✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी सप्टेंबर २०२५

स
स्वधर्म यांनी
Sat, 09/06/2025 - 21:49  ·  लेख
लेख
६ सप्टेंबर आला तरी चालू घडामोडींचा धागा दिसत नव्हता, म्हणून सुरू केला. बहुधा सगळे गणपतीत मग्न आहेत. नातवाला 65 लाखांची Tesla भेट देणाऱ्या प्रताप सरनाईकांची एकूण संपत्ती किती? रिक्षाचालक ते 800% संपत्ती वाढ, Income सोर्स... सरनाईकांनी म्हणे निर्धार केला होता की भारतातील पहिली टेस्ला मीच घेणार. त्याप्रमाणे ती त्यांनी घेतली. शिवाय या त्यांच्या कृतीमुळे आता त्यांच्या नातवाला शाश्वत वाहतुकीचे महत्व कळेल. त्यांच्या संपत्तीत २००९ सालच्या १६ कोटी पासून २०२४ मध्ये ३३३ कोटी अशी वाढ झाली आहे. बाकी किरकोळ विषय सोडून देऊन एका परिवाहन मंत्र्याच्या पर्यावरण स्नेही कृतीची जरूर कदर केली पाहिजे, नाही का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22025 वाचन

💬 प्रतिसाद (142)

प्रतिक्रिया

:)

अमरेंद्र बाहुबली
Mon, 09/22/2025 - 10:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व राज्यांत तिथले मोठे

कंजूस
Sun, 09/21/2025 - 13:56 नवीन
सर्व राज्यांत तिथले मोठे नेते आहेत.... देशभरात सभा घेऊ शकतील असे त्यातले किती असतील?
  • Log in or register to post comments

गेल्या तीन महिन्यांपासून

आग्या१९९०
Sun, 09/21/2025 - 15:22 नवीन
गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या फेसबुक फीडमध्ये विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे व्हिडिओ दिसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, RTO अधिकारी, सिव्हिल सर्जन, रेशनपुरवठा अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन या कार्यकर्त्यांनी केलेले व्हिडिओ चित्रण शेअर केले जाते. सामान्य नागरिकांशी उद्धटपणे वागणारे हेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांसमोर मात्र नम्रतेने वागताना दिसतात. रहिवासी दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड इत्यादींसाठी महिनोनमहिने सरकारी कार्यालयांचे हेलपाटे घालणाऱ्या नागरिकांना, हे कार्यकर्ते सोबत गेल्यावर, त्याच दिवशी आवश्यक दाखले कुठलीही लाच न देता लगेच मिळतात. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटते—हे नेमके कसे शक्य होते? प्रत्यक्षात, कार्यकर्ते कुठेही गोंधळ किंवा तोडफोड न करता, कायदेशीरपणे जाब विचारतात आणि अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्याची विनंती करतात. यामध्ये सोशल मीडियाचा योग्य वापर करून प्रभावी दबाव निर्माण केला जातो. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी धडा घ्यावा असे आदर्श काम हे कार्यकर्ते सातत्याने करत आहेत.
  • Log in or register to post comments

मित्रो, नाचो!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/21/2025 - 18:02 नवीन
मित्रो, नाचो! Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/21/2025 - 20:01 नवीन
खरे आहे पण दुसरा पर्याय तरी काय होता? आपण जेवढे अमेरिकेवर अवलंबून आहोत त्याच्या १% ही अमेरिका आपल्यावर अवलंबून नाही. अमेरिका पुन्हा ग्रेट करण्याचा चंग ट्रम्पाने बांधला असल्याने ट्रम्प सगळे प्रकार करणार ह्याचा अंदाज होता. अर्थव्यवस्था खराब आहे म्हणतात पण देशांतर्गत/आंतरराष्त्रीय विमानसेवा जोमात आहे. एस.यु.व्ही. गाड्यांचा खपही जोरात.बांधकाम क्षेत्राला वाईट दिवस येणार हे गेले १५ वर्षे ऐकत आहे पण कोथरूडमध्ये २ बी.एच.के ४५ लाखाचा एक कोटी झाला लोकांचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/21/2025 - 23:13 नवीन
मित्रो, नाचो!
=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

AI चा आय.टी. च्या नोकर्‍यांवर कितपत परिणाम होत आहे ?

चित्रगुप्त
Mon, 09/22/2025 - 01:13 नवीन
AI चा आय.टी. च्या नोकर्‍यांवर कितपत परिणाम होत आहे, किती लोकांच्या नोकर्‍यांवर गदा आलेली आणि येऊ घातली आहे याबद्दल कुणीतरी लिहावे. अमेरिकेत नोकरी करणारे माझ्या परिचयातले काही भारतीय यामुळे चिंताक्रांत झालेले आहेत, आणि काही भारतात परत येत आहेत. -- पूर्वी कधीकाळी डीटीपी वगैरे आल्यावर शेकडो कमर्शियल आर्टिस्टांच्या नोकर्‍या गेल्या असल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

चीनने नवीन 'K' विसा सुरु केला आहे, तिथे भारतीय जाऊ शकतात.

चित्रगुप्त
Mon, 09/22/2025 - 01:16 नवीन
China’s K-VISA Plan | After H1B Visa Rejection in US, India’s Professionals Shift Focus. https://youtu.be/2WUk6Oi0ih8?si=nv5maowb_YcfiBHq
  • Log in or register to post comments

एस. एल. भैरप्पा

धर्मराजमुटके
Wed, 09/24/2025 - 17:54 नवीन
एस. एल. भैरप्पा आज काळाच्या पडद्याआड गेले. एक 'पर्व" संपलं. जीवनातील काही काळ त्यांचे अनुवादित साहित्य (उमा कुलकर्णी यांचे कृपेने) वाचताना फार आनंदात गेला. बरीचशी पुस्तके संग्रही आहेत. श्रद्धांजली म्हणून पुन्हा बाहेर काढून वाचावीत म्हणतो
  • Log in or register to post comments

गेल्या महिण्यात भारतवारी करुन

सुक्या
Wed, 09/24/2025 - 22:14 नवीन
गेल्या महिण्यात भारतवारी करुन येताना भैरपांची पुस्तके आणली. वाचायला सुरु करण्याआधीच ही बातमी. भावपुर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मला उशीर झाला,श्री प्रचेतस यांनी सुचवल्या नंतर..

कर्नलतपस्वी
Wed, 09/24/2025 - 18:51 नवीन
भैरप्पांचे सार्थ पुस्तक विकत घेतले आणी मग मात्र दरवेळेस एक या प्रमाणे पुस्तके घेत गेलो. अनुवाद वाचायला आवडत नाही पण उमा कुलकर्णी यांनी कथानकाला धक्का न लावता सुंदर अनुवाद केल्याने कानडी लेखकाची साहित्य संपदा मराठीतून वाचायला तेवढाच आनंद आला. भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भैरप्पांचे साहित्य उशीरा

Bhakti
Wed, 09/24/2025 - 20:25 नवीन
भैरप्पांचे साहित्य उशीरा माझ्या हाती लागले.सध्या 'पर्व' ऐकतेय अक्षरशः असे महाभारत सगळ्यांनी आवर्जुन वाचले पाहिजे.कुठेही अमानवी,देव संकल्पना नाही तर केवळ मानवी भावनांवर आधारित महाभारत लिहिणारे भैरप्पा अद्भुत लेखक होते.आवारण ,वंशवृक्ष पुस्तक ऐकली आहेत.खुप मोठी दुःखद बातमी आहे.असा लेखक परत होणे नाही _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

भैरप्पांचे

कॉमी
Wed, 09/24/2025 - 19:41 नवीन
उत्तरकांड वाचलेले. छानच होते. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भैरप्पाना श्रद्धांजली!

अमरेंद्र बाहुबली
Wed, 09/24/2025 - 22:20 नवीन
भैरप्पाना श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

निवडणूक आयोगास सुबुद्धी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/25/2025 - 09:25 नवीन
'वोट चोर, गद्दी छोड़' च्या धुराळ्यानंतर मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पावले उचलण्यात आली आहेत,आता मतदारांची ई-पडताळणी होणार आहे. आयोगाने त्यांच्या संकेतस्थळ आणि अपवर एक नवीन 'ई-साइन' फीचर सुरू केले आहे. सुरुवातीला सगळं नाकारायचं, सर्व व्यवस्था हाताशी धरुन कोणी काही आरोप केले की, त्याला विरोध करायचा. तोंडघशी पडले की, हळूच आरोप केलेल्या गोष्टी सुधारायच्या. अर्थात, गोबरयुगात हे असं व्हायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

राहुल गांधींनी न थकता GST आणि

आग्या१९९०
गुरुवार, 09/25/2025 - 10:07 नवीन
राहुल गांधींनी न थकता GST आणि वोट चोरीतील चुका दाखवल्यामुळे अनुक्रमे सरकार आणि निवडणूक आयोगाला दखल घ्यावी लागून सुधारणा कराव्याच लागल्या. त्यामुळेच गोदी मिडिया, आयटी sel, भाजप समर्थक सध्या गप्प आहेत. घशात गेलेले दात त्यांना तोंड उघडू देत नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थात, गोबरयुगात हे असं

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/25/2025 - 10:47 नवीन
अर्थात, गोबरयुगात हे असं व्हायचंच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजकारण करु नको

अभ्या..
गुरुवार, 09/25/2025 - 21:36 नवीन
धाराशिव मध्ये कधी नव्हे ती पूर परिस्थिती असताना, राज्यात जवळपास ७० लाख एकरावरील शेतजमीन बरबाद झाली असताना, १० जणासह हजारो गुरेढोरे आणि घरे पाण्यात गेल्यावर, मराठवाड्यात गेल्या अर्ध्या वर्षात ५०० च्या वर शेतकर्‍यांच्या आत्महत्या असताना इतक्या दिवसांनी मुख्यमंत्री त्यांच्या लवाजम्यासह अवतरतात आणि पीडीत नागरिकांना सरकारी किर्तन ऐकवताना एका शेतकर्‍याने फक्त "प्रति एकरी कीती मदत देणार?" इतकेच विचारले तर आपल्या उद्दाम मुख्यमंत्र्याचे उत्तर "ह्यात राजकारण करु नका" वर ह्या शेतकर्‍याला पोलीस पकडून नेतात आणि दारु पिऊन गोंधळ घालतोय असे सांगतात. धन्य आहे. दुसरे धरणफेम उपरत्न शेतकर्र्‍यांनी प्रश्न विचारताच म्हणतेय यालाच मुख्यमंत्री करा, आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? तिसरे उपरत्न स्वतःचे आणि पालकमंत्र्याचे फोटो लावलेल्या अन्नधान्याच्या बॅगा तीन तीन दिवस उपाशी शेतकृयांनी परत केल्यावर म्हणतेय " ही सरकारी नाही तर आमची वैयक्तिक मदत आहे" चौथे महाजन रत्न म्हणतेय "पैसे काय आम्ही खिशात घेऊन फिरतो का" . अंसंवेदनशीलतेचा कळस आहेत एकेक. काय भाषा, काय माज
  • Log in or register to post comments

मुळात जनतेच्या मतानी निवडून

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/25/2025 - 21:55 नवीन
मुळात जनतेच्या मतानी निवडून आले असतील तर जनतेची पर्वा करावी लागते, ईव्हीएम सेटिंग ने जिंकेलेल असेच उत्तर देणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेह-लडाख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/26/2025 - 18:36 नवीन
लेह-लडाख सध्या पेटले आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनेआणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. भाजपची पक्ष कार्यालये जाळली वगैरे च्या बातम्या येत आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा, राज्यघटनेचे सहावे परिशिष्ठ लागू करणे.लडाखमध्ये आणखी एक संसदीय जागा वाढवणे. आणि लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना. इत्यादि मागण्या आहेत. पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील 15 दिवसांपासून उपोषण करत होते आणि त्याच मुद्द्यांवर हे आंदोलन होतं. मात्र केंद्र सरकारने आंदोलन आणि हिंसाचारास सोनम वांगचुक हे जवाबदार मानून त्यांचे परदेशी फंड वगैरे देशद्रोही कृत्य म्हणून त्यांच्यावर देशद्रोही म्हणून खटला भरून त्यांची तुरुंगात रवानगी होईल असे वाटते. केंद्र सरकार-भाजपला विरोध कराल तर तुरुंगात जाल या धोरणाचे आता कोणाला आश्चर्य वाटत नाही. अर्थात, गोबरयुगात हे अनपेक्षित नाहीच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

गोबरयुगात हे अनपेक्षित नाहीच.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 09/26/2025 - 22:15 नवीन
गोबरयुगात हे अनपेक्षित नाहीच. + १ तिकडे तात्याने औषधांवर १०० टक्के टेरिफ लावले आहे, मोदीजी भारताला पुन्हा गरिबी दाखवतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Everyone is hyping Sonam

सुबोध खरे
Fri, 09/26/2025 - 18:39 नवीन
Everyone is hyping Sonam Wangchuk as the “savior” of Ladakh, but let’s strip the romanticism and actually look at what he’s asking for. Sixth Schedule inclusion On paper: protects culture, ecology, tribal rights. In reality: it hands veto power over land and resources to local councils. Translation = Delhi needs local permission to build roads, bases, or even military logistics hubs in the most sensitive border zone in India. Meanwhile, China is laying down highways to the LAC like Lego bricks. Why would India voluntarily handicap its own defense? Statehood for Ladakh Population of Ladakh = ~3 lakh. That’s smaller than many UP districts. A full legislature, high court, governor, etc. for that? It’s not empowerment, it’s bureaucratic bloat. The Union Territory model ensures direct Centre control, which is exactly what you need in a frontier region. The “betrayal” narrative Let’s not rewrite history. In 2019, Ladakhis celebrated UT status when Article 370 was scrapped. They weren’t promised statehood. Compare that to J&K, where the Centre explicitly promised statehood restoration and hasn’t delivered yet. As Omar Abdullah said: if Ladakhis feel betrayed, imagine how Kashmiris feel after asking peacefully for years. The China angle Wangchuk frames his movement as ecological and cultural protection. Fine. But intentionally or not, his agenda mirrors China’s interests: stall Indian projects, block troop mobility, keep Ladakh weak and dependent. Ecology matters, but without national security, there’s no ecology to protect. Bottom line: What sounds like a “Gen Z revolution” for local rights is, in practice, a strategic gift to Beijing. Sixth Schedule would paralyze India’s hand in Ladakh. Statehood is redundant. Job reservations and local representation can be addressed without tying the nation’s military in knots.
  • Log in or register to post comments

वॉव

अभ्या..
Fri, 09/26/2025 - 18:49 नवीन
ज्या रेडीट डिस्कशन वरुन हा पॅरा घेतलाय त्या क्रियेटरचा (r/indiadiscussion) चा हा लोगो. Image removed. लोगो बघायचा, उगमस्थानासह सगळे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कमळ दिसतय लोगोत म्हणजे नक्कीच

अमरेंद्र बाहुबली
Fri, 09/26/2025 - 22:17 नवीन
कमळ दिसतय लोगोत म्हणजे नक्कीच चिखलातला असणार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वांगचुक व गडकरी

स्वधर्म
Fri, 09/26/2025 - 22:31 नवीन
अपेक्षेप्रमाणे सोनम वांगचुक यांच्यावर भाजप चे ट्रोल बदनामीची मोहीम करणारच होते. पण काही रोचक बातम्या: वरील गदारोळानंतर, गुरूवारच्या बातमीनुसार त्यांच्या संस्थेला ३.५ लाख इतकी महाप्रचंड रक्कम परदेशी संस्थेकडून मिळाली व ती योग्य त्या खात्यात भरली नाही म्हणून त्यांच्या परदेशी देणगी स्वीकारण्याचा परवाना गृह मंत्रालयाने रद्द करण्याची कारवाई केली. The home ministry alleged in its order that Wangchuk had deposited Rs 3.5 lakh in the FCRA account of the organisation in violation of Section 17 of the Act during the financial year 2021-’22. दुवा: https://scroll.in/latest/1087008/day-after-ladakh-violence-centre-cancels-fcra-licence-of-activist-sonam-wangchuks-ngo आता दुसरी बातमी ही वरील पहिल्या बातमीमुळे खूपच रोचक ठरते. अगदी भाजप समर्थकांसाठी पणः गडकरी यांचे चिरंजीव आय आर बी कंपनीच्या कुटुंबाने काढलेल्या कंपनीत (तेच ते पुणे मुंबई टोल वसूल करणारे) भागीदार होते. शिवाय या नवीन कंपनीचे बँक कर्जाचे अतिकिरकोळ ३१८८ कोटी रू. थ़कीत झाल्यावर त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली व राष्ट्रीय दिवाळखोरी लवादाने हजारो कोटी रूपये मालमत्ता असलेल्या त्या कंपनीचा लिलाव केला. तो लिलाव अति अति फारच किरकोळ २९९ कोटी रुपयांना एका दुसर्‍या कंपनीने घेतला. योगायोग असा की ही खरेदी गडकरी यांच्या दुसर्‍या मुलाच्या मानस अ‍ॅग्रो नावाच्या कंपनीने केली. आता यात सोनम वांगचुक यांच्या फसवणूक व्यवहाराईतकी महाप्रचंड रक्कम नसल्याने अर्थातच सरकारच्या सर्व संस्था अगदी शांत आहेत, पण सोनम यांच्या संस्थेने ३.५ लाख इतकी महाप्रचंड रक्कम फक्त दुसर्‍या खात्यात भरली म्हणून आपले अत्यंत जागरूक गृह खाते वायुवेगाने कारवाई करते झाले. ... Gadkari’s son Nikhil was a shareholder in IEPL, established by the Mhaiskar family, who shot into the limelight during the Sena-BJP government’s rule in the late 1990s, when they bagged major toll contracts in the state. The company was cleared to take bank loans amounting to ₹1,170 crore and went on to set up a coal-based power generation company in Bela village in Nagpur to generate 540 MW of power. “After setting up one unit of 270 MW, they claimed the second unit could not take off as they were unable to sign a power-purchase agreement. The company proceeded to declare bankruptcy. The debt it owed five banks rose to ₹3,188 crore and lenders moved the National Company Law Tribunal (NCLT), which invited bids to acquire the company’s assets, in 2022,” she said. Damania further alleged that Manas Agro, a company promoted by Sarang Gadkari, another son of Gadkari, secured the winning bid, for ₹299 crore. “A company with assets and a net worth of thousands of crores was acquired for peanuts. Moreover, Manas Agro is a subsidiary of Manas Ventures, which in turn was a subsidiary of Cian Agro, a company promoted by Nikhil Gadkari. दुवा: https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/gadkari-accused-of-financial-misappropriation-calls-it-vendetta-101758827872014.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गोबरयुगीन भारतातील गमती जमाती

अमरेंद्र बाहुबली
Fri, 09/26/2025 - 22:35 नवीन
गोबरयुगीन भारतातील गमती जमाती म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

१९९५

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/28/2025 - 13:32 नवीन
युती सरकारचा काळ(१९९५-९९) कोणाला आठवत असेल की नाही माहित नाही. पण अनेक अधिकार्यांची तक्रार होती की मंत्री ऑफिसमध्ये बोलावतात, सरळ 'किती देणार' विचारतात आणि मग नकार दिला की बदली केली जाते. ह्या मंत्र्यांमध्ये गडकरींचे नाव घेतले जायचे.(शिवसेनेचेही दोघे होते). फ्लाय-ओव्हरची कामे देतानाही हा प्रकार झाला होता. २०१४ पासुन गडकरींची 'स्वच्छ' प्रतिमा समोर यायला लागली तेव्हा हसू आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गडकरीणी त्यांच्या मुलाच्या

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 13:57 नवीन
गडकरीणी त्यांच्या मुलाच्या लग्नात बहुतेक २०१० साली किती खर्च केला होता ह्याची माहिती इंटरनेटवर पहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

संबंधीत मंत्र्यांचे

स्वधर्म
Sun, 09/28/2025 - 17:56 नवीन
संबंधीत मंत्र्यांचे अजिबात आश्चर्य वाटत नाही, आश्चर्य वाटते ते भाजप समर्थकांचे. अजूनही न खाऊंगा न खाने दूंगा असे म्हणणार्‍या नेत्यावर विश्वास ठेवतायत! काही वेगळा दृष्टीकोन पचतच नाही. बाकी गडकरी आपण फार कामाचे असा आव आणून बोलत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

त्या समर्थकाना सगळ कळतय पण

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 19:10 नवीन
त्या समर्थकाना सगळ कळतय पण त्याना वास्तविकता स्वीकारायला जड जाते आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

धक्कादायक आहे

युयुत्सु
Sat, 09/27/2025 - 17:12 नवीन
धक्कादायक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

it hands veto power over land

आग्या१९९०
Fri, 09/26/2025 - 23:27 नवीन
it hands veto power over land and resources to local councils. Translation = Delhi needs local permission to build roads, bases, or even military logistics hubs in the most sensitive border zone in India. Meanwhile, China is laying down highways to the LAC like Lego bricks. Why would India voluntarily handicap its own defense? हे बहुदा खटकत असेल तर वन ( सुरक्षा ) सुधारणा बिल मधील तरतुदी वाचा. देशातील आदिवासी का ह्या बिलाला विरोध करत आहे ते जाणून घ्या. सरकार बुद्धिभेद करण्यात पटाईत आहे. काय काय हिसकावून घ्यायचे आणि कोणासाठी ह्यात तरबेज आहे सरकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मुद्दे खोडून काढता आले तर

सुबोध खरे
Fri, 09/26/2025 - 19:31 नवीन
मुद्दे खोडून काढता आले तर सांगा काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय यालाच आजकाल काही लोक जास्त महत्त्व देतात बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments

मुद्दे???

अभ्या..
Fri, 09/26/2025 - 19:43 नवीन
कालच सुभाषित वाचले एक किंमत घड्याळाची नाही तर ते वापरणाऱ्या मनगटाची असते. म्हणले, घड्याळ्याच्या किमतीपेक्षा वापरणारे मनगट बघून ठरवावी किंमत. पण असो, कॉपी केलेला पॅरा हे पूर्णपणे तुमचे मत असेल तर सोनम वांगचूकच्याच कित्येक लिंक उपलब्ध आहेत त्या पण बघा. बघा त्यातल्या कुठल्या खर्‍या मानायच्या तुमच्या बुध्दीने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ट्रम्प तात्यांनी परत एकदा

रात्रीचे चांदणे
Fri, 09/26/2025 - 22:35 नवीन
ट्रम्प तात्यांनी परत एकदा असिफ मुनीरला भेट दिली. ह्या वेळेस शरीफ पण बरोबर होते. ऑपेरेशन सिंदूर नंतर मुनीर बरोबरची ही दुसरी तिसरी तरी भेट असेल. सौदी बरोबरची डिफेन्स डील आणि ट्रम्प बरोबरच्या भेटी ह्या काही भारतासाठी चांगल्या गोष्टी नाहीत. चीन तर आगोदर आहेच पाकिस्तान च्या बाजूने. ५०% टारीफ मधून औषधना वागळले होते पण त्यावरही आत्ता त्यावरही १०० टक्के कर लावला आहे. आपण ह्यातून कसा मार्ग काढतो ते बघायला हवं.
  • Log in or register to post comments

जेनेरिक औषधांवर टेरिफ नाही तर

सुबोध खरे
Sat, 09/27/2025 - 09:43 नवीन
जेनेरिक औषधांवर टेरिफ नाही तर पेटंटेड आणि ब्रँडेड औषधांवर आहे. त्यामुळे सध्या तरी भारतीय औषध कंपन्यांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. भारतीय औषध कंपन्यांचा भर स्वस्त जेनेरिक औषधांच्या निर्यातीवर आहे. पण तात्यांचा काहीही भरवसा नाही. अर्थात जेनेरिक औषधांवर जर एवढा कर लादला तर सामान्य माणसाला औषधें विकत घेणे अशक्य होईल त्यामुळे त्यावर फार जास्त कर लावणे तात्याला शक्य होईल असे वाटत नाही. वाईट काळातील हि एक संधी समजून बहुसंख्य भारतीय औषध कंपन्या सध्या अमेरिकेच्या बाहेर इतर बाजारपेठा ( आफ्रिका दक्षिण अमेरिका इ) शोधत आहेत जेणेकरून एकाच देशावरील आपले अवलंबित्व कमी होईल.
  • Log in or register to post comments

जेनेरिक औषधांवर निर्यात कर

शाम भागवत
Sun, 09/28/2025 - 09:11 नवीन
जेनेरिक औषधांवर निर्यात कर लादून त्यातून ब्रॅंडेड औषधाच्या निर्यातीवर अनुदान द्यायचं असं काहीतरी करायला पाहिजे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शिवसेनेचे प्रेम वादातीत आहे,

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 17:43 नवीन
Image removed. शिवसेनेचे प्रेम वादातीत आहे, आज देशप्रेमी नेते, पक्ष सत्तेत असते तर पाकड्यासोबत क्रिकेट सामने झाले नसते, पण दुर्दैवाने देशापेक्षा पैशाला मोठी मानणारी लोक सत्तेत आहेत.
  • Log in or register to post comments

संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे

पाषाणभेद
Sun, 09/28/2025 - 18:39 नवीन
संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे संकट उभे आहे. शेती, पीके जवळजवळ नष्ट झाले आहे. पशू, घरे यांचे नुकसान झाले आहे. सर्वांना यातून तारावयास ईश्वर समर्थ आहे, पण शासन, सामाजिक संस्था यांनी देखील संबधितांस मदत करणे अत्यावश्यक आहे.
  • Log in or register to post comments

सरकारची मदत करायची आजीबात

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 19:11 नवीन
सरकारची मदत करायची आजीबात इच्छा नाही, देऊ, करू, पाहू म्हणून मदतीला चालढकल केली जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

जन्मदरिद्री, कर्मदरीद्री, अष्टदरीद्री

अभ्या..
Sun, 09/28/2025 - 19:37 नवीन
ओमराजे निंबाळकर ह्या शिवसेनेच्या खासदाराने रात्री अपरात्री स्वतः आपत्तीनिवारण मोहिमात भाग घेऊन त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिध्द झाल्यानंतर मामु आणि दोन्ही माउमुमंना जाग आली, त्यातल्या एका माउमुमंने तर तेवढ्यात वेळात वेळ काढून स्वतःचे फोटो बॅगांवर प्रिंट करवून घेऊन, फ्लेक्स छापून मगच त्या गाड्या नटवून सजवून (त्यात पण मज्जा बरंका, तीन चार ट्रकमध्ये बसणारा माल पंचवीस महिंद्रा पिकप मध्ये भरायचा आणि सांगायचे पंच्च्वीस्स्स ट्रक मदत पाठवली) पाठवल्या. तीन दिवस उपाशी असलेल्या नागरिकांनी परत पाठवल्या त्या गाड्या. कुणीही थू च करणार असल्या प्रशासनावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुणीही थू च करणार असल्या

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 19:38 नवीन
कुणीही थू च करणार असल्या प्रशासनावर... +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा