Skip to main content

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 15/07/2026 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

आपणास माहिती आहे १५ मे रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता आणि  या वक्तव्याचा निषेध म्हणून, १६ मे रोजी अभिजीत दिपके यांनी समाज माध्यमांवर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंग्यात्मक सामाजिक चळवळीची स्थापना केली होती. भारतात या चळवळीची तरुणांमधे खूप चर्चा  आहे,  व्यवस्थेविरुद्ध तरुण एकत्र होऊन आपली भूमिका मांडायला एकत्र झाले आहेत.  सामाजिक माध्यमांवर या विविध विषयांचा,  मिम्ससहित सध्या बोलबाला आहे. आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही,  आमच्या या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी असे आवाहन  आंदोलकांनी  केले, सरकारने तरुणांच्या मागण्यांवर विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांना आहे. 

सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर  बोलण्यासारखं तसं नवं काही नाही. परीक्षांचे  पेपर फुटणे, मंदिर गळणे, मंदिरातील पैशांचा अपहार करणे,  युवकांची बेरोजगारी,  वाढती महागाई या विषयांवर सरकारकडे फारशी समाधानकारक उत्तरं नाहीत. भारतीयांची ससेहोलपट सुरु आहेच.  सध्या,  दिल्लीतील जंतरमंतरवर सध्या  सुरु असलेले  आंदोलन प्रामुख्याने NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांविरुद्ध सुरू आहे, सदरील आंदोलनात आंदोलक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी करत आहेत, अशा वेळी सरकार या आंदोलनाकडे अजूनही गांभीर्याने पाहात नाही, सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. 
 
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केले आहे.  आज सतरा दिवसानंतर त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.  काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या पत्रांमुळे आंदोलन  चर्चेत राहिले. यातील एका पत्राद्वारे 'सीजेपी'ने राजकीय नेत्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली, तर दुसऱ्या पत्रात देशभरातील १,८०० मान्यवरांनी गेल्या १७दिवसांपासून उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि इतर विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
 

आंदोलनात विविद्य विद्यार्थी त्यांचे पालक या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता सरकार या आंदोलकांच्या मागण्यांकडे चर्चा अथवा उपायांबाबत कोणीही चर्चा करायला आलेले नाही.  काही मोजक्याच राजकीय पक्षांनी पेपरफूटीबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे, आजचे तरुण काहीच करीत नाही, व्यवस्थेविरुद्ध लिहित अथवा बोलत नाही.  अशा वेळी तरुण आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत असतील तर, अशा वेळी सरकारची जवाबदारी काही असेल की नाही ? या आंदोलनाचं पुढे काय होईल ?  या आणि विविध  प्रश्न आणि संभाव्य उत्तरासाठी  चर्चेसाठी हा धागा. आपण आपली मतं मांडत राहूया....

 


वाचने 6356
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

In reply to by वृषभ खोंडे

टिंगु आयडी

जपानच्या ‘त्या’ मंत्र्यांचे आरोप भारताने फेटाळले; MEAने बुलेट ट्रेन कराराची सत्यता सांगितली  https://www.lokmat.com/national/india-mea-spokesperson-randhir-jaiswal-…


In reply to by सुस्वरूप

Screenshot-20260718-165131-2Screenshot-20260718-165554

 

 

पहिल्या चित्रात तू दिलेली बातमी त्यात सांगितले आहे की पहिले पॅकेज सुरत - बिलीमोरा असेल अंतर किती ? मात्र ५० किलोमीटर, आणि दुसऱ्या चित्रात बघ सुरत बिलीमोरा अंतर ! कशाला उगाच काहीही बोलत बसायचे ? आता हे ५० किलोमीटर सुरू करणार अन् जपानी लोकांना सांगणार की आम्ही बुलेट ट्रेन सुरू केली ! जय हो 


सुरेख धागा आहे... तरुणाईबद्दल लेख असेल अन् मी बोलणार नाही असं होणार नाहीच... afterall I'm also one of them na... माझा तरी सोनम वांगचूक काकांना पूर्ण पाठिंबा आहे... हा आता काही लोग येतील प्रतिक्रिया द्यायला आणि मला दूषणं पण देतील, तुम्ही हिंदुद्रोही आहात, देशाची काळजी नाही तुम्हाला, तुमचं डोकं धुवून टाकलंय (literal brainwash!😂)... पण नाही जे डोळ्यांना दिसतंय त्यावरूनच बोलतोय की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना देश किंवा देशाचं भविष्य असलेल्या तरुणाईचं काहीच सोयरसुतक नाहीय... त्यांना तर फक्त बोचा टेकवायला खुर्ची हवीय.
पण या खुर्चीच्या मोहापायी देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ज्या पद्धतीने पोखरलं जातंय, ती खरंच या व्यवस्थेला लागलेली 'वाळवी' आहे. सर्वोच्च न्यायालयाचे एक माननीय न्यायाधीश जेव्हा बेरोजगार तरुण आणि आंदोलनकर्त्यांचा उल्लेख 'झुरळ' (कॉकरोच) म्हणून करतात, तेव्हाच समजतं की एसी केबिनमध्ये बसलेल्या लोकांना रस्त्यावरच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या संघर्षाची किती चाड आहे. पण अभिजीत दिपके यांनी याच अपमानाचा 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) नावाचं व्यंगात्मक आंदोलन उभारून जो प्रतिवाद केलाय, त्याला दाद द्यावीच लागेल! जेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यमं आणि सरकार डोळे मिटून बसतात, तेव्हा तरुणाईलाच असा आपला आवाज बुलंद करावा लागतो.
आज जंतरमंतरवर जे चित्र आहे, ते अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. एकीकडे तरुण आपल्या हक्कासाठी, NEET पेपरफुटीच्या चक्रातून सुटण्यासाठी रस्त्यावर ऊन-पावसात बसलेत आणि दुसरीकडे सोनम वांगचूक काकांसारखा हिरा त्यांच्या पाठीशी उभा राहून आज १७ दिवस आमरण उपोषण करतोय! आज त्यांची प्रकृती खालावत चाललीय, तरीही सरकार ढिम्म आहे. उलट काही सोशल मीडियावरील 'फुकटज्ञानी' स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्यासाठी वांगचूक काकांच्या उपोषणाची फालतू तुलना करत सुटलेत. अभ्यास वाढवायचा सल्ला देणाऱ्या अशा लोकांचा स्वतःचा इतिहास आणि चालू घडामोडींचा अभ्यास किती शून्य आहे, हे आपण पाहतोच आहोत.
"आजचे तरुण काहीच करत नाहीत, बोलत नाहीत" असं म्हणणाऱ्यांना जंतरमंतरवरची ही गर्दी आणि सोशल मीडियावरील हा आक्रोश चपराक आहे. आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही, आम्हाला फक्त आमच्या भविष्याची आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेची हमी हवीय, ही साधी मागणी समजून घ्यायला सरकारला वेळ का नसावा?
डॉ. दिलीप बिरुटे सरांनी अगदी योग्य वेळी हा धागा सुरू केला आहे. हा लढा फक्त दिल्लीपुरता मर्यादित न राहता देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. शेवटी 'व्यक्ती' म्हणून आमची पात्रता अजून निर्माण व्हायची असेलही, पण या देशाचे नागरिक आणि विद्यार्थी म्हणून व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार आमच्यातल्या प्रत्येक 'झुरळाला' नक्कीच आहे!


In reply to by आनन्दा

  • Google वर एका सर्चमध्ये मिळणारा व्हिडिओ इथे मागून विषयांतर कशाला करताय? जर का तेवढं पायाभूत ज्ञान आपल्याला नसेल तर समजू शकतो.😉

जंतर मंतरवर नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमार्फत सोनम वांगचुक यांना स्टेजवरून उचलून इस्पितळात नेण्यात आलं आहे, अशी बातमी येत  आहे. मा.न्यायालयाचा हवाला देत पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळ सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत. उपोषणाचा कार्यक्रम संपल्यात जमा आहे.

 

तपशीलवार निवांत लिहितो.

 

-दिलीप बिरुटे


प्राकृतिक चिकित्सा केंद्रात 21 दिवस उपाशी ठेवण्यासाठी किमान 50- 60चा खर्च येतो. वजन अर्धा किलो कमी होते. सनम चे वजन आठ किलो कमी झाले आणि त्यांनी इशारा तिला 21 दिवस पूर्ण होतात आहे. आता सरकारी हॉस्पिटलच्या व्हीआयपी रूममध्ये सर्व टेस्ट करून घेतील. 


In reply to by विवेकपटाईत

करून बघितले आहे का ? की उगाच शाहजोग पणाचा आव आणून ट्विटरवर वाचलेले इकडे येऊन ओकण्याचा कार्यक्रम लावला आहेत ?


मूळ मुद्दा-

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.

त्यांनी राजीनामा दिल्यास सोनम वांगचुक आपले उपोषण मागे घेतील का?

बरं उपोषण मागे घेतल्यामुळे मूळ प्रश्न कसा सुटणार आहे? याबद्दल कुणी काही सांगेल का?

मूळ प्रश्न ज्या समितीने लक्ष घालायचे  त्या सर्वपक्षीय संसदीय समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे आहेत.    

पेपर फुटला कसा याबद्दल कोणी तरुण नक्की माहिती देईल का?

सरकारला वेठीस धरून एखादी मागणी मान्य करून घेऊतली तर म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो अशी स्थिती झाल्यास टायची जबादारी कोण घेणार आहे?

बाकी एखाद्या फडतूस सदस्याने  विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही. कारण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत.

झुरळ पार्टीचा जाहीरनामा बद्दल काहीच बोलायचे नाहीये किंवा अभिजित दिपके ची लायकी काय याबद्दल बोलणार नाहीत.

बाकी या जाहीरनाम्याबद्दल मी केलेली उहापोह आता इथे देतो आहे.

The Manifesto.
Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it.

हा अत्यंत भंपक आणि विचार न करता सवंग लोकप्रियतेसाठी काढलेला आहे हे स्पष्ट आहे

01
If the CJP comes in power, no Chief Justice shall be granted a Rajya Sabha seat as a post-retirement reward.

Justice Ranjan Gogoi: Nominated in 2020 shortly after his retirement in November 2019.Justice Ranganath Misra: The former Chief Justice of India, who was elected to the Rajya Sabha in 1998 as a member of the Indian National Congress (INC).Justice Baharul Islam: A former Supreme Court judge who resigned from the bench in 1983 and was later elected to the Rajya Sabha on a Congress ticket.

हि तीन उदाहरणे सोडली तर न्यायधीशांनी संसदेत प्रवेश केलेला नाही.

02
If any legit vote is deleted, whether in a CJP or opposition-ruled state, the CEC shall be arrested under UAPA, as taking away voting rights of citizens is no less than terrorism.

कुठे तरी कनिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना जबाबदार धरून त्यांना अजामीनपात्र दहशवादी कायद्याखाली अटक करायची हि मागणी करताना कोणताही विचार केलेला नाही.

हे म्हणजे एखाद्या पोलीस कॉन्टेबलने केलेल्या मारहाणीसाठी पोलीस महासंचालकांना अजामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक करण्याइतकी विधिनिषेधशून्य मागणी आहे.

The Unlawful Activities (Prevention) Act (UAPA), enacted in 1967, is India's primary anti-terror legislation. It aims to prevent and penalize unlawful activities, terrorist acts, and the financing of terrorism that threaten the sovereignty and integrity of India.

देशाच्या एकता आणि अखण्डते ला धोका देणारी दहशतवादी कृती यात आपल्याला कुठे दिसते?

03
Women shall receive 50% reservation, not 33%, without increasing the strength of Parliament. Additionally, 50% of all Cabinet positions shall be reserved for women.

स्त्रियांसाठी सरसकट ५० टक्के आरक्षण देणे हा एक विचार आहे पण सत्ताधारी पक्षाच्या निवडलेल्या सदस्यात जर तेवढ्या स्त्रियाच नसतील तर मंत्रिपदे कशी द्यायची हा विचार ना करता सवंग लोकप्रियतेसाठी केलेली मागणी आहे. असे झाल्यास राबरीदेवी सारख्या रबर स्टॅम्प संसद सदस्या तयार होतील याने बाबू आणि नोकरशाहीच जास्त बळकट होईल.

04
All media houses owned by Ambani and Adani shall have their licences cancelled to make way for truly independent media. Bank accounts of Godi media anchors shall be investigated.

२०१२ मध्ये अंबानी यांनी न्यूज १८ विकत घेतले तो वर सर्व प्रसार माध्यमे स्वतंत्र आणि निष्पक्ष होती असे आपले म्हणणे आहे का?
(अडानी यांनी पहिले प्रसार माध्यम २०२२ मध्ये विकत घेतले)

गोदी मीडिया कोणती हे कुणी ठरवायचे? केजरीवाल यांनी प्रमाणित केलेल्या सर्वात प्रामाणिक अशा तपास अधिकाऱ्यांनी कि ऋन्मेष ने?

आणि सर्व प्रसार माध्यमांच्या बँकेच्या खात्यांची चौकशी कुणी करायची सी बी आय ईडी का आयकर खात्याने? पण मग ते परत म्हणणार हे सर्व तर सरकारी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत.

आणि सामान्य माणसाला मुळात साधी चौकशी कशी करायची याचे मूलभूत ज्ञानही नसते. मग सायबर गुन्हे तर सोडाच आर्थिक गुन्हे यांचा तपास कसा करायचा?
इतकी सर्व यंत्रणा असली तरी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास किती किचकट असतो हे तेलगी हर्षद मेहता केतन पारेख केसेस मध्ये पाहिले नाही का?
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली केलेल्या तपासात सुद्धा २ जी घोटाळ्यात सज्जड पुरावा मिळू शकला नाही

05
Any MLA or MP who defects from one party to another shall be barred from contesting elections — and from holding any public office — for a period of 20 years.

The Indian Government enacted the Anti-Defection Law in 1985. दोन तृतीयांश पेक्षा कमी सदस्य पक्ष सोडून गेले तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते. तेंव्हाच्या सरकारने काहीतरी विचार करूनच कायदा केला असेल ना?

पक्षांतर्गत हुकूमशाही किंवा पक्ष नेतृत्व मूलभूत तत्वांशी हरताळ फासून काम करत असेल तर निवडून गेलेल्या सदस्यांनी काय फक्त मम म्हणायचे का? मग सकृतदर्शनी लोकशाही असली तरी पक्षांतर्गत हुकूमशाहीच चालेल.

अशा साठी २० वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालणे म्हणजे भुरट्या चोरीसाठी फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे.

मुळात श्री मोदी यांचा या कॉकरोच वक्तव्याशी कोणताही संबंध नाही.

केवळ त्यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी एका परदेशी उपट सुंभाने काढलेला हा भंपक उपक्रम आहे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणायचा भंपक आणि हास्यास्पद प्रयत्न आहे       
 

 


पेपर फुटला कसा याबद्दल कोणी तरुण नक्की माहिती देईल का?

सर ह्यावर तर CBI किंवा/ आणि पर्यायाने सरकारच उत्तर देणार ना ? फेरपरीक्षा घेतली म्हणजे आधीच्या परीक्षेचा पेपर लीक झाला हे सरकारला मान्य आहे. त्या अनुषंगाने सरकारने तपास CBI कडे सोपवून पण बरेच दिवस झाले, त्यामुळे आता 

 

- तपास कुठल्या टप्प्यात आहे ? 

- चार्जशीट फाईल झाली का ? झाली नसेल तर का नाही ? 

- चार्जशीट फाईल करायला वाढीव मुदत मागितली आहे का (कोर्टात) ? 

- तपासाच्या अंती काय चित्र दिसते आहे ? 

 

- ही सगळी माहिती तर सरकार/ CBI देणार ना ? ह्यात तरुणांनी काय माहिती द्यायची अपेक्षा आहे ?


In reply to by वृषभ खोंडे

तपास कुठल्या टप्प्यात आहे ? 

आणि 

तपासाच्या अंती काय चित्र दिसते आहे

या गोष्टी सरकारने आंदोलन कर्त्यांना विश्वासात घेऊन सांगायला हव्या होत्या.

परंतु श्री सोनम वांगचुक सोडले तरी एकही माणूस विश्वासार्ह दिसत नाही.

बाकी वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला बरेच उपटसुम्भ  तेथे आलेले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.

कदाचित ज्या तर्हेने हे आंदोलन सुरु झाले आहे त्यामुळे सरकारने सुरुवातीलाच ताठर भूमिका घेतली आहे असे दिसते.

सोनम वांगचुक यांनी सुरुवातीला NEP बद्दल श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कामाबद्दल प्रशंसोद्गार काढलेले होते  आणि अचानक त्यांनी आंदोलनात उडी घेऊन उ टर्न केल्यामुळे असे झाले असावे.

 

      


In reply to by सुबोध खरे

बाकी वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला बरेच उपटसुम्भ  तेथे आलेले आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.

 

 

हे तुमचे आमचे वैयक्तिक, सामूहिक मत असू शकते, ते चूक का बरोबर मी त्यात पडणार नाही तूर्तास. पण एकंदरीत सरकार असे बोलून/ वागून चालू शकत नाही. लोकशाही म्हणले की सरकारला प्रत्येक आंदोलन नीट हाताळावेच लागते सरकार ते हाताळते असे वाटते.  


सोनम वांगचूक ह्यांना दिल्ली पोलीसांनी उचलून सफदरजंग इस्पितळात दाखल केले असे कळले.

ह्या उचलबांगडीला झाकण्यासाठी पांढरे बेडशीटस आणण्याचे दिल्ली पोलिसांना सुचले पण ऐम्ब्युलन्स आणली तर त्यात एक स्ट्रेचर आणण्याचे मात्र सुचले नाही.

एका पेशंटला आणण्यासाठीच आले होते ना?

अफाट अचाट आहेत खरोखर.


In reply to by कर्नलतपस्वी

चोराच्या मनात चांदणे...आता काविळ झाली असेल तर ढवळा पण पिवळाच दिसेल की ओ...काका!


In reply to by कर्नलतपस्वी

काय इमानासोबत अक्कल पण गहाण टाकली की काय?

तुम्हाला काय वेगळे चॅनेल आणि शूटिंग दाखवतात की काय? का खरी झापडं मिळतात दाये बाये लावायला?

वरच्या माझ्या प्रतिसादातले काय खोटे आणि किती धादांत खोटे ते सिध्द करुन दाखवा अन्यथा...

तुम्ही सुचवलेला मार्ग आहेच तुमच्यासाठी. जावा तिकडंच....


In reply to by अभ्या..

त्याना स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते, हे स्पष्टपणे दिसून येते .... cjp  website

 

https://cjpmember.in/blogs/sonam-wangchuk-shifted-to-safdarjung-hospital-cjp-reacts

 

 


In reply to by कोण

त्याना स्ट्रेचरवरून नेण्यात आले होते, हे स्पष्टपणे दिसून येते ....

 

धन्यवाद. 

 


In reply to by अभ्या..

काय इमानासोबत अक्कल पण गहाण टाकली की काय?

तुम्हाला काय वेगळे चॅनेल आणि शूटिंग दाखवतात की काय? का खरी झापडं मिळतात दाये बाये लावायला?

वरच्या माझ्या प्रतिसादातले काय खोटे आणि किती धादांत खोटे ते सिध्द करुन दाखवा अन्यथा...

तुम्ही सुचवलेला मार्ग आहेच तुमच्यासाठी. जावा तिकडंच....

तुम्ही सुचवलेला मार्ग आहेच तुमच्यासाठी. जावा तिकडंच....

 

उचलली जीभ लावली टाळ्याला. 

जर्मनीत राहून परभणीची चिंता सोडा. आमचे आम्ही बघून घेऊ.

थोडी शिल्लाक असेल तर......

 

जाऊ द्यात, तुमच्या सारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बद्दल काय बोलायचे.


In reply to by कर्नलतपस्वी

जर्मनीत राहून परभणीची चिंता सोडा. आमचे आम्ही बघून घेऊ.

ते दिसतच आहे, कसे बघून घेता आहेत ते. म्हणून तर चिंता.

परभणी आमचीच आहे.  पासपोर्टावर चार सिंह आहेत अजून, एक दिसत नाही मागचा ते नशीब समजा.

देशभक्तीचा ठेका काही फक्त वर्दीचा नसतो. तेंव्हा जाऊच द्या. 

अर्ध्या हळकुंडाने किती हळद खेळायची ते आमचे आम्ही बघू.

 


In reply to by अभ्या..

मला आधी वाटले रेल्वे मध्ल्या बेड शीट उचलुन आणल्या व ह्याना गुंडाळुन लदाख ला रैल्वे बसव्तिल


आता येथेच पहा.  

साधा झुरळांच्या आंदोलन बद्दल धागा आहे त्यात नेहमीच्या वाममार्गी लोकांनी शेतकरी आंदोलन, मंदिरातील पैसे चोरी बुलेट ट्रेन गोबर युग राममंदिरात गळती  सारखे असंबद्ध  मुद्दे आणून केवळ आपला मोदी द्वेष व्यक्त केला आहे.

झुरळ पक्षाच्या जाहीरनाम्या बद्दल एकानेही मत मांडलेले नाही किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय अधिक नक्की काय करायला हवे आहे याबद्दल  लिहिलेले नाही.    

कारण सज्जड असा मुद्दा त्यांना सापडत नाहीये.

श्री सोनम वांगचुक  यांनी स्वतः श्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल प्रशंसा केली होती.

https://x.com/Wangchuk66/status/1636408767976988672?lang=en  

मग अचानक असं काय झालं?

पेपर फुटला हि वाईट गोष्ट आहेच पण भारतात सायबर फ्रॉड किती होतात आणि त्याचे फटके किती लोकांना बसतात 
.
Indians lost an estimated ₹22,495 crore (over $2.6 billion) to cybercrimes in a recent year, with investment scams accounting for more than 75% of the total stolen money. यात सुद्धा माणसांची आयुष्यभराची कमाई एका क्षणात नाहीशी होते. असं नाही कि केवळ तरुणच यात अडकलेले आहेत.    
नीटची प्रश्नपत्रिका फुटली हा पण एक सायबर क्राईमच आहे.  
Yes, the NEET paper leak involves significant cybercrime elements. While the initial leak can be an insider job, the subsequent circulation of stolen questions on messaging apps, digital extortion, and the sale of fake leaked papers on social media are actively investigated by cyber authorities.

त्याचा तपस चालू आहे आणि ज्या तरुणांना याचा फटका बसला आहे त्यांची पुनरपरीक्षाही  घेतलेली आहे.    

The Central Bureau of Investigation (CBI) has arrested 13 private individuals, including key conspirators and a Chemistry lecturer involved in NTA's paper-setting panel, after discovering that leaked question papers were sold for vast sums. The government also ordered a re-examination, cancelled previous scores, and withheld the results of involved candidates.
The Indian Government and investigative agencies have taken several concrete actions:
CBI Arrests: The CBI has apprehended 13 individuals, including the alleged kingpin P.V. Kulkarni (a Chemistry lecturer on the NTA's paper-setting panel) who leaked question papers during special coaching classes.
Cancellation and Re-test: The initial May 3 NEET-UG examination was officially cancelled, and a nationwide re-examination was successfully conducted on June 21.Strict Penalties on Accused: The National Testing Agency (NTA) has withheld the final scores of identified accused, such as Yash Yadav, despite a court allowing them to take the June 21 retest.

Evidence Recovery: CBI officials have seized multiple digital devices containing 132 handwritten questions, 111 of which matched the NTA master question sets.

Parliamentary Accountability: Top officials from the Union Education Ministry, NTA, and CBI have briefed parliamentary panels and courts to detail the conspiracy and aggressively oppose bail pleas for the arrested suspects.


In reply to by सुबोध खरे

मग एकदा सोनम वांगचूक ह्यांनी फक्त प्रशंसा करायला भेट दिलेली ना? मंत्री महोदयांनी ती भेट दिली ना?

आता एकदा मंत्री महोदयांनी त्यांची भेट घेऊन तुम्ही दिलेला सगळा निबंध वाचून दाखवायला काय हरकत होती? वांगचुक ह्यांनी नाकारली होती काय भेट?

नुसतीच प्रशंसा काय ऐकायची? करावी चर्चा कधीतरी. नाही निघाला काही मार्ग तर तेही आगामी निबंधात मेन्शन करता आले असते.


मला वाटतं की शासनास सोनमबुवांना उचलून इस्पितळात हलवायचा होता. पण थेट तसं करता येत नव्हतं. म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचा जीव वाचवायची कारवाई करतो आहोत, असं दाखवलेलं आहे. एकंदरीत शासन लबाड आहे. म्हणतात ना खटासी असावे खट ....!

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

थ्रेड्स वर एक  पत्र फिर्तेय त्यात सोनम ने स्वत च्या मर्जीने आपण होस्पित्ल जात आह  असे लिहिलेय

खरे खोटे माहीत नाही


In reply to by सुस्वरूप

सुस्वरूप,

 

तुम्ही दिलेल्या दुव्यावर जो कागद दाखवलाय त्यात सोनम वांगचुक या नावाखाली " मै अपने मर्जीसे अपना Medical Exam करा हूँ । " असं वाक्य दिसतं. मात्र त्यात तारीख 13/07/26 अशी दिसते आहे. यावरनं ही वैद्यकीय चाचणी सुमारे चारपाच दिवस आधीची दिसते आहे. शिवाय हा कागद लोहिया इस्पितळाचा आहे, तर सोनम यांना सफदरजंग इस्पितळात भरती केले आहे. त्यामुळे सोनमबुवा आपणहून गेले हे मानणे अवघड आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

बरोबर

पण खोटे पत्र बनवणारा एव्ड्या मोठ्या चुका नाही करणार

असे  हौउ शकते के लेटर आधीच दिले व ४ दिव्सने  कार्यवाही झाली कारण म्याटर मधे पोलिस वगिरे लागनार

तसेच एक  इस्पिताळ ला लेटेर दिले ते दुसरिकडे  चालेल

 

पण मुळ दुवा दिलाच आहे 


देश झोपेत असताना काल पांढ-या कपड्या आडून लोकशाहीची तिरडी उचलण्यात आली. सध्या नीट परीक्षेच्या पेपरफूटीच्या घोळामुळे अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. परीक्षा पद्धतीतला घोळ संपता संपत नाही. केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे, काल आंदोलनाच्या एकविसाव्या दिवशी लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली. आदरणीय मा. न्यायालय यांनी सोनम वांगचुंग यांच्या आरोग्याची काळजी घ्या असे सांगितले दिल्ली पोलिसांनी काळजीसाठी व्यवस्थित नियोजन करुन सोनम वांगचुंग यांना दवाखान्यात बळजबरीने जमा केले, असे वाटत आहे. दिल्लीचं आंदोलन हाताबाहेर जात असल्याचे वाटत असल्यामुळे आंदोलन गुंडाळण्यासाठी अशी कार्यवाही केली असल्याची शंका व्यक्त होत आहेत.  मात्र आंदोलन अजून तीव्र होत जाणार असे वाटत आहे. 

जंतर-मंतर'वर उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी ज्या नाट्यमय पद्धतीने आंदोलनस्थळावरून हटवले. ही कारवाई अत्यंत गुप्तपणे आणि पूर्वनियोजित पद्धतीने पार पडल्याचे विविध माध्यमांच्या बातम्यांमधून दिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सुरक्षा कडक असल्याचे सांगून शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजता दिल्ली पोलिसांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात बोलावले गेले. वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवले जाणार असून, ही कारवाई अवघ्या ३० सेकंदात पूर्ण करायची असल्याचे माहिती पोलिसांना दिली गेल्याचा दावा सूत्रांनी केला. ( संदर्भ लोकसत्ता ) 

​कारवाईपूर्वी जंतर-मंतर परिसरात मोबाईल नेटवर्क जॅमर बसवण्यात आले. सकाळी सुमारे साडेसहा वाजता आंदोलनाच्या मंचाभोवती पांढरा पडदा उभारण्यात आला. साध्या वेशातील पोलिसांनी मंचावर येत वांगचुक यांच्याभोवती कडे केले. पोलीस कारवाई करत असल्याचे लक्षात येताच आंदोलकांनी विरोध केला, मात्र त्यांना बाजूला करत पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेतले व लगेच त्यांना रुग्णवाहिकेतून सफदरजंग रुग्णालयात नेले. वांगचुक २८ जूनपासून उपोषण करत होते.


बाय द वे, नीटचा निकाल काल लागला निकालातला गोंधळ अजूनही संपलेला दिसत नाही. वृत्तपत्रीय बातम्या नुसार पेपरफूटीनंतर, आता  गुणांचा घोटाळा समोर येताना दिसत आहे.  निकालात गंभीर चुका दिसत आहे. आता  पालक पुन्हा न्यायालयात दाद मागतील, प्रवेश होण्यास विद्यार्थ्यांना डीसेंबर उजाडणार  असे दिसत आहे. 

-दिलीप बिरुटे 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देश झोपेत असताना काल पांढ-या कपड्या आडून लोकशाहीची तिरडी उचलण्यात आली.

 

अरेरे! म्हणजे त्यांचे निधन झाले की काय? त्यांना (तुमच्या लिखाणावर विसंबून) भावपूर्ण श्रद्धांजली.

 

 

 


लोकहो,

 

भाऊ तोरसेकारांनी यापूर्वी झालेल्या अशाच एका उपोषणाचे कथा चर्चिली आहे. इरोम शर्मिला चानू असं या मणिपुरी युवतीचं नाव आहे. तिच्यासंबंधी ( इंग्रजी ) माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Irom_Sharmila_Chanu

 

भाऊ तोरसेकरांचं चलचित्र ( १८ मिनिटे ) : https://www.youtube.com/watch?v=fyCBGNRm7NQ

 

शासन सोनमबुवांना फुटक्या कवडीइतकीही किंमत का देत नाही हे जाणून घ्यायचं असेल तर उपरोक्त चलचित्रं पहावं. तेव्हढा वेळ नसल्यास इथे सारांश सांगतो. त्याचं काय आहे की असं उपोषण करून कोणी मरंत नसतो. द्रवान्न व खारपाणी ( = सलाईन ) लावून माणसं दशकानुदशके जगवली गेली आहेत. शर्मिला चानू २००० ते २०१६ अशी सुमारे १६ वर्षं अर्धवपोषण करीत होती. वाजपेयी व मनमोहन सरकारे येऊन गेली. तिचा उद्देश सैन्यास दिलेले खास अधिकार रहित करायचा होता. ही मागणी मान्य केली तर ईशान्य भारत उर्वरित भारतापासून छानपैकी तुटून वेगळा झाला असता. त्यामुळे वरीलपैकी कोणीही सरकार झुकलं नाही. २०१४ साली मोदी सरकार आलं तेही झुकलं नाही. शेवटी तिने उपोषण मागे घेतलं आणि निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. तिच्यात तिचा सुपडा साफ झाला. सोनमबुवांची मतशक्ती तितकीच आहे. म्हणून शासन त्यांना किंमत देत नाही.

 

बाकी, सोनमबुवांना उपाशी ठेऊन स्वत: त्यांच्यासमोर खादाडी करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय म्हणावं बरं? या कृत्यामुळे लोकशाहीची थट्टाबिट्टा उडवली गेली आहे का? की कसल्याश्या प्रदर्शनात खाण्याचे स्टॉल लागतात तशा या प्रदर्शनात खादाडीच्या टपऱ्या लागल्या आहेत? तसं असेल तर प्रदर्शन कसलं आहे?

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

इरॉम शर्मिलाने २०१७ मधील मणिपूर विधानसभा निवडणुकीत तब्बल ७० मते घेतली होती. तिने निवडणुक लढवायचा निर्णय घेतल्यानंतर श्री.रा.रा.केजरीवालांनी तिला पाठिंबा दिला होता तेव्हाच तिच्याविषयी इन जनरल सहानुभूती असली तरी ती हरावी असेच वाटायला लागले होते. तिचे नुसते डिपॉझिटच जप्त झाले नाही तर तीन आकडी मतेही मिळवू शकली नाही यामुळे समाधान वाटले. 

 

सोमन वांगचुक किती मते घेतील यापेक्षा किती मते फिरवतील हा प्रश्न विचारायला हवा. बरेच लोक असे आहेत (इथेही आहेतच) की ते सोनम हे बुजगावणे नसून दुसरे कोणते बुजगावणे उपोषणाला बसविले असते, किंवा कोणालाही उपोषणाला बसविले नसते किंवा मुळात नीटचा पेपर फुटला नसता तरीही विरोधातच मत देणार. अशांचा काही फरक पडत नाही. ज्यांनी अन्यथा समर्थनार्थ मते दिली असती ते या उपोषणामुळे विरोधात मते देतील अशांचा आकडा किती हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. 

वेगवेगळ्या परीक्षांमध्ये घातलेला घोळ हा नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे. एन.टी.ए ने घातलेली अनागोंदी अगदीच अक्षम्य आहे. भाजप आणि मोदींची मोठी व्होटबॅंक त्यामुळे प्रभावित होऊ शकेल. त्या प्रकाराचे कोणीच समर्थन करू नये. पण झुरळांनी एक मोठी चूक केल्याने फिरलेल्या मतांचा हा आकडा अन्यथा असता त्यापेक्षा बराच कमी असेल असे मला वाटते. हे सगळे आंदोलन केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दलच मर्यादीत ठेवले असते तर या आंदोलनाला खूप जास्त समर्थन मिळू शकले असते. पण त्यात अरूंधती रॉय सारखी नालायक बाई तिथे आली, बस नाम रहेगा अल्लाका, हिंदू देवतांची खिल्ली उडविणारे लोक तिथे आले आणि तिथेही त्यांनी तेच प्रकार कले, सीताका नाम लेकर नीताके पतीके लिये वगैरे प्रकार झाले हे सगळे बघून तुकडे तुकडे गॅंग मधूनमधून वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या मार्गाने वळवळ करत असते त्यातलाच हा प्रकार आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी त्यांना काहीही घेणेदेणे नाही हे सूज्ञ लोकांना नक्कीच समजते.  

 

बाकी, सोनमबुवांना उपाशी ठेऊन स्वत: त्यांच्यासमोर खादाडी करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय म्हणावं बरं? या कृत्यामुळे लोकशाहीची थट्टाबिट्टा उडवली गेली आहे का? की कसल्याश्या प्रदर्शनात खाण्याचे स्टॉल लागतात तशा या प्रदर्शनात खादाडीच्या टपऱ्या लागल्या आहेत? तसं असेल तर प्रदर्शन कसलं आहे?

अण्णांच्या उपोषणाच्या वेळेस काही वेगळे चालू होते का? तेच तर चालू होते. मलाही वाटते आता यावेळेस दिल्लीत पाहिजे होतो. मी पण तिथे पिझ्झा हादडायला जाऊन आलो असतो 😀


एकेकाळी भारताचे पंतप्रधान एपीजे अब्दुल कलाम ही एक मुस्लिम व्यक्ती होती असेही एका झुरळाचे (किंवा झुरळीणीचे) म्हणणे आहे! 

https://www.facebook.com/share/v/19BrHnmbi1/

 


बोस्टन इथल्या अल्बर्ट आइनस्टाइन इन्स्टिटयूट मधून फंडिंग आले आहे का ?


देश झोपेत असताना काल पांढ-या कपड्या आडून लोकशाहीची तिरडी उचलण्यात आली.>>>

अस वाटत  बऱ्याच लोकांना सोनम सोनम वांगचुंग मरावा वाटत होता. सरकार ऐकत नाही आणि उपोषणाचा वीसावा दिवस असेल तर त्यानं उपोषण सोडणेच योग्य होते. कमीत कमी त्याच्या समर्थकांनी तरी तसा प्रयत्न करायला पाहिजे होते. चुकून मेला असता तर त्याच भांडवल मात्र केलं असतं.

 

अण्णांच्या बबतीत पण हेच, ह्या वयात अण्णा आंदोलन करत नाहीत म्हणून पण त्यांच्यावर टीका करणारे भरपूर आहेत.


सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यामुळे मोदी सरकारविरोधी रविवारी संताप उमटला.
जंतरमंतरवर अलोट गर्दी झाली.  शेतकरी आंदोलनानंतर दिल्लीत इतका  जबरदस्त माहौल पहिला नसल्याची दिल्लीकरांची प्रतिक्रिया तितकीच बोलकी होती.. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्या नंतर हे आंदोलन रविवारी शिंगोला पोहोचले. आता सगळे लक्ष आज होणा-या सोमवारच्या संसदेवरील मोर्चाकडे लागले आहे.


नीट परीक्षेमधील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर २० जुन रोजी सुरू झालेले हे आंदोलन रविवारी आता मोदी सरकारविरोधात रूपांतरित झाल्याचे मानले जात आहे. 

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सीजेपी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारचा मोर्चा फक्त प्रधानांच्या विरोधात नव्हे तर मोदींच्या विरोधातही आहे, असे आन्दोलकांकडून म्हटले जात आहे.


1.  जंतरमंतरवरील  (सीजेईपी) आंदोलनाला प्रतिसाद वाढत आहे. देशाभरातील तरुण मोठ्या संख्यने येथे दाखल होत आहेत.


2.  देशाभरातील वृत्तवाहिन्यांनी मात्र या आंदोलनाला विशेष दखल घेतलेली नाही. सोनम वांगचुक यांना रूग्णालयात नेल्यानंतर काही प्रमाणात वृत्तवाहिन्यांनी वार्त्तांकन केले. मात्र या आंदोलनाविषयी त्यांना सूतक आहे.

3. सध्या  यूट्यूब वाहिन्यांवर 'सीजेईपी'च्या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात अपडेट मिळत आहेत.


सरकारच्या वतीने सफदरजंग रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घ्यावी आणि संसदेच्या अधिवेशनात शिक्षणातीतल उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे. असे झाल्यास वांगचुक उपोषण सोडतील; अन्यथा ते उपोषण सुरूच ठेवतील, अशी माहिती त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिली. ( माहिती सोर्स वृत्तपत्रे आणि यूट्यूब )

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 

 


प्रस्तावित संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, संसदेकडे काढण्यात येणाऱ्या कोणत्याही मोर्चा, रॅली किंवा मोठ्या जमावाला परवानगी देण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, संसद अधिवेशन सुरू असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या आदेशामुळे संबंधित भागात परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शने किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.  ( संदर्भ - यूट्यूब आणि वृत्तपत्रीय  बातम्या) 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्ली पोलिसांच्या ओफिशीयल फेस बूक पेज ल लोक  कमेंट मधे अक्लेचे तारे तोडत आहेत  कि भारतात कुठे पण  शांति पुर्वक मोर्चा काढता येतो


जंतरमंतरवर लाखोच्या संखेने सहभागी झालेल्या आणि  युवक आपल्या मागणीसाठी आंदोलन करीत संसदेवर निघालेल्या मोर्चावर   लाठीचार्ज झाल्याच्या बातम्या आज काही वाहिन्यांवर पाहण्यात आल्या. सरकारने आपल्या शिष्टमण्डलाबरोबर युवकांशी चर्चा करण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने चालवला आहे असे दिसते.

आज लोकसभेचं कामकाज होऊ शकले नाही तिकडेही गदारोळ झाला आणि राज्यसभेतही काँग्रेसचे खर्गे यांनी याबददल सरकारला जाब विचारला त्यावरुनही गोंधळ झाला.

 

बाकी नीटच्या गुणांचा महागोंधळ अजूनही सुरुच आहे असे दिसते. चालू द्या.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by Bhakti

भारताच्या सिस्टीम खूप रिजिड आहेत, iron frame म्हणतात ते उगाच नाही भारतीय नोकरशाहीला ! . (कौतुकाने इत्यादी नाही पण एक प्लेन फॅक्ट म्हणून सांगतोय)

 

शिवाय,

 

जे पी नड्डाना भेटून सौरव दास व इतर प्रतिनिधी मंडळाने आपली मागणी असणारे पत्र त्यांना सुपूर्द केले अशीही बातमी आत्ताच बघितली 

IMG-20260720-WA0022

In reply to by Bhakti

>>>इतक्या दिवसांत राजीनामा द्यायला पहिजे होता पण !!

खरं आहे पण सरकारचा इगो त्याचं काय करायचं ?


आता भविष्यात नीट घोटाळ्याबाबत जे काय निर्णय व्हायचे ते होतील पण आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या क्रूर पद्धतीने मारहाण केली ती भयंकर होती. माध्यमात जरी येत नसले तरी, यूट्यूब फेसबुक आणि विद्यार्थ्यांनी टाकलेले व्हिडीयोत ते सर्व कौर्य दिसतं.

अनपढ़ लोक व्यवस्थेत असल्यामुळे आंदोलने कशी  हाताळावी यांचं ज्ञान नाही, शेतकरी आंदोलन असेच दडपशाही करुन दाबण्याचा प्रयत्न केला. आंदोलन ताणले आणि आंदोलक दबत नाही हे पाहुन कायदे मागे घेतले. आताही  शिक्षणाचं होत असलेले नुकसान यांना काय कळणार पण जे शिक्षणाविषयी जागरूक आहेत ते आणि  इतर मूलं कुठून कुठून या आंदोलनात सहभागी झालेले होते, किती तरी विद्यार्थी मारहाणीमुळे जायबंदी झाले असतील. सर्व निषेधार्ह आहे.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या आंदोलनातील तरुण ह्यांचा नीट परीक्षेशी काहीही संबंध नाही , हे सगळे फुकट खादाडी करणारे आहेत. आज फुकट मिळणारे दंडुके खायला गर्दी करत आहेत.


In reply to by आग्या१९९०

सहमत. 

जसे शेतकरी आंदोलनात शेतकरी नव्हते तसेच ह्या आंदोलनात विद्यार्थी नाहीत. जे आहेत ते हौसे, गवसे व नवसे ह्या प्रकारात येतात.

खरे विद्यार्थी परीक्षा देउन पुढच्या तयारीला लागले सुद्धा. 

 


In reply to by आग्या१९९०

सगळे युवक परदेशातून येऊन इकडे आंदोलन करीत आहेत त्यांना परदेशातून फंड येतो, काजू बदाम पिस्ते खाऊन ते आंदोलन करीत आहेत, एवढं पेरलं की आपल्या सरकारचं काम झालं. =))

 

-दिलीप बिरुटे


ते आंदोलन वगैरे सगळं ठीक आहे, माझा एक साधा प्रश्न आहे - हिंदुत्ववादी असल्याचा दावा करून, हिंदूंची मते मिळून प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली तरीही अजून एखाद्या आंदोलनामध्ये कुणीतरी येतो आणि प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपशब्द वापरण्याची हिंमत करतो आणि अजूनही त्याच्यावर काही कार्यवाही होत नाही याची जबाबदारी कोणाची? दीपकेंची का मोदींची? 

 

मोगु मोरू दोघांकडून उत्तराची  अपेक्षा आहे.


In reply to by कांदा लिंबू

ज्याने  बोटाला धरून मंदिरात आणले त्याचीच जबाबदारी. हाणा त्यांना 


In reply to by कांदा लिंबू

भारताचा प्रोब्लेम हा आहे की भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे बरीच बंधने येतात. बाकी कुणाल कामरा हा ईसम "बालीश बहु .." ह्या प्रकारातला येतो. त्याला माहीत आहे की आर एस एस / हिंदु धर्म वगेरे वर बाता मारल्या तर फार काही होत नाही. सहिष्णु आहेत लोक. तेच तो ईतर धर्मा विषयी बोलत नाही तिथे लगेच बेअदबी / सर तन से जुदा वगेरे वगेरे बाता होतात. एकदा कुठेतरी त्याला हा प्रश्न विचारला होता " की बाबा रे, तु हिंदु धर्मा बद्दल ईतका बोलतो तेच तु ईतर धर्मा बद्दल का बोलत नाही?"  तर ह्या कामरा ने "तो त्यांच्या धर्मिक मान्यतेचा भाग आहे, त्यावर मी काही बोलु ईच्छीत नाही" असे बोलुन पायात शेपुट घालुन चड्डी ओली केली होती. 

 

बाकी जे लोक त्याच्या तद्दन फालतु जोक का हशा आणी टाळ्या मारत होते ते कामरा ला कुणी धोपटवले असते तर लगेच बांगड्या फोडुन रडायला सुरु झाले असते. वर मग समस्त फुरोगामी नवीन बांगड्या भरुन आले असते तिथे मातम करायला. 


In reply to by सुक्या

भारताचा प्रोब्लेम हा आहे की
खराब हवा-पाणी-रस्ते, प्रदूषण, शिक्षणाचा बट्ट्याबोळ हे एवढं सगळं अक्षरश: जळत असतानाही इथे लोकांना हिंदूधर्म वगैरे एवढंच सुचतं.

हसावं की रडावं कळत नाही.


 


In reply to by भृशुंडी

खराब हवा-पाणी-रस्ते, प्रदूषण, शिक्षणाचा बट्ट्याबोळ हे एवढं सगळं अक्षरश: जळत असतानाही इथे लोकांना हिंदूधर्म वगैरे एवढंच सुचतं. 

सहमत आहे. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना तिथे येऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणे असे काम समाजकंटक लोकच करू शकतात नाही का?

हसावं की रडावं कळत नाही. 

हा हसण्याचा किंवा रडण्याचा विषय नाही. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ या मुद्द्यावर आंदोलन सुरू असताना तिथे येऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान करणे व आंदोलनाला भलतेच वळण देणे असे करणाऱ्या माणसाला तिथल्या तिथे बदडून काढले पाहिजे.

 


In reply to by कांदा लिंबू

एक तर तुम्ही 
१- मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जाताय  [ उगाच रामचंद्राचा अपमान वगैरे इथे आणून दिशाभूल]
२- तुम्हाला खरंच हा मुद्दा "मूळ विषयापेक्शा"  मोठा वाटतो आहे.

पहिला पर्याय असेल तर काय बोलणार? झोपलेल्याचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही.

दुसरा असेल तर माझा पास. तुमच्यापरीने महत्त्वाचा विषय तुम्ही मांडत राहा. 


In reply to by भृशुंडी

वोके. आता गोलपोष्ट बदलु नका.  हे आंदोलन सुरु झाले ते नीट चा पेपर फुटला म्हणुन. विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन सुरु झाले. आता हे पेपर कुणी फोडले तर ज्या "गुरुवर्यांवर" हा पेपर बनवण्यासाठी विश्वास ठेवला त्यांनीच शेण खाल्ले. ह्या आंदोलनात त्यांचा कुणी निषेध केला. त्यात एक कोचिंग क्लासवाला पण आहे. किती जण त्याच्या कोचिंग क्लासबाहेर जाउन घोषणा देउन आले? नाही ना. त्याचे कोचिंग क्लास तसेच चालु राहतील. आपलेच लोक तिथे आपले पाल्य पाठवतील. 

आता येउ या तुमच्या मुद्याकडे.

खाली दिलेल्या घोषणा व त्यांचा संबंध विद्यार्थ्यांच्या ह्या आंदोलनात कसा आहे ते सांगा. 

०. धर्मेन्द्र प्रधान राजीनामा.

१. कलम ३७० रद्द करा.

२. LGBTQ वर काहीतरी मागनी होती.

३. उमर खालीद ला सोडा. 

४. मनुवाद से आझादी / ब्राहमण्वाद से आझादी. (कप्पाळ)

ज्यावर तुमचा आक्षेप आहे तो राम / भारतमाता वगेरे मुद्दा मी वगळला आहे.  अजुन बरेच आहे आता ईतकेच. 

 

 


In reply to by सुक्या

हे सगळं दिपकेला विचारा की कोणी...

मला तर दीपकेचे तर खरच कौतुक वाटतं, परदेशातल भरलेले ताट सोडून तो इथे लढतोय. कोणी म्हणेल त्याला फन्डिग आहे.मला जरी अमाप फन्डिग दिले असते तरी मी असा प्रकार केला नसता.

पण तुम्ही दिलेल्या मुद्द्यावर विचार करता. आन्दोलनाची अवस्था हौसे नवसे गौसे यांची जत्रा होऊ नये असेही वाटते.

पण अशा मुद्द्यावर जर जेन जी बोलत असेल तर चूक आहे. त्यांना राष्ट्रप्रेम हवे.माझ्य घरातील जेन जी,अल्फा यांची नास्तिकतेकडे होणारी वाटचाल पाहता, हे मुद्दे येतील असे वाटले नव्हते. माझ्या घरातल्या पिढीला केवळ सगळ व्यवस्थित पाहिजे आहे.

जातीद्वेष, धर्मद्वेष या पुढच्या पिढीने तरी धरून पुढे येऊ नये 🙏

 


In reply to by Bhakti

माझ्या घरातल्या पिढीला केवळ सगळ व्यवस्थित पाहिजे आहे.

जातीद्वेष, धर्मद्वेष या पुढच्या पिढीने तरी धरून पुढे येऊ नये 

 +१

सध्याची तरुण पिढी खूप हुशार आहे त्यांना हे करायला वेळ  नाही.  त्यांना देशातच योग्य संधी मिळाल्यास  भारतासारखा प्रगत देश नसेल जगात


In reply to by Bhakti

परदेशातल भरलेले ताट सोडून तो इथे लढतोय.

आपल्या भाबडेपणाबद्दल सहानुभूती

 

Abhijeet Dipke was in the United States studying for his Master's degree at Boston University and job hunting.

Abhijeet Dipke is a 30-year-old Indian political communication strategist and founder of the CJP.

He is known for his work in digital political messaging, narrative building, and online campaign strategy.

Dipke completed his undergraduate degree in journalism in Pune before moving to the United States for higher education.

He recently graduated from Boston University with a two-year master’s degree in Public Relations.

Between 2020 and 2023, he worked with Aam Aadmi Party and was involved in the party’s social media and election campaign operations.

https://www.hindustantimes.com/trending/who-is-abhijeet-dipke-the-boston-educated-founder-of-cockroach-janata-party-101779346291274.html.

 

वय वर्षे ३०. भारतात पत्रकारितेचा अभयसक्रम पूर्ण केल्यावर बोस्टन ला २ वर्षाचा master’s degree in Public Relations. हा अभ्यासक्रम केला. सध्याच्या अमेरिकेच्या स्थितीत अशा अभ्यासक्रमाला कोण नोकरी देणार होतं? विशेषतः राजकारणात भाग घेतलेल्याला.  

are you politically involved? याला काय उत्तर देणार? वर त्याचे सगळे जालावरील अकाउंट तपासले असता अमेरिकेत कोण नोकरी देणार होतं  

१७ ते ३० या १३ वर्षात ४ + २ वर्षे शिक्षण  बाकी ७ वर्षांचा हिशेब लावा.  
 
त्याचा अभ्यासक्रम संपला आता तेथे नोकरी मिळत नसेल तर माणूस काय करेल?

तेवढ्यात त्याला हि संधी दिसली. मनीश सिसोदिया यांचे पाठबळ होतेच.

मग काय आले. मुळात कॉकरोच या वक्तव्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, ते वक्तव्य सरन्यायाधीशांचे होते.

पण चान्स पे डान्स चालू आहे       

 

 


In reply to by सुबोध खरे

😂😂काहीपण लॉजिक!

दिपकेने जसे काय तुम्हाला ही जॉब बाबत आपबीती सांगितली अशाप्रकारे फेकताय तुम्ही..... चालू द्या!

आंदोलनात ज्या मुलीला खुप लागलाय ती राहुरीतली दिल्लीतली mbbs चे शिक्षण घेणारी आहे. कोणी बँकर, कोणी इंजिनियर कोणी वकील सगळे कोवळे पण शिकलेली मुलं अशाच कोण्या दीपकेवर विश्वास ठेवतील असं वाटत तुम्हांला???

 


In reply to by सुबोध खरे

Abhijeet Dipke was in the United States studying for his Master's degree at Boston University and job hunting. 

 

बाकी, आपले हेतू सिद्ध करून घेण्यासाठी असे दिपक्यांसारखे हस्तक समाजकारणाचा बुरखा पांघरवून भारतात पेरायचे डाव्या इकोसिस्टमचे कौशल्य उजवी फळी कधी साध्य करू शकेल असे वाटत नाही. संघाला 100 वर्ष झाली पण तरीही अशी "पावर उनकी है पर सिस्टम हमारा है" टाइप मजबूत इकोसिस्टम ते अजूनही तयार करू शकले नाही.


In reply to by कांदा लिंबू

स्वातंत्र् युद्धात  सुद्धा अनेक नेते परदेशात शिकले पण जॉब करत राहिले असते तर ते भारताला लाभले असते का???

नाही.

प्रॉब्लेम हा आहे की,धर्म धरतांना बाकीचे मुद्दे गौण ठरवणे हा आहे.आधीच्य लोकांनिही बाकीच्या मुद्यावर सपोर्ट केला हे विसरू नका.

आणि जेन जी तर अजिबात कर्मकांड न मारणारी आहे आणि त्यांसाठी धर्माची व्याख्या कर्मकाण्ड अशी बनविण्यात अधिक शक्ती वापरली. जी त्यांना अजिबात कळणार /मान्य नाही.

आता रात्रीत कसा काय आधुनिक मसीहा उभा करणार???

विवेकानंद घडवायच्या ऐवजी कोणते नेते घडवले गेले... याचा उहापोह करा.


In reply to by Bhakti

परदेशात शिकलेले स्वातंत्र्य सैनिक स्वयंप्रेरणेने किंवा एखाद्या दिव्य, उदात्त आदर्शाच्या प्रभावाखाली मायदेशी येऊन देशप्रेमापोटी काही कार्य करायला प्रवृत्त झालेले होते. तसेच हे नेते असतील तर त्यांना त्या पंगतीत बसवण्यात काही गैर नाही. पण फंडीग देऊन कुणीतरी अज्ञात शक्तीने पाठवलेले हे 'एजंट' असतील तर त्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना एकाच तागडीत तोलणे अपमानास्पद ठरेल. असो.


In reply to by सुबोध खरे

काय हो डॉ खरे साहेब. अमेरिकेत असणे म्हणजेच लाईफ बन गई, सोन्याचे ताट वाढलेले.. इत्यादि असते आताशा. 

 

अमेरिकेत कॉन्फरन्ससाठी जायला किंवा ऑनसाईट जायला व्हिसा मिळाला तरी आता अमेरिकेत सेटल्ड असेच म्हणायचे असते. 

 

बदला बघू तुमची जुनाट मते. ;-)


In reply to by कांदा लिंबू

ऊहापोह हा शब्द मला अशासाठी आवडतो की भरपूर खोबरे पेरलेले गरमागरम वाफाळते पोहे त्या शब्दाने डोळ्यासमोर येतात. त्यात कांदा लिंबू साथीला असल्यास दुधात साखर किंवा कांदेपोह्यांत लिंबू..

😁


In reply to by गवि

अस्मादिकाच्या सदस्यनामाचा एका मिपाकरला उपयुक्त अर्थाने उपयोग करता आला याचे समाधान आहे.


हल्ली मिपावर एक-दोन वेळा उहापोह हा शब्द वाचण्यात आला होता. त्यासंदर्भात -

उहापोह करणे याचा अर्थ विचार करणे असा नसून सांगोपांग चर्चा करणे असा आहे. केवळ एकजण उहापोह करू शकत नाही, किमान दोनजण लागतात. 

 


In reply to by गवि

दडपे पोहे की नागपूरचे तर्री पोहे की आमचे कांदा पोहे????

मला उहापोह "हे"च आवडतात 😅


In reply to by गवि

आम्ही पंचाच नेसत होतो. पण गांधीना बॅरिस्टर होऊन वकीलीत महिना तीनशे रुपये मिळू लागले होते ( शिक्षकाचा पगार एक रुपया होता) तेव्हा त्यांनी पंचा नेसला.  हे आठवलं. 

बाकी दिपकेने  इथे येऊन राहुलची झोप उडवली, सरकारची आइटी सेल जोरात कामाला लावली. ममताताई धावत आल्या. 

तरुणाईचा दणका.


In reply to by Bhakti

अभिजीत विचारे जे काही करतोय तो त्याच्या शिक्षणाचा भाग आहे.म्हणजे जसे डॉक्टर बनण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनशिप करणे सक्तीचे असते तसाच हा प्रकार आहे. थेअरी तर शिकलोय तर आता चला प्रात्यक्षिक ही करुया ह्या उद्देशाने त्याने हा प्रकार चालु केल्या सारखा वाटतोय. भारतात असे काही करणे सहज शक्य आहे. जिथे रस्त्यावरचे जे.सी.बी पाहण्यासाठी मिनिटात गर्दी गोळा होते तिथे एखादा राजकिय अजेंडा राबवुन गर्दी गोळा करणे काही अवघड नाही. आर्यन खान प्रकरणात ही ज्यांना फुटकळ वेळ आहे अशी बरीच गर्दी जमली होती अथवा जमवली गेली होती. अश्या चळवळी सो कॉल्ड अमेरिकेतुनच नुकत्याच शिकलेले इंजिनिअर /डॉक्टर्स वगैरें कडुन  कधी सुरु झाल्याचे आठवत नाही. कारण त्यांचे शिक्षण व करियर ह्या असल्या प्रकारासाठी पूरक  नसते व मुळात मिळालेल्या शिक्षणाचे व त्यानंतर मिळणार्या करियरचे प्रचंड महत्त्व माहित असल्याने अशी उच्चशिक्षित तरुण ह्या प्रकारांपासुन लांब राह्तात. पण असे जर्नलिझम वगैरेंच कोर्स करणार्या मंडळीचे करिअरच ह्या अश्या सो कॉल्ड प्रकारांवर अवलंबुन असल्याने अशी मंडळी ह्या चळवळी प्रकारात दिसतात. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये शिकणार्या एका दलित विद्यार्थ्याला पुण्याच्या एका कॉलेजने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने फार गदारोळ झाला होता. त्या तरुणाचे विडिओ पण पाहिले होते व मला वाटले होते कि पुन्हा एखादी चळवळ सुरु होते कि काय? पण तो विद्यार्थ्याचे कार्यक्षेत्र बहुदा फायनान्स मध्ये असल्याने त्याने पुढच्या संधी वर लक्ष दिले असावे. तो ही जर ह्या जर्नलॅझिम वगैरे अभ्यासक्रमात ला असता तर त्याने नक्कीच अशी संधी साधलीच असती. (दुसरे आठवणारे उदाहरण म्हणजे कन्हैया कुमार. त्याला ही पत्रकारिता वगैरे काही अभ्यासक्रमाची पदवी होती असे वाटते.)


In reply to by सुक्या

प्रश्न जबाबदारी (accountability) चा आहे. 

ज्या मंत्र्याच्या हाताखाली २ वेळा राष्ट्रीय पातळीच्या परीक्षेत घोळ घातला जातो, त्याची कुवत आणि वकूब काय असेल?

पेपर फोडणाऱ्यांवर(च) कारवाईची मागणी करायची आणि मंत्र्यांना सोडायचे हे म्हणजे भेसळयुक्त दूध विकणाऱ्या विक्रेत्यामागे धावून त्या कंपनीला सोडून देण्यासारखं आहे. 

तेव्हा accountability हवी. आंदोलकांनी ही मागणी करण्यात काय गैर आहे?

[बाकी तुम्ही खाली दिलेले मुद्दे आंदोलनाशी अजिबात संबंधित नाहीत, ते जर कुणी करत असेल तर तोही आंदोलन भरकटवण्याचाच प्रकार आहे]

पुन्हा - मुख्य मुद्द एवढाच,  accountability पाहिजे