✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी सप्टेंबर २०२५

स
स्वधर्म यांनी
Sat, 09/06/2025 - 21:49  ·  लेख
लेख
६ सप्टेंबर आला तरी चालू घडामोडींचा धागा दिसत नव्हता, म्हणून सुरू केला. बहुधा सगळे गणपतीत मग्न आहेत. नातवाला 65 लाखांची Tesla भेट देणाऱ्या प्रताप सरनाईकांची एकूण संपत्ती किती? रिक्षाचालक ते 800% संपत्ती वाढ, Income सोर्स... सरनाईकांनी म्हणे निर्धार केला होता की भारतातील पहिली टेस्ला मीच घेणार. त्याप्रमाणे ती त्यांनी घेतली. शिवाय या त्यांच्या कृतीमुळे आता त्यांच्या नातवाला शाश्वत वाहतुकीचे महत्व कळेल. त्यांच्या संपत्तीत २००९ सालच्या १६ कोटी पासून २०२४ मध्ये ३३३ कोटी अशी वाढ झाली आहे. बाकी किरकोळ विषय सोडून देऊन एका परिवाहन मंत्र्याच्या पर्यावरण स्नेही कृतीची जरूर कदर केली पाहिजे, नाही का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22025 वाचन

💬 प्रतिसाद (142)

प्रतिक्रिया

नाही.

कंजूस
Sun, 09/14/2025 - 18:43 नवीन
नाही. चारशे बोलले आणि २३० वर अडकले. फसवा आत्मविश्वास होता. फक्त अगदी निवडणुकीच्या तीन महिने अगोदरच्या काळातील घटना दोघांनाही तारक/ मारक ठरू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

विद्यमान सत्ताधीश

रामचंद्र
Sun, 09/14/2025 - 19:50 नवीन
विद्यमान सत्ताधीश निवडणुकीच्या बाबतीत नक्कीच गहाळ किंवा निष्काळजी नाहीत. शिवाय ते कमालीचे प्रयत्नवादी आहेत. निवडणुकीच्या अंदाजाबाबत त्यांनी करवून घेतलेल्या अभ्यासानुसार अपेक्षित यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी 'चारशेपार' ही घोषणा एक डावपेच म्हणून केली. त्याचा परिणाम प्रत्यक्षात नसलेली लाट आणि त्यावर अर्थातच विरोधकांची प्रतिक्रिया असं दोन्हीही झालं. मात्र सर्व भलेबुरे मार्ग हाताळून सत्ताधारी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवलं. विरोधक कमी पडतात ही सत्ताधारी पक्षाची चूक नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

उलटे वाटते

चंद्रसूर्यकुमार
Sun, 09/14/2025 - 21:18 नवीन
मला याच्या बरोबर उलटे वाटते. ४०० पार ही घोषणा देणे ही मोदींची मोठी चूक झाली. त्यामुळे झाले असे की मोदी तसेही ४०० जागा आणणार आहेत म्हणून समर्थक मतदार गाफील राहिले आणि मतदानाला बाहेर पडले नाहीत तर मोदी खरोखर ४०० जागा घेऊन आले तर काय या भीतीने विरोधक मतदार मात्र अगदी निकराने घराबाहेर पडले. मोदी तसेही ४०० जागा आणणार आहेत मग माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे - मग कशाला ४०-४२ डिग्री तापमानात मत द्यायला जा, महाराष्ट्रात अजित पवारांना बरोबर घेतलेले आवडले नाही ना मग एक तर मतदानाला बाहेरच पडू नका किंवा विरोधात मत द्या - तसेही मोदी ४०० जागा आणणारच आहेत मग माझ्या एका मताने काय फरक पडतो? पुण्यात ब्राह्मण उमेदवार दिला नाही ना - मग द्या विरोधात मत किंवा मतदानाला बाहेर पडूच नका कारण माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? स्थानिक उमेदवार आवडला नाही ना - मग तेच: मतदानच करू नका किंवा विरोधात मत द्या कारण मोदी तसेही चारशे जागा आणणार आहेत मग माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? उत्तर प्रदेशात पक्षातील आपापसातले हेवेदावे पुढे आले आणि जोरदार फटका बसला तो त्याच कारणाने - असे वाचले होते (की युट्यूब व्हिडिओमध्ये ऐकले होते) की युपीत जोरदार विजय मिळाला तर मग योगी डोईजड होतील म्हणून अमित शहांनी योगींना हवे होते त्यापैकी २०+ नावे कापली. खखोदेजा. जर आपण आरामात जिंकत आहोत असे मोदींनीच चित्र उभे केले नसते तर कदाचित असे आपापसातले हेवेदावे चव्हाट्यावर आले नसते. आपण असे गाफील राहिले तर काय परिणाम होतो हे कळल्यावर त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये समर्थक मतदार जागे झाले. त्याचे परिणाम महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत दिसून आले. लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजप उमेदवार हरला होता तो पराभव अगदी जिव्हारी लागला असेल. त्यानंतर काही महिन्यात झालेल्या त्याच अयोध्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या मिल्कीपुर पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार दणदणीत मतांनी जिंकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

निवडणूक मुद्दे आणि अब की बार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/15/2025 - 11:05 नवीन
>>>>>>अडवणूक आयोग सोबत असले तर ४०० काय ५०० ही अशक्य नाहीत! :) उन्होने मेरी मा का अपमान किया है, प्लीज मुझे वोट दे दो. आपको पता होगा मेरी मॉ भी एटीम के लाईन मे खडी थी, प्लीज मुझे वोट दो, आपको पता है, मैने रेल स्टेशन पर चाय बेची है, प्लीज मुझे वोट दे दो. मैने जिंदगी के पैतीस साल भीक मांगकर खाये है, प्लीज मुझे वोट दो. देश अशा मुद्यांवर चालत राहिला तर, एवढ्यावरही पाचशे होतील असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:)

अमरेंद्र बाहुबली
Mon, 09/15/2025 - 17:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वोटचोर

विअर्ड विक्स
Sat, 09/13/2025 - 20:22 नवीन
वोटचोर हा हेका पुढच्या निवडणुकीपर्यंत रागा धरणार आणि २०१९ ची चूक पुन्हा करणार का हि उत्सुकता आहे , बिहार निवडणुकीत वोटचोर हा मुद्दा चालणे हा सर्वात मोठा विरोधाभास आहे जे बूथ कॅप्चरिंगचे हेड क्वार्टर आहे असू दे निवडणुका या भावनाप्रधान होऊन लढवल्या जातात त्यामुळे असे तर्क बाजूला ठेवले जातात. सकारात्मक ऊर्जा जोपर्यंत विरोधकांतून लोकांना मिळणार नाही तोपर्यंत जिंकणे कठीण आहे . यात्रा करून उपयोग नाही जेव्हा CM कोण असे विचारले असता गोलमोल उत्तर देऊन तेजोहरण केले यातूनच निकाल लागला .
  • Log in or register to post comments

आता तर कठीण आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/14/2025 - 11:47 नवीन
''निवडणूक नोंदींचे विशेष पुनरावलोकन (एसआयआर) करावे या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकारावर गदा येत असल्या मत निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्रात केले आहे'' आम्ही जे काही करतो ते बरोबर करतो. आमच्या निवडणूकीच्या कामकाजात कोणीही लक्ष घालू नये असेच म्हणायचे आहे का निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे, ते स्वतंत्र आहे, याचा अर्थ वाटेल तसा निर्णय घेता येईल अस कसे म्हणता येईल. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य हे लोकशाही प्रक्रियेतील निवडणूका निष्पक्ष पद्धतीने पार पाडाव्यात त्यासाठी आहे, तसे होत नसेल तर कोणास तरी हस्तक्षेप करावाच लागेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नक्कीच.

कंजूस
Sun, 09/14/2025 - 18:50 नवीन
नक्कीच. पण वेळ काळ आणि नियमाच्या कचाट्यात पकडायला विरोधक असमर्थ ठरले. सरकार एका बाजूला आणि अंमलबजावणी यंत्रणा म्हणजे नोकरशाही यांना त्यांच्याच चिमट्याने वेळीच पकडले नाही. एक सर्वसामान्य विधान करून कोर्टात खटले दाखल होत नसतात. विवक्षित प्रत्येक निर्णयाला दावा दाखल करण्याचा काळ सोडला गेला. काँग्रेसकडे तर नामांकित वकील आहेत पण ते स्वतः हून खटले आणत नाहीत. कोणीतरी काम दिले की खटला चालवायचा असा कार्यक्रम करतात. याचा फायदा भाजपगठबंधनाला झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणूक आयोगाने

सुबोध खरे
Tue, 09/16/2025 - 09:55 नवीन
निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्रात केले आहे'' कायद्याचे मूलभूत अज्ञान आहे हे इथे स्पष्टपणे दृगोच्चर होते. कोणत्याही खटल्यात सुरुवातीलाच सरकारी पक्ष या न्यायालयाला हा खटला चालवण्याचा अधिकारच नाही किंवा हे न्यायालयाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे किंवा न्यायालयीन हस्तक्षेप हि घटनेची पायमल्ली आहे असे शपथपत्रात दाखल करतातच. त्यात काही तथ्य नाही हे सरकारी पक्षालासुद्धा माहिती असतं तसच न्यायालयाला सुद्धा. आपल्याकडे जशा नोटीस लिहिलेल्या असतात. उदा. येथे गाडी पार्क केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. trespassers will be prosecuted. त्यात काही दम नाही हे लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांनाही माहित असतं त्यावर इतके त्वेषाने लिहिणे म्हणजेच आपल्याला कायद्याची माहिती कमी आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/16/2025 - 11:14 नवीन
त्यावर इतके त्वेषाने लिहिणे म्हणजेच आपल्याला कायद्याची माहिती कमी आहे असे दिसते.
डॉ.सुबोध खरे आपणास वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

trespassers will be

आग्या१९९०
Tue, 09/16/2025 - 11:59 नवीन
trespassers will be prosecuted. त्यात काही दम नाही हे लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांनाही माहित असतं
निरुपयोगी नक्कीच नाही असे बोर्ड लावल्याने. वहिवाटीच्या खटल्यात आपली बाजू मजबूत होण्यास नक्कीच हातभार लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आनंदी आनंद गडे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 09/15/2025 - 17:15 नवीन
आनंदी आनंद गडे डुप्लिकेट वॉटर जीथे तिथे, मतचोरी हवी तिथे भाजपे जिंकती चोहीकडे. :) https://www.lokmat.com/maharashtra/dhule-anil-gote-on-fake-voters-list-vote-chori-45-thousand-bogus-voters-cast-their-votes-in-dhule-assembly-elections-anil-goten-has-the-list-serious-allegations-a-a607/
  • Log in or register to post comments

आनंदी आनंद गडे साडेसाती कुणा कडे....

कर्नलतपस्वी
Tue, 09/16/2025 - 10:14 नवीन
साडेसाती चालू आहे. सध्यातरी बालकवी ठोंबर्याचे गाणे म्हणत टाळ्या वाजवत बसा.
  • Log in or register to post comments

लगे रहो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/16/2025 - 11:11 नवीन
तर, अशा त-हेने पुन्हा एकदा प.मोदीचं सरकार कायदे करण्याच्या बाबतीत तोंडावर पडलं. वक्फच्या तरतुदीच्या बाबतीत 'घटनाबाह्य मनमानी किंवा विधीमंडळाच्या अधिकाराबाहेर असलेल्या कायद्यांना सरसकट स्थगिती देता येईल' असे म्हणत वक्फच्या काही तरतुदींना न्यायालयाने स्थिगिती दिली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

https://www.misalpav.com

आग्या१९९०
Tue, 09/16/2025 - 12:17 नवीन
https://www.misalpav.com/comment/1188569#comment-1188569 ह्या धाग्यावरील माझे सर्व प्रतिसाद वाचा. मी मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते . आता कायदेशीर तोंड फोडून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/16/2025 - 12:50 नवीन
वाचत होतो. अगदी योग्य लिहित होता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अकराव्या शतकानंतर मुसलमान आणि

कंजूस
Tue, 09/16/2025 - 12:34 नवीन
अकराव्या शतकानंतर मुसलमान आणि मोगलांनी तलवारीच्या धारेवर देश ताब्यातील घेतला आणि हिंदुस्थानाबाद करायला सुरुवात केली. जमीन त्यांचीच झाली. ब्रिटिशांनी ताबा घेतल्याने ती क्रीया थांबली. ते गेल्यावर काँग्रेसमध्ये नेहरू घराणं आलं आणि देशात कुठेही त्यांचा काही संबंध नसलेल्या शहरातील मुख्य ठिकाणे नेहरू घराण्यांच्या वारसाच्या नावांनी ओळखली जाऊ लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज मोदी ७५ पूर्ण करून, संघ

अमरेंद्र बाहुबली
Wed, 09/17/2025 - 23:22 नवीन
आज मोदी ७५ पूर्ण करून, संघ आणी भाजपने पडलेल्या पायंड्या प्रमाण रिटायर्ड होत आहेत! पुढचा pm कोण होणारे?
  • Log in or register to post comments

ते पुढची निवडणूक लढवणार

कंजूस
गुरुवार, 09/18/2025 - 18:26 नवीन
ते पुढची निवडणूक लढवणार नाहीत एवढेच. शांत बसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

का हो? म्हणजे रिटायर्ड होणार

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/18/2025 - 20:49 नवीन
का हो? म्हणजे रिटायर्ड होणार नाहीत का? भाजपमधले अनेक ज्येष्ठ नेते वयाचा दाखला देऊन घरी बसवण्यात आले ना? मग मोदी काय स्पेशल आहेत का? की मोदी संघ, भाजपला विचारत नाहीत? शांत बसा. नाही बसणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोणते नेते घरी बसले?

कंजूस
Fri, 09/19/2025 - 06:15 नवीन
कोणते नेते घरी बसले?
भाजपमधले अनेक ज्येष्ठ नेते वयाचा दाखला देऊन घरी बसवण्यात आले ना?
प्रमिला महाजन किंवा सुषमा स्वराज? यांना ७५ वय झाल्यावर लगेच आमदार/खासदारकी सोडून द्यायला सांगितलं? नाही. पुढील निवडणुकीत तिकिट दिलं नाही. अपक्ष म्हणून निवडणुक लढवणार आली असती. ७५ वयाचा निर्णय काही आयोगाचा नाही, भाजपचा स्वतःचा आहे. शरद पवार मोदींच्या वाढदिवसाला बोलले की मीच जर ऐंशीच्या पुढे असून राजकारणात आहे तर मी काय सांगणार मोदींना? तर विरोधकांनी या मुद्द्यावर पार्ट्या करू नयेत. आणि पुढे इंडिया ब्लॉकचे सरकार आले तरीही राहुलबाबा किंवा प्रियांका पंतप्रधान होणार नाही. राष्ट्रपतीही ममता दीदीने ठरवलेलाच उमेदवार होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भुजबळ बुवा

सुबोध खरे
Sat, 09/20/2025 - 12:03 नवीन
भुजबळ बुवा Atal Bihari Vajpayee[1] (25 December 1924 Prime Minister of India In office 19 March 1998 – 22 May 2004 Lal Krishna Advani (born 8 November 1927) 7th Deputy Prime Minister of India In office 29 June 2002 – 22 May 2004 Prime Minister Atal Bihari Vajpayee Preceded by Devi Lal (1991) बेफाट आरोप करण्यापूर्वी जरा वरील पण वाचून पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

जौद्या! भाजपेयींची पदलालसा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 09/20/2025 - 13:29 नवीन
जौद्या! भाजपेयींची पदलालसा वादतीत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Manmohan Singh[a] (26

सुबोध खरे
Mon, 09/22/2025 - 20:29 नवीन
Manmohan Singh[a] (26 September 1932) Prime Minister of India In office 22 May 2004 – 26 May 2014 (AGE 82). Sonia Gandhi born 9 December 1946) (AGE 79) Parliamentary Chair of the Indian National Congress Incumbent Assumed office October 1999 Sharadchandra Govindrao Pawar born 12 December 1940, AGE 85
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पाकिस्तान ने सौदी बरोबर एक

विजुभाऊ
गुरुवार, 09/18/2025 - 16:16 नवीन
पाकिस्तान ने सौदी बरोबर एक विशेष करार केला आहे. या नुसार दोन्ही पैकी कोणावरही हल्ला झाल्यास तो दोन्ही राष्ट्रांवर हल्ला आहे असे मानून मदतीला यायचे. हा करार मुख्यतः इस्राईल आणि भारत या दोघाना डोळ्यापुढे ठेवून केलेला आहे. इस्राईल सौदीवर हल्ला करेल असे वाटत नाही. हा करार सौदीपेक्षाही पाकिस्तानी लश्कराला फायद्याचा आहे. पाकिस्तान कडे सैन्य आहे. सौदी चे सैन्य जगाच्या नजरेस पडलेले नाहिय्ये. पाकिस्तानकडे पैसे नाहीत मात्र अण्वस्त्रांची हूल आहे हे नक्की
  • Log in or register to post comments

ऑपेरेशन सिंदूर दरम्यान turkey

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 09/18/2025 - 20:31 नवीन
ऑपेरेशन सिंदूर दरम्यान turkey, चीन बरोबरच आझेरबाईझन चा पाठिंबा पाकिस्तान ला होताच. आत्ता ह्यात सौदी आला.
  • Log in or register to post comments

अतिरेकी कारवाया करणाऱ्या

कंजूस
Fri, 09/19/2025 - 05:47 नवीन
अतिरेकी कारवाया करणाऱ्या ठिकाणांवर भारताने हल्ला केला. तसाच पुढेही केला तर ते मित्र देश धावून येणार नाहीत. त्यांच्या करारात तसे नसणारच. अमेरिकेत पाकिस्तानात घुसून लादेनला ठार केले त्या घटनेबाबत पाकिस्तान गप्पच बसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

वोट चोर, गद्दी छोड.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/18/2025 - 21:13 नवीन
'वोट चोर, गद्दी छोड' यातल्या मत चोरीचा विरोधी पक्ष राहुल गांधी यांचा दुसरा भाग आला. देशाचे निवडणूक आयोग यांनी २०२३ च्या कर्नाटक निवडणूकीत मतांची चोरी कशी केली त्याबद्दल आरोप केले. निवडणूक आयोगाला हे सर्व माहिती असून घोटाळ्याबाजांना निवडणूक आयोग पाठीशी घालत आहे, निवडणूक आयोगाने खुलासा करावा अशी मागणी केली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इतका भ्रष्ट निवडणूक आयोग

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/18/2025 - 21:26 नवीन
इतका भ्रष्ट निवडणूक आयोग खचितच इतर कुठे असावा. काँग्रेसने उभा केलेला देश भाजपेयीनी नासवला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नाटकाच्या जागेबाबत खुलासा

कंजूस
Fri, 09/19/2025 - 06:02 नवीन
कर्नाटकाच्या जागेबाबत खुलासा वाचला. मतदार यादीतून नाव काढण्याबाबत ६०१८ अर्ज आले त्यातले २४ खरे निघाले. मग त्या उरलेल्या अर्जदारांनी पुढे काय केले ही माहिती राहुलबाबाने सांगितली नाही. तरीही मतदार चोरी होते हाच पाढा वाचला जात आहे. किती मतदारांची नावे गाळली गेली त्या मतदारांनी पुन्हा अर्ज केले का हेसुद्धा राहुलबाबा सांगत नाही. आला अर्ज की लगेच उघड यादी आणि करून टाक अद्ययावत असं काही होत नसते. निवडणुकीअगोदर साधारण दीड वर्ष मतदार याद्या नवीन करण्याची मोहिम असते तेव्हाच हे काम होते. त्यानंतर याद्या छापतात. बिहारमधील कित्येक लोक इतर राज्यांत जाऊन कामाला आहेत. त्यांची नावे मूळ ठिकाणी यादीत असतील तरी ते सर्व लोक निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी मूळ गावी/ शहरी जातही नसतील. मग काय त्यांचे नाव यादीतून रद्द होते आपोआप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहिती देण्यास टाळाटाळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/19/2025 - 09:09 नवीन
भारतातील मतदार यादीतील नावं सेंट्रली मॅनेज्ड पद्धतीनं डिलीट करण्यात आले आहेत.याचा तपास करण्यासाठी कर्नाटक CID ने निवडणूक आयोगाला.फोन नंबर, OTP, IP एड्रेस, डिव्हाईस डेस्टिनेशन पोर्टची माहिती मागितली आणि १८ वेळा पत्रं लिहिली. पण निवडणूक आयोगाने काहीही उत्तर दिलं नाही. उघड उघड मत चोरी होत आहे आणि मतचोरटे मोकाटफिरत आहेत. ही लढाई राहुल गांधी यांची नाही तर सामान्य जनतेचीही आहे, असे वाटायला लागले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+१ मतचोरी करून सत्तेत बसलेले

अमरेंद्र बाहुबली
Fri, 09/19/2025 - 09:54 नवीन
+१ मतचोरी करून सत्तेत बसलेले मस्तवाल लोक सामान्य माणसाला सहन होणारे नाहीत! भारत हा लोकशाही देश आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१००

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/28/2025 - 13:27 नवीन
१०० टक्के काहीतरी गडबड केली आहे. लोकांचा संशय वाढत चालला आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माई, विधानसभा २०२४ चे निकाल

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/28/2025 - 13:55 नवीन
माई, विधानसभा २०२४ चे निकाल बघ १ लाख १० हजार ते १ लाख २० हजार असे बरोबर टप्प्यात मते पडून भाजपाचे लोक जिंकलेत, १ लाख १४ हजार ते १५ हजार हा त्यातल्या त्यात जवळचा आकडा, माझ्या भागात तर जेवढे मुसलमान मतदार नाहीत त्याहून जास्ती मते mim ला पडली आहेत, अरे घोटाळे करा पण जरा नीट तरी करावेत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हा काय प्रकार

कपिलमुनी
गुरुवार, 09/18/2025 - 22:37 नवीन
असा अभय देता येते ??
  • Log in or register to post comments

विरोधी पक्ष यावर न्यायालयात

रामचंद्र
गुरुवार, 09/18/2025 - 23:45 नवीन
विरोधी पक्ष यावर न्यायालयात जाईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जोपर्यंत वोटेबँक लोकशाही आहे

NiluMP
Fri, 09/19/2025 - 23:11 नवीन
जोपर्यंत वोटेबँक लोकशाही आहे त्योपर्यंत देशाचं काही खार नाही
  • Log in or register to post comments

भारतातील पहिली टेस्ला मराठी

चौथा कोनाडा
Sat, 09/20/2025 - 18:25 नवीन
भारतातील पहिली टेस्ला मराठी माणसाने घेतली हे पाहुन अनेक जण जळताहेत ... या विषयावर चर्चा करुन त्यावर टीका करणे हा त्यांच्या विरुध्द कट आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्लान आहे ... मुंबै हळू हळू गुजरातेत खेचून घेण्याचा डाव आहे.
  • Log in or register to post comments

ट्रंप तात्यानी एच १ बी चे फीस

विजुभाऊ
Sat, 09/20/2025 - 20:14 नवीन
ट्रंप तात्यानी एच १ बी चे फीस चे नियम बदलले आहेत.
  • Log in or register to post comments

एच

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 09/20/2025 - 20:56 नवीन
एच वनबी व्हिसाची फी एक लाख डॉलर्स एवढी वाढवली आहे. शिवाय प्रत्येक वर्षी अशीच रक्कम भरावी लागणार आहे असे ट्रम्प म्हणतात. अर्जदाराकडे विशेष कौशल्य असेल आणि कंपन्याना असे लोक पाहिजे असतील तर फी द्यायला काहीच हरकत नाही अशीही पुस्ती तात्यांनी जोडली आहे. अपेक्षेप्रमाणे नॅस्कॉमने कांगावा करायला सुरुवात केली आहे. पुर्वी हे नॅस्कॉमवाले टी.व्ही.वर येउन रडायचे. सध्या परिस्थिती तशी नसल्याने तक्रार करत आहेत. आतापर्यन्त अनेकांचे समज तात्यांनी खोटे ठरवले आहेत. हे फक्त आवाज करतील, टॅरिफ पुन्हा कमी करतील, आय.टी.ला कधीच हात लावणार नाहीत वगैरे
  • Log in or register to post comments

आपले परराष्ट्र धोरण इतके वाईट

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/21/2025 - 10:09 नवीन
आपले परराष्ट्र धोरण इतके वाईट कधीच नव्हते, चुकीचे लोक सत्तेत आल्याने आता भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येणार! अजून किती देशाचे वाटोळे करणार आहेत मोदीजी देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिकेतील भारतियांवर मोठे संकट

चित्रगुप्त
Sun, 09/21/2025 - 00:48 नवीन
  • Log in or register to post comments

हा नविन

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 09/21/2025 - 10:13 नवीन
हा नियम(१ लाख डॉलर्स) फक्त नविन अर्जांसाठी असणार आहे. अमेरिकन सरकार ह्यातुन प्रचंड कमाई करेल(६५००० गुणिले १ लाख डॉलर्स). असो. गंमतीची बाब- काल ही बातमी आली आणी अनेकांच्या चेहर्यावर हसू पसरलेले दिसले. विशेष करून काही मराठी पत्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मोदी अमेरिकेत जेव्हा जेव्हा गेले तेव्हा तिकडच्या जमलेल्या प्रचंड गर्दीने विरोधकांचा थोडा जळफळाट झाला असेल तर आपण समजू शकतो पण विरोधकांपेक्षा ह्या पत्रकारांच्या बोलण्यातुन मत्सर दिसायचा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

इराण किंवा रशिया यांच्याकडून

कंजूस
Sun, 09/21/2025 - 13:59 नवीन
इराण किंवा रशिया यांच्याकडून तेल घेतले नाही तर अमेरिकेने दिले असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

*माननीय पंतप्रधान श्री

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/21/2025 - 13:04 नवीन
*माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी हे आज संध्या 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत* >>> ७५ पूर्ण झाल्याने तसेच परराष्ट्र धोरण पूर्णपणे गंडल्याने जबाबदारी घेऊन आपला राजीनामा जाहीर करणार असावेत तसेच नवीन पंतप्रधान म्हणून फडणवीस ह्यांचे नाव काहिर करतील अशी अपेक्षा आहे. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन निओ मिडल क्लास साथियो

अभ्या..
Sun, 09/21/2025 - 17:29 नवीन
खण्ण्ण खण्ण्ण खण्ण, फुल्ल भरलेल्या एसटीच्या दारापाशी उभा राहून टपाखाली वाजवून लक्ष वेधणारा असायचा. माझ्या भावांनो बहिणींनो, मायबापानो, ऐका ऐका ऐका. एकच पेन सेट ज्यात आहे लाल, निळा, काळा पेन आणि एक पेन्सिल, एक रबर, एक रिफिल आणि खोडरब्बर. ह्या सेटने तुम्ही परिक्षा देऊ शकाल आणि यशस्वी व्हाल, ह्याच पेनाने तुम्ही लव्ह लेटर लिहाल आणि त्या स्वप्नसुंदरीसोबत संसार थाटाल, ह्याच पेनाने अ‍ॅप्लिकेशन लिहाल आणि पाहिजेल ती नोकरी मिळवाल. हिच पेन्सिल मुलाला द्याल, तोही हाच सेट वापरेल कारण हा आहे आपल्या देशात बनलेला. १०० टक्के आपला. प्रेमाने वापरा, तीन तीन पिढ्या बिनधास्त वापरा. स्वस्त मजबूत टिकाऊ. बाजारात घ्यायला जाल तर सर्व मिळून शेकडो रुपये किम्मत होईल. कंपनीने ह्या प्रॉडक्टवर गेली ११ वर्षे संशोधन करुन फक्त ग्राहकांसाठी हे अद्वितीय उत्पादन उपलब्ध केलेले आहे, आज बचत उत्सव आहे, कंपनीचा बोनांझा ऑफर चा लाभ घ्या. साजरा करा तुमचा उत्सव फक्त एक दशांश किमतीत. कुणाची वाट बघता, लगेच घ्या. ताई माई अक्का, त्वरा करा, त्वरा करा. . का आठवावा हाच माणूस... . अरे आहे कोण? सेल्समन? परिस्थिती काये? बोलतो काये? आपण ऐकतो काये? . इ त के *त्ये आहोत का निओ मिड्डल कलास वाले. कॉन्ग्रॅट्स फॉर न्यु क्लास कॉम्रेड्स....ओ..सॉरी साथियो..... वेल्कम टू फेस्टीव्ह बचत बोनांझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हाहा :)

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/21/2025 - 18:00 नवीन
हाहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

परराष्ट्र धोरण पूर्णपणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/21/2025 - 23:10 नवीन
परराष्ट्र धोरण पूर्णपणे गंडल्याने जबाबदारी घेऊन आपला राजीनामा जाहीर करणार असावेत तसेच नवीन पंतप्रधान म्हणून फडणवीस
=)) च्यायला, 'वोट चोर, गद्दी छोड़' यामुळे 'बहनो और भाइयो'वर काही तरी येईल अशी अपेक्षा होतीच. काय दळन टाकलं तपशीलवार कळवा.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

Gst दर मी कमी केले आहेत

अमरेंद्र बाहुबली
Sun, 09/21/2025 - 23:26 नवीन
Gst दर मी कमी केले आहेत त्यामुळे मला पहा नी फुले वहा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/22/2025 - 07:34 नवीन
पंडीत नेहरूंनी लावलेला 28% GST अखेर मोदीजीनी कमी केला! धन्यवाद विश्वगुरूजी. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा