Skip to main content

पॅरिसमधील मिपाकर आणि अपरिचित पॅरिसबद्दल आगामी लेखमाला.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 29/05/2026 07:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मित्रहो.

नुक्ताच पॅरिसमधे दाखल झालेलो  असून यावेळी दीर्घ मुक्काम करण्याचा विचार आहे. पॅरिस शहरात किंवा आसपास थोडेतरी मिपाकर असतील असे वाटते. तुम्ही जर यापैकी असाल किंवा तुमच्या माहितीत तसे कुणी असेल तर अवश्य कळवा. 

पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात. परंतु अनेक ऐतिहासिक जागा, संग्रहालये, उद्याने, लेखक - कलावंत - शास्त्रज्ञ - तत्वचिंतक, राजे-राण्या इत्यादिकांची स्मारके, इमारती, पूल, भुयारे, दफनभूमी,  ग्रंथालये अशा अनेक  रोचक गोष्टी या शहरात सर्वत्र  विखुरलेल्या आहेत. 

– बहुतांश पर्यटकांसाठी अपरिचित असणाऱ्या अश्या जागांबद्दल लवकरच एक  लेखमाला  मी सुरु करणार आहे. 


वाचने 412
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अरे वा! पोहोचलात का पॅरिसला. यावेळी भेटायला जमले नाही. 

 

मस्त लेखमाला लिहा. त्याआधी मोनालिसावरील अपूर्ण लेखमाला पूर्ण करा.

 

 


In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, मोनालिसावरील लेखमालेचा पाचवा भाग लिहीण्याचे गेली पाच-सहा वर्षे राहून गेलेले आहे. मुळात ती  कथा संपूर्णपणे काल्पनिक, त्यातून असा दीर्घ खंड पडल्यामुळे  पुढील कथा सुसुत्रपणे सुचत जाणे कठीण झाले होते, म्हणून आता उलटे करण्याचे ठरवले, म्हणजे आता निदान पॅरिस भटकंती आणि काहीतरी लिहीणे सुरु करायचे, मोनालिसा कथेशी संबंधित जागांवर जायचे, दा विंचीची चित्रे बघायची, पॅरिसमधल्या भव्य ग्रंथसंग्रहालयातली पुस्तके चाळायची, यातून पुढली कथा सुचत जाईल असे वाटते आहे. 

त्या अपूर्ण कथेची अजून रसिक वाचकांना आठवण आहे, हा विचार सुद्धा प्रेरणादयक आहे. 


लुव संग्रहालयास भेट देणार आहात का? आता प्रवेशशुल्क बरेच वाढविल्याचे वाचनात आले. संग्रहालयापासून चालत जाण्याच्या अंतरावर एका लहानशा उद्यानात "The Thinker" हा विचारमग्न पुरूषाचा पुतळा आहे. जमल्यास तो पाहून या.


या संग्रहालयाचे एका दिवसाचे तिकीट आता ३२ युरो झाले आहे, परन्तु वर्षभराचा पास ९३ युरो असल्याने तो घेतो आहे. तसेच  दर महिन्याला बस + मेट्रो + ट्राम (अमर्याद भ्रमंती) पासही घेत राहीन (प्रतिदिन: 12.30€, साप्ताहिक: 32.40€, आणि मासिक 90,80€) 


In reply to by चित्रगुप्त

दोन वर्षांपूर्वी लुव संग्रहालयास भेट दिली होती. अगदी आयत्यावेळी प्रवेशपत्रिका घेतली, तेव्हा ३९.७० युरो प्रत्येक प्रवेशपत्रिकेसाठी द्यावे लागले होते. पण त्याचे दु:ख नाही. लुव संग्रहालय हा अविस्मरणीय अनुभव आहे.


In reply to by चित्रगुप्त

मी देखील ३ वर्षाधी गेलो होतो, इतक मोठ संग्रहालय आहे की पाहून पाहून थकतो. बाकी पायी खूप फिरलो पॅरिस, सकाळी आठ ते रात्री १० सतत ४ दिवस.


"पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच गोष्टी पटकन आठवतात"

नका हो ठेऊ इतका सन्कुचित दृष्टिकोन ! किमान काही आगळ्या वेगळ्या वारुणी (शाम्पेन जी आता कुठल्याही विजयोत्सवासाठी अपरिहार्य, कोनॅक इ.इ.) आणि चीज, क्रॉस्सॉ (लिहिण्याप्रमाणे उच्चारायचे  असल्यास क्रॉइस्सान्ट) सारखे अस्सल फ्रेन्च खाद्यपदार्थ हे कसे काय नाही आठवत? 😊

 


किमान काही आगळ्या वेगळ्या वारुणी (शाम्पेन जी आता कुठल्याही विजयोत्सवासाठी अपरिहार्य, कोनॅक इ.इ.) आणि चीज, क्रॉस्सॉ (लिहिण्याप्रमाणे उच्चारायचे  असल्यास क्रॉइस्सान्ट) सारखे अस्सल फ्रेन्च खाद्यपदार्थ हे कसे काय नाही आठवत? 😊.   

असंख्य प्रकारचे क्रेप्स विसरलात का ? 😀
फक्त पॅरिसच का ? 

कंट्रीसाईड फार सुंदर आहे ... जमलं तर Annecy या टाऊनला नक्की भेट द्या, मला फार आवडलेलं ... Lively without feeling packed. 


In reply to by पर्णिका

हो. मी बोन (Beaune) या पॅरीसपासून (खरं तर पारीपासून) एक दीड तास अंतरावर असलेल्या एका गावात गेलो होतो. खूप सुंदर गाव आहे. 


In reply to by पर्णिका

असंख्य प्रकारचे क्रेप्स विसरलात का ? 

मुळीच नाही, पण आठवणीने लिहिलेच पाहिजेत असे इतके खाद्यपदार्थ (आणि पेये) आहेत की कुठे तरी ती यादी थोपवावी लागते.

आता उदाहरणार्थ पहा:  ज्याला आपण फक्त कोणचीतरी ब्रॅन्डी असे म्हणू त्याच पेयाला फ्रेन्च लोक (मला माहित असेलेली किमान दोन नावे) Cognac and Armagnac असे दोन पर्याय देतात आणि त्याखेरीज V.S. (Very Special), V.S.O.P. (Very Superior Old Pale),  

Napoléon, X.O. (Extra Old) आणि X.X.O. (Extra Extra Old) असे अनेक दर्जे देखील ठरवतात. लिहावे तरी काय काय?  

  

 


पॅरिस म्हटले की आयफेल टॉवर आणि मोनालिसा या दोनच.....

 

मला तीसरी एक गोष्ट  आठवते. श्रावण घेवडा,  

याचा व फ्रान्स चा  काही संबध आहे का?

 

लेख मालेच्या प्रतिक्षेत.