✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी- मे २०२५

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 04/30/2025 - 19:30  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे. लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/bigg-boss-marathi-season-5-fame-abhijeet-sawant-new-marathi-song-chal-turu-turu-releasing-soon/articleshow/120764486.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31590 वाचन

💬 प्रतिसाद (140)

प्रतिक्रिया

युद्ध व्हायची शक्यता वर्तवली

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/30/2025 - 20:25 नवीन
युद्ध व्हायची शक्यता वर्तवली जात असतानाही शेअर मार्किट स्थिर कसे? हा प्रश्न मला पडललाय!
  • Log in or register to post comments

कुणी सांगितले की युद्ध होणार आहे?

मुक्त विहारि
Wed, 04/30/2025 - 20:58 नवीन
भारतात इतके फितूर असताना कोण युद्धाच्या भानगडीत पडणार? चार दोन जोरदार जीवघेणे ठोसे नक्कीच मारतील आणि ते पण मुके.... ह्या देशात फितूर भरपूर, त्यामुळे मुका मार देणेच योग्य.(IP Man तंत्र ज्ञान) पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत जनतेला, युद्धाची सवय नाही.... त्यामुळे सगळ्या देशांच्या नेत्यांचा कल, गोरिला युद्धाकडेच आहे. तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पाकिस्तान आणि भारत... एक मूलभूत फरक....

मुक्त विहारि
Wed, 04/30/2025 - 21:20 नवीन
पलवाशा खान, ह्या पाकिस्तानी नेत्या म्हणतात की...२५ कोटी पाकिस्तानी जनता, आमच्या पाठीशी... थोडक्यात, पाकिस्तानी जनतेने हे मान्य केले आहे की पहलगाम हल्ला पाकिस्तानी सैन्याने केला... ह्याला एकजूट म्हणतात... आणि आपलीच जनता इथे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देते.... युद्धाच्या झळा सोसायला तिथली जनता मानसिक रित्या तरी तयार आहे... आपली जनता, रात्रीचे दोन तास दिवे बंद केले तरी बोंबलत बसेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

फुटीर भारतीय...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 08:46 नवीन
अलीगढ़ में मुस्लिम स्कूली छात्र से पाकिस्तान झंडे पर ठुकवाई कील, सरेआम सड़क पर करवाई पेशाब https://www.abplive.com/states/up-uk/aligarh-hindu-organization-forced-muslim-school-student-to-urinates-on-pakistani-flag-ann-2934279 ---- जाता जाता.. पाकिस्तानी लोकसंख्या २५ कोटी आणि एकाने देखील "भारत जिंदाबाद' अशी घोषणा केली नाही. आणि ह्या देशांत मात्र, "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा ऐकायला मिळतात.. --- असो, आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

युद्ध के डर से औंधे मुंह गिरा पाकिस्तान का शेयर बाजार; निवेशकों

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 09:09 नवीन
युद्ध के डर से औंधे मुंह गिरा पाकिस्तान का शेयर बाजार; निवेशकों में मची अफरातफरी https://www.jagran.com/world/pakistan-pahalgam-attack-pakistan-stock-market-crashes-amid-fears-of-war-with-india-23928565.html ----- ये नया भारत हैं.... एक पाऊल पण नाही उचलले.... पाकिस्तानी घाबरले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

*BREAKING केंद्र सरकार

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/30/2025 - 21:07 नवीन
*BREAKING केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार:* मूळ जनगणनेसह केले जाईल, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय... https://link.divyamarathi.com/cHllkX1dZSb पहलगाम हल्ल्यावरून लक्ष विचलित करण्याचा मोदी सरकारचा डाव?
  • Log in or register to post comments

तबला कसा वाजवायचा?

मुक्त विहारि
Wed, 04/30/2025 - 21:13 नवीन
याचे उत्तम उदाहरण... आरक्षण नसते दिले तर म्हणाले असते की आरक्षण का नाही दिले? काँग्रेस तर कधीपासून जाती आधारित जन गणना करण्याची मागणी करत आहे... आता मागणी मान्य केली तर म्हणतात की आत्ताच का? ----- असो, तुमची पंचतंत्र वाचायची वेळ अद्याप गेलेली नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अवघड आहे मुवि तुमचे. डायरेक्ट

सुक्या
Wed, 04/30/2025 - 21:48 नवीन
अवघड आहे मुवि तुमचे. डायरेक्ट धोतराला हात घातलात ? आता ते कुठे पळतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्या माणसाचा स्वभाव, हलक्या कानाचा आहे...

मुक्त विहारि
Wed, 04/30/2025 - 22:32 नवीन
मोदींना शिव्या घालण्यासाठी, काही लोकांना पगार मिळतो. आणि काही लोकांना परमपूज्य राहुल गांधी यांची तळी उचलण्यासाठी पगार मिळतो. (एक विनोद.... तर्क शास्त्र, बहू बाजूंनी चालते.... ह्यांनी जे तर्क लावले ते तर्क लावून उद्या कुणी असेही म्हणू शकतो की "नॅशनल हेरॉल्ड स्कँडल" लपविण्यासाठी कुणीतरी पहलगामचा हल्ला केला असेल.कारण , ह्या दोन्ही प्रकरणा नंतर, परमपूज्य राहुल गांधी एकदम शांत झाले आहेत आणि वरून सुप्रीम कोर्टाचा सावरकर प्रकरणी आदेश...काँग्रेस आणि त्यांचे नेते, इतक्या खालच्या थराला जाणार नाहीत, इतपत तारतम्यता मला आहे... सांगायचा मतलब असा की, स्वतःची बुद्धी वापरायची असते. बोळ्याने दूध किती दिवस पिणार?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

पाकिस्तान संसद में अखिलेश यादव की जमकर तारीफ, PTI सिनेटर ने कहा-

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 09:02 नवीन
पाकिस्तान संसद में अखिलेश यादव की जमकर तारीफ, PTI सिनेटर ने कहा- इंडिया में किसी ने मोदी का साथ नहीं दिया... https://hindi.news18.com/news/uttar-pradesh/lucknow-pakistan-parliament-praises-akahilesh-yadav-samajwadi-party-and-aap-over-pahalgam-attack-remarks-against-narendra-modi-ws-kl-9210626.html --- .... काय बोलावं ते सुचेना ...
  • Log in or register to post comments

बरोबर आहे.

nutanm
Tue, 05/20/2025 - 11:11 नवीन
बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुळात जात्याधारीत जनगणना,

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/01/2025 - 09:07 नवीन
मुळात जात्याधारीत जनगणना, राखीव जागा प्रमाण वृद्धी या मुद्द्यांना बहुसंख्य जनतेचा पाठिंबा असल्याचे आजपर्यंत दिसले नाही. पप्पूने कंठशोष करून मागणी करूनही कॉंग्रेसला तसेच ही मागणी करणाऱ्या अन्य पक्षांना निवडणुकीत किरकोळ लाभ सुद्धा झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येत नाही. तरीही अचानक हा निर्णय घेण्याचा गंभीर अश्वप्रमाद करण्याचे कारण काय? इतके दिवस हा निर्णय घेण्यास भाजप, संघ यांचा विरोध होता. आता हा निर्णय घेतल्यानंतर मागे फिरणे शक्य नाही. यातून प्रचंड सामाजिक तणाव निर्माण होईल. जातीजातीत यादवी माजू शकते. एकदा जात्याधारीत जनगणना सुरू झाली की त्यात अजून नवीन मागण्या पुढे येतील व जनगणना समाप्तीनंतर आकडेवारी प्रसिद्ध करणे सरकारसाठी अत्यंत अडचणीचे ठरू शकेल. महाराष्ट्रात मराठा जातीची टक्केवारी ३२-२४% नसून १६-१८% आहे किंवा देशभर इतर मागासवर्गीय ५२-५४% नसून ३५-३६% इतकेच आहेत असे निष्कर्ष आले तर सरकार ते प्रसिद्ध करण्याची टाळाटाळ करेल व केल्यास हे समाजगट ही आकडेवारी मान्यच करणार नाही आणि इतर समाजगट या आकडेवारीचा आधार घेऊन आपल्या मागण्या पुढे रेटतील. राखीव जागा प्रमाण वृद्धी ही मागणी अत्यंत जोराने पुढे येईल व त्यासाठी सरकारला संसदेत घटनाबदल करून हे प्रमाण ७५-८०% पर्यंत न्यावे लागेल. यामुळे अराखीव गट संतापेलच, पण सर्वोच्च न्यायालय यावर स्थगिती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशातील सामाजिक वातावरण पूर्णपणे विषारी होईल. केवळ ४ तासांची मुदत देऊन संपूर्ण देश ५० दिवसांसाठी ठप्प करणे हा निर्णय जितका घातकी व अनाकलनीय होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातकी हा निर्णय ठरेल. पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत असतो हे समजत नाही.
  • Log in or register to post comments

पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 09:45 नवीन
पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत असतो हे समजत नाही. ---- ह्या वाक्याला सहमत आहे... आरक्षण ही दुधारी तलवार आहे आणि दुर्दैवाने ती भारतासाठी नेहमीच घातक ठरत आली आहे. उदा. नष्ट झालेले नंद साम्राज्य ते नष्ट झालेले मराठा साम्राज्य.... ---- आपण इतिहासातून काहीच शिकत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्हीं म्हणताय ते दुर्दैवाने कटू असले तरी सत्य आहे.

मारवा
Fri, 05/02/2025 - 05:39 नवीन
खरे म्हणजे empirical data ही अत्यंत सुंदर.अशी गोष्ट आहे. जर आपला समाज आदर्श व नेते प्रामाणिक असते तर या data ने न्याय आणि विकास याचे उत्कृष्ठ संतुलन empirical data चा सुयोग्य वापर करून साधता आले असते. परंतु जसे तुम्ही खाली मराठा आरक्षण संदर्भात वास्तव सांगितले ते बघता आणि भारताची sady स्थिती बघता आहे होणे शक्य नाही. त्यामुळे यातून काही चांगले होईल ही आशा भाबडी म्हणावीबकेळ उलट black mirror होण्याची शक्य युरोपिया पेक्षा जास्तच आहे. हा empirical data मात्र सतत नाकारणे म्हणजे आपण सर्व मागास समाज विरोधी आहोत हे दिसणे भाजपला परवडण्यासारखे नव्हते.कारण आरक्षणाविरोधी ही त्यांचीं प्रतिमा बऱ्यापैकी establish करण्यामध्ये virodhi यशस्वी झालेत आणि प्रत्यक्षात भाजपा आहे सुद्धा. आता राहुल गांधी यांना हा मोठा मुद्दा भाजपची हिंदू मते फोडण्यासाठी महत्वाचा आहे असे वाटले असावे. कारण त्यांचे अदानी किंवा इतर मुद्दे तितक्या मोठ्या वर्गाला अपील होऊ शकत नवते. त्यामुळे त्यांनी जाती गणना व आरक्षनाची 50 टक्के सीलिंग तोडू हा मुद्दा लावून धरला. ( त्यांचे थोडे ग्रेस च्या या ओळी सारखे झाले घन जमतील तेव्हा जमतील मोकळे तू केस सोड परसात तुझ्या तरी काय ? निष्पर्ण सुरूचे खोड ) गमतीचा भाग सोडला तर ही मागणी राहुलची एकट्याची नव्हती लालू आणि इतर अनेक मंडळी याची मागणींकरात आहेत. बघू या काय होते ते Let us hope for the best
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

केवळ ४ तासांची मुदत देऊन

आग्या१९९०
गुरुवार, 05/01/2025 - 09:34 नवीन
केवळ ४ तासांची मुदत देऊन संपूर्ण देश ५० दिवसांसाठी ठप्प करणे हा निर्णय जितका घातकी व अनाकलनीय होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त घातकी हा निर्णय ठरेल. हा प्रकार कधी झाला?
  • Log in or register to post comments

आई भारतीय आणि वडील भारतीय, तर अशा मुलांचे काय करायचे?

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 10:03 नवीन
मां भारतीय, पिता पाकिस्तानी… अब कहां जाएंगे बच्चे? पुलिस कंफ्यूज; MP में फंसा पेंच https://www.tv9hindi.com/state/madhya-pradesh/jabalpur-mother-is-indian-father-is-pakistani-where-will-children-go-now-officials-confused-3262606.html ---- त्यात विचार काय करायचा? ह्याचे उत्तर फार आधीच, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दिले आहे. "शत्रू राष्ट्राच्या मुलांना थारा देऊ नये. विषवल्लीच्या बिया, विषारीच वेली तयार करतात."
  • Log in or register to post comments

भोपाळ मध्ये एका स्त्रीवर अत्याचार...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 11:24 नवीन
भोपाळ मध्ये "नराधम फरहान गँग" बद्दल लेख लिहीत असताना खालील बातमी मिळाली.... "भोपाल में नया कांड, 17 साल की दलित लड़की बोली- जोया भाभी भाई शाहरुख से करवाती.." https://www.livehindustan.com/madhya-pradesh/bhopal-dalit-girl-alleges-rape-by-muslim-man-his-sister-involved-201745989448098.html -------
  • Log in or register to post comments

