Skip to main content

दोन नेते गुजराती

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 08/05/2026 11:28 या दिवशी प्रकाशित केले.

दोन नेते गुजराती

भलतेच करामती
कळतच त्यांना नाही
अति तेथे होते माती
 
विकासाच्या नावाखाली
दोन हजार चौदा साली
गांधी सांगून आण्णाच्या 
आग लावली बुडाखाली
 
प्रधानसेवकाच्यानंतर
एक होई चौकीदार
दुजा घेई हाती आपल्या 
बेदरकारपणे कारभार
 
सतत मुखात खोटे
घाली विदेशात खेटे
प्रचारकी बघून थाट
जनतेच्या तोंडी बोटे
 
हरभरा यांच्यामुळे
टरारून गच्च फुले
कुठे जरा खुट्ट होता 
म्हणे हे तर नेहरूमुळे
 
आधी बोलती चिन्यांना
लाल लाल डोळे हाणा
पाकिस्तानला कळेल
अशी भाषा तुम्ही द्या ना
 
पाक सारखा घुसतो 
चीन नकाशा पुसतो
व्यापाऱ्यांना सैन्यापेक्षा
एक साहसी म्हणतो
 
नोटबंदी, लॉकडाऊन
पाहिले सारे करून
हाती धुपाटणे आले
बघा हताश होऊन
 
विदेशनितीचा परिपाक
रुपयाचे गेले नाक
खोल गाळात रुतले
अर्थव्यवस्थेचे चाक
 
कोरोनात बळी गेले
सीमेवर कामी आले
अगणित देशबांधव
गर्दीत चेंगरून मेले
 
याआधी दुर्दैवी घटना
पाहिल्यात घडताना
गुजराती दोन दिसले
जबाबदारी झटकताना
 
सारे मणिपूर पेटले
उरी, पुलवामा घडले
मनाच्या बाता एकाच्या
ऐकूनी कान विटले
 
कितीतरी चरित्रहीन
बरळतात मंत्रीगण
यांच्या संगतीत स्वच्छ
माखलेले भ्रष्टाचारानं
 
आंधळा घेऊन द्वेष
धरून गोसावी वेष
निघालेत चोर दोन
विकायला सारा देश
 
पत्रकार येती कामे 
नामजप ओठी घुमे
पैशासाठी सत्तेपुढे
लाचार सारी माध्यमे
 
सहिष्णुतेचा अंत पाही
ठाऊक हे त्यांना नाही
असल्या दडपशाहीला
लोकशाहीत थारा नाही
 
- संदीप भानुदास चांदणे

वाचने 538
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अरेरे सँडी बाबा अरे अरे.

लिहिलस अगदी खरे खरे.

पण ठाऊक नाही का इथले रिवाज?

गेलास आता ब्लॅक आणि ब्लॉक यादीत.

करू नकोस असा प्रामाणिक माज.

हवे असतील प्रतिसाद तसे पुन्हा.

खरे बोलण्याचा करू नकोस गुंन्हा


आंधळ्यांना दिसतच नाही सूर्याचा प्रकाश 

प्रगतीच्या सूर्याच्या होतो त्यांना त्रास

बरर्नाल  लावून लिहितात अंधाराच्या कविता

 

 

 

 


आणि विरोधकांच्या हाती चरफडणे.

 

केली होती इंडी आघाडी

पण वेळोवेळी केली पाडापाडी.

आणखी साडेतीन वर्षं

होतील का काही घडामोडी?

 

मुस्लिम लीगबरोबर जो जाईल कुणी

तोच जिंकेल आघाडी.


दोन नेते गुजराती 

मांडून बसले ठाण

सत्ता मिळत नाही म्हणून 

कंठाशी आले प्राण

 

दोन नेते गुजराती

जणू संताजीचे घोडे

जळी,स्थळी काष्ठी पाषाणी

झाले पळता भुई थोडे

 

दोन नेते गुजराती

यांचा मिळेना काट

शंभर उंदिर खाऊन

बोक्यांचा बघा थाट

 

दोन नेते गुजराती

चोखा व्यपार जाणती

झीरो अकाऊंट मधे

सौ टका पाठवती 

 

दोन नेते गुजराती

सबका साथ सबका विकास 

हटाओ चुल्हा लगाव गॅस

खरेच किती करामती

 

दोन नेते गुजराती

ये पब्लिक है,सब जानती है

कितीही बोंबला,"संविधान खतरे मे है"

जनता नही मानती,जनता नही मानती

 

दोन नेते गुजराती

चाणक्याची जोडगोळी

फक्त दोनच दोन नाम

सँण्डी बाबाला फुटला घाम

 

(साईबाबा हलकेच घ्याल अशी अपेक्षाच)


दोन नेते गुजराती

कागदी वाघोबांची त्यांना पाहून फाटती 

ते विदूषकाचे गुण गाती

ज्याने विरोधकांची केली माती

 

भोपळा विरोधकांच्या हाती 

कारण त्यांनी जपली केवळ नातीगोती 

लाचारी केली अति 

अति तेथे माती 

 

काकांचे संस्थान बारामती 

खासदारकीसाठी गुजरात्यांना शरण जाती

केवळ अल्ला जाने

कधी संपेल विरोधकांची साडेसाती 

 


देशातील वर्तमान राजकीय स्थितीवर आणि सत्तेत असलेल्या दोन प्रमुख नेत्यांवर  अत्यंत टोकदार आणि कडू शब्दात, भक्तांच्या ढुंगनाला चिमटे घेणारे वास्तववादी भाष्य आपण आपल्या रचनेतून केले आहे.

 

 शेवटच्या ओळीतून   लोकशाहीत दडपशाहीला स्थान नसते,  हा लोकशाहीवादी आशावादही आवडला.

 

लिहीते राहा.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by कंजूस

सध्या जळफळाट संवत्सर चालू आहे.
 

ही काही आताची गोष्ट नव्हे. २०१४ पासून सुरू आहे. असे लोक इतरांना उद्देशून---

२०१४ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०१५ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०१६ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०१७ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०१८ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०१९ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२० मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२१ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२२ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२३ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२४ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२५ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

२०२६ मध्ये: भक्त भक्त भक्त.....

...................

 

त्यात नवे काहीच नाही. बंगालमधील निकाल आल्यापासून या लोकांचा अधिकच चडफडाट आणि जळफळाट होत आहे. ते पाहून असुरी का म्हणतात तो आनंद होत आहे.