Skip to main content

सावलीतले रक्षक

लेखक ताजे प्रेत यांनी सोमवार, 20/04/2026 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये राहुल एका प्रतिष्ठित कंपनीत 'सिस्टीम आर्किटेक्ट' म्हणून काम करत होता. त्याचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. त्याला आता लवकरात लवकर 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून प्रमोशन हवे होते. पण त्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता त्याचा बॉस, राजेश सिन्हा. राजेश मूळचा बिहारचा होता, कडक स्वभावाचा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी. तो राहुलला सतत कामाचा त्रास द्यायचा.

राजेश सिन्हाबद्दल ऑफिसमध्ये अनेक कुजबुज चालायची. तो 'होमोसेक्शुअल' (समलिंगी) होता आणि आपल्या अधिकाराचा वापर करून हाताखालच्या देखण्या पुरुष कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करायचा. जे त्याच्या 'इच्छा' पूर्ण करत, त्यांना प्रमोशन मिळे; जे नाही म्हणत, त्यांचे करिअर तो बरबाद करायचा. राहुल हे सर्व जाणून होता आणि प्रचंड दडपणाखाली जगत होता.

राहुलचे आई-वडील, सुजाता आणि वसंतराव, गावी साधे शेतकरी असल्याचा आव आणत होते. राहुलला वाटायचे की त्यांनी आपल्या शिक्षणासाठी १५ लाखांचे कर्ज घेतले आहे आणि ते फेडण्यासाठी दोघेही शहरात काबाडकष्ट करत आहेत. राहुल स्वतः त्या कर्जाचे हप्ते भरत असे आणि याच गोष्टीचा त्याला अहंकार होता.

पण सत्य काही वेगळेच होते. राहुलची आई, सुजाता, प्रत्यक्षात त्याच आयटी पार्कमध्ये, ज्या इमारतीत राहुल काम करत होता, तिथे 'हाऊसकिपिंग' (साफसफाई) विभागात सुपरवायझर म्हणून काम करत होती. तिने स्वतःची ओळख लपवली होती. राहुलला एकदा ती झाडू मारताना दिसली होती, तेव्हापासून तो तिच्याकडे बघून नजरचुरावायचा आणि ऑफिसमध्ये तिला ओळख द्यायला त्याला प्रचंड लाज वाटायची.

एके दिवशी राहुलचा वाढदिवस होता. सुजाताने घरून बनवून आणलेला डबा आणि एक प्रेमाची भेटवस्तू घेऊन ती ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये राहुलची वाट बघत थांबली होती. राहुल त्याच्या टिमसोबत बाहेर चालला होता. सुजाताला तिथे बघून त्याला राग अनावर झाला.

"तुम्ही इथे काय करताय? मी हजार वेळा सांगितलंय मला भेटायला येत जाऊ नका. आणि हा कसला डबा? मला हे गावरान जेवण नकोय," राहुल आपल्या आईवर सर्वांसमोर ओरडला. त्याने तिच्या हातातली भेटवस्तू रागाने खाली फेकून दिली. सुजाता काहीच बोलली नाही, तिचे डोळे पाणावले. तितक्यात तिथे वसंतराव आले, जे त्या परिसरात सिक्युरिटी गार्डचा गणवेश घालून काम करत होते. त्यांनी राहुलला समजवण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने त्यांचाही अपमान केला. "तुम्ही दोघंही माझ्या आयुष्यातून चालते व्हा," असे म्हणून तो रागाने निघून गेला. आई-वडील मान खाली घालून तिथून निघून गेले.

दोन दिवसांनंतर, कंपनीत एका अत्यंत गोपनीय प्रोजेक्टवर काम सुरू झाले. भारत सरकारसाठी ते 'सिगरेट सॉफ्टवेअर' बनवत होते. त्यांची आयडिया अशी होती की उपग्रहावरील कॅमेरे इतके ऍडव्हान्स करायचे की माणसाच्या अंगावरील अगदी 'व्हायरस' पण स्पष्ट दिसले पाहिजेत. हे तंत्रज्ञान देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते.

रात्रीचे १० वाजले होते. राजेश सिन्हाने राहुलला उशिरापर्यंत थांबवले आणि एका विशेष, अति-सुरक्षित प्रयोगशाळेत (Lab) बोलावले. तिथे कोणीच नव्हते.

राजेशने राहुलजवळ येऊन, त्याच्या खांद्यावर हात ठेवत घाणेरड्या सुरात म्हटले, "राहुल, तुला प्रमोशन पाहिजे ना? मला तुला मदत करायला आवडेल."

राहुलला धोका जाणवला. "सर, मी माझ्या कामातून ते सिद्ध करीन," तो लांब सरकत म्हणाला.

"काम तर सगळेच करतात, राहुल. काहीतरी स्पेशल करावं लागतं," असे म्हणत राजेशने आपल्या लॅपटॉपवर एक 'मॉर्फ' केलेली (खोटी) आक्षेपार्ह क्लिप दाखवली. "जर तू आज माझं ऐकलं नाहीस, तर ही क्लिप मी व्हायरल करीन आणि तुझं करिअर, तुझं आयुष्य संपवून टाकीन."

राहुल घाबरला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो 'नाही' म्हणत रडायला लागला. पण राजेश सिन्हा, जो दिसायला तगडा आणि उंचापुरा होता, त्याने राहुलचा शर्ट पकडला आणि त्याला स्वतःकडे ओढले. राहुल हतबल झाला होता.

आणि तितक्यात, प्रयोगशाळेचा दरवाजा जोरात उघडला गेला!

झाडू आणि साफसफाईचे सामान हातात घेतलेली सुजाता तिथे उभी होती. तिचा हाऊसकिपिंगचा अवतार होता, पण तिच्या डोळ्यात मात्र अंगार होता.

"ए बुढिया, तुला कळत नाही का आत यायचं नाही? चल बाहेर!" राजेश सिन्हा तिच्यावर खेकसला.

सुजाताने काहीच उत्तर दिले नाही. ती वेगाने पुढे आली. राजेश काही समजायच्या आत, तिने आपल्या हातातला झाडू अत्यंत जोरात त्याच्या उघड्या घशात घुसवला आणि आत ढकलला!

राजेश वेदनेने किंचाळला. झाडूचा दांडा घशात गेल्याने त्याला श्वास घेता येईना. त्याने झटका देऊन सुजाताला बाजूला ढकलले आणि कसाबसा झाडू बाहेर काढला. त्याचे तोंड रक्ताने भरले होते.

तो बिहारचा असल्याने, त्याच्याकडे एक लपवलेला 'कट्टा' (गावठी पिस्तूल) नेहमी असायचा. त्याने तो कट्टा काढला आणि आई व राहुलवर रोखला. "आता तुम्हा दोघांनाही मी जिवंत सोडणार नाही!" तो गोळी घालणार, इतक्यात...

ठाssss!

एका गोळीचा आवाज झाला. पण ती गोळी राजेशने चालवली नव्हती. ती गोळी थेट राजेशच्या पिस्तुलाच्या बॅरलमध्ये घुसली आणि त्याचे पिस्तूल त्याच्या हातातच फुटले! राजेशचा हात रक्तबंबाळ झाला आणि तो कळवळीने खाली पडला.

राहुलने थरथरत बघितले, "हा नेमबाज कोण?"

दरवाजात वसंतराव उभे होते. त्यांच्या हातात एक अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर होती आणि त्यांचा चेहरा आता साध्या सिक्युरिटी गार्डचा वाटत नव्हता.

वसंतराव पुढे आले आणि राजेशच्या छातीवर पाय ठेवून म्हणाले, "राजेश सिन्हा, तुझी कहाणी संपली आहे. तू हे सिक्रेट सॉफ्टवेअर पाकिस्तान आणि चीनला विकण्याचा सौदा केला आहेस, हे 'रॉ'ला (RAW - Research and Analysis Wing) खूप आधीच कळले होते."

राहुलला मोठा धक्का बसला. त्याचे आई-बाबा... रॉ चे एजंट?

सुजाताने तिचा हाऊसकिपिंगचा ऍप्रन काढून टाकला. ती वसंतरावांपेक्षाही सिनिअर एजंट होती. तिने राजेश सिन्हाची कॉलर पकडून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. "बोल, कुणाकुणाला माहिती दिली आहेस? कोड्स कुठे आहेत?" तिची चौकशी अत्यंत क्रूर आणि व्यावसायिक होती.

काही वेळातच, सुजाताने सर्व माहिती काढून घेतली. तिने कोठेतरी फोन लावला आणि थंड स्वरात म्हणाली, "टार्गेट न्यूट्रलाइज्ड. माहिती मिळाली आहे. देशाचा, आईबापांचा जो नाही, तो कोणाचाच नाही."

फोन ठेवताच, वसंतरावांनी राजेश सिन्हाच्या मानेवर एकच अचूक 'टिचकी' मारली. राजेशचा मणका क्षणात तुटला आणि तो जागीच ठार झाला.

हे सर्व नाट्य बघून राहुल थरथर कापत होता. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याचे साधे, गरीब आई-वडील इतके भयानक आणि शक्तिशाली असू शकतात?

सुजाता राहुलजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर आता आईची ममता नव्हती, तर एका कर्तव्यकठोर एजंटची शांतता होती. ती म्हणाली, "राहुल, तुला वाटलं आम्ही गरीब आहोत? तुला आयुष्यात जबाबदारीची जाणीव व्हावी, कष्टाची किंमत कळावी, म्हणून आम्ही तुला कर्ज घ्यायला लावलं होतं. तुझं कर्ज फेडायला आमच्याकडे दहापट पैसे बँकेत आहेत. पण तू... तू स्वतःच्या अहंकारात इतका आंधळा झालास की तुला तुझी आई झाडूवाली म्हणून मिरवायला लाज वाटली."

राहुल काहीच बोलू शकला नाही. तो फक्त ओक्साबोक्शी रडत होता.

सुजाता आणि वसंतरावांनी राजेश सिन्हाचे प्रेत एका 'हाऊसकिपिंग ट्रॉली'मध्ये टाकले, त्यावर कचऱ्याचे काळे ढीग टाकून ते झाकून टाकले. राहुलला तिथेच रडत सोडून, ते दोघेही ते प्रेत घेऊन प्रयोगशाळेबाहेर निघून गेले.

उपसंहार

दुसऱ्या दिवशी, राहुलने ऑफिसमध्ये जाऊन आपल्या आई-वडिलांची माफी मागितली. त्याच्या वागण्यात जमीन-अस्मानाचा फरक पडला होता. ऑफिसमध्ये सर्वत्र बातमी पसरली होती की, बॉस राजेश सिन्हा देशाची गुपिते पाकिस्तानला विकताना पकडला जाण्याच्या भीतीपोटी पळून गेला आहे. राहुलला आता प्रमोशनची हाव नव्हती, त्याला फक्त एका गोष्टीची जाणीव होती की, ज्या आई-वडिलांना तो सामान्य समजत होता, तेच देशाचे आणि त्याचे खरे 'सावलीतले रक्षक' होते.


वाचने 428
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

  1. राहुल एका प्रतिष्ठित कंपनीत 'सिस्टीम आर्किटेक्ट' म्हणून काम करत होता. त्याचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. त्याला आता लवकरात लवकर 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून प्रमोशन हवे होते. 
    - आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजर ही वेगवेगळी प्रोफाइल्स आहेत.  :) :) :)
  2.  भारत सरकारसाठी ते 'सिगरेट सॉफ्टवेअर' बनवत होते. 
    - :) :) :) 
  3.  त्यांची आयडिया अशी होती की उपग्रहावरील कॅमेरे इतके ऍडव्हान्स करायचे की माणसाच्या अंगावरील अगदी 'व्हायरस' पण स्पष्ट दिसले पाहिजेत. 
    - :) :) :)
  4. तिने आपल्या हातातला झाडू अत्यंत जोरात त्याच्या उघड्या घशात घुसवला 
    - हा श्लेष मात्र जबरी आहे :) :) :)
  5.  ती गोळी थेट राजेशच्या पिस्तुलाच्या बॅरलमध्ये घुसली आणि त्याचे पिस्तूल त्याच्या हातातच फुटले! 
    - इथे रनजीकांतलाही लाजवले आहे :) :) :)
  6.  राजेशचा हात रक्तबंबाळ झाला आणि तो कळवळीने खाली पडला. 
    - :) :) :)
  7. राजेश सिन्हाच्या मानेवर एकच अचूक 'टिचकी' मारली. राजेशचा मणका क्षणात तुटला आणि तो जागीच ठार झाला.
    - इथे ओशाळला जेम्स बॉन्ड :) :) :)
  8. तिच्या चेहऱ्यावर आता आईची ममता नव्हती, तर एका कर्तव्यकठोर एजंटची शांतता होती
    - इथे चक्क  MI6 च्या M ची आठवण झाली :) :) :)

- (आजचा हसण्याचा कोटा पूर्ण झालेला) सोकाजी


In reply to by सोत्रि

हहपुवा ...

 

काय सोकाजी भौ, आमच्यासारख्या गरिबांसाठी पिसं काढायला काहीतरी शिल्लक ठेवायचं की! कथेतला सगळाच मसाला तुम्ही वापरून टाकला!

छे ! फक्त प्रतिसाद वाचले होते, आता कथासुद्धा वाचायला लागणार!

 


हेच... हेच ते इरसाल मिपाकर.. नविन लेखकाला नाउमदे करतात.... 

 

एक तर कष्टाने लिहितात त्याचं मोल नाही यांना. 

अशा लोकांमुळेच लेखन संस्कृती लोप पावत चालली आहे. हे त्या क्याटेगारीतले लोकं आहेत ज्यांनी सुहास शिरवळकर, बाबुराव अर्नाळकर सारख्या लेखकांना तुच्छ लेखले. 

 

लिहा हो बिनधास्त, छान लिहिलंय...  धुरंधर -३ पाहत आहे असा फील आला.


In reply to by चौथा कोनाडा

सर्व काही वास्तववादी असेलच असे नाही. मुद्दाम  मिसिंग लिक ठेवल्यास कथेचा पोत आणखीन  चांगला होतो. ते चित्रगुप्त नेहमीच प्रतिसादताना लिहीतात  की दुर्बोधता हे कसले तरी व्यवच्छेदक लक्षण आहे. 

 

आता व्यवच्छेदक हे आणखीन  कुठल्या आजाराचे लक्षण आहे माहीत  नाही. 

 

बाकी गुप्त हेर कथा आवडली. धुरंधर सारखीच आहे की.......


अनेकदा यूट्यूब किंवा तत्सम ठिकाणी कुकू टीव्ही किंवा पॉकेटएफएम (चुभुदेघे) सारख्या ई चॅनल्सवरच्या सीरिजची झलक येत असते. त्यात पाठवण्यासाठी कथा एकदम चपखल आहे.

 

 

त्यात न चुकता श्रीमंत लोक झाडूवाले, चहास्टॉलवाले किंवा भिकारी असतात. प्रत्यक्षात ते बिलियनेर आणि देशातले सर्वात मोठे उद्योगपती असतात किंवा असेच कोणीतरी सीक्रेट. ते सर्वांची बोलणी (घालून पाडून) ऐकतात, त्यांची साधी गिफ्ट फेकून दिली जाते, वरून त्यांना गटर की बदबू , भिखारी की औलाद असे हिणवून सगळीकडून हाकलले जाते. थप्पड आणि मारहाण कायमच. आणि ज्या फाईव स्टार हॉटेलातून त्यांना हाकलले जाते त्याचे तेच मालक असतात.