जणगणना, कोंबडं आणि सुर्य

धर्मराजमुटके
गुरुवार, 05/01/2025 - 11:35 नवीन
कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबत नाही. भारतातून जात जाणार नाही, राजकारणी जातीपातीचा वापर करुन घेणारच मात्र त्याला आपण किती बळी पडायचे हे वास्तव स्वीकारुन जात आधारीत जणगणणेचा स्वीकार केला गेला पाहिजे. आर्थिक सुबत्ता वाढली की जननदर कमी होतो असा एक सर्वसाधारण सिद्धांत आहे तो खरा आहे की खोटा ते ही या निमित्त पडताळून पाहता येईल. शिवाय जनगणनेच्या सुधारीत आकड्यामुळे सरकारी विभागांना जुन्या कार्यक्रमांमधे नव्याने बदल करावे लागू शकतात (ते चांगले की वाईट हा कळीचा मुद्दा) बाकी आरक्षणाच्या मुद्यावर न बोललेले बरेच (विशेषतः सवर्णांनी). ब्राह्मणाच मुलगा ब्राह्मण राहणार आणि शुद्राचा मुलगा शुद्रच राहणार ही व्यवस्था बदलायची म्हणून आणि सामाजिकदृष्ट्या मागास जनांना पुढे आणायचे म्हणून आरक्षणव्यवस्था चालू केली मात्र कोणत्याही चांगल्या गोष्टीचे वाट्टोळे करण्यात आपण भारतीय हुशार आहोत. (निदान ह्या दृष्टीने तरी आपणा सर्वांचा डीएनए एकच आहे ही म्हण लागू होते). आज ७० वर्षे झाली तरी बहुधा सगळ्या जातींचे लोक त्यांच्या जुनाट बुरसटलेल्या मानसिकतेतून बाहेर प्डू शकले नाहीत. जे बाहेर पडले त्यांनी आपले कल्याण साधले. ज्यांनी आरक्षणाचा लाभ दोन तीन पिढ्या घेतला तेही मानसिक गुलामगिरीतून / मागासपणातून बाहेर पडलेले नाही किंवा आपले आरक्षण आपल्याच जातीतल्या गरजुला देण्याइतपत दाते होऊ शकले नाहीत. जातीय जनगणनेने काही तणाव निर्माण होतील म्हणून ती करायचीच नाही म्हणजे शहामृगासारखे वाळूत तोंड खूपसून बसण्यासारखे आहे. कोण जाणे, कदाचित एखादी चांगली गोष्ट देखील पुढे येऊ शकेल. उम्मीद पर दुनिया कायम है ! अवांतर-१ : जातीय जनगणनेत जात बाह्य / धर्मबाह्य विवाह करणार्‍यांची पण शिरगणती व्हावी म्हणजे सामाजिक अभिसरण रोटी बेटी व्यवहारात किती पुढे सरकले आहे तेही तपासून पाहता येईल. अवांतर-२ : जनगणनेच्या वेळी जात न सांगण्याचा पर्याय असावा व जातीला महत्व नसेल तर जात न सांगणारे किती जण निघतात ते देखील पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments

संतुलित प्रतिसाद..

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 12:12 नवीन
प्रतिसाद आवडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

महाराष्ट्र दिनाच्या

धर्मराजमुटके
गुरुवार, 05/01/2025 - 11:38 नवीन
तमाम मराठी जनतेस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! खरे तर मिपा ने आज बॅनर लावावयास हवे होते. असो !
  • Log in or register to post comments

पाकिस्तानशी चर्चा करा या

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/01/2025 - 11:49 नवीन
पाकिस्तानशी चर्चा करा या विरोधकांच्या मागणीचा अनावश्यक ताण घेऊन वाजपेयी-अडवाणींनी मुशर्रफला भारतात बोलावून भारताचे तोंड काळे करून घेतले. तसेच जात्याधारीत जनगणनेच्या अनावश्यक मागणीचा दबाव घेऊन मोदींनी जात्याधारीत जनगणनेचा निर्णय घेतलेला दिसतो. वाजपेयींनी मुशर्रफला दिलेले आमंत्रण काढून घेतले असते तरी खूप काही वेगळे झाले नसते. परंतु जात्याधारीत जनगणनेच्या निर्णयावर माघार घेणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

सहमत आहे ...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 12:20 नवीन
सहमत आहे.. सत्तेपुढे आणि एकगठ्ठा मतदारांपुढे, कुणाचेच काही चालत नाही... कधी तरी आपण एकत्र भेटू आणि शांत पणे बियर पिऊ... बाय द वे, आरक्षण ह्या जगात अनादी अनंत काळापासून सगळीकडे आहे आणि कमी अधिक प्रमाणात ते राहणारच आहे... पृथ्वीराज कपूर यांची चौथी पिढी, स्वतः च्या तोंडाला रंग फासून पैसे कमवत आहे. हे एक उदाहरण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पृथ्वीतलावरील सर्वात दुर्दैवी द्विपाद कळप!

वामन देशमुख
गुरुवार, 05/01/2025 - 12:21 नवीन
जात्याधारित आरक्षण या गोष्टीने हिंदू समाजाचे जे अपिरिमित नुकसान झाले आहे त्यास तोड नाही. हिंदुत्ववादी असल्याचा दावा करून हिंदूंची मते मिळवून सत्तेत आलेल्या संघप्रणीत मोदींनी मागच्या दहा बारा वर्षांत - - हिंदुहिताचा एकही नवीन निर्णय घेतला नाही - हिंदुअहिताचा एकही जुना निर्णय रद्द केला नाही --- काँग्रेस ही हिंदूंची थेट शत्रू आहे तर भाजप हा हिंदूंचा छुपा शत्रू आहे. कोणीही मित्र नसलेला व सर्वच शत्रू असलेला हिंदू समाज म्हणजे पृथ्वीतलावरील सर्वात दुर्दैवी द्विपाद कळप!
  • Log in or register to post comments

कळप सोडा.

आग्या१९९०
गुरुवार, 05/01/2025 - 12:30 नवीन
कळप सोडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

चला भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/01/2025 - 12:39 नवीन
चला भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष नाही इथपर्यंततरी काही लोकांची प्रगती झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

राहुल गांधींपुढे मोदी झुकले,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/01/2025 - 14:19 नवीन
राहुल गांधींपुढे मोदी झुकले, शेवटी सत्य जिंकले! सत्यमेव जयते! माझा भारत महान!
  • Log in or register to post comments

नरेंद्र मोदींनी एका रात्रीत

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/01/2025 - 17:48 नवीन
नरेंद्र मोदींनी एका रात्रीत २८ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घातली, आणि पाकिस्तानात जणू भूकंपच आला! रस्त्यापासून संसदेपर्यंत, लष्करापासून गल्लीपर्यंत, सगळीकडे हलकल्लोळ माजलाय. - इस्लामाबादेत पाकिस्तानच्या संसदेवर दगडफेक! - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. -युट्युब चॅनल बंदीमुळे पालिस्तानी लष्कराची सप्लाय चेन कोसळली. -पाकिस्तानात मटण महागले, बोकडचोरीच्या घटना वाढल्या. - कराचीत लोक उंच बिल्डिंगवर चढून उड्या टाकताहेत कारण खायला काही नाही. - सिंधू नदीत उड्या टाकून अनेकांची आत्महत्या, कारण मोदींचा मास्टरस्ट्रोक! -पाकिस्तानचे नेते मिळेल ती फ्लाईट पकडून देश सोडताहेत. -अतिरेकी गुफेतून बाहेर येऊन स्वतावर गोळ्या झाडताहेत. - अनेक मुल्ला मौलवींचे पाकिस्तान सोडून पलायन! - “28 चॅनल बंदीचा मास्टरस्ट्रोक मागे घ्या” पाकी पंतप्रधानांची मोदींकडे भीक! - युट्यूब चॅनल बंदीने पाकी पंजाबातील गहू उत्पादनावर परिणाम. पाकी शेतकरी हवालदिल! - पाकी परिवहन यंत्रणा कोलमडली! - गहू पाकी सीमांवर अडलेला, युट्युब चॅनल चालू झाल्याशिवाय गहू देशाबाहेर निघणे कठीण! - पाकव्याप्त काश्मीरात बर्फ वितळण्यास सुरुवात, ह्यामागे मोदींची २८ युट्युब चॅनलवरील बंदी कारणीभूत, जागतिक हवाईसुंदरी असोसिएशन च्या प्रमुखांचे मत! - हे सगळे पाहून मोदी, डोभाल नी शहा ह्यांनी पार्टी केल्याची बातमी.
  • Log in or register to post comments

You Tube मुळे नाही पण...महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/01/2025 - 18:04 नवीन
महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या. https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/5054074/inflation-at-peak-in-pakistan-prices-of-all-essential-items-increased-ieghd-import-asc-95/ ---- छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे... अफवा नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

Meritocracy vs. Social Justice

धर्मराजमुटके
गुरुवार, 05/01/2025 - 20:23 नवीन
Meritocracy vs. Social Justice एक जरुर पहावी अशी चित्रफीत
  • Log in or register to post comments

तुम्ही दिलेला व्हिडिओ बघितला मार्मिकच आहे तो.

मारवा
गुरुवार, 05/01/2025 - 22:01 नवीन
यातील सुटी सुटी मते माहीत होती. परंतु अशी एकसंघ मांडणी फार्मिक आहे. तरी ते थोडे. एकांगी आहेत. या द्वैत वरील ही खालील निष्कर्ष मला फारच मार्मिक व अचूक व अचूक काटेकोर संतुलन साधलेली वाटली बघा तुम्हाला काय वाटते. The debate over the 50% ceiling on reservations reflects a dynamic tension between the principles of equality and social justice. While maintaining the ceiling ensures a balanced approach to merit and representation, the socio-economic realities necessitate a flexible, context-sensitive application. Moving forward, a comprehensive policy review, informed by empirical data and societal needs, is essential to create a reservation system that is both equitable and effective in addressing the aspirations of all communities.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

आता मराठा आरक्षण संदर्भात empirical data

मारवा
गुरुवार, 05/01/2025 - 22:08 नवीन
हा गोळा केला जात होता /आहे सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही. पण तुम्ही बघा सरसकट हे द्या सरसकट सगे सोयरे टाका इत्यादी जन दबावापुढे झुकून जेव्हा काम होते तेंव्हा कसला empirical data आणि कसला policy review असे कठोर वास्तव आहे अशी आपली राजकीय व्यवस्था आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सध्याचे नेमके स्टेटस माहीत

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/01/2025 - 22:40 नवीन
सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही. खटला अत्यंत संथ वेगाने सुरू होऊन अर्धवट अवस्थेत असताना ३ न्यायाधीशांच्या खंडपीठातील एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या राज्यात केल्याने आतापर्यंतची सुनावणी पूर्णपणे रद्द झाली आहे. खटल्याची नव्याने सुनावणी होण्यासाठी तिसऱ्या न्यायाधीशाची जागा भरणे आवश्यक आहे व अनेक महिन्यांनतरही ती जागा भरली जात नाही. हा तथाकथित इंपिरिकल डेटा हा पूर्णपणे फार्स होता हे माहिती असल्याने आणि नीट सुनावणी झाल्यास राखीव जागा तिसऱ्यांदा रद्द होणार याची पुरेपूर कल्पना असल्याने खटलाच अनेक वर्षे लोंबकळत ठेवणे हा उपाय शोधलेला आहे. यात राज्य सरकार व न्यायव्यवस्थेचे साटंलोटं असणार. मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी शिंदेंनी सर्वेक्षणाचे पूर्वीप्रमाणेच नाटक करून सर्व खोटा डेटा दाखवून प्रगत मराठा जातीला अत्यंत मागास ठरवून राखीव जागा दिल्या. परंतु मुख्यमंत्रीपद टिकले नाही. मधल्या मध्ये अराखीव गटाचे नुकसान करून टाकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सहमत आहे

स्वधर्म
Fri, 05/02/2025 - 16:06 नवीन
आपल्या मुद्द्यांशी सहमत आहे. केवळ जरांगे यांच्यासारख्यांच्या दबावामुळे हे सगळे करण्यात आले व आता सगळेच अधांतरी होऊन बसले आहे. परंतु या मोमेंटमचा फायदा घेत प्रशासन व राजकारणातल्या अनेकांनी प्रचंड घाई करुन फार मोठ्या प्रमाणात 'कुणबी' प्रमाणपत्रे वाटली व या ना त्या मार्गाने राखीव जागांत शिरकाव करून घेतला. त्याने खर्‍या मागास गटांचे नुकसान झाले ते झालेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण जे वास्तव कुणबी होते असे सोडून अजून कोणाला

मारवा
Fri, 05/02/2025 - 17:08 नवीन
पण जे वास्तव कुणबी होते असे सोडून अजून कोणाला म्हणजे जे कुणबी नव्हते अशा अपात्र व्यक्तींना मिळाली तरच चुकले ना ? असे झालेले आहे का ? असल्यास त्याचे प्रमाण किती खऱ्या कुणबी certificate च्या तुलनेत? असे मोठया प्रमाणात झाले आहे का ? अपात्र असून कुणबी प्रमाणपत्र दिले असे झाले असेल तर मात्र मोठे नुकसान झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

... परंतु अशी एकसंघ मांडणी

वामन देशमुख
गुरुवार, 05/01/2025 - 22:30 नवीन
... परंतु अशी एकसंघ मांडणी फार्मिक आहे.
जर typo नसेल तर फारच + मार्मिक == फार्मिक हा शब्द आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

Nahi हो typo च होता मोबाईल वर मराठी जमत नाही

मारवा
Fri, 05/02/2025 - 05:50 नवीन
माझ्या फार घाणेरड्या चुका होत आहेत हल्ली मोबाईल वर टाईप करताना. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिसळपाव चे मास्तर फार कडक आहेत चूक झाली म्हणजे झाली चुकीला क्षमा नाहीच. Edit चा पर्याय नाही. Bhiga आपल्या कर्मा ची फळं बघत रहा आता तुम्ही काय वेडवाकड टाईप केलेलं आहे ते इलाज नाही मिस्टर नेने इलाज नाही सारखं पण छान शब्द अपघाताने निर्माण झाला हे खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

ही बातमी दिसली -

वामन देशमुख
Fri, 05/02/2025 - 13:41 नवीन
वक्फ चा विरोध म्हणून गावाची वीज कापली! https://www.amarujala.com/video/uttar-pradesh/kanpur/video-protest-against-waqf-amendment-bill-by-switching-off-electricity-in-homes-2025-04-30
  • Log in or register to post comments

https://www.tv9marathi.com

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/02/2025 - 21:06 नवीन
https://www.tv9marathi.com/videos/india-digital-strike-on-pakistan-pm-shehbaz-sharif-suspends-youtube-account-amid-india-and-pak-tension-1396737.html बापरे काय ती कारवाई! पाकिस्तानचा थरकाप उडाला असेल! हर हर मोदी, नमो नमो!
  • Log in or register to post comments

पहलगाम येथील दहशतवादी

श्रीगुरुजी
Fri, 05/02/2025 - 22:04 नवीन
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मिपावरील व भारतातील पाकिस्तानचा निद्रिस्त संघ आणि पाकिस्तानप्रेमी विदूषक एकदम जागे होऊन पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झालेत.
  • Log in or register to post comments

पहलगाम येथील दहशतवादी

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/02/2025 - 22:07 नवीन
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मिपावरील अंधभक्त व पाकीसमर्थक भारतातील निद्रिस्त संघ आणि पाकिस्तानप्रेमी अंधभक्त विदूषक एकदम जागे होऊन पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झालेत.
  • Log in or register to post comments

खालील पाकिस्तानी

श्रीगुरुजी
Sat, 05/03/2025 - 17:11 नवीन
खालील पाकिस्तानी वृत्तपत्रांची संकेतस्थळे आज उघडत नाहीत. - डॉन, द नेशन, एक्सप्रेस ट्रिब्यून, पाकिस्तान टुडे, न्यूज इंटरननॅशनल, डेली टाईम्स कालपर्यंत डॉन ऑनलाईन वाचता येत होते. आता या क्षणी वरीलपैकी कोणत्याच वृत्तपत्राचे संकेतस्थळ उघडत नाही. भारतात ही वृत्तपत्रे वाचता येऊ नये यासाठी भारतानेच ही संकेतस्थळे प्रतिबंधित केली की पाकिस्ताननेच प्रतिबंधित केली की माझ्याच आंतरजाल जोडणीत समस्या येत आहे हे समजय नाही.
  • Log in or register to post comments

पहलगाममध्ये धर्म विचारून

श्रीगुरुजी
Sat, 05/03/2025 - 23:33 नवीन
Image removed. पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदू असल्यामुळे मारले नाही हा प्रचार पाकिस्तानप्रेमी सातत्याने करताहेत. मागील आठवड्यात पवारांनी हाच प्रचार केला होता.
  • Log in or register to post comments

ते काहिका प्रचार करेना! आपण

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/03/2025 - 23:54 नवीन
ते काहिका प्रचार करेना! आपण ३५-४० हजार वार्षिक खर्च करूनही अतिरेकी इतक्या आत पोहोचले कसे नी परत गेले कसे हा प्रश्न सरकारला विचारत राहिला पाहिजे, एवढे हजारो कोटो नक्की काश्मीर वर खर्च होताहेत की भाजप नेत्यांच्या स्विस बँक खात्यात जाताहेत? हे देखील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरोबर आहे आवडले.

nutanm
Tue, 05/20/2025 - 11:48 नवीन
बरोबर आहे आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

परत एकदा हार्वर्ड

चंद्रसूर्यकुमार
Sun, 05/04/2025 - 21:37 नवीन
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्राएलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यानंतर अनेक अमेरिकन विद्यापीठांमध्ये इस्राएलविरोधी निदर्शने झाली होती. हार्वर्डमध्ये झालेल्या अशाच एका निदर्शनात इब्राहिम भरमाल या विद्यार्थ्याने एका ज्यू धर्मीय विद्यार्थ्याला मारहाण केली होती. अमेरिकेत अशाप्रकारचे गुन्हे किरकोळ समजले जात नाहीत आणि अशा गुन्ह्यांना तुरूंगवासाची शिक्षा असते. मात्र इब्राहिम भरमलला बॉस्टनमधील न्यायाधीशाने काय शिक्षा दिली? तर रागावर नियंत्रण कसे ठेवावे हा कोर्स करायला सांगितला. https://www.nbcboston.com/news/local/harvard-grad-students-ordered-to-attend-anger-management-after-assault-at-pro-palestinian-protest/3699287/ मागच्या वर्षी दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवून दोघांचे जीव घेणार्‍या पुण्यातल्या त्या पोरट्याला दारू पिण्याचे दुष्परीणाम हा निबंध लिहायला एका न्यायाधीशाने सांगितला होता तसे करणारे गुडघ्यातले न्यायाधीश फक्त भारतातच असतात असे नाही. त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्या इब्राहिम भरमालला हार्वर्ड लॉ स्कूलने ६५ हजार डॉलरची फेलोशिप दिली. म्हणजे ज्यू विद्यार्थ्याला मारहाण करणे हा गुन्हा किरकोळ होता असे हार्वर्डचे मत आहे का? समजा उबर-ओला वगैरे टॅक्सी वाहनचालकाचा धर्म बघून कोणी रद्द केली अशी बातमी आली तर मग झेनोफोबिया, अमका फोबिया, तमका फोबिया वगैरे आकांडतांडव करणारे डापु गँगमधील लोकांना एखाद्याचा धर्म बघून मारहाण करणे/ जीव घेणे वगैरे समर्थनीय वाटत असावे कदाचित. बरं डापु गँगवाले लोक काय करतील ते करतील. ते तसलेच आहेत. पण त्या इब्राहिम भरमालला ती फेलोशिप दिल्यानंतर ट्रम्पतात्यांनी हार्वर्डचे करमुक्त स्टेटस रद्द केले आहे. हार्वर्डला देणगी मिळते किंवा इतर स्त्रोतांमधून जे उत्पन्न आहे (केस स्टडी विकणे, हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूची वर्गणी वगैरे) त्यावर कर भरणे इतकी वर्षे अपेक्षित नव्हते. हार्वर्डला मिळालेल्या उत्पन्नाचे काय करायचे हे ते विद्यापीठ ठरवेल. पण ज्ञानाची आराधना करणे सोडून असल्या प्रकारांना ते समर्थन/प्रोत्साहन द्यायला लागले तर त्यांचे करमुक्त स्टेटस रद्द करून तात्यांनी काही चुकीचे केले असे वाटत नाही. अशीच अद्दल भारतातील जे.एन.युला कधी घडविणार याची वाट बघत आहे. हार्वर्ड हे बर्‍याच अंशी अमेरिकेतील जे.एन.युच आहे.
  • Log in or register to post comments

चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे

श्रीगुरुजी
Sun, 05/04/2025 - 22:01 नवीन
चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाणी भारताने अडविले. झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे पाणी सुद्धा अडविले जाण्याची शक्यता आहे. ही बातमी कितपत खरी आहे व खरी असल्यास याचे कोणते, किती प्रमाणात व केव्हा परिणाम होतील याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

अंगातले पाणी दाखवा.

आग्या१९९०
Sun, 05/04/2025 - 22:44 नवीन
अंगातले पाणी दाखवा. पहलगामच्या अतिरेक्यांना पकडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कार्ल मार्क्स

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2025 - 11:12 नवीन
आज ५ मे, आजच्या ५ मे १८१८ रोजी जर्मनीत ट्रीयर येथे कार्ल मार्क्सचा जन्म झाला. बर्लीन विद्यापीठात तत्वज्ञान या विषयात पीएच.डी संपादन केली. २४ फेब्रुवारी १८४८ साली जगातील जवळपास सर्व भाषेत प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे 'कम्युनिष्ट पक्षाचा जाहीरनामा' . पृथ्वीच्या निर्मीतीपासून तर माणूस समाज कसा कसा बदलत गेला त्याची जशी चर्चा त्यांनी त्यात केली तशी चर्चा आजही होतांना दिसते. भांडवलदार कामगारांच्या श्रमाची कशी चोरी करतात त्यावर लिहून-बोलून भांडवलशाहीच्या उरात धडकी भरवली. प्रभावी राजकीय विचारवंत म्हणूण कार्ल मार्क्स विचार केला जातो. कार्ल मार्क्सचे समर्थक आणि विरोधक दोघेही त्यांना विसरु शकत नाही हे त्याचे वैशिष्ट्ये. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मार्क्स

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/05/2025 - 11:24 नवीन
काहीकाही माणसं जन्माला आली नसती तर जगावर अनंत उपकार झाले असते अशा माणसांच्या यादीमध्ये कार्ल मार्क्सचा क्रमांक फार वरचा आहे. हा एक माणूस जन्माला आला नसता तर कोट्यावधी लोकांचे प्राण वाचले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2025 - 11:28 नवीन
काहीकाही माणसं जन्माला आली नसती तर जगावर अनंत उपकार झाले असते
अशी यादी फार मोठी होईल.... ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा