Skip to main content

कट्टा

पॅरिसमधील मिपाकर आणि अपरिचित पॅरिसबद्दल आगामी लेखमाला.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 29/05/2026 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मित्रहो.

नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो  असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा. 

पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी,  ग्रंथालये अशा अनेक  रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र  विखुरलेल्या आहेत. 

बिटरगाव - जंगी महाकट्टा आवतान

लेखक प्रिन्सदादा यांनी सोमवार, 11/07/2016 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, लगा हितं लय कट्टे, महाकट्टे चाल्लेले बगून पोरं म्हनली, दादा आपन का भरवत नाय एक कट्टा वो. आता मी पन विचार केला, असा पन एवडा मोट्टा कट्टा गावात आमच्या तात्यानी बांदून ठिवलाय, तित म्हातारी कोतारी तंबाकू मळत बसत्यात, तर जरा सांस्क्रुतिक आसं काम पन हुइल. मग कार्येकर्त्यांच्या आग्रेवाला मान देवून आता आमी पन आमच्या गावात महाकट्टा करायचं ठरवलेलं हाये. आनि जरी पोरं सगळी यवस्था बगत आसली तरी आपले माननीय मित्र आनि मिपाकर आवरजून यावेत म्हनून आपुन स्वता (स्वत्ता बरका) आमंत्रन देन्यासाटी आलेलो आहे.

दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५

लेखक खटपट्या यांनी मंगळवार, 16/06/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो. तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे. या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये.