Skip to main content

चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/10/2025 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा. आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही. १. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी ) २. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५ ३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25223
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग माफी मागावी लागते पण सुधारण्याचे नाव काही घेत नाही. Rahul Gandhi ‘unconditionally apologises’ to apex court for wrongly attributing ‘chowkidar’ remark to it In his affidavit, Mr. Gandhi, through advocate Sunil Fernandes, urged that the court may “graciously be pleased to accept the instant affidavit and close the present contempt proceedings”. गम्मत म्हणजे केवळ श्री मोदींचा द्वेष म्हणून येथे पण काही लोक त्याच्या भंपक वक्तव्याला सत्य मानून टाहो फोडत राहतात. सुज्ञ मिपाकर आता याला कंटाळले आहेत त्यामुळे याचा प्रतिवाद सुद्धा करत नाहीत. खरं तर बरेच मिपाकर आता यामुळे मिपावर येईनासे झाले आहेत. हॉटेलात आलेली माणसं -- याच्या खाली मी गेल्या कित्येक दिवसात १० माणसं काही आलेली पाहिली नाहीत. चालू द्या

In reply to by सुबोध खरे

>>> मोदींचा द्वेष म्हणून येथे पण काही लोक त्याच्या भंपक वक्तव्याला सत्य मानून टाहो फोडत राहतात. जाऊ द्या डॉक्टर काका आपण त्यांचं घर उन्हात बांधू. आपण आपल्या त्या अनपढ़ माणसाचा आणि त्याच्या पक्षाचा प्रचार करुन आपल्या 'भक्तीचा' परिचय करुन दिलाच पाहिजे असे स्पष्ट मत आहे. ;) -दिलीप बिरूटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे मास्तर तुमचा कुंथणं चालू द्या. तुमच्या प्रतिसादांचा प्रतिवाद सहज करता येईल पण तुमचं चालूच द्या

In reply to by सुबोध खरे

हॉटेलात आलेली माणसं -- याच्या खाली मी गेल्या कित्येक दिवसात १० माणसं काही आलेली पाहिली नाहीत. सध्या मी सोडून अजून केवळ दोन माणसं आहेत.

In reply to by सुबोध खरे

@बिरुटे मास्तर बघा बाबा मास्तर, कोणे एके काळी राजकारणाच्या धाग्यामुळे सूज्ञ मिपाकर (म्हणजे कोण कुणास ठाऊक) मिपावर यायचे टाळत होते. नंतर गजानन कागलकरामुळे सूमि (म्हकोकुठा) मिपावर यायचे टाळत होते. कागलकर गेले अल्लाघरी. नंतर बाहुबलीमुळे सूमि (म्हकोकुठा) मिपावर यायचे टाळत होते. बिचारे शांत झाले तीन चार वेळा बॅन होऊन. आता तुमच्यामुळे सूमि (म्हकोकुठा) मिपावर यायचे टाळत आहेत. हळूच एक आवाज आला, अभ्यामुळे सूमि लोकांनी (म्हकोकुठा) मिपा सोडले. करा बॅन तिच्यायला. हाकानाका. . आता मिपाचे भविष्य केवळ तुमच्या हाती आहे. एकतर १० च्या वर माणसे आणा नाहीतर मिपा सोडा (सूज्ञ मिपाकर असाल तर आधी सोडा)

In reply to by अभ्या..

@अभ्याशेठ, आपण यायचं. मिपा इंजॉय करायचं. मिपावर इकडे कोणी कोणामुळे येत असेल, पण, मराठी संस्थळ इतिहासाच्या खिड़कीतुन संस्थळाकड़े पाहिल्यास संस्थळाच्या धोरणामुळे लोक सोडून गेलेले माहिती आहेत पण कोणा व्यक्तीमुळे कोणी लेखक-वाचक संस्थळ सोडत नसतो. हं आता निमित्ताला कोणतेही कारण पुरेसे असते. -दिलीप बिरुटे ( आनंदी मिपाकर )

झोरान ममदानी हा भारतीय वंशाचा मुस्लीम युवक न्यूयोर्क चा महापौर म्हणून निवडून आला. ट्रंपच्या रिपब्लिकन उमेदवाराच्या विरोधात एक डेमोक्रॅटिक सोशालिस्ट उमेदवार म्हणून त्याने हे यश मिळवले आहे. आपल्या शत्रुचा शत्रू तो मित्र ह्या नात्याने तरी झोरानचे अभिनंदन व्ह्ययला हवे. न्यूयोर्क सारख्या अमेरिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या शहराचे महापौरपद तेही अफाट पैसा, सत्ता, वर्णविद्वेष, धर्मविद्वेष, अनुभव हे सर्व विरोधात असताना ममदानीने मिळवलेले यश उल्लेखनीयच आहे. अमेरिकेतील हिंदू समाजानेही बदल ओळखून त्याला पाठिंबा दिला व विजयानंतर सत्कारही केला आहे. त्याची आई मीरा नायर ही बॉलीवूडची प्रसिध्द दिग्दर्शिका आहे आणि वडील महमूद ममदानी भारतीय वंशाचे गुजराती खोजा मुस्लीम असून युगांडाला लहानपणीच स्थलांतरीत झालेले आहेत.

In reply to by अभ्या..

भारतीय वंशाचे विशेषण( आपणच, आपले पत्रकार आणि पेपर चानेलवाले डंका वाजवतात ) लावले गेलेल्या अमेरिकनांनी भारताला नेहमीच टाळले आहे हे विसरता कामा नये. ते लोक तिकडच्याच पुंग्या वाजवतात. नैतर त्यांनाच भारी पडेल हे ते लक्षात ठेवतात.

In reply to by कंजूस

विसरता कामा नये.
म्हणजे काय करायचे? असा प्रतिसाद लिहायचा नाही का? का विशेषण लावायचे नाही? न्यूयॉर्क चा महापौर झालाय म्हणजे तो काही पिंची महापालिकेत बसणार नाहीये तेंव्हा अपेक्षा नाहीचेत काही तर काय करायला पाहिजे तूर्तास?

सध्यातरी ट्रम्पच्या पार्टी पेक्षा विरोधी पार्टी चांगली असेल म्हणावं लागेल. ट्रम्प चा कांय भरवसा नाही. आज त्यानं ८ विमान पडली म्हणून सांगितलं.

अंजली दमानिया यांनी हल्लीच पार्थ पवारांचे जमीन अधिग्रहण प्रकरण उजेडात आणले आहे. हे प्रकरण महायुतीच्या जहाजालाच मोठे भोक पाडण्यास कारणीभूत होऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची यावर स्पष्टीकरण देण्यात चांगलीच तारांबळ उडताना दिसते. अजित पवार साहेब not reachable.

In reply to by कंजूस

सत्तर हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आपणच आरोप करून एखाद्या व्यक्तीला आपल्याच मंत्रीमंडळात थेट उपमुख्यमंत्रीपद दिलं जात असेल तर अठराशे कोटींचा कथित गैरव्यवहार करणाऱ्या होतकरू तरुणाला क्लीन चिट देणं अभ्यासू, तडफदार नेत्याला काय कठीण आहे?

In reply to by रामचंद्र

संघाच्या पवित्र संस्कारातून आलेल्या नेत्यांनी असे काही केले तर ते म्हणे मोठे देशहित साध्य करण्यासाठी केलेला आपद्धर्म असतो. मिशीवाल्या खासदारालाही त्यांनी अशीच क्लीन चीट दिली होती. पण भाजप समर्थकांच्या संस्कारात 'आपल्या' माणसाने काहीही केले तरी विरोधाचे अवाक्षरही काढण्याची पध्दत नसते. बाकी दुसर्‍यांनी अगदी विदा गोळा करून जरी काही समोर आणले तरी हिणवण्याचा संस्कार असतो. गोबर कालाचा महिमा अन काय.

In reply to by स्वधर्म

मग, 'वॉशिंग मशीन पार्टी' असा लौकिक उगीचंच कमावलाय का? आपल्या लौकिकाला जागायला नको?

झोरान ममदानी हा भारतीय वंशाचा मुस्लीम युवक न्यूयोर्क चा महापौर म्हणून निवडून आला. ट्रंपच्या रिपब्लिकन उमेदवाराच्या विरोधात एक डेमोक्रॅटिक सोशालिस्ट उमेदवार म्हणून त्याने हे यश मिळवले आहे.
झोरान ममदानीचे अभिनंदन ! मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !

In reply to by धर्मराजमुटके

मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !
आई आणि वडील दोघेही भारतीय वंशाचे असतील तर १०० टक्के शिल्लक असणार भारतीय वंश. खोजा मुस्लीम पर्शियातून १९ व्या शतकात आले ही वस्तूस्थिती गृहित धरता ओरिजिनल भारतीय वंश असण्याला कीती शतकाची व्हॅलिडीटी ग्राह्य धरायची हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील. कदाचित हि तुलना ओरिजिनल आयुर्वेद आणि पतंजली उत्पादने इतकी असेल.

In reply to by अभ्या..

पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील.
तेच म्हणायचं आहे. ढवळ्या शेजारी पवळया बांधला. वाण आणी गुण देखील गेला.

In reply to by धर्मराजमुटके

भारतीय वंशाचा माणूस जरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तरी त्याचा भारताला फारसा फायदा होईल असे नाही. मुळात तो जर अमेरिकी नागरिक असेल तर त्याने अमेरिकेशीच एकनिष्ठ राहणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. उगाच आपण खूष होण्यात काहीही हशील नाही.

In reply to by सुबोध खरे

जसे एखाद अदानी अंबानी भक्त एखाद्या देशाचा पंतप्रधान झाला तर आपल्याला फायदा होईल असे देशातील काही गबाळे लोक समजतात.

रेल्वे प्रशासनाने मागच्या एका दुर्घटनेत( मुंब्रा) मेलेल्या प्रवाशांचे खापर लोकल ट्रेनच्या मोटरमेन ड्राइवरांवर ठेवून काल त्यांना निलंबित केल्यावर कर्मचारी संतापले. तासभर आंदोलन केले. मग गाड्या सुटल्यावर काही प्रवासी रुळांवरून लोअर परळ कडे चालले होते ते मेले. आता याही घटनेची चौकशी हाच अधिकारी करेल आणि त्या गाडीच्या मोटरमनला निलंबित करेल. [१] रेल्वेत दारात उभे राहिलेल्या एका प्रवाशाने तिथेच आपली खांद्यावरची पिशवी सावरतानाच ती सटकून विरूद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या दारांत उभे असलेल्या प्रवाशांवर धडकून ते खाली पडले होते.

आता भोंदू जमीन व्यवहाराचे खापर कुणावर फोडणार? ( सरकारी खात्यातील नोकरांचे बळी जाणारच कारण ते नियमांनी बांधलेले असतात आणि खात्यामार्फत चौकशा होऊन निलंबन करण्यात येते. कधी कधी मोठा नुकसानीचा आर्थिक घोटाळा असेल तर तुरुंगवास किंवा पेन्शनची रद्द होते.) राजकारणी नेत्यांचं काय?

हरियाणात ३५० किलो RDX, दिल्लीत डबल इंजिन सरकार तिथे बॉम्बस्फोट. गृहमंत्री बिहारमध्ये cctv कॅमेरावर कागद चिकटवून गुप्त भेटी घेत आहेत. मस्त चाललंय देशात.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुलवामा, उरी, पहलगाम, दिल्ली असे मोठमोठे हल्ले, स्फोट झाले तरीही अंधभक्त “देश सुरक्षित हातो मी आहे” असेच म्हणतील! असे म्हणाले नाही तर ते अंधभक्त कसले?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्था या गोलकिपर सारख्या असतात. किती गोल वाचवले ते महत्त्वाचे नाही. एक गोल कसा झाला? दहशतवाद्यांनी एकदाच जिंकायचे असते तर आपल्या सुरक्षा संस्थांना १०० % वेळेस मुंबईत बॉम्ब स्फोटाचे वेळेस ३०० किलो RDX वापरले गेले होते. काल २९०० किलो स्फोटके पकडली गेली आहेत. त्याबद्दल एक अवाक्षर नाही 2,900kg explosives seized in F’bad; 7 held in ‘white-collar’ terror link https://www.hindustantimes.com/cities/gurugram-news/2900kg-explosives-s… या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे?

In reply to by सुबोध खरे

In 2024, Indian law enforcement agencies seized narcotics worth approximately ₹25,330 crore (over USD 3 billion), which represents a significant increase over the previous year. (more than 55% higher than in 2023). Overall Trend: In September 2025, the Union Home Minister reported that between 2014 and 2025, drugs worth ₹1.65 lakh crore (over 1 crore kg) were seized, highlighting an increased intensity in anti-drug operations over recent years.

In reply to by सुबोध खरे

या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे? किती किलो स्फोटके पकडल्यास किती लोकांचा जीव गेल्यास निषेध करायचा असे काही कोष्टक असेल तर लवकरात लवकर टाका. देशातील कुठल्याही दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचे राजकारण कधीच करू नये. जनतेने किंवा राजकीय नेत्यांनी.

In reply to by आग्या१९९०

जरा धीर धरा. अजून हा दहशवादी हल्लाच आहे कि दुसरं काय ? हे तरी नक्की होऊ द्या. कोणत्या संघटनेने केला आहे काहीतरी ठोस माहिती हाती येऊ द्या गिधाडांसारखे कोणतेही प्रेत बेवारशी म्हणून झुंबड केल्यासारखे येऊ नका. उद्या पासून लगेच रडायला सुरुवात कि इतकी माणसे मेली श्री मोदी काय करत आहेत? राजीनामा द्यायला पाहिजे हे गाय पट्ट्यात काय चाललंय इ इ इ

In reply to by सुबोध खरे

कोण राजीनामा मागतंय? अजिबात राजीनामा द्यायची गरज नाही. बिहारचा प्रचार कोण करणार? सगळे नालायक भरले आहेत पक्षात. फक्त दोनच जीव तोडून काम करत आहे. स्फोटात मेलेले जीव हे किड्यामुंग्यांचे गेले. त्यांच्यासाठी राजीनामा देण्यापेक्षा त्यांचा जीव कोणी घेतला हे शोधून कडेने महत्वाचे आहे. लगे रहो बिहारचा निक्काल लागेपर्यंत.

In reply to by आग्या१९९०

हायला स्फोटात मेलेले जीव हे किड्यामुंग्यांचे गेले किड्यामुंगीचे जीव कुणी घेतले हे कशाला शोधून काढायचे? त्यांचा जीव कोणी घेतला हे शोधून कडेने महत्वाचे आहे. हायला घोडा बोलो या चतुर बोलो

In reply to by आग्या१९९०

३५ -४० हजार करोड खर्च करूनही काश्मीरात हल्ले करून अतिरेकी पळून जातात, तर हे दिल्लीतल्या स्फोटातले आरोपी काय डोंबल पकडणार? सुशिक्षित आणी देशप्रेमी लोक सत्तेत येत नाही तोपर्यंत देशाची अशीच वाट लागणार.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

३५ -४० हजार करोड खर्च करूनही काश्मीरात हल्ले करून अतिरेकी पळून जातात तुम्ही या कि RAW किंवा IB किंवा आर्मी मध्ये दहशतवादी एकदम पळून जातील येमेन मध्ये हा का ना का

In reply to by सुबोध खरे

>> या वेळेस गुप्तचर संस्थेच्या पाठीशी उभे राहायचे कि केवळ जिकडे तिकडे टीका करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करायचे? अगदी बरोबर. पण 'फक्त त्यावेळी काँग्रेसचे किंवा भाजपाविरोधी सरकार असेल तर एकदम अंगावर जायचे, नाकर्ते म्हणून हिणवायचे' हे लिहायचे राहिले तुमचे.

In reply to by स्वधर्म

पाकिस्तानला अद्दल घडवून सहा महिनेसुद्धा झाले नाहीत तोच असा प्रकार होत असेल तर ही पाकिस्तानची धमक म्हणायची की आपल्या सरकारचा नाकर्तेपणा?

In reply to by रामचंद्र

पाकिस्तानला काश्मीर दिलं तरी ते सुधारणार नाहीत. फार फार तर आपण असले हल्ले कमी करू शकतो. पूर्ण पणे थांबवने शक्य नाही. कारण आपलेच लोकं त्यांना मदत करायला तयार आहेत.

In reply to by सुबोध खरे

बरोबर ९ होते, परंतु तुमच्या कंपूतील एकजण होता, दोघांचे अधिकचे अर्धे अर्धे एकत्र करून १० केले. मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो.

In reply to by आग्या१९९०

बरोबर ९ होते, परंतु तुमच्या कंपूतील एकजण होता बरोबर तुमच्या कंपूतील ९ जणामुळेच सगळे सुज्ञ लोक मिपा वर येईनासे झाले. माझ्यासारखा एखादा ज्याला अफाट संयम आहे तोच जुन्या प्रेमामुळे येत राहतो अन्यथा जुने मिपाकर भेटले तर तीच कहाणी सांगतात कि कंपूबाजी मुळे आता मिपावर यावेसे वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

>>>>माझ्यासारखा एखादा ज्याला अफाट ज्ञान आहे तोच जुन्या प्रेमामुळे येत राहतो गडबडीत असे वाचले. बाय द वे, आपल्या या अफाट ज्ञानामुळे सगळे मिपाकर स्वर्गातच जातील काही वाद नाही. धन्यवाद. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायला बिरुटे मास्तर तुमच्याकडे निवडणूक लावल्या काय? नाही म्हणजे मास्तर गडबडीत गोंधळ घालतोय म्हणून विचारलं. नाही तर मास्तर साधारणपणे निवांत असतात

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिहारींचा मतदान कौल कोणाला ? अंधभक्त आणी मंदभक्त मतदान करणार म्हणजे शेवटी बिहारींचा कौल गोबरयुगालाच :)

In reply to by धर्मराजमुटके

भाजप आणी नीतीशच्या जंगलराज म्हणून बिहारची मुक्तता झाली तर ते बिहारसाठी चांगलेच झाले म्हणावे लागेल, अर्थात चुना आयोगाने प्रामाणिकपणे काम केल असेल तरच! नाहीतर पुन्हा भाजपचे गंभीर जंगलराज सुरू होईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अर्थात चुना आयोगाने प्रामाणिकपणे काम केल असेल तरच! नाहीतर पुन्हा भाजपचे गंभीर जंगलराज सुरू होईल. आताच असं नक्की काय घडलं असावं की चुनाव आयोग प्रामाणीकपणे काम करील असे तुम्हाला वाटते ? एवढे मतदान वाढले म्हटल्यावर नक्कीच वोटचोरी झाली असणार. राहूल गांधींच्या 'द बि फाईल्स' मधे याचा खुलासा होईलच म्हणा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१.हिंदुस्तान टाइम्स बातमीनुसार दोन तीन पोलपंडितांनी कॉ. आरजेडीला सत्ता मिळेल लिहिलं आहे. लिंक (https://www.hindustantimes.com/india-news/bihar-exit-poll-2025-live-upd…) २.महिला मतदार वाढल्या की भाजप येणार हे सांगितले जाते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटते महाआघाडीला जास्त सिटस् दाखवताहेत. दुसऱ्या टप्यात आणखीन वाढलेल्या मतदानामुळे महाआघाडी विरोधातला कल जास्त स्पष्ट झालाय. त्यामुळे मविआला पन्नासपेक्षा जास्त जागा मिळणं अवघड वाटतंय.