नमस्कार मित्रहो.
नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा.
पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी, ग्रंथालये अशा अनेक रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र विखुरलेल्या आहेत.
– बहुतांश पर्यटकांसाठी अपरिचित असणाऱ्या अश्या जागांबद्दल लवकरच एक लेखमाला मी सुरु करणार आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
963
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! पोहोचलात का पॅरिसला…
अरे वा! पोहोचलात का पॅरिसला. यावेळी भेटायला जमले नाही.
मस्त लेखमाला लिहा. त्याआधी मोनालिसावरील अपूर्ण लेखमाला पूर्ण करा.
त्याआधी मोनालिसा ....
In reply to अरे वा! पोहोचलात का पॅरिसला… by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, मोनालिसावरील लेखमालेचा पाचवा भाग लिहीण्याचे गेली पाच-सहा वर्षे राहून गेलेले आहे. मुळात ती कथा संपूर्णपणे काल्पनिक, त्यातून असा दीर्घ खंड पडल्यामुळे पुढील कथा सुसुत्रपणे सुचत जाणे कठीण झाले होते, म्हणून आता उलटे करण्याचे ठरवले, म्हणजे आता निदान पॅरिस भटकंती आणि काहीतरी लिहीणे सुरु करायचे, मोनालिसा कथेशी संबंधित जागांवर जायचे, दा विंचीची चित्रे बघायची, पॅरिसमधल्या भव्य ग्रंथसंग्रहालयातली पुस्तके चाळायची, यातून पुढली कथा सुचत जाईल असे वाटते आहे.
त्या अपूर्ण कथेची अजून रसिक वाचकांना आठवण आहे, हा विचार सुद्धा प्रेरणादयक आहे.
व्वा....! लेखमालेची वाट…
व्वा....!
लेखमालेची वाट पाहात आहे. लवकर लिहा.
लेखमालेला शुभेच्छा काकासाहेब…
लेखमालेला शुभेच्छा काकासाहेब! खूप पॅरिस फिरा फोटो टाका, आम्हालाही फिरवा!
लुव संग्रहालयास भेट देणार…
लुव संग्रहालयास भेट देणार आहात का? आता प्रवेशशुल्क बरेच वाढविल्याचे वाचनात आले. संग्रहालयापासून चालत जाण्याच्या अंतरावर एका लहानशा उद्यानात "The Thinker" हा विचारमग्न पुरूषाचा पुतळा आहे. जमल्यास तो पाहून या.
खूप आधी काढलेला
In reply to लुव संग्रहालयास भेट देणार… by श्रीगुरुजी
हा विचार करतोय? अस वाटतय…
In reply to खूप आधी काढलेला by निपा
हा विचार करतोय? अस वाटतय काहीतरी घोडचूक करून बसलाय नी आता कपाळावर हात मारतोय!
हा नाही तो पुतळा. तो पुतळा…
In reply to खूप आधी काढलेला by निपा
हा नाही तो पुतळा. तो पुतळा असा आहे.
लूव (लूव्र ?) चा वार्षिक पास घेतला आहे
या संग्रहालयाचे एका दिवसाचे तिकीट आता ३२ युरो झाले आहे, परन्तु वर्षभराचा पास ९३ युरो असल्याने तो घेतो आहे. तसेच दर महिन्याला बस + मेट्रो + ट्राम (अमर्याद भ्रमंती) पासही घेत राहीन (प्रतिदिन: 12.30€, साप्ताहिक: 32.40€, आणि मासिक 90,80€)
दोन वर्षांपूर्वी लुव…
In reply to लूव (लूव्र ?) चा वार्षिक पास घेतला आहे by चित्रगुप्त
दोन वर्षांपूर्वी लुव संग्रहालयास भेट दिली होती. अगदी आयत्यावेळी प्रवेशपत्रिका घेतली, तेव्हा ३९.७० युरो प्रत्येक प्रवेशपत्रिकेसाठी द्यावे लागले होते. पण त्याचे दु:ख नाही. लुव संग्रहालय हा अविस्मरणीय अनुभव आहे.
मी देखील ३ वर्षाधी गेलो होतो…
In reply to लूव (लूव्र ?) चा वार्षिक पास घेतला आहे by चित्रगुप्त
मी देखील ३ वर्षाधी गेलो होतो, इतक मोठ संग्रहालय आहे की पाहून पाहून थकतो. बाकी पायी खूप फिरलो पॅरिस, सकाळी आठ ते रात्री १० सतत ४ दिवस.
"पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर…
"पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात"
नका हो ठेऊ इतका सन्कुचित दृष्टिकोन ! किमान काही आगळ्या वेगळ्या वारुणी (शाम्पेन जी आता कुठल्याही विजयोत्सवासाठी अपरिहार्य, कोनॅक इ.इ.) आणि चीज, क्रॉस्सॉ (लिहिण्याप्रमाणे उच्चारायचे असल्यास क्रॉइस्सान्ट) सारखे अस्सल फ्रेन्च खाद्यपदार्थ हे कसे काय नाही आठवत? 😊
किमान काही आगळ्या वेगळ्या…
असंख्य प्रकारचे क्रेप्स विसरलात का ? 😀
फक्त पॅरिसच का ?
कंट्रीसाईड फार सुंदर आहे ... जमलं तर Annecy या टाऊनला नक्की भेट द्या, मला फार आवडलेलं ... Lively without feeling packed.
हो. मी बोन (Beaune) या…
In reply to किमान काही आगळ्या वेगळ्या… by पर्णिका
हो. मी बोन (Beaune) या पॅरीसपासून (खरं तर पारीपासून) एक दीड तास अंतरावर असलेल्या एका गावात गेलो होतो. खूप सुंदर गाव आहे.
बोन (Beaune) ची नोंद करून…
In reply to हो. मी बोन (Beaune) या… by श्रीगुरुजी
बोन (Beaune) ची नोंद करून ठेवतेय.
असंख्य प्रकारचे क्रेप्स…
In reply to किमान काही आगळ्या वेगळ्या… by पर्णिका
असंख्य प्रकारचे क्रेप्स विसरलात का ?
मुळीच नाही, पण आठवणीने लिहिलेच पाहिजेत असे इतके खाद्यपदार्थ (आणि पेये) आहेत की कुठे तरी ती यादी थोपवावी लागते.
आता उदाहरणार्थ पहा: ज्याला आपण फक्त कोणचीतरी ब्रॅन्डी असे म्हणू त्याच पेयाला फ्रेन्च लोक (मला माहित असेलेली किमान दोन नावे) Cognac and Armagnac असे दोन पर्याय देतात आणि त्याखेरीज V.S. (Very Special), V.S.O.P. (Very Superior Old Pale),
Napoléon, X.O. (Extra Old) आणि X.X.O. (Extra Extra Old) असे अनेक दर्जे देखील ठरवतात. लिहावे तरी काय काय?
अगदी सहमत... किंबुहना…
In reply to असंख्य प्रकारचे क्रेप्स… by शेखरमोघे
अगदी सहमत... किंबुहना युरोपमधील फूड फार आवडतं.
जेन झी पब्लिक मात्र pancakes and hash browns शिवाय कसेबसे दिवस काढतात. 😂
लेखमालेच्या प्रतिक्षेत ... …
लेखमालेच्या प्रतिक्षेत ... लवकर घडवा पारीची सहल.
मला तीसरी एक गोष्ट आठवते.
पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच.....
मला तीसरी एक गोष्ट आठवते. श्रावण घेवडा,
याचा व फ्रान्स चा काही संबध आहे का?
लेख मालेच्या प्रतिक्षेत.
अरे वाह !
लिहा....!
-दिलीप बिरुटे
माझी बायको अणि मी ट्रिप plan…
माझी बायको अणि मी ट्रिप plan केली आहे. 4 दिवस पॅरिस अणि नंतर 4 दिवस rent a car घेऊन Normandy area. Popular आणि offbeat combination. तुमच्या suggestions चा फायदा करून घ्यावा म्हणतो. पु भा प्र
@ तिता: कलेची आवड कितपत आहे, त्यावरून ठरवता येईल.
In reply to माझी बायको अणि मी ट्रिप plan… by तिता
पॅरिसमधे चित्रकला, मूर्तीकला, वास्तुकला यांचे खजिने आहेत. ते सगळे नीट बघायला पुष्कळ दिवस हवेत. तुमची आवड- निवड कळवा म्हणजे सुचवू शकेन.
सध्या गुडघा दुखत असल्याने मला जरा सावकाशीने फिरावे लागेल, त्यामुळे लेखन पण हळूहळू होईल. तुम्ही केंव्हा येणार आहात पॅरिसला ?
14 - 18 September
In reply to @ तिता: कलेची आवड कितपत आहे, त्यावरून ठरवता येईल. by चित्रगुप्त
14 - 18 September
आम्हाला कलेची आवड आहे पण…
आम्हाला कलेची आवड आहे पण सखोल ज्ञान नाही. Museums ची entry fee पण मजबूत असते. आम्ही Louvers बघू पण बाकीचे Skip करू.
आम्हाला Paris चा feel येईल असे भटकायला आवडेल- iconic जागा, सोशल development, local food - fine dining नाही.
काही जागा राहून कळतात पण published itinerary मध्ये नसतात.
तुम्ही suggestions दिल्या तर मला ठरवता येऊ शकेल. चर्चा इथेच केली तर कुणाची हरकत नाही असे assume करतोय.
चित्रगुप्त काकांनी आखून…
चित्रगुप्त काकांनी आखून दिलेल्या प्लान नुसार पॅरिस मनसोक्त भटकून झाले होते! कमी वेळात भरपूर वास्तू, म्यूजियम पाहून झाले. ❤️
काका साहेबांचे धन्यवाद. त्यांनी अगदी कुठल्या वास्तूला काय उच्चारावे हे देखील सांगितले त्यामुळे फ्रेंच चा ओ का ठो न कळणाऱ्या मला बरेच सोपे गेले पॅरिस!