✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

व
वामन देशमुख यांनी
Tue, 04/01/2025 - 10:46  ·  लेख
लेख
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
  • समृद्धी महामार्गावर टोल वाढला.
  • महामार्ग ६५ वर हैदराबाद-विजयवाडा दरम्यान टोल कमी झाला!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
  • एनडीए
  • इंडिया
--- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37219 वाचन

💬 प्रतिसाद (341)

प्रतिक्रिया

भारतिय

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/10/2025 - 23:53 नवीन
(भारतिय) राजकारणात नीतीमत्ता वगैरे काही नसते. भाजपा असो,कॉंग्रेस असो वा आणखी कुणी.. निवड्णूक आणि सत्तेचे राजकारण सुरु झाले की नितीमत्ता वगैरे गुंडाळून ठेवावी लागते. व्यक्तिगत जीवनात त्यामानाने डावे/समाज्वादी नेते स्वच्छ असायचे पण गेल्या ३० वर्षातले ह्यांचे राजकारण काँग्रेस पक्षाला लोंबकळून होते. म्हणून मतदारांनी त्यांना राजकारणातूनच बाद केले.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/11/2025 - 00:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

(No subject)

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 08:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चिलटाने सुर्यावर थुंकणे याचे

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 09:59 नवीन
Image removed. चिलटाने सुर्यावर थुंकणे याचे हे उदाहरण.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 04/11/2025 - 11:29 नवीन
कोणताही कलावंत सर्वगुणसंपन्न असावा अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुळात वडेट्टीवार यांनी

सुबोध खरे
Fri, 04/11/2025 - 12:06 नवीन
मुळात वडेट्टीवार यांनी कोणतीही माहिती ना घेता बेफाट विधान केलेलं आहे. श्रीमती लता मंगेशकर यांनी भारतीय लष्करात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी किंवा अन्य पीडित दु:खी लोकांसाठी अनेक वेळेस कार्यक्रम करून मिळालेले पैसे दिलेले आहेत त्यामुळे अशा गोष्टी "देणगी दिली" या सदराखाली लोकांच्या दृष्टीस येत नाही. मुळात एखाद्या कलाकाराने सामाजिक कार्यासाठी देणगी दिलीच पाहिजे का? आपण त्यांच्या स्वर्गीय गळ्यातून निघालेल्या स्वरातून मिळणार आनंद पैशातच मोजला पाहिजे का? माझ्या सारखया असंख्य सैनिकांना किंवा दूरस्थ ठिकाणी काम करणाऱ्या एकाकी माणसांना लता दीदी यांच्या स्वराने जो मानसिक आधार दिलेला आहे त्याची किंमत पैशात कशी करणार? त्यातून फडतूस राजकारण्यांच्या असल्या मताला कशाला किंमत द्यायची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

लता मंगेशकरांनी अनेक

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 13:05 नवीन
लता मंगेशकरांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली होती. लातूरमधील एका महाविद्यालयाला कार्यक्रम करून बरीच मदत केली होती. कोविड काळात मुख्यमंत्री निधीत देणगी दिली होती. नृत्य, गायन, कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरोबर आहे. पण काडीचीही अक्कल

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 12:57 नवीन
बरोबर आहे. पण काडीचीही अक्कल नसलेल्या माठ्याने कोणतीही माहिती न घेता मुर्खासारखे बरळणे झोडपलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

महात्मा फुले जयंतीच्या

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/11/2025 - 13:49 नवीन
महात्मा फुले जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा! ते नसते तर आज मुली शिकल्या असत्या का हा मोठा प्रश्नच आहे. जय फुले शाहू आंबेडकर!
  • Log in or register to post comments

तुळजापूरात ड्रग्ज तस्करीत पुजारी?

वामन देशमुख
Fri, 04/11/2025 - 14:21 नवीन
तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीच्या चर्चा ऐकू येत होत्या. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये थेट पुजारीच सापडले होते. त्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील दोषी पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिर प्रवेशबंदी करण्यात येणार असून, ही कारवाई तातडीने अंमलात आणली जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस आणि मंदिर प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंदिर संस्थानने त्वरित पावलं उचलली आहेत.
  • Log in or register to post comments

नशीब यात एकही . . .

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 14:32 नवीन
नशीब यात एकही . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

समजत नाही

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/11/2025 - 15:08 नवीन
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस आणि मंदिर प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंदिर संस्थानने त्वरित पावलं उचलली आहेत.
एक गोष्ट समजत नाही. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे मधूनमधून अशाप्रकारचे आदेश देत असतात. असे आदेश सरकारमधील मंत्री किंवा प्रशासनातील जिल्हाधिकारी किंवा तत्सम कोणा अधिकार्‍याने दिले तर समजू शकतो. पण नीलम गोर्‍हे असे आदेश नक्की कोणत्या अधिकारात देत असतात? असे कारवाई करायचे आदेश द्यायचा अधिकार विधानपरिषदेच्या उपसभापतींना असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

माहिती नाही. पूर्वी भाजप-सेना

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 15:27 नवीन
माहिती नाही. पूर्वी भाजप-सेना युतीचे सरकार असताना विधानसभेत विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा कोणत्याही सरकारी पदावर नसूनही राष्ट्रवादीचे अजित पवार (जे एक साधा आमदार होते) वारंवार पिंपरी चिंचवड महापालेकत जाऊन तेथील अधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे. यावर अनेकांनी आक्षेप घेऊनही ना त्यांनी ते बंद केले ना मुख्यमंत्री देफने बंद करण्यास सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आमदार खासदार, नगरसेवक लोक अशी

रात्रीचे चांदणे
Fri, 04/11/2025 - 16:53 नवीन
आमदार खासदार, नगरसेवक लोक अशी बरीच बेकायदा कामं करत असतात. मी तर ऐकलाय की राज ठाकरे तर कधीच टोल भरत नाहीत. कोणी त्यांना विचारातही नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही तोडफोड करू दे कार्यकर्त्यांवर लहान सहान केसेस दाखल करून त्यांना मोकळे सोडले जाते. अशी बरीच उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

(No subject)

श्रीगुरुजी
Sat, 04/12/2025 - 00:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सर्टिफाईड बी टीम!

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/12/2025 - 00:18 नवीन
सर्टिफाईड बी टीम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सांभाळून, परतीचे दोर नका कापू

टीपीके
Sat, 04/12/2025 - 11:05 नवीन
सांभाळून, परतीचे दोर नका कापू, कधी तुम्हाला उबाठा, शप तोंडावर पाडतील सांगता येणार नाही. बाकी राणाला भारतात आणले म्हणे, तुमच्या पक्षांचा दुखवटा किती दिवसांचा? निदर्शनांना कधी जाताय? या वेळी तुमच्या मते अजून एका निरपराध्याला पकडल्याने राजमाता किती वेळ रडत होत्या? पण या वेळी राणाची वकीली करण्यात राऊतांअगोदर कन्हैयाने बाजी मारली ना? या विषयावर सरकारवर टिका करायची संधी त्याने तुम्हाला पण दिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ख्या ख्या ख्या! ख्या ख्या

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/12/2025 - 11:19 नवीन
ख्या ख्या ख्या! ख्या ख्या ख्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

चक्क तुम्हाला माझं म्हणणं

टीपीके
Sat, 04/12/2025 - 12:55 नवीन
चक्क तुम्हाला माझं म्हणणं पटलं? आज सूर्य कुठून उगवला बघितले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माझ्या मते राणाला भारतात

श्रीगुरुजी
Sat, 04/12/2025 - 14:25 नवीन
माझ्या मते राणाला भारतात आणण्याची आवश्यकता नव्हती. त्याला अमेरिकेत जन्मभर तुरूगवास मिळाला होता. तेथे तुरूंगात फाजील लाड होत नाहीत. त्याला येथे आणून काहीही साध्य होणार नाही. तो कोणतीही नवीन माहिती देणार नाही व दिली तरी ते सिद्ध करणे आता अशक्य आहे. कपिल सिब्बल, प्रशांतभूषण त्याला सोडवून आणण्यासाठी तयारीला लागले असतीलच. कॉंग्रेस, शप गट, सप, उबाठा गट, वंबिआ इ. त्याच्यावर कसा अन्याय होतोय यासाठी आंदोलनाची तयारी करीत असणार. कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, बरखा दत्त इ. माध्यमातून त्याची बाजू जोरदारपणे मांडतील. राऊत, कन्हैय्याकुमार, उमर अब्दुल्ला, अखिलेश यादव इ. रस्त्यावर उतरून धुमाकूळ घालतील. भारताला त्याला तुरूंगात व तुरूगाबाहेरही पोसावे लागेल. मानवतेच्या आधारावर त्याला जामीन मिळेल आणि तो देशद्रोह्यांचा हीरो होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

अबा आणि गँग खूष

टीपीके
Sat, 04/12/2025 - 14:47 नवीन
अबा आणि गँग खूष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

फसगत

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 04/12/2025 - 21:13 नवीन
"त्याला येथे आणून काहीही साध्य होणार नाही. तो कोणतीही नवीन माहिती देणार नाही" हे तर आधीच माहित होते. डेन्मार्कमधील गुन्यासाठी तो अमेरिकेत तुरुंगात होता. तेथील सुप्रिम कोर्टाने पुराव्याअभावी राणाची २६/११ मधुन मुक्तता केली होती. आता जगाचे लक्ष असणार आहे ह्या केसमध्ये. खोट्या चकमकीत मारणे, जेलमध्ये आत्महत्या दाखवणे .. असले काहीही करता येणार नाही. तिकडे पिझा खात होता.. इकडे जाड भाकर्या खाव्या लागतील. "कसाबला बिर्याणी देत होतो" हे सगळे खोटे होते असे खुद्द विद्वान वकील आणि आता भाजपात सामील झालेले उज्ज्वल निकम ह्यांनीच मान्य केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

समजा एखादा गुन्हेगार असेल तर

रात्रीचे चांदणे
Sat, 04/12/2025 - 21:36 नवीन
समजा एखादा गुन्हेगार असेल तर तर त्याला भारतीय कायद्यानुसार शिक्षा मिळायला नको का? मुंबई हल्ल्यात 166 लोक मेले होती, त्यांच्या मृत्यू ला कारणीभूत असणाऱ्यांना भारतीय कायद्यानुसार शिक्षा होत असेल तर चांगलेच आहे की. ह्यात फसगत कसली. प्रशांत भूषण गँग काय करणार ह्याचा विचार करून निर्णय घेण्यात अर्थ नाही. कदाचित एखादा मुद्दा मिळेलही त्याचकडून, भारताने असच प्रयत्न केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 04/12/2025 - 22:05 नवीन
शि़क्षा झालीच पाहिजे. चव्हाण 'त्याला सोडुन द्या' असे थोडीच म्हणत आहेत? पण भाजपावाल्यांची नेहमीची सवय आहे. "आमच्या मताशी सहमत व्हा नाहीतर तुम्ही देशद्रोही आहात"काही निर्बुद्ध पत्रकारांनी तशी री ओढायला सुरुवातही केली आहे. प्रशांतभूषण काय करतील ह्याची चिंता कशाला? वकिलांचे कामच ते आहे. इंदिरा गांधींच्या मारेकर्याची केस घेणार्यांची सून भाजपातच आहे. आसाराम बापू,हर्षद मेह्ता ह्यांची केस लढवणारे, कायदा आणि निर्लज्जपणा कोळून प्यायलेले एक वकील वाजपेयी सरकारमध्ये तर कायदा मंत्री होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

??

चंद्रसूर्यकुमार
Sat, 04/12/2025 - 21:38 नवीन
साध्य होईल की नाही ही पुढची गोष्ट झाली. पण भारतीय नागरीकांना इतक्या बेदरकारपणे ठार मारायच्या अक्षम्य गुन्ह्यात सामील असलेल्या कोणालाही भारतीय कायद्यापुढे उभे करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे.ते सरकारने केले याचे समाधान आहे. २६/११ नंतर 'भारतीयांची तीच लायकी' असली मुक्ताफळे उधळणार्‍याला किमानपक्षी भारतीय न्यायालयापुढे उभे करायला नको? त्याला फाशीची शिक्षा होईलच असे नाही तसेच होणारच नाही असेही नाही. इंदिरा गांधी हत्याप्रकरणी सतवंतसिंग आणि केहारसिंग या दोघांना फाशीची शिक्षा झाली होती. केहारसिंगने प्रत्यक्षात इंदिरा गांधींवर गोळी चालवली नव्हती (ती चालवली होती बियंतसिंग आणि सतवंतसिंग यांनी- त्यातील बियंतसिंग त्या दिवशीच मेला- की मारला) तरीही त्याला कटात सहभागी होता म्हणून फाशीची शिक्षा दिली होती. संसद हल्ला प्रकरणात अफजल गुरूने प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेतला नव्हता (प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेतलेले हरामखोर त्या दिवशीच मेले) तरीही त्याला कटात सहभागी असल्याबद्दल फाशीची शिक्षा न्यायालयाने दिली होती. त्याप्रमाणेच जर २६/११ च्या आखणीत राणाने मोठी भूमिका बजावली असेल तर त्याला फाशी होऊ शकेल. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात २००५ मध्ये अबू सालेमला पोर्तुगालमधून भारतात आणले गेले होते. तेव्हा त्याला फाशी देणार नाही असे आश्वासन भारत सरकारने पोर्तुगाल सरकारला दिले होते त्यानंतरच पोर्तुगाल सरकारने त्याचे प्रत्यापर्ण भारतात केले. इतर आरोपींनी दिली होती त्यापेक्षा नवी आणि पूर्वीच्या १२ वर्षात न कळलेली कोणतीही माहिती अबू सालेम द्यायची शक्यता जवळपास नव्हती. तसेच त्याला फाशीही होणार नव्हती. तरीही भारतीय नागरीकांविरोधात गुन्हा करणारा कोणीही कुठेही असेल तरी त्याला भारतात आणणे आणि भारतीय न्यायालयापुढे उभे करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. ते पार पाडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अमेरिकेत तो सुटण्याची शक्यता

श्रीगुरुजी
Sat, 04/12/2025 - 22:17 नवीन
अमेरिकेत तो सुटण्याची शक्यता खूप कमी होती. भारतात अकार्यक्षम न्यायव्यवस्थेमुळे तो सुटू शकतो. भारतात त्याच्या पाठीशी अनेकजण उभे राहून त्याला भरपूर मदत करतील. त्याला पोसावे लागेल ते वेगळेच. त्यापेक्षा तो अमेरिकेतल्या तुरूंगातच राहून तेथेच मरायला हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्राचे माजी

श्रीगुरुजी
Sat, 04/12/2025 - 14:40 नवीन
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहशतवादी तहव्वुर राणाविरुद्ध निष्पक्ष खटला चालवण्याची मागणी केली आहे. त्याला बचावाची संधी, अपीलची सुविधा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कपिल सिब्बल, प्रशांतभूषण, असीम सरोदे, इंदिरा जयसिंग, अभिषेक मनू सिंघवी इ. तयारीस लागले असतील. दहशतवाद्यांसाठी कॉंग्रेसींना नेहमीच कळवळा असतो.
  • Log in or register to post comments

काय खोटं बोललो आम्ही, 24

टीपीके
Sat, 04/12/2025 - 14:52 नवीन
काय खोटं बोललो आम्ही, 24 तासात राजमातांनी चक्र फिरवली. आता उठा, राऊत, शप मदतीला धावतील. आणि या वेळी प्रो माई अचानक गप्प बसतील. अबांच इंटरनेट अधून मधून बंद पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्याने ना पृथ्वीराज चव्हाण

रात्रीचे चांदणे
Sat, 04/12/2025 - 14:51 नवीन
ह्याने ना पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पक्षाला मुस्लिमांची मते मिळणार नाहीतच पण हिंदूंची कमी मात्र होतील. आणि निकाल लागला की मात्र EVM दोष देत बसतील.
  • Log in or register to post comments

ईव्हीएम हॅक करता येतं,

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/12/2025 - 16:43 नवीन
ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो! अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे, तुलसी गब्बार्ड यांचा खळबळजनक दावा https://dhunt.in/ZP72v By सामना via Dailyhunt
  • Log in or register to post comments

हमारी दोस्ती बनी रहे .. चलो

आंद्रे वडापाव
Sat, 04/12/2025 - 18:54 नवीन
हमारी दोस्ती बनी रहे .. चलो मैं चलता हूं ... . Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 04/12/2025 - 19:58 नवीन
"दहशतवाद्यांसाठी कॉंग्रेसींना नेहमीच कळवळा असतो." श्रीगुरुजी सगळी बातमी वाचायची नाही. आपल्याला जे आवडते ते घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. हेच विधान मोदी/शहानी केले की म्हणायचे 'ह्यामागे एक वेगळीच कूट्नीती/चाणक्यनीती आहे जी जगाला २५ वर्षांनी समजेल" The Congress leader stated that a "kangaroo court" will not run in the country as the whole world will be watching India .. चव्हाण योग्यच बोलले आहेत. दया नायक/प्रदिप शर्मा छाप अधिकार्याने राणाचे एन्काउंटर केले तर भारताचे नुकसान होईल. 'राणाला भर चौकात फाशी द्या" हे म्हणायला सोपे आहे. हा राणा कोणत्या गुन्ह्यासाठी अमेरिकेत तुरुंगात होता? डेन्मार्कमधील गुन्ह्यासाठी. A US court in 2013 acquitted Rana of conspiracy to provide material support to the Mumbai attacks. But the same court convicted him of backing LeT to provide material support to a plot to commit murder in Denmark. आता चव्हाण ह्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला असेल? गुडघ्यात मेंदू असणार्या अर्नब गोस्वामी/नाविकाला हे समजणार नाही. Read more at: https://www.theguardian.com/world/2025/apr/10/mumbai-attacks-tahawwur-hussain-rana https://www.latestly.com/agency-news/india-news-congress-prithviraj-chauhan-calls-for-fair-trial-for-tahawwur-rana-under-indian-laws-ahead-of-his-extradition-from-us-6773123.html
  • Log in or register to post comments

आलीस का परत.

श्रीगुरुजी
Sat, 04/12/2025 - 21:24 नवीन
आलीस का परत. येथे प्रतीक्षा करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिका सहित जगभरातील अनेक

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/12/2025 - 21:44 नवीन
अमेरिका सहित जगभरातील अनेक लोक ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते आणि निकालही फिरवता येतो, असं सांगत असताना भारतातील बहुसंख्य जनता व विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधात आंदोलनं करत आहेत, निवेदने देत आहेत. अशा स्थितीत भाजपा महायुती मात्र ईव्हीएम मशीनवरच निवडणुका घेण्यात इतकी उत्सुक का आहे? भाजपाला ईव्हीएम इतकी प्रिय का आहे? अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा मोदींच्या उपस्थितीत ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. तरीदेखील भाजपा ना ईव्हीएम सोडते, ना सत्ता. ज्या दिवशी निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जातील, त्याच दिवशी निवडणूक खर्‍या अर्थाने पारदर्शक झाली असं समजावं लागेल. अन्यथा, तुम्ही मत कुणालाही द्या — सत्ता मात्र भाजपा महायुतीच्याच हातात येते. आता महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्येही हेच घडणार, अशी धारणा बुद्धिजीवी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये तयार होत आहे. https://www.facebook.com/reel/1199818235143886/?mibextid=ZZyLBr
  • Log in or register to post comments

evm मध्ये हेराफेरी शक्यच नाही

विवेकपटाईत
Sun, 04/13/2025 - 12:29 नवीन
evm मध्ये हेराफेरी शक्यच नाही. या शिवाय evm बदलणे ही शक्य नाही. टीनपट डब्बा गल्लीतील कारीगर ही तैयार करू शकत होता. कागदी बॅलेट कोणीही सकाळी सिरिज पाहून दोन तासांत मतपत्र छापू शकत होता. कागदी सील ज्यावर पोलिंग अजेंटचे हस्ताक्षर राहायचे ते एका पिन ने ही सहज हटविणे शक्य होते. सरकार तुमची असेल तर मतपेट्या बदलून त्यात काढलेली कागदी सील सहज लावणे शक्य होते. ( मी 1982 ते 1996 पर्यन्त निवडणूक ड्यूटी प्रत्येक निवडणूकीत केली आहे). अमेरिकेत सरकार कोणाचीही आली तरी त्यांची भूमिका भारत विरोधी राहील कारण अंतराष्ट्रीय राजनीति CIA निर्धारित करते. त्याची दोन कारणे आहेत. पहिला भारत रशियन ब्लॉकचा आहे. दूसरा आधीच चीनच्या उन्नतीमुळे अमेरिका आणि युरोपची वाट लागत आहे. त्यात भारताची भर नको. गेल्या दहा वर्षांत भारताची प्रगति बघता ही भीती खरी ठरत आहे. भारतात अराजकता पसरवून भारताचे तुकडे करणे जे सीआयएचे अनेक दशकांपासूनचे उद्दीष्ट आहे. 2011 नंतर भारतात अराजकता पसरविण्याचे भरपूर प्रयत्न झाले. दुर्भाग्य 2014 मध्ये मोदींच्या हाती पूर्ण बहुमताची सत्ता आली. सीआयएचे शेकडो कोटी पाण्यात गेले. 2024 पर्यन्त भारताला अस्थिर करण्यासाठी किती हजार कोटी बुडाले याची कल्पना करणे कठीण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे "बियॉण्ड डाऊट" कुणी सिद्ध

युयुत्सु
Sun, 04/13/2025 - 12:45 नवीन
हे "बियॉण्ड डाऊट" कुणी सिद्ध केल्याचे माझ्या वाचनात नाही. कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स तत्वतः पंक्चर करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

लष्कर-ए-तोयबा

चंद्रसूर्यकुमार
Sun, 04/13/2025 - 14:27 नवीन
काही काही गोष्टी अशा असतात की ती गोष्ट खरी असल्याचा पुरावा देता येत नाही पण ती गोष्ट खोटी असेल तर त्याचे खंडन करता येते. तुमच्या भाषेत त्याला हायपोथिसिस का असे काहीतरी बोलतात. उदाहरणार्थ- युयुत्सुंचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध नाही याचा पुरावा देता येणार नाही. मात्र युयुत्सुंचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध आहे असा एखाद्याचा दावा असेल तर त्या व्यक्तीने अगदी बारीकसाही पुरावा दिला तर युयुत्सु हाफीज सईदच्या टोळीतले एक आहेत असे म्हणता येईल. त्यामुळे युयुत्सुंचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध नाही ही अशी गोष्ट आहे जी "बियॉन्ड डाऊट" कधीच सिध्द करता येणार नाही. फक्त त्यांचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध आहे याचा स्पष्ट पुरावा देता येणार नाही. त्याप्रमाणेच ईव्हीएम हॅक करता येत नाही हे "बियॉन्ड डाऊट" कधीच सिध्द करता येणार नाही. जर का एखाद्याचा दावा असेल की ईव्हीएम हॅक करता येते तर ते करून दाखवा असे आव्हान निवडणुक आयोगाने दोन-तीनदा दिले होते तिथे कोणी गेले पण नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे मागे इलॉन मस्क किंवा आता तुलसी गॅबार्डने ईव्हीएम विषयी जे काही म्हटले त्यावरून काँग्रेसच्या राजकारण्यांपासून मिपावरील अमरेंद्र बाहुबलींपर्यंत अनेकांना उकळ्या फुटल्या. इलॉन मस्कने प्युर्टो रिकोमध्ये ईव्हीएम मध्ये प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस पेपर ट्रेल होता म्हणून बरे झाले असे म्हटल्यावर आपल्याकडे जसे यंत्र आणि जशी पेपर ट्रेल असते तसेच तिथे पण असते असे गृहित धरून तिथे प्रश्न आला तसा आपल्याकडे पण येऊ शकेल असे दावे केले गेले. पण तिथे प्रश्न कुठे आला? तर मतदानाची वेळ संपल्यावर मशीनमधील आकडे (कोणाला किती मते मिळाली) हे इंटरनेट लिंक करून आपोआप एका सेंट्रल युनिटकडे पाठवले गेले होते ती मधली लिंक कोणीतरी हॅक केली होती. म्हणजे जो काही प्रश्न आला तो मशीनमध्ये नव्हता तर मधल्या लिंकमध्ये होता. आपल्याकडील यंत्रे इंटरनेटला जोडलेलीच नसतात तर सगळ्या मतदानकेंद्रावरील यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेली जातात आणि तिथे मतमोजणी केली जाते. तरीही मशीन हॅक करता येऊ शकते असा कोणाचा दावा असेल तर ती करून दाखवावी. मग ते म्हणणे लगेच मान्य करू. ते हॅक करायला आतापर्यंत कोणीही पुढे का आले नाही? जे काही चालू आहे ते नुसते हवेतील गोळीबार. तिसरे म्हणजे कोणत्याही मशीनची अ‍ॅक्युरसी ९९.९९% पेक्षा दरवेळेस देता येईल असे वाटत नाही. दहा हजारातील एखादा मोबाईल फोनचा हॅन्डसेट न चालणारा निघतो त्याप्रमाणेच. भारतात मतदानकेंद्र आहेत १० लाखच्या आसपास. प्रत्येक केंद्रावर एक मशीन धरले तरी पूर्ण निवडणुकीत १० लाख मशीन वापरली जातात. त्यापैकी १% म्हणजे १० हजार आणि त्याच्या १% म्हणजे १०० मशीनमध्ये काहीतरी बिघाड असणार हे गृहित धरायलाच हवे. अशा मशीनमध्ये मते योग्य प्रकारे नोंदली जाणार नाहीत किंवा एक बटन दाबले तर दुसर्‍याला मत जाणार असे काही होणार हे अपेक्षित आहे. असे कुठे होत असेल तर निवडणुक आयोग त्याठिकाणी फेरमतदान घेते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मला नाही वाटत १० पेक्षा जास्त ठिकाणी असे करावे लागले. म्हणजे भारतातील मशीन ९९.९९९% अ‍ॅक्युरेट आहेत असे का म्हणू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मशीन

चंद्रसूर्यकुमार
Sun, 04/13/2025 - 14:33 नवीन
दुसरे म्हणजे कुठेतरी असा मशीनमध्ये प्रश्न आला की तीच बातमी होते आणि वर्तमानपत्रे, चॅनेल्सवर दाखवली जाते. अशा पूर्ण देशात १० केंद्रावरील बातम्या बघून मशीन हॅक झाली आहेत असे नक्कीच म्हणता येणार नाही. कारण ९९.९९९% केंद्रांमध्ये मशीन व्यवस्थित काम करत असतात त्याची बातमी होत नाही. दररोज हजारो विमाने इकडून तिकडे जात असतात- मुंबई (किंवा कोणत्याही) विमानतळावर अमुक एक विमान लँड झाले, तमुक विमानाचे उड्डाण झाले अशा बातम्या येत नाहीत. पण एखादे विमान पडले तरच त्याची बातमी होते. ८-१० ठिकाणी मशीनमध्ये प्रश्न आले म्हणून सगळ्या देशातील मशीन बोगस आहेत असे म्हणणार्‍या लोकांना बघून एक प्रश्न पडतो- एखादे विमान पडल्याची बातमी आल्यावर सगळीकडची विमाने सर्वत्र पडतच असतात आणि कोणतेच विमान योग्य प्रकारे उडून आपल्या गंतव्य स्थानी उतरतच नाही असे या लोकांना वाटत असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

गंम्मत अशी आहे की ईवीएम ला

सुक्या
Mon, 04/14/2025 - 00:35 नवीन
गंम्मत अशी आहे की ईवीएम ला झोडपणारी मंडळी, भारतातले व अमेरिकेतली ईवीएम कशी काम करतात. त्या दोघांमधला मुलभुत फरक काय आहे ह्या गोष्टी कडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करतात. किंवा बहुतेक ह्या गोष्टी त्यांना माहीतच नसतात. केवळ ईवीएम ह्या नामसाधर्म्यामुळे तिकडची ईवीएम हॅक करता येत असतील तर आपलीही ईवीएम हॅक होतात हा त्यांचा युक्तीवाद असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते हा दुराग्रह सोडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

ईव्हीएम हॅक करता येते तर ते

अमरेंद्र बाहुबली
Sun, 04/13/2025 - 19:22 नवीन
ईव्हीएम हॅक करता येते तर ते करून दाखवा असे आव्हान निवडणुक आयोगाने दोन-तीनदा दिले होते तिथे कोणी गेले पण नव्हते. निवडणूक आयोगाच्या टर्म एंड कंडिशन्स काय असतात ते पहा! भाजपलाजिंकवायला निवडणूक आयोग सज्जच असतो, ईव्हीएम वरील प्रश्नाना भाजप नेते उत्तर देतात तेव्हाच आयोग नी भाजपचे साटेलोटे कळते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

तुमच्याकडे घरी कॅल्क्युलेटर

सुक्या
Mon, 04/14/2025 - 00:38 नवीन
तुमच्याकडे घरी कॅल्क्युलेटर असेलच. त्याला हात न लावता २ + २ = १७ करुन दाखवा बरे. जगातल्या सगळ्या टेक्नोलोजी (सॅटेलाईट, ५जी, ४ जी, वाय फाय, रेडियो सिग्नल वगेरे वगेरे) वापरा. बघा जमतय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

चोराच्या मनात चांदणे

चंद्रसूर्यकुमार
Mon, 04/14/2025 - 09:05 नवीन
ईव्हीएम वरील प्रश्नाना भाजप नेते उत्तर देतात तेव्हाच आयोग नी भाजपचे साटेलोटे कळते!
सुशांतसिंग रजपूत आणि दिशा सलियान यांच्या संशयास्पद मृत्यूंचा परत तपास करावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आपल्याला विचारल्याशिवाय कोणताही निकाल न्यायालयाने देऊ नये अशी 'इंटरव्हेन्शन पिटीशन' दाखल केली होती तेव्हाच चोराच्या मनात चांदणे होते हे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तरीही मशीन हॅक करता येऊ शकते

युयुत्सु
Mon, 04/14/2025 - 07:58 नवीन
तरीही मशीन हॅक करता येऊ शकते असा कोणाचा दावा असेल तर ती करून दाखवावी. फर्मवेअर ही अशी गोष्ट आहे की इथे सोप्या भाषेत मला समजावता येणार नाही. सर्व इव्हीएम मशिन्स्वर एकच फर्मवेअरची आवृत्ती आहे, हे मला जर कुणी पटवून दिले तर, तसेच फर्मवेअरचे मॅनिप्युलेशन कसे केले जाते हे कॅननसारख्या कंपनीच्या कॅमे-यामध्ये मी बघितले (आणि थोडेफार वापरले असल्याने) वरील युक्तीवादाला माझ्यादृष्टीने वैयक्तिक पातळीवर उतरून गप्प बसविण्याचा प्रयत्न असे मी म्हणेन. इव्हीएम तांत्रिकदृष्ट्या कॅमेर्‍यापेक्षा कमी गुंतागुतीचे आहे, त्यामुळे तार्कीक पातळीवर संशयाला खूप जागा आहे. फर्मवेअर मध्ये गडबड करणे फार अवघड नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

जो काही संशय असेल तो सिद्ध

श्रीगुरुजी
Mon, 04/14/2025 - 08:18 नवीन
जो काही संशय असेल तो सिद्ध करून दाखवा. निवडणूक आयोगाने संधी दिली होती, परंतु आरोप करणाऱ्या कोणीही ते आव्हान स्वीकारले नाही. मतयंत्राचा वापर थांबवावा यासाठी काही जण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु त्यासाठी कोणतेही सबळ कारण, सबळ पुरावे देता आले नव्हते. तुलसी गबार्डसारख्या कोणाचीही विधाने हा कोणत्याही न्यायै पुरावा मानला जात नाही. अगदी तार्किकदृष्ट्या विचार केला तरी मतयंत्रात गडबड खरू शकणाऱ्यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत व इतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अशी गडबड न करता स्वतःची अडचण स्वतःच करून घेतली हे तार्किकदृष्ट्या पटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेऊन मतयंत्रात गडबड.करता येते व गडबड करून भाजप निवडणूक जिंकला हे आरोप नाकारले. ज्यांना मतयंत्रावर संशय आहे त्यांनी अजूनही आपले आरोप सिद्ध करण्यास.प्रयत्न करावे. तसेच DRE Voting Machine म्हणजे काय व ते कोठे उपयोगात आणतात हे समजून घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

त्यामुळे तार्कीक पातळीवर

श्रीगुरुजी
Mon, 04/14/2025 - 08:54 नवीन
त्यामुळे तार्कीक पातळीवर संशयाला खूप जागा आहे. फर्मवेअर मध्ये गडबड करणे फार अवघड नाही... संशय घ्या, पण कधीतरी सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न करा. हे सिद्ध करणे आजवर कोणासही शक्य झाले नाही. गडबड करणे फार अवघड नाही हे बोलणे सोपे आहे. किती वर्षे असा संशय घेऊन बडबड करणार? अशी गडबड करून दाखविण्याचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

भारतात अराजकता पसरवून भारताचे

आग्या१९९०
Sun, 04/13/2025 - 12:51 नवीन
भारतात अराजकता पसरवून भारताचे तुकडे करणे जे सीआयएचे अनेक दशकांपासूनचे उद्दीष्ट आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी परकीय शक्तींवर संशय घ्यायच्या ती हीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मी बोललेलो ना? पुढचा आठवडा

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/12/2025 - 22:08 नवीन
मी बोललेलो ना? पुढचा आठवडा “माई दी ग्रेट” गाजवणार! भक्तांना उभे सोलून काढतेय माई! कीप इट अप माई!
  • Log in or register to post comments

भारत एवजी पाकिस्तान मध्ये

विवेकपटाईत
Sun, 04/13/2025 - 12:12 नवीन
भारत एवजी पाकिस्तान मध्ये पाठविले असते राणा साहेब आज्ञातांच्या हस्ते केंव्हाच स्वर्गीय झाले असते. आता किमान दहा पंधरा वर्ष फ्रिची बिर्याणी खातील.
  • Log in or register to post comments

EVM हॅक करता येते ह्या वर

रात्रीचे चांदणे
Mon, 04/14/2025 - 08:26 नवीन
EVM हॅक करता येते ह्या वर विश्वास ठेवणे हा विरोधकांसाठी अतिशय सोपा मार्ग आहे. राहुल गांधी हे अतिशय अकार्यक्षम नेते आहेत असा आरोप करणे आणि त्याच्यावर चर्चा करणे हे विरोधक आणि काँग्रेजनांसाठी शक्य नाही. मग EVM वर आरोप केला की थोडावेळ तरी मानसिक समाधान तर मिळत असेल.त्यामुळे जो पर्यंत सत्तेत येत नाही तो पर्यंत EVM विरोध ते करत बसतील. एकदा सत्ता पलटली की सध्या EVM चे समर्थन करणारेही विरोध करू लागतील.
  • Log in or register to post comments

एकदा सत्ता पलटली की बऱ्याच

आंद्रे वडापाव
Mon, 04/14/2025 - 09:00 नवीन
एकदा सत्ता पलटली की बऱ्याच गोष्टी आपोआप बदलतील हो.... "रात्रीचे चांदणे" हे "दिवसाचे कवडसे" होईल... हिंदू मोकळा श्वास घेऊ शकणार नाही... महागाई खुपच वाढलीय नै, पेट्रोल पहा किती वाढले, जॉब्स नाही, चीन किती आत घुसलाय याची जाणीव होईल... बरंच काही होईल... आता शांत असलेले थेरडे अचानक जागे होतील... बरंच काही होईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा