ते सगळे चूक आहेत. पण विद्यमान शिक्षण मंत्र्यां च्या महान गुणवत्तेबद्दल आणि तेच अजूनही शिक्षणमंत्रीपदी रहावेत याची कोणती महत्वाची कारणे आहेत, हा मुद्दा तुमचा राहून गेला आहे. त्यामुळे आपण खालील प्रश्नांची उत्तरे देऊन आंम्हाला उपकृत करावे ही विनंती आहे.

- विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणपध्दतीत कोणते महत्वाचे बदल केले आहेत, ज्याचा भारतातील करोडो विद्यार्थ्यांना काय अतुलनीय फायदा झाला?

- विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण खाते सांभाळल्यामुळे देशात विद्यार्थ्यांना कोणते नवीन अभ्यासक्रम मिळाले, त्यांचा कसा कौशल्यविकास झाला?

- विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून काय केले?

- त्यांनी कोणत्या जुन्या टाकाऊ गोष्टी बदलून नव्या आधुनिक गोष्टी आणल्या?

- एकूण भारतीय शिक्षण पध्दतीची गुणवत्ता किती व कशी वाढली?

हे जर आपण सांगितले तर झुरळ जनता पार्टीच्या आंदोलनातील हवाच निघून जाईल. विद्यमान शिक्षणमंत्री हेच आंम्हाला शिक्षण मंत्रीपदी हवेत असे नवे आंदोलनही विद्यार्थी करतील; पण हे जर नाही सांगितले तर तुंम्ही लिहिलेल्या प्रतिसादातील हवाच निघून जाईल. तेंव्हा कृपया थोडा वेळ काढून विद्यमान शिक्षण मंत्र्यांची ही माहिती आंम्हाला द्यावी अशी नम्र विनंती आहे.


In reply to by स्वधर्म

हा प्रतिसाद तुम्ही लिहिला आहे याचाच अर्थ माझे आधीचे दोन्ही प्रतिसाद तुम्ही वाचलेले नाहीत. नाहीतर शिक्षणमंत्री फारफार चांगले आहेत असे मला म्हणायचे आहे असे तुम्हाला वाटलेच नसते. 

असो.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

>> ...नाहीतर शिक्षणमंत्री फारफार चांगले आहेत असे मला म्हणायचे आहे असे तुम्हाला वाटलेच नसते. 

म्हणजे शिक्षणमंत्री चुकले आहेत व आपले काम करण्यात असफल आहेत हे तुंम्हाला मान्य आहे. मग त्यांच्या राजीनाम्याची मागणीही आपल्या मते योग्यच ठरते. तर ती मागणी करणाऱ्यांना चुकीचे दाखवण्याचे काय कारण आहे?

दुसरे असे की समजा वांगचुक किंवा दिपके इ. लोकांच्या खऱ्या खोट्या पूर्वेतिहासात जाऊन आता ते करत असलेली मागणी चूक थोडीच ठरते. त्यामुळे अशा शिक्षणमंत्र्यावर अनेक परीक्षांतील चुकांची व त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या गंभीर परिणामांची जबाबदारी टाकून सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला तुमचा विरोध आहे का?


In reply to by स्वधर्म

Following widespread outrage over a handwritten "guess paper" leak, the central government has officially cancelled the May 3, 2026 NEET-UG examinationand implemented several sweeping legal, administrative, and logistical measures.


CBI Probe Ordered: The Ministry of Education handed over the comprehensive investigation to the Central Bureau of Investigation (CBI) to dismantle organized paper leak networks.Mass Arrests: Multiple crackdowns across several states—including Rajasthan, Haryana, and Maharashtra—have led to the arrest of key kingpins and suspects associated with the exam mafia.


Parliamentary Accountability: The Parliamentary Standing Committee on Education has strictly demanded written action-taken reports from both the National Testing Agency (NTA) and the CBSE regarding loopholes in examination execution and command failures.

Revised Exam Schedule and Candidate Relief

Nationwide Re-test: A fresh pan-India NEET-UG re-examination is officially scheduled for June 21, 2026.

No Extra Fee: Over 22 lakh registered medical aspirants can appear for the re-test without any additional registration fees.City Preference: To minimise candidate distress, Union Education Minister Dharmendra Pradhan announced that students are permitted to choose their preferred exam city for the re-test. Admit cards are being re-issued on the official NTA Portal.

Tightened Security Measures for the June 21 Re-test

Military Logistics: The government has roped in the Indian Air Force (IAF) to securely transport confidential question papers from printing presses directly to 18 key locations nationwide, eliminating transit leaks.Paper Setters Isolation: Subject matter experts and paper setters have been placed under strict communication blackouts and isolation in undisclosed locations without phone or internet access.

 Cyber Crackdown: The NTA and Ministry of Electronics and Information Technology are actively collaborating with tech giants (including Meta, Google, and Telegram) to instantly block channels attempting to fraudulently sell fake or simulated re-test question papers.

Long-term Structural Reforms End of Pen-and-Paper Format: The Ministry of Education announced a complete policy shift to eliminate physical paper transit vulnerabilities. Starting from 2027, NEET will permanently migrate to a Computer-Based Test (CBT) format with heavy digital encryption safeguards.

Radhakrishnan Committee Implementation: The government has committed to fully enforcing all structural and data security recommendations laid out by the high-level expert committee headed by former ISRO Chief Dr. K. Radhakrishnan.If you are an aspirant or parent looking to navigate these recent changes, let me know if you need help finding how to re-download your admit card, details on exam city center guidelines, or updates on the CBT transition protocol.

अजून काय काय करायला हवेय?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?


In reply to by सुबोध खरे

Parliamentary Standing Committee on Education याचे अध्यक्ष श्री दिग्विजय सिंह होते ते निवृत्त झाले त्यानंतर या समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे खासदार श्री मुकुल वासनिक हे आहेत. हि सर्व पक्षीय समिती आहे.   


In reply to by सुबोध खरे

Mr. Subodh Khare, your comment looks like a straight-up copy-paste from the government's PR manual. "दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो काय वेगळे करणार?"—are you actually listening to yourself? This exact line of thinking is why our education system is currently infested with 'वाळवी' (termites).

First of all, NTA and the Ministry scheduling a re-test and taking "no extra fee" is NOT a favor. विद्यार्थ्यांवर उपकार केलेत का यांनी? NTA च्या ढिसाळ कारभारामुळे आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे नाही. If they had dared to charge an extra fee after ruining the mental peace of 22 lakh students, जनतेने त्यांना उभ्या-उभ्या रस्त्यावरच जाब विचारला असता आणि चपलेने हाणलं असतं. It’s not some visionary masterstroke; it is the absolute bare minimum damage control to save their own faces.

Second, flaunting "CBI probes", "mass arrests", and "Air Force logistics" now? What were they doing after the 2024 disaster? Once bitten, twice shy नावाची काही गोष्ट असते की नाही? If the Ministry had actually fixed the loopholes and shown some spine back in 2024, students wouldn't have had to face this exact same trauma with even more intensity in 2026. You are basically clapping for the fire brigade after the minister intentionally left the gas on and let the house burn down... twice.

As for "अजून काय काय करायला हवेय?"— Accountability, Mr. Khare.

In any functional democracy, if a national-level exam fails spectacularly under your watch, destroying the years, confidence, and lives of the youth, you take moral responsibility and step down. राजीनामा देणं म्हणजे व्यवस्था सोडून पळ काढणं नसतं, तर 'माझ्या नेतृत्वाखाली हे भयंकर अपयश आलंय' हे उघडपणे मान्य करणं असतं. पण मंत्र्यांना खुर्चीचा मोह सुटत नाही आणि तुमच्यासारखे लोक त्यांची वकिली करायला मोकळे!

2027 मध्ये CBT (Computer-Based Test) आणून त्या २१ विद्यार्थ्यांचे गेलेले जीव आणि आमच्यासारख्या repeaters ची वाया गेलेली तरुणपणाची वर्षं परत आणून देणार आहात का तुम्ही?

Stop acting like a PR agent for a completely failed system. अंधभक्तीचा चष्मा काढा आणि वास्तवात जगा. It is absolutely embarrassing.

 

संपादित.  व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन

 


In reply to by अनिशासूत

Stop acting like a PR agent for a completely failed system. अंधभक्तीचा चष्मा काढा आणि वास्तवात जगा. It is absolutely embarrassing.

चाटूगिरीचा उत्तम नमुना आहात तुम्ही... माझा आयडी बॅन झाला तरी नवल वाटणार नाही मला

 

 

कुठला  चष्मा  घालायच त ज्याच त्यान ठरवू द्या आणी काय हो दुसर्‍यांना  सल्ले देताना तुम्ही पण तसेच वागतायत. 

एक आय डी बॅनर झाला तर दुसरा असेलच की....

 

एव्हढा पुळका आलाय तर जा जंतरमंतर वर. 


In reply to by कर्नलतपस्वी

काय आहे ना तपस्वी काका... चूुकीच घडताना दिसत असेल तर गप्प बसवत नाही मला...आणि तुम्हाला झोंबत असेल तर तो तुमचा प्रश्न! 

शेवटी तुकोबारायांनी म्हणलंच आहे...उपदेश किती करावा खळासी...नावडे त्यासी बरे काही😌


In reply to by अनिशासूत

विद ड्यू रिस्पेक्ट....

 

जसे तुम्ही एका बाजूची तळी उचलता तशी दुसरे दुसर्‍या बाजूची उचलतात. ज्यांची मते पटत नाहीत  किंवा आपल्या मताशी जुळत नाही म्हणून त्यानां अंधभक्त, चाटूकार अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे. 

 

राजकिय डिबेटस् कधीच  कनक्ल्युजीव्ह नसतात. ते कायम कन्फ्युजन वर आधारित असतात.

उपदेश किती करावा खळासी...नावडे त्यासी बरे काही

आता यात खळ कोण आणी निखळ कोण हे कोण ठरवणार......


In reply to by अनिशासूत

बा अनिशासुता,  एवढे वाघिणीचे दूध सांडवलेस, त्यापेक्षा  गूगलमामाकडून त्याचा मराठी तर्जुमा करून घ्यायचास. मिपा मराठी लेखनासाठी आहे ना ?


राम मंदिर लूट पकडली गेली.  त्याआधी असेच पद्मनाभ मंदिर उघडले होते.  तेव्हा Teflon coated PM म्हणाले होते की आपल्या देशात पुढील सात पिढ्या पुरेल एवढे धन उपलब्ध झाले आहे.. पुढे बरेच स्टंटबाजी झाली,  पक्ष फोडणे त्यासाठी यंत्रणेला खिशात घालून फिरणे अणि साध्या देश भिकेला लागला आहे.  राम मंदिर लूट . आता काय तर गेले तीन चार महिन्यांत येणारे वीज बील.  अनुक्रमे 14k, 9 k, 8.5k लेटेस्ट बील. आता बोला.  Teflon coat कधी तरी समोर येतील आणि जनतेच्या भावना समजून घेऊन पदच्युत होतील याची वाट पाहणारा,  एक साधक 


दिल्ली उच्च न्यायालयाने १५ जुलै २०२६ रोजी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेची (PIL) अत्यंत गंभीर दखल घेत केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे आणि तातडीने उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की, "सोनम वांगचुक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत, याचिकाकर्त्यांनी कोर्टात भीती व्यक्त केली की योग्य उपचार न मिळाल्यास वांगचुक अवघ्या दोन दिवसांत प्राण गमावू शकतात
सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी कोर्टात उपस्थित नसल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. हायकोर्टाने केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) आणि दिल्ली सरकारच्या स्टँडिंग काउन्सिल यांना नोटीस पाठवून तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
 कुमार सैनी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत वांगचुक यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची, तसेच त्यांचा जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय देखरेखीखाली त्यांना 'फोर्स फीडिंग' (जबरदस्तीने द्रव आहार आणि आवश्यक पोषक तत्वे) देण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांचा जीव वाचवणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे, असेही याचिकेत नमूद आहे.
गोबरयुगातलं नालायक सरकार असल्यामुळे यांना कोणाचीच काळजी नसते नाही. मतलबी धूर्त आणि सत्तेसाठी वाटेल ते करु असे मंद लोकांचे सरकार आहे असे व्यक्तिगत मत आहे, आन्दोलनातून मार्ग निघेल असे सरकार स्वत:हुन काही प्रयत्न करणार नाही.
-दिलीप बिरुटे
 
 

In reply to by गवि

आपलं प्रतिसाद अगदी योग्य आहे. धन्स पण दुसरा एक मुद्दा  ज्यात आपण म्हणता- 

''प्राणांतिक उपोषण हा मार्ग लोकशाही मार्ग आहे, असे म्हणताना याचा अर्थ तो कायदेशीर मार्ग आहे असा होत असेल तर ते मात्र चुकीचं आहे'' 

असं नाही. भारतीय संविधानाने नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये (उदा. रामलीला मैदान खटला) स्पष्ट केले आहे की, उपोषण हा निषेध नोंदवण्याचा एक वैध आणि घटनात्मक मार्ग आहे. पण, जर उपोषणकर्त्याची तब्येत अतिशय खालावली आणि त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर कलम २१जीवनाचा अधिकार अंतर्गत त्याच्या जीवाची रक्षा करणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी बनते. अशा वेळी न्यायालय किंवा प्रशासनाच्या आदेशाने वैद्यकीय पथकाद्वारे उपोषणकर्त्याला सक्तीने अन्न किंवा सलाईन दिले जाऊ शकते.  (Thanks टू गूगल)

सारांश प्राणांतिक उपोषण हा लोकशाहीने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी  दिलेला सनदशीर मार्ग आहे. अर्थात हे सगळं लोकशाही वगैरे असते असे मानना-यांसाठी असते हे नमूद करतो.

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी प्राणांतिक उपोषणाबद्दल म्हटले. ते बेकायदेशीर आहे. शिवाय ते कोण करते आहे यावर अवलंबून, ते अहिंसात्मक आणि शांततापूर्ण असू किंवा राहू शकत नाही. दुसऱ्या ऐवजी स्वतःचा जीव मागणी पूर्ण व्हावी म्हणून ओलीस ठेवणे म्हणजे कायदेशीर असे नव्हे. जर ती व्यक्ती लोकप्रिय असेल तर त्यांच्या आमरण उपोषणातून, विशेषतः काही घडल्यास प्रचंड हिंसक उद्रेक होऊ शकतो. मोर्चा किंवा मैदानावर धरणे याची तुलना आमरण उपोषणाशी करू नये. नकळत आपण कोणाच्यातरी स्वतःसाठी धोकादायक कृतीला उदात्त करतो. शिवाय सर्वच लोक सारासार विचाराने अशा मार्गांकडे येतीलच असे नाही. मनाच्या भडकलेल्या किंवा हळव्या स्थितीत केवळ प्रचंड प्रभावाखाली येऊन अनेक तरुणांनी जीव गमावले आहेत. आत्मदहन किंवा तत्सम उपाय ही याचीच एक खूप पुढची पायरी आहे.


In reply to by गवि

सोनम यांचे प्राण कोणाच्या मत प्रदर्शनाने वाचणार असतील तर त्यांच्या मागणीशी सहमती, पाठिंबा आणि त्यांच्या आत्मघातकी मार्गाला विरोध असाच आपला अप्रोच असला पाहिजे.


In reply to by गवि

सरकारला सोनम वांगचुंग यांचा जीव महत्वाचा नाही. सामान्य माणसं सरकारसाठी तसे महत्वाचे नाही. सरकारचा इगो सर्वात मोठा आहे असाच अहंकार शेतकरी आंदोलनवेळी देशाने पाहिला. सरकारने शेवटी शेपुट घातले पण शेतकरी आंदोलन मोडून काढ़ण्यासाठी सरकारने काय काय केलं ते देश विसरला नाही.

 

वीस तारखेला संसदेवर मोर्चा आहे, बघूया हे आंदोलन सरकार कसे हाताळते आणि युवकांच्या प्रश्नाला सरकार कसे न्याय देते ते पाहात राहू.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by गवि

सोनम यांचे प्राण कोणाच्या मत प्रदर्शनाने वाचणार असतील तर त्यांच्या मागणीशी सहमती, पाठिंबा आणि त्यांच्या आत्मघातकी मार्गाला विरोध असाच आपला अप्रोच असला पाहिजे.

 

गवि

सरकारने काय काय केले आहे हे मी वर लिहलेले आहे यापेक्षा जास्त काय करायला हवे आहे याबद्दल काही लिहिता येईल का?

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला भिऊन सरकारने "आता" त्यांचा राजीनामा घेतला तर सरकार "ब्लॅकमेल" ला घाबरते असा अत्यंत चुकीचा संदेश जनतेला जाऊ शकतो मग आपल्या कोणत्याही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी असे लोक कोणत्याही ठरला जाऊ शकतील.

मुळात हे आंदोलन वांगचुक यांचे नाहीच.

कॉकरोच पक्षा चा जाहीरनामा वाचलात तर अभिजित दिपके सारख्या भंपक माणसाने बाष्कळ असा जाहीरनामा लिहिलेला आहे. त्याचे सहज खंडन करता येईल.

त्यात वांगचुक यांचा संबंध काय?  त्यांनी स्वतःचे महत्तव वाढवण्यासाठी आंदोलनात उडी घेतली आहे. मृत्यूची विहीर सारख्या सर्कशीच्या खेळात त्यांनी उडी घेतली आणि दिपके आणि कंपनी त्यातून अलगद बाहेर पडली आहे.

या आंदोलनात नीट चे विद्यार्थी कुठेच नाहीत. त्यांना आपले करीयर कारायचे आहे.

( एके काळी मी  नीटची परीक्षा दोन वेळेस दिलेली आहे) 

माझा वैयक्तिक मत विचारलं तर वांगचूक याना उघडे पडण्याची गरज आहे.

आणि ते जर उपोषण करून स्वर्गवासी झाले तर त्यांचा एक पुतळा लेह मध्ये जरूर उभारा.

बाकी चालू द्या             


In reply to by सुबोध खरे

सरकारला वेठीला धरणे याबाबत अगदी योग्य बोललात. सरकारला पर्वा नाही हे खरेच. पण सरकारसाठी असे एखादी चांगली किंवा लोकप्रिय व्यक्ती आमरण उपोषणाला बसली की त्या व्यक्तीचा जीव वाचावा म्हणून काही निर्णय घेऊन तातडीने वचन देणे किंवा अंमलबजावणी करणे असे केल्याने एक अनिष्ट पायंडा (precedence) पडतो. स्वतःचा जीव ओलीस ठेवून मागण्या पूर्ण करून घेणे. आणि त्याहून वाईट. अगदी मरायला टेकले की मग आता जीव गेला तर काय घ्या, अशा तणावाखाली सरकारने मागणी मान्य करणे.. यामुळे कोणत्याही आंदोलन करू पाहणाऱ्या तरुणाईला संदेश जातो की अधिक अधिक क्लेश करून घ्या. हा आत्मघातकी मार्ग चिकाटीने मरेपर्यंत धरुन रहा. म्हणजे हमखास यश मिळेल. हे सर्व म्हणतोय त्याचा कोणत्याही आंदोलनाच्या मागणीच्या वैधतेशी संबंध नसून मार्गाशी आहे. स्वतःचा जीव घेण्यातले हौतात्म्य अनेक निराश तरुणांना जीव गमवायला कारणीभूत झालं आहे. अनिल अवचट यांचा एक लेख होता. आणखी काय करायला हवे होते हा तुमचा प्रश्न देखील रास्त आहे. पण आणखी काहीतरी करायला हवे होते, म्हणजे उदा राजीनामा.. असेच जर कोणाचे म्हणणे असेल तर ते तुमच्या माझ्या दृष्टीने चूक की बरोबर की अवास्तव यापेक्षा इथे त्यांचा जो हक्क आहे आपले म्हणणे मांडण्याचा त्याबद्दल मी म्हटले. मार्ग वैध नाही.


In reply to by गवि

सरकारला पर्वा नाही हे खरेच

 

वांगचुक यांच्या बद्दल पर्वा नाही असे आपले म्हणणे असेल तर ठीक.  

अन्यथा सरकारने केवळ कोणी आंदोलन करतो म्हणून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा असे झाले असते तर डिफेन्स मधील दलालांनी आंदोलन करून मनोहर पर्रीकर यांचा राजीनामा नक्की मागितला असता.  

बाकी सरकारने अजून काय करायला हवे होते याबद्दल कोणी उत्तर देताना दिसत नाही.  


In reply to by गवि

कधी काळी साधन शुचिता सांभाळण्यासाठी अवलंबला जाणारा उपोषणाचा मार्ग आता छुप्या दहशतवादाकडे झुकतो आहे. 

लोकशाही मार्गावर विश्वास असलेली व्यक्ती अतिरेकी सशस्त्र हल्ले करून  काय किंवा सुनियोजीत पद्धतीने उपोषणासारखा वरपांगी सोज्वळ दिसणारा देखावा उभा करून त्या आडून  ठराविक राजकीय पक्ष, व्यक्ती  किंवा समुदायाविरूद्ध दहशत माजवण्याचा प्रकार कधीच करणार नाही. सुदैवाने कित्येक वेळा अशांचा खरा 'अजेंडा' उघडकीला येतो,  त्यांना मिळणारा पाठिंबा ओसरतो आणि उपद्रवमूल्य देखील कमी होते. असो. 


In reply to by मूकवाचक

सुदैवाने कित्येक वेळा अशांचा खरा 'अजेंडा' उघडकीला येतो,  त्यांना मिळणारा पाठिंबा ओसरतो आणि उपद्रवमूल्य देखील कमी होते. असो. 

 

 

असं खरंच होतं का? उलट मोठ्या संख्येने सामान्य निराश जनतेला असे लोक नायक वाटू लागतात .. असे वाटते.


In reply to by गवि

सत्य यात मध्ये कुठे तरी आहे.

 

कारण असाच मार्ग जरांगे  पाटील वापरताना दिसतात.

अजून तरी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पुढे मान तुकवलेली आहे.

 

मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तरी इतर मागासवर्गीयात आरक्षण मिळणे  शक्य नाही     


In reply to by गवि

>> मी प्राणांतिक उपोषणाबद्दल म्हटले. ते बेकायदेशीर आहे. शिवाय ते कोण करते आहे यावर अवलंबून, ते अहिंसात्मक आणि शांततापूर्ण असू किंवा राहू शकत नाही. दुसऱ्या ऐवजी स्वतःचा जीव मागणी पूर्ण व्हावी म्हणून ओलीस ठेवणे म्हणजे कायदेशीर असे नव्हे.

हे एकदम पटले. शिवाय आपल्या मनासारखे व्हावे म्हणू आत्मक्लेष करणे हा पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह प्रकार आहे. कदाचित त्यामुळेच डॉ. आंबेडकर यांचा त्याला विरोध होता. परंतु प्राणांतिक उपोषणाचीही दखल जर सरकार घेत नसेल, तर शांततामय मार्गाने आंदोलन केल्याने सरकार दखल घेईल असे कसे म्हणता येईल? कुणीतरी कोर्टात जावे असे म्हटले आहे. कोर्ट कचेऱ्या या अपराध्याला शासन व्हावे यासाठी ठीक आहेत पण कोणी जबाबदारीच घेऊन राजीनामा देतच नसेल, तर न्यायालयात जाणे कितपत परिणामकारक ठरेल? न्यायालयात तारीख पे तारीख घेत बसणे हेच बहुतेक अन्यायग्रस्त लोकांच्या नशीबी येते. त्यामुळेच हा उपोषणाचा मार्ग निवडला असावा असे वाटते. उपोषणाच्या गांधीजींच्या मार्गात विरोधी पक्षाच्या सद्सद्विवेक बुध्दीवर विश्वास गृहित धरला जातो व त्याला आवाहन केले जाते, पण सत्ताधाऱ्यांकडे ती सद्सद्विवेक बुध्दी असल्याचे आत्तापर्यंत तरी दिसलेले नाही. 

मग शेवटी नाईलाजाने उद्रेक होईल असा उपोषणाचा मार्ग अवलंबला जातो की काय असे वाटते.


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या प्रतिसादात हा महत्वाचा भाग आहे: अशा वेळी न्यायालय किंवा प्रशासनाच्या आदेशाने वैद्यकीय पथकाद्वारे उपोषणकर्त्याला सक्तीने अन्न किंवा सलाईन दिले जाऊ शकते. या बाबतीत असहकार्य होत असते आणि सक्तीने किंवा बळाने किंवा अटक करून घेऊन जावे लागले की हिंसक वळण लागते. कार्यकर्ते, सपोर्टर मॉब हा तितका सुजाण आणि शांत नसतो.


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

For years, a carefully manufactured image was sold to the nation:

Sonam Wangchuk as the real-life Rancho from 3 Idiots - the poor Ladakhi boy who rose from nothing, rejected the broken system, and became a revolutionary innovator fighting for the common man.

That story is a lie.

The Rancho character in 3 Idiots was never based on Sonam Wangchuk. It was actually the other way around; Wangchuk’s public image is based on the film.
His entire public persona, the hero worship, and the “genius from the mountains” narrative were built on the back of *3 Idiots*. The movie turned him into a national icon. Without it, most of India wouldn’t even know his name.

The truth is far less cinematic.

Wangchuk was born into a politically influential family. His father, Sonam Wangyal, was a Congress MLA from Leh who later became a Cabinet Minister in the J&K government in 1975. When his father gained power, the family moved to Srinagar. This was not the life of a poor, downtrodden mountain boy struggling against all odds. This was access, connections, and political privilege from an early stage.

He did not study at an IIT.
He completed his B.Tech in Mechanical Engineering from the Regional Engineering College, Srinagar (now NIT Srinagar) in 1987, the same regional college that thousands of ordinary students attend. His admission there likely benefited from his father being a sitting Congress MLA and Minister at the time. Political family influence opened doors that truly poor students from remote areas rarely get.

He is not a scientist. He is a mechanical engineer by qualification who later became an environmental activist, often opposing development projects in Ladakh.

Despite all the hype around inventions like the Ice Stupa, zero patents are registered in his name. Not even one patent or one Research paper.

Yet this same privileged son of a Congress Minister is presented as the authentic voice of the voiceless poor. The same pattern is visible with others, for example, Abhijeet Dipke pursuing expensive liberal arts courses in fancy Boston colleges, or Saurav Das, the failed CLAT aspirant from rich, privileged South Delhi with zero real investment in on-ground public work. These are the people being pushed as the “representatives” of common, downtrodden Indians.

This is the real inconvenient truth:

A section of the elite and politically connected class has mastered the art of wearing the mask of the poor and the marginalised. They build cults around themselves using films, media, and selective narratives while hiding their actual backgrounds of power, privilege, and influence.

Sonam Wangchuk’s story is not one of rags to revolutionary. It is a story of how political family privilege was repackaged as grassroots rebellion.

The myth is exposed. The facts don’t lie.
C/P Rishi Bagree

संधीसाधू


In reply to by सुबोध खरे

शेतकरी आंदोलनावेळी शेतकरी कसे देशद्रोही आहेत, त्यांना  परदेशातुन कसा फंड येतो, कसे काजू बदाम खाऊन आंदोलन चालु आहे, शेतकरी कसे खलिस्तानवादी आहेत असे काय नी किती बदनामी त्या आंदोलनाची केली, तसाच वरील भाग वरच्या प्रतिसादात आहे. आयटीसेलवरुन अशी बदनामी आता या देशाला नवी नाही. गूगलवर शोधाशोध केली तर, वरील प्रतिसादाचे उत्तर मिळते.

 

एखाद्या व्यक्तीला कुटुंब आणि अथवा अशा काही पार्श्वभूमीवरुन त्याच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्षाला आणि समाजकार्याला 'खोटे' ठरवणे चुकीचे आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात उणे ३० अंश तापमानात राहून जे काम उभे केले आहे, ते कोणत्याही 'विशेषाधिकारा'मुळे नाही तर त्यांच्या प्रचंड इच्छाशक्ती आणि देशप्रेमामुळे शक्य झाले आहे. सोशल मीडियावरील अशा पोस्ट केवळ त्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आणि जनसामान्यांच्या आवाजाला कमकुवत करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, यांचं आता नवल वाटत नाही.

चालू ठेवा...

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजेंडा वीरांना तेवढा वेळ आणि बुद्धी असेल असं मला तरी वाटत नाही.... मिंधेपणाचा कळस आहेत 

winding up (at least  for this thread...) 


युपिए काळात तर 10 वर्षांत  20 हून जास्त पेपर फुटले होते. अनेक केंद्रात पुन्हा परीक्षा झाल्या. त्यावेळी कुणीही त्यागपत्र  मागितले नाही. यावेळी पूर्ण परीक्षा पुन्हा घेतली. पुढच्या वर्षापासून ऑनलाइन घेतली जाणार. जो पर्यन्त मोठे मोठे कोचिंग माफिया आहेत, पेपर फुटण्यापासून थांबविणे कठीण आहे,. बाकी घरात चोरी झाली म्हणून घर मालकाने घर सोडून जावे. हे विचित्र आहे ना. खरे कारण पुढच्या वर्षी पासून एनसीईआरटी चे नवे सिलेबस येणार. हे आहे. 

बाकी काकरोच आंदोलन पुर्णपणे भाडोत्री आंदोलन आहे.  आधी दोन कोटी नकली  फॉलोवर तैयार झाले. 50 कोटी लोकांच्या फेसबूक वर दर रोज  पोहचत यात निश्चित शेकडो कोटी खर्च झाले असतील. (माझे 400 फॉलोअर आहेत त्यात अधिकान्श नातेवाईक तरीही   सर्व वाममार्गी प्रोफेशनल आंदोलंजिवींची मदत घ्यावी लागत आहे.  अर्थात हे प्रोफेशनल  बिना पैसा हे काहीही करत नाही. सर्व जुने आंदोलंजीवी तिथे पोहचले आहे.  

 बाबा साहेब आंबेडक्रांनी 1949 संविधान सभेत उपोषण इत्यादींना संविधान विरोधी म्हंटले होते.  त्यांच्या दृष्टीने अश्या प्रकारे निवडलेली सरकारवर दबाव टाकणे त्यांचे दृष्टीने संविधान विरोधी कृती आहे.  याचा नकारात्मक परिणाम होईल.  आजपर्यंत उपोषण करणारे महात्मा गांधी ते अण्णा एक ही वर गेला  नाही.  सोनमला लद्दखचे मुख्यमंत्री बनवून द्या. ते उद्या उपोषण सोडून देतील.  बाकी एक व्यक्तीचे उपोषण एका मंत्रीचे त्यागपत्र. 100 उपोषण प्रधानमंत्रीचे त्यागपत्र.  असेच उपोषण करून प्रधानमंत्री निवडता येतील. हजारो कोटी खर्च करून निवडणूक घ्यायची गरज काय. 

संपादित 

कृपया  संदर्भहीन आरोप टाळावेत.

-मिपा व्यवस्थापन 

 


In reply to by विवेकपटाईत

>>>> एक देशद्रोहि माणूस जो चीनचा समर्थक आहे. विदेशांत देशविरोधी गरळ ओकतो. विदेशी चंदा घेऊन ज्या कामासाठी मिळाला आहे, तिथे खर्च करत नाही.  हिशोब दाखवायला तैयार नाही.     तो उपोषण करून निश्चित मरणार नाही. 20 तारखेला उपोषण तोडेल. 

=)) हा देशद्रोही माणूस भाजपचा समर्थक असता  किंवा भाजप मधे असता तर त्याला भारतरत्न मिळावे म्हणून अंधभक्त उपोषणाला बसले असते. =))

-दिलीप बिरुटे

 


In reply to by विवेकपटाईत

काँग्रेस खूप हलकट होती हे मान्य करून प्रमाण मानून २०१४ मधेच बोटाला शाई लावून मोदींना सत्ता दिली आहे. देतोच आहोत. आज २०२६ उगवले आहे, किती दिवस त्या काळात असे मग आज का बोलता असला सूर लावणार ? बदल कधी घडणार ? नवी शिक्षण नीती आणणारे हे सरकार खरेच इतके बोल्ड असेल तर मग ह्यांनी पेपर लिकेज् केसेस किमान macoca मधे चालवण्याची तरी तयारी दाखवावी की नाही ?


In reply to by वृषभ खोंडे

macoca लावण्यासाठी संघटित गुन्हेगारी सिद्ध व्ह्ययला लागेल. जोपर्यंत सी बी आय ची संपूर्ण चौकशी होऊन पुरेसा पुरावा मिळत नाही तोवर तसे केले तर गुन्हेगार जामिनावर सुटण्याची शक्यता जास्त असते. आणि मग परत तेच सोपस्कार करण्यात भरपूर कालापव्यय होईल.   

मोदी सरकार एवढे आंदोलन चालू असेल तर पेपरफुटीचं प्रकरण धसास लावेपर्यंत गप्प बसेल असे वाटत नाही.    

 

 


In reply to by सुबोध खरे

हम्म लीगल पॉईंट तर आहे, चला त्याला आपण जमेल तसे परिशीलन करू. पेपर फुटीत ऑर्गनाईझ पद्धतीने क्राइम झाला आहे का ? तर ढळढळीत हो ! - एन टी ए ने पेपर सेट करायला नेमलेला कुलकर्णी मास्तर - कोचिंग क्लास चालवणारा मोटेगावकर - बायोलॉजी शिकवणारी मॉडर्न कॉलेज मधली प्रोफेश्वरीण बाई - ह्या सगळ्यांना एका समान सूत्रात गोवण्यात सहभाग असणारी ती ब्युटी पार्लर चालवणारी बाई - आंतरराज्यीय सहभाग आणि आरोपी मला वाटते इतके सुस्पष्ट आहे तर मकोका संबंधी विचार करायला (गेलाबाजार मिपावर) काहीच हरकत नसावी. सरकारचे intention ही केस धसास लावणे असलीच तर ते काय विचार करतात अन् कृती करतात ते आपण पाहतोय/ पाहू की. तोवर मिपावर चर्चेचे गुऱ्हाळ !


संविधान सभेत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की घटनात्मक मार्ग उपलब्ध असताना सत्याग्रह-असहकारासारखे मार्ग "Grammar of Anarchy" ठरतील


In reply to by विवेकपटाईत

सत्याग्रह ह्या गांधी च्या मूळ संकल्पनेत एक नैतिक शक्ती होती. अरुण शॉरी ह्यांनी अतिशय खोलांत जाऊन त्यावर लेखन केले आहे. गांधी चा सत्याग्रह आणि हे आधुनिक ढोंगी लोकांचे ब्लॅकमेल ह्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे.

चंपारण्य च्या सत्याग्रहात गांधीजी नी लिहिले होते कि सत्याग्रह ह्यांत सर्वांविषयी प्रेम भावना असते. सत्याग्रह हा द्वेषाने केला जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे "आग्रह" ज्या गोष्टीचा आहे ती गोष्ट अत्यंत सोपी, सर्वांत बेसिक असली पाहिजे. अतिअधिकतावादी मागण्या करायच्या नाहीत.  चंपारण्य च्या सत्याग्रहांत गांधीजींनी सत्याग्रहाचे प्लेबुक लिहिले.

१. सर्वप्रथम आपण ज्या विषयावर सत्याग्रह करीत आहोत त्याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. दुसऱ्याची बाजू समजून घ्यायचा सखोल आणि सहानुभूतीने प्रयत्न केला पाहिजे. (पूर्वपक्ष). गांधीजींनी स्वतः शेकडो शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्यांचा अभ्यास केला आणि पुरावे गोळा केले. 
२. आपल्या सत्याग्रहासाठी  दुसर्यांना वेठीस धरायचे नाही. काम सोडल्यास शेतकऱ्यांची चूल कशी चालेल ? मुलांना अन्न कुठून येईल ह्यावर गांधीजींनी भर दिला. 
३. मागणी अतिशय सोपी, नैतिकतेस धरून आणि विरोधकांना बरोबर घेऊन करायची. ब्रिटिश सरकारने ब्रिटिश जमीनदारांच्या दबावाखाली गांधीजी ना जिल्हा सोडून देण्याचा आदेश दिला जो गांधीजींनी धुडकावून लावला आणि आपण तुरुंगांत जायला तयार आहोत असे सांगितले. 
४. सत्याग्रहाच्या आधी इतर सर्व मार्ग आपण पहिले पाहिजेत. वाटाघाटी, कोर्ट कचेरी इत्यादी. 
५. विरोधकांचे मत परिवर्तन हा सत्याग्रहाचा उद्धेश आहे. ब्लॅकमेल (भयोपदान) नाही.

अण्णा असो वा वांगचुक हि मंडळी ब्लॅकमेलर आहेत. 


गोबी सरकार विषयी विशेष प्रेम नसले तरी हे झुरळवादी (अत्यंत समर्पक शब्द आहे) काही योग्य वाटत नाहीत. वॉशिंग्टन ला सध्या भारताविरुद्ध अढी आहे आणि विदेशी डावे ह्यांना सुद्धा गोबी आवडत नाही. ह्या सर्वांच्या मंथनातून हि झुरळे आणि वांगचुक सारखे आधुनिक अण्णा छाप ढोंगी आणि दांभिक लोक निर्माण झाले आहेत. गोबी सरकार भ्रष्ट, अकार्यक्षम आणि अत्यंत अहंकारी असले तरी ह्या लोकांच्या हाती सत्ता येणे भारतासाठी धोक्याचे आहे. वॉशिंग्टन चे प्लेबुक नेपाळ आणि बांगलादेश मध्ये अत्यंत यशस्वी झाले आहे पण भारतांत ह्याला तोंडघशी पाडणे देश हिताचे आहे !

 


In reply to by साहना

अवांतर : 

 

वॉशिंग्टनच्या प्लेबुकावरनं या व्यंगचित्राची आठवण झाली :

दडपशाहीचा पुतळा

-गा.पै.


जोपर्यंत मीडिया यांना कव्हर करणार नाहीत तोपर्यंत यांच्या परिस्थितीचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही.. aaniआणी मीडिया साध्या काय काय करत आहेत ते सर्वश्रुत आहेच 


आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीत केंद्र सरकारने सोनम वांगचुंग यांना मदतीची तयारी दर्शवल्यानंतर हायकोर्टाने म्हटलं की, कोणत्याही नागरिकाचा जीव महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे. त्यामुळे नागरिकाला वाचवण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्य बिघडण्यापासून थांबवण्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता असेल तर ते करावेत.

 

केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करण्याची आणि गरज पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. केंद्र सरकारच्या उत्तरानंतर हायकोर्टानं जनहित याचिका निकाली काढली आहे.

 

-दिलीप बिरुटे

 


केंद्र सरकारने न्यायालयात सोनम वांगचुक यांची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी चालू असून आवश्यक ते सर्व उपचार करण्याचे आश्वासन दिले 


सुरुवातीच्या तीन दिवस जगातील सर्व विदेशी मिडिया 2.2 कोटी फॉलोवर्सची वाट पाहत होता. आज ही भारतीय मिडिया बीबीसी  आणि मोठ्या संख्येने यूुूट्यूबर   तिथे जास्त आहे.  कोणी समोस्याच्या स्वाद सांगतो आहे तर कोणी छोल्यांच्या स्वाद सांगतोय.  खाद्य जत्रा सूुरू आहे.

सर्व वाम मार्गी  आईसा  इत्यादी प्रकाश राज, पाटकर, स्वरा भास्कर कुणाल कामरा इत्यादी मोठी लिस्ट. केजरी इत्यादी ही. फक्त जनता नाही. 


In reply to by विवेकपटाईत

हे  सगळे मंदिरातील पैसे खाणारे असतील थोडक्यात ना खाऊंगा ना खाने दूंगाचे भक्त.  लवाड लांडगे.


In reply to by आग्या१९९०

दक्षिण भारताीयl गैर भाजपा सरकार हजारो कोटी मंदिराचे दरवर्षी खातात. कोणी काहीही बोलत नाही. हिंदूंच्या पैसा दुसऱ्या कामासाठी वापरला जातो. राम मंदिरातील चोरी झाली चोर पकडला गेले. 90% पैसा ही सापडला. चोर कोण भाजपा की गैर भाजप सरकार. 


In reply to by विवेकपटाईत

Tamil Nadu’s Hindu Religious and Charitable Endowments (HR&CE) Department administers over 44,000 temples. Temple revenues—generated via hundi (donations), land rent, and gold monetization—are legally mandated to fund religious activities, maintenance, and devotee welfare. 

 

The government recently cancelled ₹246 crore of temple-funded commercial projects to keep revenue strictly focused on temple preservation.

 

भगवा केलेला भाग - तिथला कायदा आहे तो, आणि तिथल्या जनतेला मंजूर आहे एकंदरीत, इतका सलत असेल तर कृपया तामिळनाडूला जाऊन (तमिळ शिकून) तिथली एखादी मिपा असेल तर त्यावर किंवा आंदोलन करून हा कायदा रद्द करण्यासाठी प्रबोधन इत्यादी करण्याचे मनावर घ्यावे. 

 

लाल केलेला भाग - ढळढळीत दिसते आहे, की मंदिरांनी चालवलेले व्यावसायिक प्रकल्प थांबवून २४६ कोटी महसूल फक्त मंदिरांच्या जतनासाठी वापरण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे ! कुठं चंदा चोरी अन् कुठं पुरातन मंदिरे जतन करायला २४६ कोटी महसूल सुरक्षित करणे !


In reply to by कांदा लिंबू

त्यातील बरेचशा लोकांनी पूर्वी कसाब, अफजल गुरू आणि याकूब मेमन असल्या लोकांच्या फाशीचा विरोध केला असला तरी आश्चर्य वाटू नये. असले प्रकार करणाऱ्यांनाच भारतात विचारवंत, मान्यवर वगैरे म्हणायची पध्दत आहे. याकूब मेमनची फाशी थांबावी म्हणून मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय उघडायला लावणारा प्रशांत भूषण तर उघड झुरळांचे समर्थन करत आहे.    

 

   


In reply to by विवेकपटाईत

आजच्या गोबरयुगात जर तुम्ही डोळे उघडे ठेवून सत्य बोलत किंवा लिहीत असाल, तर तुम्ही सर्वात मोठे 'देशद्रोही' आहात, कारण सत्य बोलणे हा आता अक्षम्य गुन्हा आणि राजद्रोहाचे लक्षण मानले जाते असे वाटते

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना जर एखाद्या वृत्तपत्राने सरकारच्या चुकांवर बोट ठेवून टीका करण्याचे धाडस केले, तर ते थेट देशद्रोहाच्या श्रेणीत जमा होते; कारण सध्या फक्त 'हो ला हो' मिळवणे म्हणजेच देशभक्ती मानली जाते.

 इतकेच काय, पण अयोध्येतील राम मंदिर पावसामुळे नव्हे तर, कथित अपहारामुळे गळत होते  का, असा साधा प्रश्न विचारण्याची हिंमत केली, किंवा बद्रीनाथमधील कथित आर्थिक अपहाराबाबत प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्हाला थेट देशद्रोही घोषित केले जाण्याची शक्यता आहे. 

महागाई, बेरोजगारी किंवा खराब रस्त्यांवरून जाब विचारणारा सामान्य नागरिक, स्वतःची बुद्धी गहाण न ठेवता स्वतंत्रपणे विचार करणारे विचारवंत, आणि व्यवस्थेत सकारात्मक बदल व्हावा अशी प्रामाणिक इच्छा बाळगणारे लोकही या यादीत आता सहज स्थान मिळवू शकतात; कारण आजकाल श्रद्धा, व्यवस्था किंवा सत्ताधाऱ्यांवर कुठलाही प्रश्न विचारणे म्हणजे थेट देशद्रोहाच्या उंबरठ्यावर उभे राहण्यासारखेच झाले आहे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या गोबरयुगात जर तुम्ही डोळे उघडे ठेवून सत्य बोलत किंवा लिहीत असाल, तर तुम्ही सर्वात मोठे 'देशद्रोही' आहात, कारण सत्य बोलणे हा आता अक्षम्य गुन्हा आणि राजद्रोहाचे लक्षण मानले जाते असे वाटते. 

 

तुमचे बकरीवादी पहा काय करताहेत - 

बकरी सौंदर्य स्पर्धा!

https://www.facebook.com/100064798598192/posts/1514768750693064/?app=fbl 

 


In reply to by वृषभ खोंडे

The minister in-charge of the negotiations was especially awful, alleged Makihara.


In reply to by वृषभ खोंडे

ताज्या घडामोडी कुठं सापडेनात म्हणून इथेच.

 

इथे आहेत - 

https://www.misalpav.com/discuss/53776 

 


In reply to by वृषभ खोंडे

बु्ट्रेसाठी सुरेश प्रभूंसारखा अभ्यासू व खरंच कामाचा माणूस हवा होता. फ्रेंच गाडी त्यांच्या निकषात बसंत होती पण जपानी नव्हती. कुठे कसली माशी शिंकली कोणास ठाऊक. पण सुरेश प्रभूंना हटवलं गेल. का ते माहीत नाही. आणि त्यांच्या जागी अश्विनीकुमार वैष्णव आले. 

-गा.पै.


In reply to by वृषभ खोंडे

टिंगु आयडी

जपानच्या ‘त्या’ मंत्र्यांचे आरोप भारताने फेटाळले; MEAने बुलेट ट्रेन कराराची सत्यता सांगितली  https://www.lokmat.com/national/india-mea-spokesperson-randhir-jaiswal-…


In reply to by सुस्वरूप

Screenshot-20260718-165131-2Screenshot-20260718-165554

 

 

पहिल्या चित्रात तू दिलेली बातमी त्यात सांगितले आहे की पहिले पॅकेज सुरत - बिलीमोरा असेल अंतर किती ? मात्र ५० किलोमीटर, आणि दुसऱ्या चित्रात बघ सुरत बिलीमोरा अंतर ! कशाला उगाच काहीही बोलत बसायचे ? आता हे ५० किलोमीटर सुरू करणार अन् जपानी लोकांना सांगणार की आम्ही बुलेट ट्रेन सुरू केली ! जय हो 


सुरेख धागा आहे... तरुणाईबद्दल लेख असेल अन् मी बोलणार नाही असं होणार नाहीच... afterall I'm also one of them na... माझा तरी सोनम वांगचूक काकांना पूर्ण पाठिंबा आहे... हा आता काही लोग येतील प्रतिक्रिया द्यायला आणि मला दूषणं पण देतील, तुम्ही हिंदुद्रोही आहात, देशाची काळजी नाही तुम्हाला, तुमचं डोकं धुवून टाकलंय (literal brainwash!😂)... पण नाही जे डोळ्यांना दिसतंय त्यावरूनच बोलतोय की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देश किंवा देशाचं भविष्य असलेल्या तरुणाईचं काहीच सोयरसुतक नाहीय... त्यांना तर फक्त बोचा टेकवायला खुर्ची हवीय.
पण या खुर्चीच्या मोहापायी देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ज्या पद्धतीने पोखरलं जातंय, ती खरंच या व्यवस्थेला लागलेली 'वाळवी' आहे. सर्वोच्च न्यायालयाचे एक माननीय न्यायाधीश जेव्हा बेरोजगार तरुण आणि आंदोलनकर्त्यांचा उल्लेख 'झुरळ' (कॉकरोच) म्हणून करतात, तेव्हाच समजतं की एसी केबिनमध्ये बसलेल्या लोकांना रस्त्यावरच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या संघर्षाची किती चाड आहे. पण अभिजीत दिपके यांनी याच अपमानाचा 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) नावाचं व्यंगात्मक आंदोलन उभारून जो प्रतिवाद केलाय, त्याला दाद द्यावीच लागेल! जेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यमं आणि सरकार डोळे मिटून बसतात, तेव्हा तरुणाईलाच असा आपला आवाज बुलंद करावा लागतो.
आज जंतरमंतरवर जे चित्र आहे, ते अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. एकीकडे तरुण आपल्या हक्कासाठी, NEET पेपरफुटीच्या चक्रातून सुटण्यासाठी रस्त्यावर ऊन-पावसात बसलेत आणि दुसरीकडे सोनम वांगचूक काकांसारखा हिरा त्यांच्या पाठीशी उभा राहून आज १७ दिवस आमरण उपोषण करतोय! आज त्यांची प्रकृती खालावत चाललीय, तरीही सरकार ढिम्म आहे. उलट काही सोशल मीडियावरील 'फुकटज्ञानी' स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्यासाठी वांगचूक काकांच्या उपोषणाची फालतू तुलना करत सुटलेत. अभ्यास वाढवायचा सल्ला देणाऱ्या अशा लोकांचा स्वतःचा इतिहास आणि चालू घडामोडींचा अभ्यास किती शून्य आहे, हे आपण पाहतोच आहोत.
"आजचे तरुण काहीच करत नाहीत, बोलत नाहीत" असं म्हणणाऱ्यांना जंतरमंतरवरची ही गर्दी आणि सोशल मीडियावरील हा आक्रोश चपराक आहे. आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही, आम्हाला फक्त आमच्या भविष्याची आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेची हमी हवीय, ही साधी मागणी समजून घ्यायला सरकारला वेळ का नसावा?
डॉ. दिलीप बिरुटे सरांनी अगदी योग्य वेळी हा धागा सुरू केला आहे. हा लढा फक्त दिल्लीपुरता मर्यादित न राहता देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. शेवटी 'व्यक्ती' म्हणून आमची पात्रता अजून निर्माण व्हायची असेलही, पण या देशाचे नागरिक आणि विद्यार्थी म्हणून व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार आमच्यातल्या प्रत्येक 'झुरळाला' नक्कीच आहे!


In reply to by आनन्दा

  • Google वर एका सर्चमध्ये मिळणारा व्हिडिओ इथे मागून विषयांतर कशाला करताय? जर का तेवढं पायाभूत ज्ञान आपल्याला नसेल तर समजू शकतो.😉

जंतर मंतरवर नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमार्फत सोनम वांगचुक यांना स्टेजवरून उचलून इस्पितळात नेण्यात आलं आहे, अशी बातमी येत  आहे. मा.न्यायालयाचा हवाला देत पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळ सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत. उपोषणाचा कार्यक्रम संपल्यात जमा आहे.

 

तपशीलवार निवांत लिहितो.

 

-दिलीप बिरुटे


प्राकृतिक चिकित्सा केंद्रात 21 दिवस उपाशी ठेवण्यासाठी किमान 50- 60चा खर्च येतो. वजन अर्धा किलो कमी होते. सनम चे वजन आठ किलो कमी झाले आणि त्यांनी इशारा तिला 21 दिवस पूर्ण होतात आहे. आता सरकारी हॉस्पिटलच्या व्हीआयपी रूममध्ये सर्व टेस्ट करून घेतील. 


In reply to by विवेकपटाईत

करून बघितले आहे का ? की उगाच शाहजोग पणाचा आव आणून ट्विटरवर वाचलेले इकडे येऊन ओकण्याचा कार्यक्रम लावला आहेत ?


मूळ मुद्दा-

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.

त्यांनी राजीनामा दिल्यास सोनम वांगचुक आपले उपोषण मागे घेतील का?

बरं उपोषण मागे घेतल्यामुळे मूळ प्रश्न कसा सुटणार आहे? याबद्दल कुणी काही सांगेल का?

मूळ प्रश्न ज्या समितीने लक्ष घालायचे  त्या सर्वपक्षीय संसदीय समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे आहेत.    

पेपर फुटला कसा याबद्दल कोणी तरुण नक्की माहिती देईल का?

सरकारला वेठीस धरून एखादी मागणी मान्य करून घेऊतली तर म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो अशी स्थिती झाल्यास टायची जबादारी कोण घेणार आहे?

बाकी एखाद्या फडतूस सदस्याने  विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही. कारण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत.

झुरळ पार्टीचा जाहीरनामा बद्दल काहीच बोलायचे नाहीये किंवा अभिजित दिपके ची लायकी काय याबद्दल बोलणार नाहीत.

बाकी या जाहीरनाम्याबद्दल मी केलेली उहापोह आता इथे देतो आहे.

The Manifesto.
Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.

हा अत्यंत भंपक आणि विचार न करता सवंग लोकप्रियतेसाठी काढलेला आहे हे स्पष्ट आहे

01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.

Justice Ranjan Gogoi: Nominated in 2020 shortly after his retirement in November 2019.Justice Ranganath Misra: The former Chief Justice of India, who was elected to the Rajya Sabha in 1998 as a member of the Indian National Congress (INC).Justice Baharul Islam: A former Supreme Court judge who resigned from the bench in 1983 and was later elected to the Rajya Sabha on a Congress ticket.

हि तीन उदाहरणे सोडली तर न्यायधीशांनी संसदेत प्रवेश केलेला नाही.

02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

कुठे तरी कनिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना जबाबदार धरून त्यांना अजामीनपात्र दहशवादी कायद्याखाली अटक करायची हि मागणी करताना कोणताही विचार केलेला नाही.

हे म्हणजे एखाद्या पोलीस कॉन्टेबलने केलेल्या मारहाणीसाठी पोलीस महासंचालकांना अजामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक करण्याइतकी विधिनिषेधशून्य मागणी आहे.

The Unlawful Activities (Prevention) Act (UAPA), enacted in 1967, is India's primary anti-terror legislation. It aims to prevent and penalize unlawful activities, terrorist acts, and the financing of terrorism that threaten the sovereignty and integrity of India.

देशाच्या एकता आणि अखण्डते ला धोका देणारी दहशतवादी कृती यात आपल्याला कुठे दिसते?

03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.

स्त्रियांसाठी सरसकट ५० टक्के आरक्षण देणे हा एक विचार आहे पण सत्ताधारी पक्षाच्या निवडलेल्या सदस्यात जर तेवढ्या स्त्रियाच नसतील तर मंत्रिपदे कशी द्यायची हा विचार ना करता सवंग लोकप्रियतेसाठी केलेली मागणी आहे. असे झाल्यास राबरीदेवी सारख्या रबर स्टॅम्प संसद सदस्या तयार होतील याने बाबू आणि नोकरशाहीच जास्त बळकट होईल.

04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.

२०१२ मध्ये अंबानी यांनी न्यूज १८ विकत घेतले तो वर सर्व प्रसार माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष होती असे आपले म्हणणे आहे का?
(अडानी यांनी पहिले प्रसार माध्यम २०२२ मध्ये विकत घेतले)

गोदी मीडिया कोणती हे कुणी ठरवायचे? केजरीवाल यांनी प्रमाणित केलेल्या सर्वात प्रामाणिक अशा तपास अधिकाऱ्यांनी कि ऋन्मेष ने?

आणि सर्व प्रसार माध्यमांच्या बँकेच्या खात्यांची चौकशी कुणी करायची सी बी आय ईडी का आयकर खात्याने? पण मग ते परत म्हणणार हे सर्व तर सरकारी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत.

आणि सामान्य माणसाला मुळात साधी चौकशी कशी करायची याचे मूलभूत ज्ञानही नसते. मग सायबर गुन्हे तर सोडाच आर्थिक गुन्हे यांचा तपास कसा करायचा?
इतकी सर्व यंत्रणा असली तरी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास किती किचकट असतो हे तेलगी हर्षद मेहता केतन पारेख केसेस मध्ये पाहिले नाही का?
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केलेल्या तपासात सुद्धा २ जी घोटाळ्यात सज्जड पुरावा मिळू शकला नाही

05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.

The Indian Government enacted the Anti-Defection Law in 1985. दोन तृतीयांश पेक्षा कमी सदस्य पक्ष सोडून गेले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते. तेंव्हाच्या सरकारने काहीतरी विचार करूनच कायदा केला असेल ना?

पक्षांतर्गत हुकूमशाही किंवा पक्ष नेतृत्व मूलभूत तत्वांशी हरताळ फासून काम करत असेल तर निवडून गेलेल्या सदस्यांनी काय फक्त मम म्हणायचे का? मग सकृतदर्शनी लोकशाही असली तरी पक्षांतर्गत हुकूमशाहीच चालेल.

अशा साठी २० वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालणे म्हणजे भुरट्या चोरीसाठी फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे.

मुळात श्री मोदी यांचा या कॉकरोच वक्तव्याशी कोणताही संबंध नाही.

केवळ त्यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी एका परदेशी उपट सुंभाने काढलेला हा भंपक उपक्रम आहे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणायचा भंपक आणि हास्यास्पद प्रयत्न आहे       
 

 


पेपर फुटला कसा याबद्दल कोणी तरुण नक्की माहिती देईल का?

सर ह्यावर तर CBI किंवा/ आणि पर्यायाने सरकारच उत्तर देणार ना ? फेरपरीक्षा घेतली म्हणजे आधीच्या परीक्षेचा पेपर लीक झाला हे सरकारला मान्य आहे. त्या अनुषंगाने सरकारने तपास CBI कडे सोपवून पण बरेच दिवस झाले, त्यामुळे आता 

 

- तपास कुठल्या टप्प्यात आहे ? 

- चार्जशीट फाईल झाली का ? झाली नसेल तर का नाही ? 

- चार्जशीट फाईल करायला वाढीव मुदत मागितली आहे का (कोर्टात) ? 

- तपासाच्या अंती काय चित्र दिसते आहे ? 

 

- ही सगळी माहिती तर सरकार/ CBI देणार ना ? ह्यात तरुणांनी काय माहिती द्यायची अपेक्षा आहे ?


In reply to by वृषभ खोंडे

तपास कुठल्या टप्प्यात आहे ? 

आणि 

तपासाच्या अंती काय चित्र दिसते आहे? 

या गोष्टी सरकारने आंदोलन कर्त्यांना विश्वासात घेऊन सांगायला हव्या होत्या.

परंतु श्री सोनम वांगचुक सोडले तरी एकही माणूस विश्वासार्ह दिसत नाही.

बाकी वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला बरेच उपटसुम्भ  तेथे आलेले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.

कदाचित ज्या तर्हेने हे आंदोलन सुरु झाले आहे त्यामुळे सरकारने सुरुवातीलाच ताठर भूमिका घेतली आहे असे दिसते.

सोनम वांगचुक यांनी सुरुवातीला NEP बद्दल श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाबद्दल प्रशंसोद्गार काढलेले होते  आणि अचानक त्यांनी आंदोलनात उडी घेऊन उ टर्न केल्यामुळे असे झाले असावे.

 

      


In reply to by सुबोध खरे

बाकी वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला बरेच उपटसुम्भ  तेथे आलेले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.

 

 

हे तुमचे आमचे वैयक्तिक, सामूहिक मत असू शकते, ते चूक का बरोबर मी त्यात पडणार नाही तूर्तास. पण एकंदरीत सरकार असे बोलून/ वागून चालू शकत नाही. लोकशाही म्हणले की सरकारला प्रत्येक आंदोलन नीट हाताळावेच लागते सरकार ते हाताळते असे वाटते.  


सोनम वांगचूक ह्यांना दिल्ली पोलीसांनी उचलून सफदरजंग इस्पितळात दाखल केले असे कळले.

ह्या उचलबांगडीला झाकण्यासाठी पांढरे बेडशीटस आणण्याचे दिल्ली पोलिसांना सुचले पण ऐम्ब्युलन्स आणली तर त्यात एक स्ट्रेचर आणण्याचे मात्र सुचले नाही.

एका पेशंटला आणण्यासाठीच आले होते ना?

अफाट अचाट आहेत खरोखर.


In reply to by कर्नलतपस्वी

चोराच्या मनात चांदणे...आता काविळ झाली असेल तर ढवळा पण पिवळाच दिसेल की ओ...काका!


In reply to by कर्नलतपस्वी

काय इमानासोबत अक्कल पण गहाण टाकली की काय?

तुम्हाला काय वेगळे चॅनेल आणि शूटिंग दाखवतात की काय? का खरी झापडं मिळतात दाये बाये लावायला?

वरच्या माझ्या प्रतिसादातले काय खोटे आणि किती धादांत खोटे ते सिध्द करुन दाखवा अन्यथा...

तुम्ही सुचवलेला मार्ग आहेच तुमच्यासाठी. जावा तिकडंच....


In reply to by अभ्या..

त्याना स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते, हे स्पष्टपणे दिसून येते .... cjp  website

 

https://cjpmember.in/blogs/sonam-wangchuk-shifted-to-safdarjung-hospital-cjp-reacts

 

 


In reply to by कोण

त्याना स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते, हे स्पष्टपणे दिसून येते ....

 

धन्यवाद. 

 


In reply to by अभ्या..

काय इमानासोबत अक्कल पण गहाण टाकली की काय?

तुम्हाला काय वेगळे चॅनेल आणि शूटिंग दाखवतात की काय? का खरी झापडं मिळतात दाये बाये लावायला?

वरच्या माझ्या प्रतिसादातले काय खोटे आणि किती धादांत खोटे ते सिध्द करुन दाखवा अन्यथा...

तुम्ही सुचवलेला मार्ग आहेच तुमच्यासाठी. जावा तिकडंच....

तुम्ही सुचवलेला मार्ग आहेच तुमच्यासाठी. जावा तिकडंच....

 

उचलली जीभ लावली टाळ्याला. 

जर्मनीत राहून परभणीची चिंता सोडा. आमचे आम्ही बघून घेऊ.

थोडी शिल्लाक असेल तर......

 

जाऊ द्यात, तुमच्या सारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बद्दल काय बोलायचे.


In reply to by कर्नलतपस्वी

जर्मनीत राहून परभणीची चिंता सोडा. आमचे आम्ही बघून घेऊ.

ते दिसतच आहे, कसे बघून घेता आहेत ते. म्हणून तर चिंता.

परभणी आमचीच आहे.  पासपोर्टावर चार सिंह आहेत अजून, एक दिसत नाही मागचा ते नशीब समजा.

देशभक्तीचा ठेका काही फक्त वर्दीचा नसतो. तेंव्हा जाऊच द्या. 

अर्ध्या हळकुंडाने किती हळद खेळायची ते आमचे आम्ही बघू.

 


In reply to by अभ्या..

मला आधी वाटले रेल्वे मध्ल्या बेड शीट उचलुन आणल्या व ह्याना गुंडाळुन लदाख ला रैल्वे बसव्तिल


आता येथेच पहा.  

साधा झुरळांच्या आंदोलन बद्दल धागा आहे त्यात नेहमीच्या वाममार्गी लोकांनी शेतकरी आंदोलन, मंदिरातील पैसे चोरी बुलेट ट्रेन गोबर युग राममंदिरात गळती  सारखे असंबद्ध  मुद्दे आणून केवळ आपला मोदी द्वेष व्यक्त केला आहे.

झुरळ पक्षाच्या जाहीरनाम्या बद्दल एकानेही मत मांडलेले नाही किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय अधिक नक्की काय करायला हवे आहे याबद्दल  लिहिलेले नाही.    

कारण सज्जड असा मुद्दा त्यांना सापडत नाहीये.

श्री सोनम वांगचुक  यांनी स्वतः श्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल प्रशंसा केली होती.

https://x.com/Wangchuk66/status/1636408767976988672?lang=en  

मग अचानक असं काय झालं?

पेपर फुटला हि वाईट गोष्ट आहेच पण भारतात सायबर फ्रॉड किती होतात आणि त्याचे फटके किती लोकांना बसतात 
.
Indians lost an estimated ₹22,495 crore (over $2.6 billion) to cybercrimes in a recent year, with investment scams accounting for more than 75% of the total stolen money. यात सुद्धा माणसांची आयुष्यभराची कमाई एका क्षणात नाहीशी होते. असं नाही कि केवळ तरुणच यात अडकलेले आहेत.    
नीटची प्रश्नपत्रिका फुटली हा पण एक सायबर क्राईमच आहे.  
Yes, the NEET paper leak involves significant cybercrime elements. While the initial leak can be an insider job, the subsequent circulation of stolen questions on messaging apps, digital extortion, and the sale of fake leaked papers on social media are actively investigated by cyber authorities.

त्याचा तपस चालू आहे आणि ज्या तरुणांना याचा फटका बसला आहे त्यांची पुनरपरीक्षाही  घेतलेली आहे.    

The Central Bureau of Investigation (CBI) has arrested 13 private individuals, including key conspirators and a Chemistry lecturer involved in NTA's paper-setting panel, after discovering that leaked question papers were sold for vast sums. The government also ordered a re-examination, cancelled previous scores, and withheld the results of involved candidates.
The Indian Government and investigative agencies have taken several concrete actions:
CBI Arrests: The CBI has apprehended 13 individuals, including the alleged kingpin P.V. Kulkarni (a Chemistry lecturer on the NTA's paper-setting panel) who leaked question papers during special coaching classes.
Cancellation and Re-test: The initial May 3 NEET-UG examination was officially cancelled, and a nationwide re-examination was successfully conducted on June 21.Strict Penalties on Accused: The National Testing Agency (NTA) has withheld the final scores of identified accused, such as Yash Yadav, despite a court allowing them to take the June 21 retest.

Evidence Recovery: CBI officials have seized multiple digital devices containing 132 handwritten questions, 111 of which matched the NTA master question sets.

Parliamentary Accountability: Top officials from the Union Education Ministry, NTA, and CBI have briefed parliamentary panels and courts to detail the conspiracy and aggressively oppose bail pleas for the arrested suspects.


In reply to by सुबोध खरे

मग एकदा सोनम वांगचूक ह्यांनी फक्त प्रशंसा करायला भेट दिलेली ना? मंत्री महोदयांनी ती भेट दिली ना?

आता एकदा मंत्री महोदयांनी त्यांची भेट घेऊन तुम्ही दिलेला सगळा निबंध वाचून दाखवायला काय हरकत होती? वांगचुक ह्यांनी नाकारली होती काय भेट?

नुसतीच प्रशंसा काय ऐकायची? करावी चर्चा कधीतरी. नाही निघाला काही मार्ग तर तेही आगामी निबंधात मेन्शन करता आले असते.


मला वाटतं की शासनास सोनमबुवांना उचलून इस्पितळात हलवायचा होता. पण थेट तसं करता येत नव्हतं. म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचा जीव वाचवायची कारवाई करतो आहोत, असं दाखवलेलं आहे. एकंदरीत शासन लबाड आहे. म्हणतात ना खटासी असावे खट ....!

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

थ्रेड्स वर एक  पत्र फिर्तेय त्यात सोनम ने स्वत च्या मर्जीने आपण होस्पित्ल जात आह  असे लिहिलेय

खरे खोटे माहीत नाही


In reply to by सुस्वरूप

सुस्वरूप,

 

तुम्ही दिलेल्या दुव्यावर जो कागद दाखवलाय त्यात सोनम वांगचुक या नावाखाली " मै अपने मर्जीसे अपना Medical Exam करा हूँ । " असं वाक्य दिसतं. मात्र त्यात तारीख 13/07/26 अशी दिसते आहे. यावरनं ही वैद्यकीय चाचणी सुमारे चारपाच दिवस आधीची दिसते आहे. शिवाय हा कागद लोहिया इस्पितळाचा आहे, तर सोनम यांना सफदरजंग इस्पितळात भरती केले आहे. त्यामुळे सोनमबुवा आपणहून गेले हे मानणे अवघड आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

बरोबर

पण खोटे पत्र बनवणारा एव्ड्या मोठ्या चुका नाही करणार

असे  हौउ शकते के लेटर आधीच दिले व ४ दिव्सने  कार्यवाही झाली कारण म्याटर मधे पोलिस वगिरे लागनार

तसेच एक  इस्पिताळ ला लेटेर दिले ते दुसरिकडे  चालेल

 

पण मुळ दुवा दिलाच आहे 


देश झोपेत असताना काल पांढ-या कपड्या आडून लोकशाहीची तिरडी उचलण्यात आली. सध्या नीट परीक्षेच्या पेपरफूटीच्या घोळामुळे अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. परीक्षा पद्धतीतला घोळ संपता संपत नाही. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे, काल आंदोलनाच्या एकविसाव्या दिवशी लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली. आदरणीय मा. न्यायालय यांनी सोनम वांगचुंग यांच्या आरोग्याची काळजी घ्या असे सांगितले दिल्ली पोलिसांनी काळजीसाठी व्यवस्थित नियोजन करुन सोनम वांगचुंग यांना दवाखान्यात बळजबरीने जमा केले, असे वाटत आहे. दिल्लीचं आंदोलन हाताबाहेर जात असल्याचे वाटत असल्यामुळे आंदोलन गुंडाळण्यासाठी अशी कार्यवाही केली असल्याची शंका व्यक्त होत आहेत.  मात्र आंदोलन अजून तीव्र होत जाणार असे वाटत आहे. 

जंतर-मंतर'वर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी ज्या नाट्यमय पद्धतीने आंदोलनस्थळावरून हटवले. ही कारवाई अत्यंत गुप्तपणे आणि पूर्वनियोजित पद्धतीने पार पडल्याचे विविध माध्यमांच्या बातम्यांमधून दिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सुरक्षा कडक असल्याचे सांगून शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजता दिल्ली पोलिसांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात बोलावले गेले. वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवले जाणार असून, ही कारवाई अवघ्या ३० सेकंदात पूर्ण करायची असल्याचे माहिती पोलिसांना दिली गेल्याचा दावा सूत्रांनी केला. ( संदर्भ लोकसत्ता ) 

​कारवाईपूर्वी जंतर-मंतर परिसरात मोबाईल नेटवर्क जॅमर बसवण्यात आले. सकाळी सुमारे साडेसहा वाजता आंदोलनाच्या मंचाभोवती पांढरा पडदा उभारण्यात आला. साध्या वेशातील पोलिसांनी मंचावर येत वांगचुक यांच्याभोवती कडे केले. पोलीस कारवाई करत असल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी विरोध केला, मात्र त्यांना बाजूला करत पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेतले व लगेच त्यांना रुग्णवाहिकेतून सफदरजंग रुग्णालयात नेले. वांगचुक २८ जूनपासून उपोषण करत होते.


बाय द वे, नीटचा निकाल काल लागला निकालातला गोंधळ अजूनही संपलेला दिसत नाही. वृत्तपत्रीय बातम्या नुसार पेपरफूटीनंतर, आता  गुणांचा घोटाळा समोर येताना दिसत आहे.  निकालात गंभीर चुका दिसत आहे. आता  पालक पुन्हा न्यायालयात दाद मागतील, प्रवेश होण्यास विद्यार्थ्यांना डीसेंबर उजाडणार  असे दिसत आहे. 

-दिलीप बिरुटे 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देश झोपेत असताना काल पांढ-या कपड्या आडून लोकशाहीची तिरडी उचलण्यात आली.

 

अरेरे! म्हणजे त्यांचे निधन झाले की काय? त्यांना (तुमच्या लिखाणावर विसंबून) भावपूर्ण श्रद्धांजली.

 

 

 


लोकहो,

 

भाऊ तोरसेकारांनी यापूर्वी झालेल्या अशाच एका उपोषणाचे कथा चर्चिली आहे. इरोम शर्मिला चानू असं या मणिपुरी युवतीचं नाव आहे. तिच्यासंबंधी ( इंग्रजी ) माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Irom_Sharmila_Chanu

 

भाऊ तोरसेकरांचं चलचित्र ( १८ मिनिटे ) : https://www.youtube.com/watch?v=fyCBGNRm7NQ

 

शासन सोनमबुवांना फुटक्या कवडीइतकीही किंमत का देत नाही हे जाणून घ्यायचं असेल तर उपरोक्त चलचित्रं पहावं. तेव्हढा वेळ नसल्यास इथे सारांश सांगतो. त्याचं काय आहे की असं उपोषण करून कोणी मरंत नसतो. द्रवान्न व खारपाणी ( = सलाईन ) लावून माणसं दशकानुदशके जगवली गेली आहेत. शर्मिला चानू २००० ते २०१६ अशी सुमारे १६ वर्षं अर्धवपोषण करीत होती. वाजपेयी व मनमोहन सरकारे येऊन गेली. तिचा उद्देश सैन्यास दिलेले खास अधिकार रहित करायचा होता. ही मागणी मान्य केली तर ईशान्य भारत उर्वरित भारतापासून छानपैकी तुटून वेगळा झाला असता. त्यामुळे वरीलपैकी कोणीही सरकार झुकलं नाही. २०१४ साली मोदी सरकार आलं तेही झुकलं नाही. शेवटी तिने उपोषण मागे घेतलं आणि निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तिच्यात तिचा सुपडा साफ झाला. सोनमबुवांची मतशक्ती तितकीच आहे. म्हणून शासन त्यांना किंमत देत नाही.

 

बाकी, सोनमबुवांना उपाशी ठेऊन स्वत: त्यांच्यासमोर खादाडी करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय म्हणावं बरं? या कृत्यामुळे लोकशाहीची थट्टाबिट्टा उडवली गेली आहे का? की कसल्याश्या प्रदर्शनात खाण्याचे स्टॉल लागतात तशा या प्रदर्शनात खादाडीच्या टपऱ्या लागल्या आहेत? तसं असेल तर प्रदर्शन कसलं आहे?

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

इरॉम शर्मिलाने २०१७ मधील मणिपूर विधानसभा निवडणुकीत तब्बल ७० मते घेतली होती. तिने निवडणुक लढवायचा निर्णय घेतल्यानंतर श्री.रा.रा.केजरीवालांनी तिला पाठिंबा दिला होता तेव्हाच तिच्याविषयी इन जनरल सहानुभूती असली तरी ती हरावी असेच वाटायला लागले होते. तिचे नुसते डिपॉझिटच जप्त झाले नाही तर तीन आकडी मतेही मिळवू शकली नाही यामुळे समाधान वाटले. 

 

सोमन वांगचुक किती मते घेतील यापेक्षा किती मते फिरवतील हा प्रश्न विचारायला हवा. बरेच लोक असे आहेत (इथेही आहेतच) की ते सोनम हे बुजगावणे नसून दुसरे कोणते बुजगावणे उपोषणाला बसविले असते, किंवा कोणालाही उपोषणाला बसविले नसते किंवा मुळात नीटचा पेपर फुटला नसता तरीही विरोधातच मत देणार. अशांचा काही फरक पडत नाही. ज्यांनी अन्यथा समर्थनार्थ मते दिली असती ते या उपोषणामुळे विरोधात मते देतील अशांचा आकडा किती हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. 

वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घातलेला घोळ हा नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे. एन.टी.ए ने घातलेली अनागोंदी अगदीच अक्षम्य आहे. भाजप आणि मोदींची मोठी व्होटबॅंक त्यामुळे प्रभावित होऊ शकेल. त्या प्रकाराचे कोणीच समर्थन करू नये. पण झुरळांनी एक मोठी चूक केल्याने फिरलेल्या मतांचा हा आकडा अन्यथा असता त्यापेक्षा बराच कमी असेल असे मला वाटते. हे सगळे आंदोलन केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दलच मर्यादीत ठेवले असते तर या आंदोलनाला खूप जास्त समर्थन मिळू शकले असते. पण त्यात अरूंधती रॉय सारखी नालायक बाई तिथे आली, बस नाम रहेगा अल्लाका, हिंदू देवतांची खिल्ली उडविणारे लोक तिथे आले आणि तिथेही त्यांनी तेच प्रकार कले, सीताका नाम लेकर नीताके पतीके लिये वगैरे प्रकार झाले हे सगळे बघून तुकडे तुकडे गॅंग मधूनमधून वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या मार्गाने वळवळ करत असते त्यातलाच हा प्रकार आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी त्यांना काहीही घेणेदेणे नाही हे सूज्ञ लोकांना नक्कीच समजते.  

 

बाकी, सोनमबुवांना उपाशी ठेऊन स्वत: त्यांच्यासमोर खादाडी करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय म्हणावं बरं? या कृत्यामुळे लोकशाहीची थट्टाबिट्टा उडवली गेली आहे का? की कसल्याश्या प्रदर्शनात खाण्याचे स्टॉल लागतात तशा या प्रदर्शनात खादाडीच्या टपऱ्या लागल्या आहेत? तसं असेल तर प्रदर्शन कसलं आहे?

अण्णांच्या उपोषणाच्या वेळेस काही वेगळे चालू होते का? तेच तर चालू होते. मलाही वाटते आता यावेळेस दिल्लीत पाहिजे होतो. मी पण तिथे पिझ्झा हादडायला जाऊन आलो असतो 😀


एकेकाळी भारताचे पंतप्रधान एपीजे अब्दुल कलाम ही एक मुस्लिम व्यक्ती होती असेही एका झुरळाचे (किंवा झुरळीणीचे) म्हणणे आहे! 

https://www.facebook.com/share/v/19BrHnmbi1/

 


बोस्टन इथल्या अल्बर्ट आइनस्टाइन इन्स्टिटयूट मधून फंडिंग आले आहे का ?


देश झोपेत असताना काल पांढ-या कपड्या आडून लोकशाहीची तिरडी उचलण्यात आली.>>>

अस वाटत  बऱ्याच लोकांना सोनम सोनम वांगचुंग मरावा वाटत होता. सरकार ऐकत नाही आणि उपोषणाचा वीसावा दिवस असेल तर त्यानं उपोषण सोडणेच योग्य होते. कमीत कमी त्याच्या समर्थकांनी तरी तसा प्रयत्न करायला पाहिजे होते. चुकून मेला असता तर त्याच भांडवल मात्र केलं असतं.

 

अण्णांच्या बबतीत पण हेच, ह्या वयात अण्णा आंदोलन करत नाहीत म्हणून पण त्यांच्यावर टीका करणारे भरपूर आहेत.


सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यामुळे मोदी सरकारविरोधी रविवारी संताप उमटला.
जंतरमंतरवर अलोट गर्दी झाली.  शेतकरी आंदोलनानंतर दिल्लीत इतका  जबरदस्त माहौल पहिला नसल्याची दिल्लीकरांची प्रतिक्रिया तितकीच बोलकी होती.. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्या नंतर हे आंदोलन रविवारी शिंगोला पोहोचले. आता सगळे लक्ष आज होणा-या सोमवारच्या संसदेवरील मोर्चाकडे लागले आहे.


नीट परीक्षेमधील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर २० जुन रोजी सुरू झालेले हे आंदोलन रविवारी आता मोदी सरकारविरोधात रूपांतरित झाल्याचे मानले जात आहे. 

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सीजेपी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारचा मोर्चा फक्त प्रधानांच्या विरोधात नव्हे तर मोदींच्या विरोधातही आहे, असे आन्दोलकांकडून म्हटले जात आहे.


1.  जंतरमंतरवरील  (सीजेईपी) आंदोलनाला प्रतिसाद वाढत आहे. देशाभरातील तरुण मोठ्या संख्यने येथे दाखल होत आहेत.


2.  देशाभरातील वृत्तवाहिन्यांनी मात्र या आंदोलनाला विशेष दखल घेतलेली नाही. सोनम वांगचुक यांना रूग्णालयात नेल्यानंतर काही प्रमाणात वृत्तवाहिन्यांनी वार्त्तांकन केले. मात्र या आंदोलनाविषयी त्यांना सूतक आहे.

3. सध्या  यूट्यूब वाहिन्यांवर 'सीजेईपी'च्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात अपडेट मिळत आहेत.


सरकारच्या वतीने सफदरजंग रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घ्यावी आणि संसदेच्या अधिवेशनात शिक्षणातीतल उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे. असे झाल्यास वांगचुक उपोषण सोडतील; अन्यथा ते उपोषण सुरूच ठेवतील, अशी माहिती त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिली. ( माहिती सोर्स वृत्तपत्रे आणि यूट्यूब )

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 

 


प्रस्तावित संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, संसदेकडे काढण्यात येणाऱ्या कोणत्याही मोर्चा, रॅली किंवा मोठ्या जमावाला परवानगी देण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, संसद अधिवेशन सुरू असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या आदेशामुळे संबंधित भागात परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शने किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.  ( संदर्भ - यूट्यूब आणि वृत्तपत्रीय  बातम्या) 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्ली पोलिसांच्या ओफिशीयल फेस बूक पेज ल लोक  कमेंट मधे अक्लेचे तारे तोडत आहेत  कि भारतात कुठे पण  शांति पुर्वक मोर्चा काढता येतो


जंतरमंतरवर लाखोच्या संखेने सहभागी झालेल्या आणि  युवक आपल्या मागणीसाठी आंदोलन करीत संसदेवर निघालेल्या मोर्चावर   लाठीचार्ज झाल्याच्या बातम्या आज काही वाहिन्यांवर पाहण्यात आल्या. सरकारने आपल्या शिष्टमण्डलाबरोबर युवकांशी चर्चा करण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने चालवला आहे असे दिसते.

आज लोकसभेचं कामकाज होऊ शकले नाही तिकडेही गदारोळ झाला आणि राज्यसभेतही काँग्रेसचे खर्गे यांनी याबददल सरकारला जाब विचारला त्यावरुनही गोंधळ झाला.

 

बाकी नीटच्या गुणांचा महागोंधळ अजूनही सुरुच आहे असे दिसते. चालू द्या.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by Bhakti

भारताच्या सिस्टीम खूप रिजिड आहेत, iron frame म्हणतात ते उगाच नाही भारतीय नोकरशाहीला ! . (कौतुकाने इत्यादी नाही पण एक प्लेन फॅक्ट म्हणून सांगतोय)

 

शिवाय,

 

जे पी नड्डाना भेटून सौरव दास व इतर प्रतिनिधी मंडळाने आपली मागणी असणारे पत्र त्यांना सुपूर्द केले अशीही बातमी आत्ताच बघितली 

IMG-20260720-WA0022

In reply to by Bhakti

>>>इतक्या दिवसांत राजीनामा द्यायला पहिजे होता पण !!

खरं आहे पण सरकारचा इगो त्याचं काय करायचं ?


आता भविष्यात नीट घोटाळ्याबाबत जे काय निर्णय व्हायचे ते होतील पण आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या क्रूर पद्धतीने मारहाण केली ती भयंकर होती. माध्यमात जरी येत नसले तरी, यूट्यूब फेसबुक आणि विद्यार्थ्यांनी टाकलेले व्हिडीयोत ते सर्व कौर्य दिसतं.

अनपढ़ लोक व्यवस्थेत असल्यामुळे आंदोलने कशी  हाताळावी यांचं ज्ञान नाही, शेतकरी आंदोलन असेच दडपशाही करुन दाबण्याचा प्रयत्न केला. आंदोलन ताणले आणि आंदोलक दबत नाही हे पाहुन कायदे मागे घेतले. आताही  शिक्षणाचं होत असलेले नुकसान यांना काय कळणार पण जे शिक्षणाविषयी जागरूक आहेत ते आणि  इतर मूलं कुठून कुठून या आंदोलनात सहभागी झालेले होते, किती तरी विद्यार्थी मारहाणीमुळे जायबंदी झाले असतील. सर्व निषेधार्ह आहे.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या आंदोलनातील तरुण ह्यांचा नीट परीक्षेशी काहीही संबंध नाही , हे सगळे फुकट खादाडी करणारे आहेत. आज फुकट मिळणारे दंडुके खायला गर्दी करत आहेत.


In reply to by आग्या१९९०

सहमत. 

जसे शेतकरी आंदोलनात शेतकरी नव्हते तसेच ह्या आंदोलनात विद्यार्थी नाहीत. जे आहेत ते हौसे, गवसे व नवसे ह्या प्रकारात येतात.

खरे विद्यार्थी परीक्षा देउन पुढच्या तयारीला लागले सुद्धा. 

 


In reply to by आग्या१९९०

सगळे युवक परदेशातून येऊन इकडे आंदोलन करीत आहेत त्यांना परदेशातून फंड येतो, काजू बदाम पिस्ते खाऊन ते आंदोलन करीत आहेत, एवढं पेरलं की आपल्या सरकारचं काम झालं. =))

 

-दिलीप बिरुटे


ते आंदोलन वगैरे सगळं ठीक आहे, माझा एक साधा प्रश्न आहे - हिंदुत्ववादी असल्याचा दावा करून, हिंदूंची मते मिळून प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली तरीही अजून एखाद्या आंदोलनामध्ये कुणीतरी येतो आणि प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपशब्द वापरण्याची हिंमत करतो आणि अजूनही त्याच्यावर काही कार्यवाही होत नाही याची जबाबदारी कोणाची? दीपकेंची का मोदींची? 

 

मोगु मोरू दोघांकडून उत्तराची  अपेक्षा आहे.


In reply to by कांदा लिंबू

ज्याने  बोटाला धरून मंदिरात आणले त्याचीच जबाबदारी. हाणा त्यांना 


In reply to by कांदा लिंबू

भारताचा प्रोब्लेम हा आहे की भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे बरीच बंधने येतात. बाकी कुणाल कामरा हा ईसम "बालीश बहु .." ह्या प्रकारातला येतो. त्याला माहीत आहे की आर एस एस / हिंदु धर्म वगेरे वर बाता मारल्या तर फार काही होत नाही. सहिष्णु आहेत लोक. तेच तो ईतर धर्मा विषयी बोलत नाही तिथे लगेच बेअदबी / सर तन से जुदा वगेरे वगेरे बाता होतात. एकदा कुठेतरी त्याला हा प्रश्न विचारला होता " की बाबा रे, तु हिंदु धर्मा बद्दल ईतका बोलतो तेच तु ईतर धर्मा बद्दल का बोलत नाही?"  तर ह्या कामरा ने "तो त्यांच्या धर्मिक मान्यतेचा भाग आहे, त्यावर मी काही बोलु ईच्छीत नाही" असे बोलुन पायात शेपुट घालुन चड्डी ओली केली होती. 

 

बाकी जे लोक त्याच्या तद्दन फालतु जोक का हशा आणी टाळ्या मारत होते ते कामरा ला कुणी धोपटवले असते तर लगेच बांगड्या फोडुन रडायला सुरु झाले असते. वर मग समस्त फुरोगामी नवीन बांगड्या भरुन आले असते तिथे मातम करायला. 


In reply to by सुक्या

भारताचा प्रोब्लेम हा आहे की - 
खराब हवा-पाणी-रस्ते, प्रदूषण, शिक्षणाचा बट्ट्याबोळ हे एवढं सगळं अक्षरश: जळत असतानाही इथे लोकांना हिंदूधर्म वगैरे एवढंच सुचतं.

हसावं की रडावं कळत नाही.


 


In reply to by भृशुंडी

खराब हवा-पाणी-रस्ते, प्रदूषण, शिक्षणाचा बट्ट्याबोळ हे एवढं सगळं अक्षरश: जळत असतानाही इथे लोकांना हिंदूधर्म वगैरे एवढंच सुचतं. 

सहमत आहे. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना तिथे येऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणे असे काम समाजकंटक लोकच करू शकतात नाही का?

हसावं की रडावं कळत नाही. 

हा हसण्याचा किंवा रडण्याचा विषय नाही. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना तिथे येऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणे व आंदोलनाला भलतेच वळण देणे असे करणाऱ्या माणसाला तिथल्या तिथे बदडून काढले पाहिजे.

 


In reply to by कांदा लिंबू

एक तर तुम्ही 
१- मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जाताय  [ उगाच रामचंद्राचा अपमान वगैरे इथे आणून दिशाभूल]
२- तुम्हाला खरंच हा मुद्दा "मूळ विषयापेक्शा"  मोठा वाटतो आहे.

पहिला पर्याय असेल तर काय बोलणार? झोपलेल्याचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही.

दुसरा असेल तर माझा पास. तुमच्यापरीने महत्त्वाचा विषय तुम्ही मांडत राहा. 


In reply to by भृशुंडी

वोके. आता गोलपोष्ट बदलु नका.  हे आंदोलन सुरु झाले ते नीट चा पेपर फुटला म्हणुन. विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन सुरु झाले. आता हे पेपर कुणी फोडले तर ज्या "गुरुवर्यांवर" हा पेपर बनवण्यासाठी विश्वास ठेवला त्यांनीच शेण खाल्ले. ह्या आंदोलनात त्यांचा कुणी निषेध केला. त्यात एक कोचिंग क्लासवाला पण आहे. किती जण त्याच्या कोचिंग क्लासबाहेर जाउन घोषणा देउन आले? नाही ना. त्याचे कोचिंग क्लास तसेच चालु राहतील. आपलेच लोक तिथे आपले पाल्य पाठवतील. 

आता येउ या तुमच्या मुद्याकडे.

खाली दिलेल्या घोषणा व त्यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या ह्या आंदोलनात कसा आहे ते सांगा. 

०. धर्मेन्द्र प्रधान राजीनामा.

१. कलम ३७० रद्द करा.

२. LGBTQ वर काहीतरी मागनी होती.

३. उमर खालीद ला सोडा. 

४. मनुवाद से आझादी / ब्राहमण्वाद से आझादी. (कप्पाळ)

ज्यावर तुमचा आक्षेप आहे तो राम / भारतमाता वगेरे मुद्दा मी वगळला आहे.  अजुन बरेच आहे आता ईतकेच. 

 

 


In reply to by सुक्या

हे सगळं दिपकेला विचारा की कोणी...

मला तर दीपकेचे तर खरच कौतुक वाटतं, परदेशातल भरलेले ताट सोडून तो इथे लढतोय. कोणी म्हणेल त्याला फन्डिग आहे.मला जरी अमाप फन्डिग दिले असते तरी मी असा प्रकार केला नसता.

पण तुम्ही दिलेल्या मुद्द्यावर विचार करता. आन्दोलनाची अवस्था हौसे नवसे गौसे यांची जत्रा होऊ नये असेही वाटते.

पण अशा मुद्द्यावर जर जेन जी बोलत असेल तर चूक आहे. त्यांना राष्ट्रप्रेम हवे.माझ्य घरातील जेन जी,अल्फा यांची नास्तिकतेकडे होणारी वाटचाल पाहता, हे मुद्दे येतील असे वाटले नव्हते. माझ्या घरातल्या पिढीला केवळ सगळ व्यवस्थित पाहिजे आहे.

जातीद्वेष, धर्मद्वेष या पुढच्या पिढीने तरी धरून पुढे येऊ नये 🙏

 


In reply to by Bhakti

माझ्या घरातल्या पिढीला केवळ सगळ व्यवस्थित पाहिजे आहे.

जातीद्वेष, धर्मद्वेष या पुढच्या पिढीने तरी धरून पुढे येऊ नये 

 +१

सध्याची तरुण पिढी खूप हुशार आहे त्यांना हे करायला वेळ  नाही.  त्यांना देशातच योग्य संधी मिळाल्यास  भारतासारखा प्रगत देश नसेल जगात


In reply to by Bhakti

परदेशातल भरलेले ताट सोडून तो इथे लढतोय.

आपल्या भाबडेपणाबद्दल सहानुभूती

 

Abhijeet Dipke was in the United States studying for his Master's degree at Boston University and job hunting.

Abhijeet Dipke is a 30-year-old Indian political communication strategist and founder of the CJP.

He is known for his work in digital political messaging, narrative building, and online campaign strategy.

Dipke completed his undergraduate degree in journalism in Pune before moving to the United States for higher education.

He recently graduated from Boston University with a two-year master’s degree in Public Relations.

Between 2020 and 2023, he worked with Aam Aadmi Party and was involved in the party’s social media and election campaign operations.

https://www.hindustantimes.com/trending/who-is-abhijeet-dipke-the-boston-educated-founder-of-cockroach-janata-party-101779346291274.html.

 

वय वर्षे ३०. भारतात पत्रकारितेचा अभयसक्रम पूर्ण केल्यावर बोस्टन ला २ वर्षाचा master’s degree in Public Relations. हा अभ्यासक्रम केला. सध्याच्या अमेरिकेच्या स्थितीत अशा अभ्यासक्रमाला कोण नोकरी देणार होतं? विशेषतः राजकारणात भाग घेतलेल्याला.  

are you politically involved? याला काय उत्तर देणार? वर त्याचे सगळे जालावरील अकाउंट तपासले असता अमेरिकेत कोण नोकरी देणार होतं  

१७ ते ३० या १३ वर्षात ४ + २ वर्षे शिक्षण  बाकी ७ वर्षांचा हिशेब लावा.  
 
त्याचा अभ्यासक्रम संपला आता तेथे नोकरी मिळत नसेल तर माणूस काय करेल?

तेवढ्यात त्याला हि संधी दिसली. मनीश सिसोदिया यांचे पाठबळ होतेच.

मग काय आले. मुळात कॉकरोच या वक्तव्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, ते वक्तव्य सरन्यायाधीशांचे होते.

पण चान्स पे डान्स चालू आहे       

 

 


In reply to by सुबोध खरे

😂😂काहीपण लॉजिक!

दिपकेने जसे काय तुम्हाला ही जॉब बाबत आपबीती सांगितली अशाप्रकारे फेकताय तुम्ही..... चालू द्या!

आंदोलनात ज्या मुलीला खुप लागलाय ती राहुरीतली दिल्लीतली mbbs चे शिक्षण घेणारी आहे. कोणी बँकर, कोणी इंजिनियर कोणी वकील सगळे कोवळे पण शिकलेली मुलं अशाच कोण्या दीपकेवर विश्वास ठेवतील असं वाटत तुम्हांला???

 


In reply to by सुबोध खरे

Abhijeet Dipke was in the United States studying for his Master's degree at Boston University and job hunting. 

 

बाकी, आपले हेतू सिद्ध करून घेण्यासाठी असे दिपक्यांसारखे हस्तक समाजकारणाचा बुरखा पांघरवून भारतात पेरायचे डाव्या इकोसिस्टमचे कौशल्य उजवी फळी कधी साध्य करू शकेल असे वाटत नाही. संघाला 100 वर्ष झाली पण तरीही अशी "पावर उनकी है पर सिस्टम हमारा है" टाइप मजबूत इकोसिस्टम ते अजूनही तयार करू शकले नाही.


In reply to by कांदा लिंबू

स्वातंत्र् युद्धात  सुद्धा अनेक नेते परदेशात शिकले पण जॉब करत राहिले असते तर ते भारताला लाभले असते का???

नाही.

प्रॉब्लेम हा आहे की,धर्म धरतांना बाकीचे मुद्दे गौण ठरवणे हा आहे.आधीच्य लोकांनिही बाकीच्या मुद्यावर सपोर्ट केला हे विसरू नका.

आणि जेन जी तर अजिबात कर्मकांड न मारणारी आहे आणि त्यांसाठी धर्माची व्याख्या कर्मकाण्ड अशी बनविण्यात अधिक शक्ती वापरली. जी त्यांना अजिबात कळणार /मान्य नाही.

आता रात्रीत कसा काय आधुनिक मसीहा उभा करणार???

विवेकानंद घडवायच्या ऐवजी कोणते नेते घडवले गेले... याचा उहापोह करा.


In reply to by Bhakti

परदेशात शिकलेले स्वातंत्र्य सैनिक स्वयंप्रेरणेने किंवा एखाद्या दिव्य, उदात्त आदर्शाच्या प्रभावाखाली मायदेशी येऊन देशप्रेमापोटी काही कार्य करायला प्रवृत्त झालेले होते. तसेच हे नेते असतील तर त्यांना त्या पंगतीत बसवण्यात काही गैर नाही. पण फंडीग देऊन कुणीतरी अज्ञात शक्तीने पाठवलेले हे 'एजंट' असतील तर त्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना एकाच तागडीत तोलणे अपमानास्पद ठरेल. असो.


In reply to by सुबोध खरे

काय हो डॉ खरे साहेब. अमेरिकेत असणे म्हणजेच लाईफ बन गई, सोन्याचे ताट वाढलेले.. इत्यादि असते आताशा. 

 

अमेरिकेत कॉन्फरन्ससाठी जायला किंवा ऑनसाईट जायला व्हिसा मिळाला तरी आता अमेरिकेत सेटल्ड असेच म्हणायचे असते. 

 

बदला बघू तुमची जुनाट मते. ;-)


In reply to by कांदा लिंबू

ऊहापोह हा शब्द मला अशासाठी आवडतो की भरपूर खोबरे पेरलेले गरमागरम वाफाळते पोहे त्या शब्दाने डोळ्यासमोर येतात. त्यात कांदा लिंबू साथीला असल्यास दुधात साखर किंवा कांदेपोह्यांत लिंबू..

😁


In reply to by गवि

अस्मादिकाच्या सदस्यनामाचा एका मिपाकरला उपयुक्त अर्थाने उपयोग करता आला याचे समाधान आहे.


हल्ली मिपावर एक-दोन वेळा उहापोह हा शब्द वाचण्यात आला होता. त्यासंदर्भात -

उहापोह करणे याचा अर्थ विचार करणे असा नसून सांगोपांग चर्चा करणे असा आहे. केवळ एकजण उहापोह करू शकत नाही, किमान दोनजण लागतात. 

 


In reply to by गवि

दडपे पोहे की नागपूरचे तर्री पोहे की आमचे कांदा पोहे????

मला उहापोह "हे"च आवडतात 😅


In reply to by गवि

आम्ही पंचाच नेसत होतो. पण गांधीना बॅरिस्टर होऊन वकीलीत महिना तीनशे रुपये मिळू लागले होते ( शिक्षकाचा पगार एक रुपया होता) तेव्हा त्यांनी पंचा नेसला.  हे आठवलं. 

बाकी दिपकेने  इथे येऊन राहुलची झोप उडवली, सरकारची आइटी सेल जोरात कामाला लावली. ममताताई धावत आल्या. 

तरुणाईचा दणका.


In reply to by Bhakti

अभिजीत विचारे जे काही करतोय तो त्याच्या शिक्षणाचा भाग आहे.म्हणजे जसे डॉक्टर बनण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनशिप करणे सक्तीचे असते तसाच हा प्रकार आहे. थेअरी तर शिकलोय तर आता चला प्रात्यक्षिक ही करुया ह्या उद्देशाने त्याने हा प्रकार चालु केल्या सारखा वाटतोय. भारतात असे काही करणे सहज शक्य आहे. जिथे रस्त्यावरचे जे.सी.बी पाहण्यासाठी मिनिटात गर्दी गोळा होते तिथे एखादा राजकिय अजेंडा राबवुन गर्दी गोळा करणे काही अवघड नाही. आर्यन खान प्रकरणात ही ज्यांना फुटकळ वेळ आहे अशी बरीच गर्दी जमली होती अथवा जमवली गेली होती. अश्या चळवळी सो कॉल्ड अमेरिकेतुनच नुकत्याच शिकलेले इंजिनिअर /डॉक्टर्स वगैरें कडुन  कधी सुरु झाल्याचे आठवत नाही. कारण त्यांचे शिक्षण व करियर ह्या असल्या प्रकारासाठी पूरक  नसते व मुळात मिळालेल्या शिक्षणाचे व त्यानंतर मिळणार्या करियरचे प्रचंड महत्त्व माहित असल्याने अशी उच्चशिक्षित तरुण ह्या प्रकारांपासुन लांब राह्तात. पण असे जर्नलिझम वगैरेंच कोर्स करणार्या मंडळीचे करिअरच ह्या अश्या सो कॉल्ड प्रकारांवर अवलंबुन असल्याने अशी मंडळी ह्या चळवळी प्रकारात दिसतात. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये शिकणार्या एका दलित विद्यार्थ्याला पुण्याच्या एका कॉलेजने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने फार गदारोळ झाला होता. त्या तरुणाचे विडिओ पण पाहिले होते व मला वाटले होते कि पुन्हा एखादी चळवळ सुरु होते कि काय? पण तो विद्यार्थ्याचे कार्यक्षेत्र बहुदा फायनान्स मध्ये असल्याने त्याने पुढच्या संधी वर लक्ष दिले असावे. तो ही जर ह्या जर्नलॅझिम वगैरे अभ्यासक्रमात ला असता तर त्याने नक्कीच अशी संधी साधलीच असती. (दुसरे आठवणारे उदाहरण म्हणजे कन्हैया कुमार. त्याला ही पत्रकारिता वगैरे काही अभ्यासक्रमाची पदवी होती असे वाटते.)


In reply to by सुक्या

प्रश्न जबाबदारी (accountability) चा आहे. 

ज्या मंत्र्याच्या हाताखाली २ वेळा राष्ट्रीय पातळीच्या परीक्षेत घोळ घातला जातो, त्याची कुवत आणि वकूब काय असेल?

पेपर फोडणाऱ्यांवर(च) कारवाईची मागणी करायची आणि मंत्र्यांना सोडायचे हे म्हणजे भेसळयुक्त दूध विकणाऱ्या विक्रेत्यामागे धावून त्या कंपनीला सोडून देण्यासारखं आहे. 

तेव्हा accountability हवी. आंदोलकांनी ही मागणी करण्यात काय गैर आहे?

[बाकी तुम्ही खाली दिलेले मुद्दे आंदोलनाशी अजिबात संबंधित नाहीत, ते जर कुणी करत असेल तर तोही आंदोलन भरकटवण्याचाच प्रकार आहे]

पुन्हा - मुख्य मुद्द एवढाच,  accountability पाहिजे. 


In reply to by कांदा लिंबू

प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपशब्द वापरण्याची हिंमत करतो

 

अहो ह्या धर्मरक्षकांनी साक्षांत अयोध्या रामजन्मभूमीच्या मंदिरातचं भ्रष्टाचार केला. ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची ? आणि म्हणे विशेष पापक्षालन विधी करून हे पाप धुणार आहेत. हे पाप ढोणे नाही.

कालच नीट परीक्षेतील गोंधळ म्हणजे "महा पाप" असल्याची दर्पोक्ती महामानवांनी केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पापक्षालन विधी करावा लागेल असे वाटते ! 

 


केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी महिनाभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) मोर्चा सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दारावर पोहोचला. या वेळी हजारो सशस्त्र जवान आणि पोलिसांनी मध्य दिल्लीला वेढा घातला. सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संसदेकडे मार्गक्रमण सुरू करताच त्यांना पांगवण्यासाठी निमलष्करी दलांचे जवान आणि दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला; अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यात ६५ विद्यार्थी व तरुण जखमी झाले, तर एक अतिगंभीर आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्य मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमा वांगचुक यांनी कठोर पवित्रा घेऊन  उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार सोमवारी केला. 

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंदोलनातील  विद्यार्थी आपल्या समस्या अगदी योग्य शब्दात मांडताना दिसत आहेत. ते अजिबात हिंसक भाषा वापरताना दिसत नाहीत त्यामुळे सरकार गोंधळले आहे. काही पोलिसांनी लाठ्यांना खिळे मारलेले आढळले.  हे पकडले गेलेल्या व्हीडीओत त्या पोलिसांचे चेहरे बघण्यासारखे  होते. आंदोलन आणि खिळे आता नवीन समीकरण झाले आहे. सरकारने चीनकडून  ( गलवान ) आयात केलेले अस्त्र.   


In reply to by आग्या१९९०

हा हा हा ... 

कुठल्या जगात आहात? पोलिसांवर दगड काय हवेतुन पडले काय? गाड्या आपोआप फुटल्या? जरा डोळे ऊघडे ठेउन बघा. व्हीडीओ आहेत जालावर सगळे. म्हणे आजीबात हिंसक भाषा वापरताना दिसत नाहीत. भाषा काय कर्म पण बघा.

आता ते बघायचेच नसतील तर गोष्ट वेगळी आहे. त्याला ईलाज नाही ... 


In reply to by सुक्या

पोलिसांवर दगड काय हवेतुन पडले काय? खिळे हवेतून उडत पोलिसांच्या  लाठ्यांमध्ये घुसले होते का? उलट पोलिसच पूर्व तयारी करून आले होते. संसद मार्गावर दगडं आलीच कशी? सुरक्षा दल झोपा काढत होते की त्यांनीच दगडं आणून ठेवली आणि भाडोत्री आंदोलकांच्या हातात दिले? हिच शक्यता जास्त वाटते. 

 

 

 


In reply to by आग्या१९९०

हो हो.  सगळे जे काही झाले आहे ते सरकार मुळेच झाले आहे. सुरक्षा दल झोपा काढत होते. सरकारनेच दगड आणुन दिले तिथे. ज्या विटा उखडल्या त्या सरकार नेच लावल्या होत्या .. कधी काळी कामाला येतील म्हणुन. पोलीसांनीच एकमेकांना दगड मारुन डोकी फोडुन घेतली.  अश्रुधुर पण एक्स्पायर होत आले होते म्हणुन वापरुन टाकले.  आतली खबर तर अशी आहे की जखमी झालेल्या पोलिसांना एक ईंक्रीमेंट देणार असे अगोदरच सांगीतले होते. त्यामुळे पोलिसांनीच केले सगळे. 

 

खुश?


In reply to by सुक्या

खुष नाही. 

दंडुक्यांवर खिळे कसे आले ह्याबद्दल काहीच भाष्य नाही केले तुम्ही .  की नेमके तेव्हा जबड्यात खिळे बसले की काय ? 


In reply to by आग्या१९९०

तुमच्यापुढे डोके फोडुन काही उपयोग नाही. तरीही ... 

दंडुक्यांवर खिळे असलेला एक व्हिडीओ ची लिंक देता का? १७६० रीपोर्टर असताना वर एव्हडे मोठे ह्युमन राईट व्हायोलेशन झाले म्हणता.  टाका कोडतात एक केस.


In reply to by सुक्या

मिळाला का वीडीओ? वाट पाहतो आहे .. 

की नेहेमीप्रमाणे पळ काढणार आहात?


In reply to by सुक्या

मिळाला का वीडीओ? वाट पाहतो आहे .. 

की नेहेमीप्रमाणे पळ काढणार आहात? 

मी तुमच्याकडून कधी विडीओ मागितला नाही आणि कोणी माझ्याकडून मागीतला तर देणे फारच गरजेचे आहे असे वाटले तरच देतो . सोशल मिडियावर शोधणे हे फार कठीण नाही. तुम्हाला फारच गरज वाटत असेल तर बसा शोधत , मी देणार नाही.  शेकडो विडीओ आहेत आंदोलकांवर पोलिस अत्याचारांचे. कदाचीत ते विडीओ बघून तुम्हाला आंदोलकांबद्दल  सहानुभूती वाटू लागेल ही शक्यता आहे.