✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 10/13/2025 - 11:11  ·  लेख
लेख
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा. आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही. १. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी ) २. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५ ३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24331 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

म्हणजे काय करायचे?

अभ्या..
गुरुवार, 11/06/2025 - 18:59 नवीन
विसरता कामा नये.
म्हणजे काय करायचे? असा प्रतिसाद लिहायचा नाही का? का विशेषण लावायचे नाही? न्यूयॉर्क चा महापौर झालाय म्हणजे तो काही पिंची महापालिकेत बसणार नाहीये तेंव्हा अपेक्षा नाहीचेत काही तर काय करायला पाहिजे तूर्तास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हंहंहं. प्रतिसाद लिहायचा हो.

कंजूस
गुरुवार, 11/06/2025 - 20:48 नवीन
हंहंहं. प्रतिसाद लिहायचा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सध्यातरी ट्रम्पच्या पार्टी

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 11/06/2025 - 18:57 नवीन
सध्यातरी ट्रम्पच्या पार्टी पेक्षा विरोधी पार्टी चांगली असेल म्हणावं लागेल. ट्रम्प चा कांय भरवसा नाही. आज त्यानं ८ विमान पडली म्हणून सांगितलं.
  • Log in or register to post comments

अंजली दमानिया यांनी हल्लीच

कंजूस
गुरुवार, 11/06/2025 - 18:57 नवीन
अंजली दमानिया यांनी हल्लीच पार्थ पवारांचे जमीन अधिग्रहण प्रकरण उजेडात आणले आहे. हे प्रकरण महायुतीच्या जहाजालाच मोठे भोक पाडण्यास कारणीभूत होऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची यावर स्पष्टीकरण देण्यात चांगलीच तारांबळ उडताना दिसते. अजित पवार साहेब not reachable.
  • Log in or register to post comments

सत्तर हजार कोटींच्या

रामचंद्र
गुरुवार, 11/06/2025 - 21:21 नवीन
सत्तर हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आपणच आरोप करून एखाद्या व्यक्तीला आपल्याच मंत्रीमंडळात थेट उपमुख्यमंत्रीपद दिलं जात असेल तर अठराशे कोटींचा कथित गैरव्यवहार करणाऱ्या होतकरू तरुणाला क्लीन चिट देणं अभ्यासू, तडफदार नेत्याला काय कठीण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

संघाच्या पवित्र संस्कारातून

स्वधर्म
Fri, 11/07/2025 - 14:54 नवीन
संघाच्या पवित्र संस्कारातून आलेल्या नेत्यांनी असे काही केले तर ते म्हणे मोठे देशहित साध्य करण्यासाठी केलेला आपद्धर्म असतो. मिशीवाल्या खासदारालाही त्यांनी अशीच क्लीन चीट दिली होती. पण भाजप समर्थकांच्या संस्कारात 'आपल्या' माणसाने काहीही केले तरी विरोधाचे अवाक्षरही काढण्याची पध्दत नसते. बाकी दुसर्‍यांनी अगदी विदा गोळा करून जरी काही समोर आणले तरी हिणवण्याचा संस्कार असतो. गोबर कालाचा महिमा अन काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

मग, 'वॉशिंग मशीन पार्टी' असा

रामचंद्र
Fri, 11/07/2025 - 15:48 नवीन
मग, 'वॉशिंग मशीन पार्टी' असा लौकिक उगीचंच कमावलाय का? आपल्या लौकिकाला जागायला नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

झोरान ममदानी

धर्मराजमुटके
गुरुवार, 11/06/2025 - 19:13 नवीन
झोरान ममदानी हा भारतीय वंशाचा मुस्लीम युवक न्यूयोर्क चा महापौर म्हणून निवडून आला. ट्रंपच्या रिपब्लिकन उमेदवाराच्या विरोधात एक डेमोक्रॅटिक सोशालिस्ट उमेदवार म्हणून त्याने हे यश मिळवले आहे.
झोरान ममदानीचे अभिनंदन ! मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !
  • Log in or register to post comments

वंश

अभ्या..
गुरुवार, 11/06/2025 - 19:39 नवीन
मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !
आई आणि वडील दोघेही भारतीय वंशाचे असतील तर १०० टक्के शिल्लक असणार भारतीय वंश. खोजा मुस्लीम पर्शियातून १९ व्या शतकात आले ही वस्तूस्थिती गृहित धरता ओरिजिनल भारतीय वंश असण्याला कीती शतकाची व्हॅलिडीटी ग्राह्य धरायची हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील. कदाचित हि तुलना ओरिजिनल आयुर्वेद आणि पतंजली उत्पादने इतकी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील.

धर्मराजमुटके
गुरुवार, 11/06/2025 - 19:42 नवीन
पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील.
तेच म्हणायचं आहे. ढवळ्या शेजारी पवळया बांधला. वाण आणी गुण देखील गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

होमिओपॅथी शोधणाऱ्या जर्मन

कंजूस
गुरुवार, 11/06/2025 - 20:55 नवीन
होमिओपॅथी शोधणाऱ्या जर्मन डाक्टरास प्रणाम. सामान्य आजारपण निवारण्यात फारच साथ दिली होमिओपॅथीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भारतीय वंशाचा माणूस जरी

सुबोध खरे
Fri, 11/07/2025 - 11:33 नवीन
भारतीय वंशाचा माणूस जरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तरी त्याचा भारताला फारसा फायदा होईल असे नाही. मुळात तो जर अमेरिकी नागरिक असेल तर त्याने अमेरिकेशीच एकनिष्ठ राहणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. उगाच आपण खूष होण्यात काहीही हशील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

जसे एखाद अदानी अंबानी भक्त

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/07/2025 - 12:51 नवीन
जसे एखाद अदानी अंबानी भक्त एखाद्या देशाचा पंतप्रधान झाला तर आपल्याला फायदा होईल असे देशातील काही गबाळे लोक समजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

समजू द्या कि

सुबोध खरे
Sat, 11/08/2025 - 11:33 नवीन
समजू द्या कि तुम्ही आपला कळफलक बडवा हा का ना का विचार नंतर करा / नाही केला तरी चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

रेल्वे प्रशासनाने मागच्या एका

कंजूस
Fri, 11/07/2025 - 07:59 नवीन
रेल्वे प्रशासनाने मागच्या एका दुर्घटनेत१( मुंब्रा) मेलेल्या प्रवाशांचे खापर लोकल ट्रेनच्या मोटरमेन ड्राइवरांवर ठेवून काल त्यांना निलंबित केल्यावर कर्मचारी संतापले. तासभर आंदोलन केले. मग गाड्या सुटल्यावर काही प्रवासी रुळांवरून लोअर परळ कडे चालले होते ते मेले. आता याही घटनेची चौकशी हाच अधिकारी करेल आणि त्या गाडीच्या मोटरमनला निलंबित करेल. [१] रेल्वेत दारात उभे राहिलेल्या एका प्रवाशाने तिथेच आपली खांद्यावरची पिशवी सावरतानाच ती सटकून विरूद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दारांत उभे असलेल्या प्रवाशांवर धडकून ते खाली पडले होते.
  • Log in or register to post comments

आता भोंदू जमीन व्यवहाराचे

कंजूस
Sat, 11/08/2025 - 13:47 नवीन
आता भोंदू जमीन व्यवहाराचे खापर कुणावर फोडणार? ( सरकारी खात्यातील नोकरांचे बळी जाणारच कारण ते नियमांनी बांधलेले असतात आणि खात्यामार्फत चौकशा होऊन निलंबन करण्यात येते. कधी कधी मोठा नुकसानीचा आर्थिक घोटाळा असेल तर तुरुंगवास किंवा पेन्शनची रद्द होते.) राजकारणी नेत्यांचं काय?
  • Log in or register to post comments

पार्थ पवारांना एवढा

कंजूस
Sat, 11/08/2025 - 13:48 नवीन
पार्थ पवारांना एवढा गैरव्यवहार करण्याची काय घाई झाली होती?
  • Log in or register to post comments

केव्हाही बघा हॉटेलात आलेली माणसं < १०

अनन्त्_यात्री
Sun, 11/09/2025 - 11:56 नवीन
ही मिपाच्या शेवटाच्या सुरुवातीच्या शेवटाची सुरूवात तर नव्हे ना?? :)
  • Log in or register to post comments

आत्ता मी धरून ३ माणसं आहेत

सुबोध खरे
Mon, 11/10/2025 - 10:57 नवीन
आत्ता मी धरून ३ माणसं आहेत
  • Log in or register to post comments

आत्ता मी धरून १६ लॉगिन आहेत.

आग्या१९९०
Mon, 11/10/2025 - 11:24 नवीन
आत्ता मी धरून १६ लॉगिन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हरियाणात ३५० किलो RDX जप्त.

आग्या१९९०
Mon, 11/10/2025 - 11:39 नवीन
हरियाणात ३५० किलो RDX जप्त. कुठून आणि कसे येत असेल इतक्या मोठ्या प्रमाणात?
  • Log in or register to post comments

https://www.ndtv.com/india

सुबोध खरे
Mon, 11/10/2025 - 12:01 नवीन
https://www.ndtv.com/india-news/jammu-and-kashmir-police-recover-300-kg-of-rdx-an-ak-47-rifle-and-ammunition-from-faridabad-near-delhi-9606244
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हरियाणात ३५० किलो RDX,

आग्या१९९०
Mon, 11/10/2025 - 22:36 नवीन
हरियाणात ३५० किलो RDX, दिल्लीत डबल इंजिन सरकार तिथे बॉम्बस्फोट. गृहमंत्री बिहारमध्ये cctv कॅमेरावर कागद चिकटवून गुप्त भेटी घेत आहेत. मस्त चाललंय देशात.
  • Log in or register to post comments

सुरक्षित हातो में ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2025 - 06:19 नवीन
देश अब सुरक्षित हातो में है ? बताइये भाइयो और बहनो, हा की नही ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/11/2025 - 08:07 नवीन
पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली असे मोठमोठे हल्ले, स्फोट झाले तरीही अंधभक्त “देश सुरक्षित हातो मी आहे” असेच म्हणतील! असे म्हणाले नाही तर ते अंधभक्त कसले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 10:46 नवीन
आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्था या गोलकिपर सारख्या असतात. किती गोल वाचवले ते महत्त्वाचे नाही. एक गोल कसा झाला? दहशतवाद्यांनी एकदाच जिंकायचे असते तर आपल्या सुरक्षा संस्थांना १०० % वेळेस मुंबईत बॉम्ब स्फोटाचे वेळेस ३०० किलो RDX वापरले गेले होते. काल २९०० किलो स्फोटके पकडली गेली आहेत. त्याबद्दल एक अवाक्षर नाही 2,900kg explosives seized in F’bad; 7 held in ‘white-collar’ terror link https://www.hindustantimes.com/cities/gurugram-news/2900kg-explosives-seized-in-f-bad-7-held-in-white-collar-terror-link-101762822637752.html या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

In 2024, Indian law

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 10:49 नवीन
In 2024, Indian law enforcement agencies seized narcotics worth approximately ₹25,330 crore (over USD 3 billion), which represents a significant increase over the previous year. (more than 55% higher than in 2023). Overall Trend: In September 2025, the Union Home Minister reported that between 2014 and 2025, drugs worth ₹1.65 lakh crore (over 1 crore kg) were seized, highlighting an increased intensity in anti-drug operations over recent years.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या वेळेस गुप्तचर संस्थेच्या

आग्या१९९०
Tue, 11/11/2025 - 10:52 नवीन
या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे? किती किलो स्फोटके पकडल्यास किती लोकांचा जीव गेल्यास निषेध करायचा असे काही कोष्टक असेल तर लवकरात लवकर टाका. देशातील कुठल्याही दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचे राजकारण कधीच करू नये. जनतेने किंवा राजकीय नेत्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जरा धीर धरा.

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 11:18 नवीन
जरा धीर धरा. अजून हा दहशवादी हल्लाच आहे कि दुसरं काय ? हे तरी नक्की होऊ द्या. कोणत्या संघटनेने केला आहे काहीतरी ठोस माहिती हाती येऊ द्या गिधाडांसारखे कोणतेही प्रेत बेवारशी म्हणून झुंबड केल्यासारखे येऊ नका. उद्या पासून लगेच रडायला सुरुवात कि इतकी माणसे मेली श्री मोदी काय करत आहेत? राजीनामा द्यायला पाहिजे हे गाय पट्ट्यात काय चाललंय इ इ इ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कोण राजीनामा मागतंय? अजिबात

आग्या१९९०
Tue, 11/11/2025 - 11:49 नवीन
कोण राजीनामा मागतंय? अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही. बिहारचा प्रचार कोण करणार? सगळे नालायक भरले आहेत पक्षात. फक्त दोनच जीव तोडून काम करत आहे. स्फोटात मेलेले जीव हे किड्यामुंग्यांचे गेले. त्यांच्यासाठी राजीनामा देण्यापेक्षा त्यांचा जीव कोणी घेतला हे शोधून कडेने महत्वाचे आहे. लगे रहो बिहारचा निक्काल लागेपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हायला

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 12:56 नवीन
हायला स्फोटात मेलेले जीव हे किड्यामुंग्यांचे गेले किड्यामुंगीचे जीव कुणी घेतले हे कशाला शोधून काढायचे? त्यांचा जीव कोणी घेतला हे शोधून कडेने महत्वाचे आहे. हायला घोडा बोलो या चतुर बोलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

उपरोध कळत नसल्याने तुम्हाला

आग्या१९९०
Tue, 11/11/2025 - 16:48 नवीन
उपरोध कळत नसल्याने तुम्हाला शहाणपणाचा अर्धा गुण दिला हे विसरले वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

३५ -४० हजार करोड खर्च करूनही

अमरेंद्र बाहुबली
Tue, 11/11/2025 - 13:00 नवीन
३५ -४० हजार करोड खर्च करूनही काश्मीरात हल्ले करून अतिरेकी पळून जातात, तर हे दिल्लीतल्या स्फोटातले आरोपी काय डोंबल पकडणार? सुशिक्षित आणी देशप्रेमी लोक सत्तेत येत नाही तोपर्यंत देशाची अशीच वाट लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

३५ -४० हजार करोड खर्च करूनही

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 20:05 नवीन
३५ -४० हजार करोड खर्च करूनही काश्मीरात हल्ले करून अतिरेकी पळून जातात तुम्ही या कि RAW किंवा IB किंवा आर्मी मध्ये दहशतवादी एकदम पळून जातील येमेन मध्ये हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अगदी बरोबर

स्वधर्म
Tue, 11/11/2025 - 16:28 नवीन
>> या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे? अगदी बरोबर. पण 'फक्त त्यावेळी काँग्रेसचे किंवा भाजपाविरोधी सरकार असेल तर एकदम अंगावर जायचे, नाकर्ते म्हणून हिणवायचे' हे लिहायचे राहिले तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पाकिस्तानला अद्दल घडवून सहा

रामचंद्र
Tue, 11/11/2025 - 17:54 नवीन
पाकिस्तानला अद्दल घडवून सहा महिनेसुद्धा झाले नाहीत तोच असा प्रकार होत असेल तर ही पाकिस्तानची धमक म्हणायची की आपल्या सरकारचा नाकर्तेपणा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

पाकिस्तानला काश्मीर दिलं तरी

रात्रीचे चांदणे
Tue, 11/11/2025 - 19:14 नवीन
पाकिस्तानला काश्मीर दिलं तरी ते सुधारणार नाहीत. फार फार तर आपण असले हल्ले कमी करू शकतो. पूर्ण पणे थांबवने शक्य नाही. कारण आपलेच लोकं त्यांना मदत करायला तयार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

Trump च्या कामगिरीमुळे सर्वच

कंजूस
Tue, 11/11/2025 - 08:53 नवीन
Trump च्या कामगिरीमुळे सर्वच देश ( रशिया सोडून) सुरक्षित हातों में हैं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा हॉटेलमध्ये आलेल्यांची

आग्या१९९०
Tue, 11/11/2025 - 08:18 नवीन
मिपा हॉटेलमध्ये आलेल्यांची रोज होणारी मोजणी थांबली का ?
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2025 - 11:06 नवीन
सध्या सात आहेत माहितीस्तव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आता ७ लोक आहेत

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 10:36 नवीन
आता ७ लोक आहेत
  • Log in or register to post comments

मास्तर

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 11:19 नवीन
मास्तर दोन आकडी सुद्धा संख्या का नाही? याचा विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मिपावर आत्ता तुम्ही धरून १०

आग्या१९९०
Tue, 11/11/2025 - 12:54 नवीन
मिपावर आत्ता तुम्ही धरून १० हजर आहेत. दोन आकडी संख्या गाठली हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नाही ९ च आहेत

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 12:56 नवीन
नाही ९ च आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बोलवा तुमच्या कंपूतल्या दोन

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 12:57 नवीन
बोलवा तुमच्या कंपूतल्या दोन चार फुरोगाम्यांना आणि करून टाका दोन आकडी हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर ९ होते, परंतु तुमच्या

आग्या१९९०
Tue, 11/11/2025 - 14:12 नवीन
बरोबर ९ होते, परंतु तुमच्या कंपूतील एकजण होता, दोघांचे अधिकचे अर्धे अर्धे एकत्र करून १० केले. मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सध्या 7 सदस्य हजर आहेत.

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 20:07 नवीन
सध्या 7 सदस्य हजर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बरोबर ९ होते, परंतु तुमच्या

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 20:14 नवीन
बरोबर ९ होते, परंतु तुमच्या कंपूतील एकजण होता बरोबर तुमच्या कंपूतील ९ जणामुळेच सगळे सुज्ञ लोक मिपा वर येईनासे झाले. माझ्यासारखा एखादा ज्याला अफाट संयम आहे तोच जुन्या प्रेमामुळे येत राहतो अन्यथा जुने मिपाकर भेटले तर तीच कहाणी सांगतात कि कंपूबाजी मुळे आता मिपावर यावेसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

य झ कुठेतरी बोंबलत हिंडत आहे,

सुबोध खरे
Tue, 11/11/2025 - 20:15 नवीन
य झ कुठेतरी बोंबलत हिंडत आहे, या शेमण्याला लाज लज्जा नाही काय पण भाषा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/11/2025 - 22:08 नवीन
>>>>माझ्यासारखा एखादा ज्याला अफाट ज्ञान आहे तोच जुन्या प्रेमामुळे येत राहतो गडबडीत असे वाचले. बाय द वे, आपल्या या अफाट ज्ञानामुळे सगळे मिपाकर स्वर्गातच जातील काही वाद नाही. धन्यवाद. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा