Skip to main content

तरीही....(विडंबन)

तरीही....(विडंबन)

Published on शनीवार, 07/02/2026
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!
लेखनविषय:

याद्या 517
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

विडंबनाची पोळी चांगली गोल झाली आहे. -दिलीप बिरुटे

मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद