Skip to main content

झालमुडी....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 04/05/2026 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,

शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.

 

कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?

जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?

 

तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,

शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!

 

"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,

पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.

 

जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,

‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.

दुत्त,दुत्त,दुत्त......

 

कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट

स्वगृही सफाई  सोडून, EC वर आरोपांची गाज !

 

 कुणावर खापर फोडावे,जनता आकळेना!

ग्यानेश्याच्या कोडी काही  सुटता सुटेना

 

कमळाबाईच्या नादाने भरली हुडहुडी,

पाच वर्षे  खा आता फक्त 'झालमुडी'!


वाचने 248
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली.

आता पेढे आणि लाडू बाद, वाटा झालमुरी भेळ.


In reply to by कंजूस

आता पेढे,लाडूला फाटा, फक्त झालमुरी वाटा......

 

धन्यवाद. 


दिदिचा पेपर रिचेकिंग ला देता येईल का? मार्क वाढतील कदाचित :)

बाकी कविता मस्त जमली आहे.