Skip to main content

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 15/07/2026 17:51 या दिवशी प्रकाशित केले.

आपणास माहिती आहे १५ मे रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी आंदोलनकर्ते आणि बेरोजगार तरुणांचा उल्लेख "झुरळ" (कॉकरोच) असा केला होता आणि  या वक्तव्याचा निषेध म्हणून, १६ मे रोजी अभिजीत दिपके यांनी समाज माध्यमांवर 'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंग्यात्मक सामाजिक चळवळीची स्थापना केली होती. भारतात या चळवळीची तरुणांमधे खूप चर्चा  आहे,  व्यवस्थेविरुद्ध तरुण एकत्र होऊन आपली भूमिका मांडायला एकत्र झाले आहेत.  सामाजिक माध्यमांवर या विविध विषयांचा,  मिम्ससहित सध्या बोलबाला आहे. आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही,  आमच्या या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी असे आवाहन  आंदोलकांनी  केले, सरकारने तरुणांच्या मागण्यांवर विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांना आहे. 

सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावर  बोलण्यासारखं तसं नवं काही नाही. परीक्षांचे  पेपर फुटणे, मंदिर गळणे, मंदिरातील पैशांचा अपहार करणे,  युवकांची बेरोजगारी,  वाढती महागाई या विषयांवर सरकारकडे फारशी समाधानकारक उत्तरं नाहीत. भारतीयांची ससेहोलपट सुरु आहेच.  सध्या,  दिल्लीतील जंतरमंतरवर सध्या  सुरु असलेले  आंदोलन प्रामुख्याने NEET पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांविरुद्ध सुरू आहे, सदरील आंदोलनात आंदोलक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी करत आहेत, अशा वेळी सरकार या आंदोलनाकडे अजूनही गांभीर्याने पाहात नाही, सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे, अशी आंदोलकांची अपेक्षा आहे. 
 
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी दिल्लीत आमरण उपोषण सुरू केले आहे.  आज सतरा दिवसानंतर त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.  काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या पत्रांमुळे आंदोलन  चर्चेत राहिले. यातील एका पत्राद्वारे 'सीजेपी'ने राजकीय नेत्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली, तर दुसऱ्या पत्रात देशभरातील १,८०० मान्यवरांनी गेल्या १७दिवसांपासून उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि इतर विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
 

आंदोलनात विविद्य विद्यार्थी त्यांचे पालक या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थिती पाहता सरकार या आंदोलकांच्या मागण्यांकडे चर्चा अथवा उपायांबाबत कोणीही चर्चा करायला आलेले नाही.  काही मोजक्याच राजकीय पक्षांनी पेपरफूटीबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे, आजचे तरुण काहीच करीत नाही, व्यवस्थेविरुद्ध लिहित अथवा बोलत नाही.  अशा वेळी तरुण आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत असतील तर, अशा वेळी सरकारची जवाबदारी काही असेल की नाही ? या आंदोलनाचं पुढे काय होईल ?  या आणि विविध  प्रश्न आणि संभाव्य उत्तरासाठी  चर्चेसाठी हा धागा. आपण आपली मतं मांडत राहूया....

 


वाचने 6356
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

In reply to by कांदा लिंबू

प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपशब्द वापरण्याची हिंमत करतो

 

अहो ह्या धर्मरक्षकांनी साक्षांत अयोध्या रामजन्मभूमीच्या मंदिरातचं भ्रष्टाचार केला. ह्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची ? आणि म्हणे विशेष पापक्षालन विधी करून हे पाप धुणार आहेत. हे पाप ढोणे नाही.

कालच नीट परीक्षेतील गोंधळ म्हणजे "महा पाप" असल्याची दर्पोक्ती महामानवांनी केली आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पापक्षालन विधी करावा लागेल असे वाटते ! 

 


केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी महिनाभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) मोर्चा सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दारावर पोहोचला. या वेळी हजारो सशस्त्र जवान आणि पोलिसांनी मध्य दिल्लीला वेढा घातला. सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संसदेकडे मार्गक्रमण सुरू करताच त्यांना पांगवण्यासाठी निमलष्करी दलांचे जवान आणि दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला; अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यात ६५ विद्यार्थी व तरुण जखमी झाले, तर एक अतिगंभीर आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्य मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमा वांगचुक यांनी कठोर पवित्रा घेऊन  उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार सोमवारी केला. 

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंदोलनातील  विद्यार्थी आपल्या समस्या अगदी योग्य शब्दात मांडताना दिसत आहेत. ते अजिबात हिंसक भाषा वापरताना दिसत नाहीत त्यामुळे सरकार गोंधळले आहे. काही पोलिसांनी लाठ्यांना खिळे मारलेले आढळले.  हे पकडले गेलेल्या व्हीडीओत त्या पोलिसांचे चेहरे बघण्यासारखे  होते. आंदोलन आणि खिळे आता नवीन समीकरण झाले आहे. सरकारने चीनकडून  ( गलवान ) आयात केलेले अस्त्र.   


In reply to by आग्या१९९०

हा हा हा ... 

कुठल्या जगात आहात? पोलिसांवर दगड काय हवेतुन पडले काय? गाड्या आपोआप फुटल्या? जरा डोळे ऊघडे ठेउन बघा. व्हीडीओ आहेत जालावर सगळे. म्हणे आजीबात हिंसक भाषा वापरताना दिसत नाहीत. भाषा काय कर्म पण बघा.

आता ते बघायचेच नसतील तर गोष्ट वेगळी आहे. त्याला ईलाज नाही ... 


In reply to by सुक्या

पोलिसांवर दगड काय हवेतुन पडले काय? खिळे हवेतून उडत पोलिसांच्या  लाठ्यांमध्ये घुसले होते का? उलट पोलिसच पूर्व तयारी करून आले होते. संसद मार्गावर दगडं आलीच कशी? सुरक्षा दल झोपा काढत होते की त्यांनीच दगडं आणून ठेवली आणि भाडोत्री आंदोलकांच्या हातात दिले? हिच शक्यता जास्त वाटते. 

 

 

 


In reply to by आग्या१९९०

हो हो.  सगळे जे काही झाले आहे ते सरकार मुळेच झाले आहे. सुरक्षा दल झोपा काढत होते. सरकारनेच दगड आणुन दिले तिथे. ज्या विटा उखडल्या त्या सरकार नेच लावल्या होत्या .. कधी काळी कामाला येतील म्हणुन. पोलीसांनीच एकमेकांना दगड मारुन डोकी फोडुन घेतली.  अश्रुधुर पण एक्स्पायर होत आले होते म्हणुन वापरुन टाकले.  आतली खबर तर अशी आहे की जखमी झालेल्या पोलिसांना एक ईंक्रीमेंट देणार असे अगोदरच सांगीतले होते. त्यामुळे पोलिसांनीच केले सगळे. 

 

खुश?


In reply to by सुक्या

खुष नाही. 

दंडुक्यांवर खिळे कसे आले ह्याबद्दल काहीच भाष्य नाही केले तुम्ही .  की नेमके तेव्हा जबड्यात खिळे बसले की काय ? 


In reply to by आग्या१९९०

तुमच्यापुढे डोके फोडुन काही उपयोग नाही. तरीही ... 

दंडुक्यांवर खिळे असलेला एक व्हिडीओ ची लिंक देता का? १७६० रीपोर्टर असताना वर एव्हडे मोठे ह्युमन राईट व्हायोलेशन झाले म्हणता.  टाका कोडतात एक केस.


In reply to by सुक्या

मिळाला का वीडीओ? वाट पाहतो आहे .. 

की नेहेमीप्रमाणे पळ काढणार आहात?


In reply to by सुक्या

मिळाला का वीडीओ? वाट पाहतो आहे .. 

की नेहेमीप्रमाणे पळ काढणार आहात? 

मी तुमच्याकडून कधी विडीओ मागितला नाही आणि कोणी माझ्याकडून मागीतला तर देणे फारच गरजेचे आहे असे वाटले तरच देतो . सोशल मिडियावर शोधणे हे फार कठीण नाही. तुम्हाला फारच गरज वाटत असेल तर बसा शोधत , मी देणार नाही.  शेकडो विडीओ आहेत आंदोलकांवर पोलिस अत्याचारांचे. कदाचीत ते विडीओ बघून तुम्हाला आंदोलकांबद्दल  सहानुभूती वाटू लागेल ही शक्यता आहे.  

 


In reply to by सुक्या

 

https://youtu.be/XVa0ZEkkQ0o?si=qZ5aPUUWZ8YEG8bO

 

यात काही फोटो व व्हिडिओ आहेत. पोलीस अतिशय अमानुष वागले आहेत. ज्यांना हे समर्थनीय वाटते, त्यांना आंधळ्या धर्म व व्यक्तीपूजेमुळे किमान माणुसकीही उरली नाही असे म्हणावे लागेल. 


In reply to by स्वधर्म

खिळ्यांचा व्हिडिओ दाखवा. 

 

बाकी आंदोलनात शिरलेल्या समाजकंटकांनी केलेली मारहाण, नासधूस, दंगल, जाळपोळ यांचे व्हिडिओ सोयीस्करपणे इग्नोर केलेत ते सर्वांनाच ठाऊक आहे. 


In reply to by कांदा लिंबू

खिळ्यांचा व्हिडिओ दाखवा.

. सिरिअसली???????

असल्या फेटिश ची लाज नाही का वाटत?

 


In reply to by अभ्या..

 लाठीला आडवा खिळा मारलेल्या पोलिसाला आंदोलक जाब विचारतानाचा विडीओ आहे हे त्यांना माहीत आहे. तो दिला तर ते मारतानाचा मागतील , असे ह्यांचे मारुतीचे शेपूट वाढतच जाईल. अशा लिंकपिसाटांना मी फाट्यावर मारतो.  


In reply to by आग्या१९९०

मुळात असा कोणताही व्हिडिओ नाहीये, म्हणून दाखवण्याचा प्रश्नच नाही. बाकी लिंकपिसाट वगैरे to you. 

 

बाकी, तुमच्यासारख्या बकरीवाद्यांच्या मिपाम्होरक्याने याच धाग्यात कोणत्यातरी १८०० मान्यवरांचा उल्लेख केला होता.‌ त्यांना विचारलं हे कोण १८०० मान्यवर आहेत ? पण त्यांनी त्याचे अजूनही उत्तर दिले नाही. कारण असे कोणी लोक नाहीतच. त्यांचेच चेले म्हणजे तुम्हीही कोणतीही लिंक देणार नाहीत कारण अशी कोणती घटना घडलेली नाही.‌


In reply to by कांदा लिंबू

हो. असा कुठलाच व्हिडिओ नाहीये. असे झाले असते तर समस्त आंदोलकांनी सगळीकडे फिरवुन पार तमाशा केला असता. गेला बाझार, बीबीसी, अल जझीरा वगेरे चैनल ने तर ते पार जगात फिरवले असते. 

एखादी अशीच  वावडी उठवुन आपला कारभार साधनारे उपट्सुंभ भुप आहेत या जगात. आठवा राजदीप सरदेसाई ने शेतकरी आंदोलनात एका मरण पावलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी गोळी मारली .. मी ती जखम पाहीली वगेरे बोलुन आगीत तेल ओतायचा प्रयत्न केला होता. हे ही तसेच. 

वावडी उठवुन आग लावायची .. लोकांना भडकावयचे .. मग बघा किती किती अराजक आहे भारतात .. लोकांमधे किती असंतोष आहे .. वगेरे बाता मारुन आपली पोळी भाजायची .. 

मला फक्त त्या सदस्याला उघडे पाडायचे होते .. 


In reply to by आग्या१९९०

अवांतर : 

 

लिंकपिसाट हे विशेषण म्हणून वापरल्याचा तीव्र निषेध. हे एक विशेषनाम असून केवळ मलाच लागू पडतं. संदर्भ : https://www.maayboli.com/comment/3501199

 

माझ्याव्यतिरिक्त इतर कुणासही हे संबोधन लागू पडंत नाही.

 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

मिपा वर प्रत्येकाला २ टोपण नावे मिळाली म्हनुन मि जंतर मंतर वले अन्दोलन करणार आहे

 

गा प्य लिनK पिसाट

टिंगु आयदि 

 

 

वगैरे वगैरे


In reply to by गणेशा

वा

  काहीही

कोणत्या एंग्ले ने इथे पोलिस वाला दिस्तोय

काहिहि फेक विडेओयि येतात व लोक फोर्वर्द करतात


In reply to by गणेशा

असले उपदव्याप केले तर आपलीच छी थु होते हे लक्षात राहु द्या. माहीती तंत्रज्ञानाचे जग आहे. पुर्वीचे छापील वृतांकणाचे दिवस गेले. तेव्हा काहीही पेरले तरी चालत असे. आता नाही चालत ... 


In reply to by गणेशा

9987673332

 

हा no आहे माझा...

विडिओ च देतो 

इतके ground वरचे विडिओ आहेत आणि पाहून विचलित होते मन, सुन्न भावना होतात..

पण आपली मने कुलीशीत झालेली आहेत अवघड आहे..

आणि इथं AI च्या विडिओ च. काय सांगता.. सर्वच खोटं आहे काय?

 


In reply to by गणेशा

पत्रकार विचारतोय अश्या अनेक वेगळ्या काठ्या..

 

असो खिळे असलेला सुराग मागे ठेवला नाही वाटत गुन्हेगारांनी 


In reply to by सुक्या

खिळे 2

घे vedio...

 

माणुस म्हणून विचार करताना आपण कोणाच्या तरी समर्थनार्थ हैवान होत चाललो आहे ह्याचे हे जिवंत उदाहरण


In reply to by आग्या१९९०

आंदोलनातील  विद्यार्थी आपल्या समस्या अगदी योग्य शब्दात मांडताना दिसत आहेत. ते अजिबात हिंसक भाषा वापरताना दिसत नाहीत त्यामुळे सरकार गोंधळले आहे. 

विद्यार्थी खुप छान बोलत आहेत,हे आतापर्यन्त कोणत्याच आंदोलनात पाहिले नव्हते.आमच्या घरीही १२ वी नीट चा विद्यार्थी होता.त्यामुळे नक्किच विद्यार्थ्यन्चि मानसिक स्थिति सांभाळ्तांना किती कष्ट होतात हे पाहिले आहे.इतक्या विद्यार्थ्याना ,पालकाना दिलासा सिस्टिम्वर तेव्हाच आता भर्वसा होइल जेव्हा प्रधान याचा राजिनामा येइल.ज्याच्या मुलांनि आत्महत्या केली त्यान्चे दुख: तर अपार आहे.


In reply to by आग्या१९९०

ह्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे GPS बंद केल्यास ह्या मंडळींना घरी परतणे शक्य होणार नाही. हिंसा हि ह्या प्लेबुक ची पुढील पायरी आहे ! 


मार खाण्यासारखे उद्योग केले की मारच मिळतो. पोलिसांवर दगडफेक केली तर पोलीस धुणार. इलाज नाही. तसेही झुरळं जास्त झाली की काय करतात. 

बाकी पुढच्या वेळी वांगचुक बरोबर ते प्रकाश राज, शबाना, अरूंधती बिरूंधती जो काय सगळा कचरा आहे त्यांना एकदमच उपोषणाला बसवा. एकत्रच RIP लिहावे अशी फार इच्छा आहे. 


तरुणाईचा पुळका? का विरोधी पक्ष धुपेल ही भीती?

दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळी महाराष्ट्रातील कित्येक केंद्रांवर कित्येक वर्षे कॉप्या होतात. बाहेरून खिडक्यांतून आत विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवली जातात तेव्हा नाही कुणी आंदोलन केले.  संस्थेच्या चालकांनाही वाटले नाही की हा प्रकार रोखावा. सरकारे त्यांचीच होती ना. पेपर फुटीची वाट पाहात नाहीत. कोणताही पेपर येवो उत्तरे येतात. आणि आता पेपर काढणारे प्रोफेसरही भिकारी झाले. आणि त्याचे एपिसेंटर महाराष्ट्रातच होते. पुणे आणि संभाजी नगर. त्यांनी एकगठ्ठा पेपर विकले कोटा येथील धनदांडग्या क्लासचालकांना. मला एकरकमी पैसे द्या आणि तुम्ही कमवा किती कमवायचे तितके. त्यांच्याविरोधातही आंदोलन का नाही करत परदेशांतून कोकलणारे? एक जर्मनीतला यूट्यूबर पैसे छापतो विडिओ टाकून. तरुणाईचा पुळका नव्हे हा. हा तर पैसे कमावण्याचा धंधा. दोन दिवसांत वीस लाख लोकांनी विडिओ पाहिले जातात. हे मालामाल. आणि आमचे विरोधी पक्ष नेते घाबरले. असे जर नवे नवे विरोधी नेते उगवले तर आमच्या म्हाताऱ्या कॉन्ग्रेसचं काय होणार? मग त्यांनी वेगळी गाडी सोडली - 'छात्रों की गूंज' .

प्रामाणिकपणे अभ्यास करून मोठ्या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत होते हे कधी या नवनेत्यांना दिसले नाही. समाजातील सडकी प्रवृत्ती /व्यवस्था दिसली नाही. 


नीटचा बट्याबोळ झाला का? हो.

ते गंभीर होते का? हो, २१ मुलांनी आत्महत्त्या करण्याएवढे गंभीर

मंत्र्याने जबाबदारी घेतली का? नाही. 

यावर आवाज उठवला तर काय होईल?

... पोलीस बळाचा वापर, आंदोलकांना मारहाण, त्यांच्याकडे अगदी टोकाची परिस्थिती उद्भवल्याशिवाय साधी चर्चाही न करणे. शिवाय चर्चेला काहीही संबंध नसलेला माणूस पाठवणे, मंत्र्याने कसलेही उत्तर न देणे... 

हे सगळे म्हणजे

- आता लोकांचे ऐकले नाही, संवेदना नसली तरी चालते कारण निवडणूका आपणच जिंकणार यामुळे आलेली मस्ती आहे. इथले प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाचे एक अतुलनिय यश ठळकपणे लक्षात येते. ते म्हणजे सर्वसाधारण माणसाची सारासार विचार करण्याची शक्तीच मारून टाकणे! हा माणूस आता हिंदू, राम इ. करत बिनबोभाट यांना मते देत राहणार व लोकशाही व्यवस्था अशाच सडत जाणार. त्याला ईलाज नाही. पुढच्या काळात जनतेला कोणत्याही गोष्टीला विरोध करताच येणार नाही. जे थोडेबहुत आवाज उठवू पाहतील त्यांना बुध्दीभेद झालेले लोक परस्परच गप्प बसवतील आणि आपल्या महानेत्याच्या पालख्या उचलत राहतील. हे अटळ आहे.


In reply to by स्वधर्म

प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करून विद्यार्थ्यांचे कोणते कल्याण करणार होती तुमची झुरळे?

या झुरळांना अजून चांगल्या प्रकारे चिरडून टाकायला हवे आहे. 
 


In reply to by कांदा लिंबू

मी लिहिलेले
>> ... हा माणूस आता हिंदू, राम इ. करत बिनबोभाट यांना मते देत राहणार व लोकशाही व्यवस्था अशाच सडत जाणार.

 

त्यावर कांदा लिंबू यांनी लिहिलेले
>>> प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करून विद्यार्थ्यांचे कोणते कल्याण करणार होती तुमची झुरळे?

 

मी लिहिलेले खरे असल्याची पावती ताबडतोब देऊन टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 


In reply to by स्वधर्म

मी लिहिलेले खरे असल्याची पावती ताबडतोब देऊन टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करून विद्यार्थ्यांचे कोणते कल्याण करणार होती तुमची झुरळे?

या झुरळांना अजून चांगल्या प्रकारे चिरडून टाकायला हवे आहे.

 


In reply to by कांदा लिंबू

ते नीटचे व्यवस्थापन करत होते अगर शिक्षणमंत्री होते अगर सत्ताधारी पक्षात होते, अशी कोणतीही माहिती नसल्याने झुरळांकडून त्यांचा अपमान होण्याचा संभव नाही. पण तुंम्ही म्हणत असाल तर यापैकी कोणती जबाबदारी त्यांनी घेतली होती ते सांगितले तर बरे होईल. 

 

 


In reply to by स्वधर्म

जेव्हा विरोधी पक्षच पूर्णपणे  निरूपयोगी स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभे असतात तेव्हा सत्ताधारी उन्मत्त होणारच. कोणालाही मत देऊन निवडून आणा, तो किंवा ती  स्वतःला विकून सत्ताधारी पक्षात जातील हे आता निश्चित झाले आहे. 

 

आता तर या विकाऊ विरोधी नेत्यांना कोणत्या पक्षाने विकत घ्यावे हे सुद्धा स्वतःच ठरवितोय. काही जणांना स्वतः विकत घेतो, काही जणांना शिंदे गटात पाठवून देतो, काही जणांना अजित पवार गटात पाठवून देतो, काही जणांना एखाद्या वेगळ्याच पक्षात पाठवून देतो. त्यात भर म्हणून शरद पवारांसारखे विरोधी गटात बसलेले ट्रोजन अश्व आहेतच. 

 

सत्ताधारी अत्यंत माजलेले आणि जनतेसंबंधात संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत हे १०० टक्के सत्य आहे, पण जो पर्याय आहे तो सुद्धा पूर्णपणे निरूपयोगी व ठिसूळ आहे हे सुद्धा १०० टक्के सत्य आहे. 

 

सरकारने विद्यार्थी आंदोलन अत्यंत अयोग्य पद्धतीने हाताळले यात अजिबात शंका नाही. परंतु यातून काहीही धोका नाही आणि धोका दिसला तर तो चिरडून टाकता येईल किंवा पैसे फेकून बंद करता येईल हा आत्मविश्वास त्यामागे आहे.

 

अत्यंत निरूपयोगी व विकाऊ विरोधी पक्ष, अत्यंत उन्मत्त व अनिर्बंध सत्ताधारी यामुळे यापुढे भविष्यात निवडणुकीत मत द्यायला जाऊन मत व वेळ व्यर्थ खर्च करायचा नाही हा निश्चय केलाय. ते एस आय आर म्हणून काहीतरी आहे त्याकडे मी ढुंकूनही लक्ष दिले नाही. माझं नाव मतदारयादीत नसलं तरी मला पर्वा नाही कारण मत देऊनही काय मिळतंय हे समोर दिसतंय.

 

मोदींनी आपल्या पहिल्या ५ वर्षात बरेच चांगले निर्णय घेतले. अर्थात काही अत्यंत चुकीचेही निर्णय होते. आपल्या दुसऱ्या पंचवार्षिक कारकीर्दीत, विशेषतः कोरोना उद्रेकानंतर, त्यांची गाडी रूळावरून पसरण्यास प्रारंभ झाला. तिसऱ्या पंचवार्षिक कारकीर्दीत ही घसरलेली गाडी वेगवेगळ्या दिशेने भरकटत आहे व काही काळाने ती पूर्ण दिशाहीन होऊन एकाच जागी ठप्प होईल असे सध्यातरी चिन्ह दिसत आहे. परंतु तरीही ते निर्भयपणे वावरत आहेत कारण विरोधकच व पर्यायाने पर्यायच समाप्त झाले आहेत. यापुढे यापेक्षा जास्त मनमानी, गोंधळ, अराजक पहायला मिळेल, परंतु सत्ताधारी पक्ष निवांत आहे कारण आता त्यांना विचारणारे कोणी शिल्लक नाहीत व ते कोणालाही उत्तरदायी नाहीत.

 

अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने केवळ स्वयंप्रगतीवर लक्ष केंद्रित करावे. आंदोलने, मतयंत्रातून सरकार बदलणे यात सहभागी होऊ नये. आंदोलने, निवडणुका यातून सरकार बदलण्याचा काळ संपुष्टात आला आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

काहीच महिन्यांपूर्वी मोदी कसे कुणाकडेच ढुंकूनही बघत नाहीत. त्यांची तपपूर्ती इ. लेख लिहिणाऱ्या आयडीला हळू हळू अंधुक का असेना पण दिसू लागले त्याबद्दल अभिनंदन.


In reply to by श्रीगुरुजी

अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने केवळ स्वयंप्रगतीवर लक्ष केंद्रित करावे. आंदोलने, मतयंत्रातून सरकार बदलणे यात सहभागी होऊ नये. आंदोलने, निवडणुका यातून सरकार बदलण्याचा काळ संपुष्टात आला आहे. 

गेल्या दहा हजार वर्षातील एकामेव महान विचार.

आता कळाले काश्मिरमधून पंडितांनी पलायन का केले. असेच सल्ले मिळाले असतील त्यांना.


In reply to by श्रीगुरुजी

मिपावर आल्यापासून आजपर्यंत वाचलेला हा एपिक प्रतिसाद.

स्वयंप्रगती....

Wow......


In reply to by स्वधर्म

Tiananmen
by James Fenton


Tianamen
Is broad and clean
And you can’t tell
Where the dead have been
And you can’t tell
What happened then
And you can’t speak
Of Tianamen.

You must not speak.
You must not think.
You must not dip
Your brush in ink.
You must not say
What happened then,
What happened there.
What happened there
In Tiananmen.

The cruel men
Are old and deaf
Ready to kill
But short of breath
And they will die
Like other men
And they’ll lie in state
In Tianamen.

They lie in state.
They lie in style.
Another lie’s
Thrown on the pile,
Thrown on the pile
By the cruel men
To cleanse the blood
From Tianamen.

Truth is a secret.
Keep it dark.
Keep it dark.
In our heart of hearts.
Keep it dark
Till you know when
Truth may return
To Tiananmen.

Tiananmen
Is broad and clean
And you can’t tell
Where the dead have been
And you can’t tell
When they’ll come again.
They’ll come again
To Tiananmen.
 

१९८९ मध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चीन सरकारने रणगाडे घातले होते... 


भाजप चा मतदार असूनही खेदाने म्हणावे लागत आहे की सध्या सरकार अतिशय माजलेल्या मूड मध्ये आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधीच घेतला असतं तर ही वेळ आली नसती. आता जगभर नाचक्की होत आहे भारताची. 
चीन च्या तियानमेंन ची आठवण आली (तेवढेच बाकी आहे आता )


In reply to by उपेक्षित

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधीच घेतला असतं तर ही वेळ आली नसती. - हे खरे असेल तर चांगलेच आहे. बाकी ही वेळ आली आहे/ कुणी आणली आहे/ की कुणी कुणाच्या ईशाऱ्यावरून ती आणू पाहतो आहे हे सहजासहजी समजणार नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो या न्यायाने प्रधान यांचा राजीनामा घेणे सरकार टाळत असावे.

बाकी अमेरिकेतून प्रकट झालेल्या नेत्याचे जे 'अवतार कार्य' सुरू झालेले आहे, त्या मागची 'दैवी योजना' नेमकी काय आहे हा कळीचा प्रश्न आहे.


राहुल गांधीचे काहीतरी तिसरंच सुरु झालंय!

अरे, सत्तेतले माजलेले

 विरोधी पक्षातले

उशीरा -अधून मधुन जागणारे....

झूरळ तर झूरळ लोकांना त्यांचा आवज हे राजकारणी कधीच मिळू देणार नाही...... नमो गावाला रागी नावाला...


देशात ज्या पद्धतीने सरकार वागते आहे, ते अतिशय चुकीचे असले तरी जशी जनतेची लायकी तसेच सरकार त्यांच्या माथी बसलेले आहे...

 

बाकी मिपावरील प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले नाहीच...  कीव वाटली 


In reply to by गणेशा

खरंच! काय बोलावं कळत नाही असले प्रतिसाद पाहिले की! 


"श्रीरामाचा अपमान, आजवर कॉपी होत होती तेव्हा झोपले होते का, एकत्रच RIP लिहावं असं वाटणं"

कांग्रेस वि. भाजपा हा गेम सतत खेळल्यामुळे बहुतेकांना त्या गेममधेच राहायची सवय झाली असावी.  आधी  तुमचा तो मोबाईल जाळून टाका. 

एखाद्या विद्यार्थ्याशी जरा बोला.. १८-२० च्या वयात स्वप्नांचा बट्ट्याबोळ पहावा लागला तर पोरं पेटणार नाहीत?
 

पुढे मागे तुमची पोरं, नातवंडं पतवंडं वगैरे जेव्हा विचारतील की "हे असलं सगळं मातेरं चालूं होतं तेव्हा तुम्ही काय करत होता?" तर निर्लज्जपणे हसून "आम्ही भाजपा कॉग्रेस   खेळण्यात दंग होतो" असं सांगायची तयारी ठेवा.
 

 

 


अश्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने केवळ स्वयंप्रगतीवर लक्ष केंद्रित करावे. आंदोलने, मतयंत्रातून सरकार बदलणे यात सहभागी होऊ नये. आंदोलने, निवडणुका यातून सरकार बदलण्याचा काळ संपुष्टात आला आहे. 

मध्यमवर्ग बहुतांशी हेच करत आला होता आणि म्हणूनच त्याला काही अशा होती. पण सध्याचे सत्ताधारी इतके उन्मत्त झाले आहेत कि जे काही शक्य आहे ते ओरबाडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. काश्मिरी पंडित किमान निर्वासित म्हणून दिल्लीत आले. पण संपूर्ण देशाच्या पातळीवर हे घडत गेल्यास काय करावे ? 

 


आम्ही पण आहोत हे आता दाखवलं नसतं तर वांगचुक आणि दिपके शिरोमणी झाले असते हे शेवटी प्रिया आणि राहुलच्या लक्षात आलं. खरगेच्या घरी छात्रों की गूंज गाडी टाकून गेले जंतरमंतरला.


In reply to by कंजूस

मूर्खपणा केला!!

 नाही तेव्हा सगळ्या आंदोलनाला हेच विरोधक सपोर्ट करतात. वीस दिवस कोणी सपोर्ट केला नाही. कालचे यश पाहता आले पोळी भाजायला. या आधीपासून cjp कडे भेटायला गेले असते तर सगळे एकत्र आले असते तर राजकीय नेत्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला असता का??


In reply to by Bhakti

राहुल गांधी आले किंवा नाही आले, यावरून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला असता किंवा झाला ननसत  असे म्हणणे चुकीचे आहे.

माझ्या मते, राहुल गांधी यांची या प्रकरणातील भूमिका तुलनेने संयमी आणि सेन्सिबल वाटते.

उलट विचार केला तर, जर ते आधीच तिथे गेले असते, तर "विद्यार्थ्यांचे आंदोलन काँग्रेसच्या पाठिंब्याने चालत आहे" असा आरोप विरोधक आणि त्यांच्या समर्थकांनी लगेचच केला असता. राजकीय पोळी भाजायचीच असती, तर ती तेव्हाच भाजली गेली असती.

दुर्दैवाने, आपल्या देशात अनेकदा एखाद्या व्यक्तीची प्रतिमा जाणूनबुजून मलीन करण्यासाठी विशिष्ट नॅरेटिव्ह तयार केले जातात आणि ते मोठ्या प्रमाणावर पसरवले जातात.

पण आता तरी लोकांनी वस्तुस्थितीकडे पाहिले पाहिजे.

राहुल गांधी "पप्पू" नाहीत...
खरा प्रश्न "गप्पू" कोण आहे, हा आहे, आणि मला तर वाटते गप्पू च पप्पू आहे 


In reply to by गणेशा

नो डाउट गप्पू ला सगळे कंटाळले आहेत. पण रागा ३ -३ टर्म दुसऱ्याला देतांना केवळ घराणेशाहीमुळेच टिकला आहे. ह्या आंदोलनाला सपोर्ट केला असता तर नक्की योग्यच दिसले असते.इतकाही संयम कामाचा नाही, ऍक्शन हवीच!


In reply to by Bhakti

पोलिसांनी लाठी हल्ला केला असता का??

 

 मोर्चा संसदेवर चालून गेला म्हणून  पोलिसांनी लाठी हल्ला केला. जंतर मंतर मध्ये केला नव्हता.

संसदेवर हल्ला केलेला चालेल का आपल्याला?   


In reply to by सुबोध खरे

ज्यांना संसदेत मत देऊन पाठवल, तेच मूग गिळून गप्प आहेत. ना पत्रकार परिषद घेतात ना समोर येऊन माफी मागतात.हे तुम्हांला चालल??


In reply to by Bhakti

म्हणून संसदेवर चालून जायचं?

उद्या काश्मीरचे फुटीरवादी म्हणतील सरकार आमच्या शी चर्चा करत नाही  तर आम्ही संसदेवर चालून जातो.

बढिया है!    


In reply to by कंजूस

राहूल गांधी हे कायम संसदेत आणि संसदेबाहेर  विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतात . मेनस्ट्रीम मिडीया  त्यांची आंदोलने आणि विद्याथ्यांबरोबर केलेला संवाद दाखवत नाही. दिपके सारखा माणूस विरोधी पक्ष विद्यार्थ्यांचे प्रश्न विरोधी पक्ष मांडत नाही असे आंदोलनापूर्वी म्हणत होता. हायजॅक वगैरेकाही नाही , शेवटी संसदेत राहूल गांधीच सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकतो , दिपके नाही .  


In reply to by कंजूस

कंजूस काका, 

मग इतक्या दिवस शिरोमणी का नाही झाले? आणि मग इतक्या दिवसांनी राहुल गांधी नी पोळी भाजली म्हणतायेत. मग आधी तर तुमच्या सारख्या अनेक लोकांनी काय काय वर्तवले असते माहिती नाही..

 

असो..

आंदोलन हे काँग्रेस, राहुल, यांचे नाहीच.. ते आहे देशातील लोकांचे.. त्यांचे प्रश्न आणि मागण्या या वर न बोलता आपण नक्की कुठले मुद्दे बोलत आहोत तेच कळत नाही..

 

 

मिपा वर चर्चा न करावी इतपत आता मन आले आहे.. सिसारी येते आजकाल काहींची एकच बाजू कायम धरून ठेवलेली पाहून 


In reply to by गणेशा

आंदोलन हे काँग्रेस, राहुल, यांचे नाहीच.. ते आहे देशातील लोकांचे..

मग तेच तर काँग्रेसने काँग्रेसच म्हणून वेगळे आंदोलन करायची गरज नव्हती, लोकांना इधर चला मै उधर चला असे होते.एकच मुद्दा होता राजीनामा तर दीपकेला सपोर्ट करायला हरकत नव्हती.


वीस तारखेच्या अमानुष लाठीमाराचे व्हीडीयो सध्या माध्यमांवर फिरत आहेत. वेदनादायी आहे सगळं. काहीही लिहावे-बोलू नये असे वाटावे अशी अवस्था  आहे. नीटची  परीक्षा नीट घेऊ असे आश्वासन दिले असते, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता तर, सरकारचं असं कोणतं नुकसान होणार होतं. आता काहीही लिहावे बोलावे वाटत नाही. 

श्रीगुरुजींचा प्रतिसाद आवडला.  

 

-दिलीप बिरुटे


 


नवीन अभ्यासक्रम येणार आहे. आणि त्यामुळे क्लास वाले वगैरेंचे बरेच नुकसान होणार आहे.

त्यामुळे हे आंदोलन चालू आहे. अशी एक पोस्ट फे बु वर फिरत आहे.


https://timesofindia.indiatimes.com/india/no-legal-action-against-cjp-protesters-wangchuk-sets-condition-to-end-hunger-strike/articleshow/132558606.cms
हीराकाकांचे उपोषण आता फक्त या अटीवर येऊन थांबलंय. 

कुणालाही कितीही वाईट वाटू दे. पण ज्या माणसाला कोर्टाने सुद्धा NSA मधून सूट दिली नाही आणि जो माणूस देशाचा नेपाळ किंवा बांगलादेश करा असे आवाहन करत होता त्यावर आता विश्वास बसणे अवघड आहे. तो कितीही हुशार असेल तरी. 

 


आज सुरू असलेल्या आंदोलनाच्या बाबतीत हा प्रश्न पडलेला नाही. हा प्रश्न नेहेमीच पडतो, आणि त्याचे उत्तर देता येत नाही.

घटनेत किंवा कायद्यात आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्या जबाबदऱ्या आणि उत्तरदायित्व याबद्दल काही विवेचन केलेले असेल, चौकटी आखून दिलेल्या असतील तर ती माहिती जनसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे. असो.

 


मागं पुण्यात कर्नल चितळ्यांनी तरुणांना हाताशी धरून संसद ताब्यात घेऊन उपस्थित सर्व खासदारांचं शिरकाण करण्याचा संकल्प केला होता त्याची आठवण झाली.


कॉंग्रेस असो, कोक्रोच जनता पार्टी असो, सोनम असो, राहुल गांधी असोत किंवा इतर कोणताही नेता यांच्या भूमिकांबद्दल मतभेद असू शकतात.

पण हे सगळं एका वेगळ्या विषयाचं आहे.

तिथे गेलेली कोवळी मुलं-मुली खरी होती. त्यांच्या मागण्या खऱ्या होत्या. त्यांच्यावर झालेला लाठीमार आणि त्यांना पोलिसांकडून, पर्यायाने सरकारकडून मिळालेली वागणूक  चूक होती 

राजकारण बाजूला ठेवून जर हे चुकीचं आहे असंही म्हणता येत नसेल, तर मग खरंच कोणत्या विचारांच्या आणि कसल्या माणसांच्या सहवासात आपण आहोत, हा प्रश्न स्वतःलाच विचारावा लागेल.

मतभेद असू द्या. राजकीय भूमिका वेगळ्या असू द्या. पण जे चुकीचं आहे, त्याविरोधात किमान एक शब्द तरी बोलण्याचं नैतिक धैर्य असावं.

एखाद्या पक्षाची किंवा नेत्याची अंधभक्ती करताना प्रत्येक चुकीचं समर्थन करणं, सत्याकडे पाठ फिरवणं आणि केवळ कोणाच्यातरी तळवे चाटण्यासाठी विवेक गहाण ठेवणं यापेक्षा मोठी गुलामी दुसरी कोणती?

अशा अंधसमर्थनाचा धिक्कार.

- गणेश जगताप

(शेवटचा प्रतिसाद या धाग्यावरती )


कॉपी करून पास व्हायची इच्छा धरणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. आता  वाममार्गाने  उत्तम गुण मिळवण्याकडे कल वाढला आहे. काही पालकांनी आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करायची तयारी ठेवली होती. मागणी वाढली की पुरवठादार उगवतात.


In reply to by कंजूस

आपले सरकार ही मागणी पूर्ण करण्यात कुठेही कमी पडत नाही.


मोर्चा संसदे पर्यंत जात असेल तर पोलिसांनी काय करायला पाहिजे होते?

आपलीच कोवळी पोर आहेत म्हणून बघ्याची भुमीका घायला पाहिजे होती का?


In reply to by रात्रीचे चांदणे

रात्रीचे चांदणे,

 

एकदम सटीक. जंतरमंतरवर जे आंदोलन चालू होते तिथे काहीही गडबड झालेली नाही. तिथून एकदीड किमी अंतरावर संसद भवन आहे. संसदेवर चालून गेलेल्या गावगुंडांवर लाठीमार झाला आहे. शांतपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नाही.

 

जो कोणी जंतरमंतर सोडून इतरत्र आंदोलन करतो तो गावगुंडच धरला पाहिजे. मग तो स्वत:स विद्यार्थी म्हणवून घेत असला तरीही.

 

आ.न.,

-गा.पै.