Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 04/11/2024 - 17:23
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
चारोळ्या
आईस्क्रीम
ओली चटणी
थंड पेय
पंजाबी
मेक्सिकन
औषधोपचार
वन डिश मील
सरबत
फलज्योतिष
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही. मी काय चुकीचे केले?? activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली. मी काय चुकीचे केले?? संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला. मी काय चुकीचे केले?? सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले. “या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला. मी काय चुकीचे केले?? “मी पुण्यात राहतो.” “पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.” “जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले. मी काय चुकीचे केले?? “मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक” “पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.” ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली. मी काय चुकीचे केले?? पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली. “तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले. ती काहीतरी पुटपुटत निघून गेली. मी काय चुकीचे केले?? :( सांगा सांगा मी काय चुकीचे केले??:(
  • Log in or register to post comments
  • 33406 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 04/18/2024 - 10:07

In reply to नको सर हव तर मला मी फेल्युअर by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मीपाचा फडणवीस?

मीपाचा फडणवीस? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटा ची तट्टाणी घरी बसलेले १०५ अजून अभंग आहेत त्यातला एक तरी फुटला का? आणि ५६ आणि ५४ जागा आलेले दोन्ही पक्ष दुभंगुन त्यांच्या नेत्यांना धरणी आपल्याला पोटात घेईल का अशी स्थिती करणाऱ्या श्री फडणवीस यांच्या नखाची तरी सर आहे का आपली ? "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" म्हणत ते आले सुद्धा आणि दोन्ही विरोधी पक्षाची शकले केली. साहेब काहीही करू शकतात असे म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलंय कारण

साहेब काहीही करू शकत नाही

हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय. बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच. फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 04/18/2024 - 10:40

In reply to मीपाचा फडणवीस? by सुबोध खरे

Permalink

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भटा ची तट्टाणी. सहमत. कुठे ५५ आमदारांवर मुख्यमंत्री बनवणारे संजय राऊत नी कुठे १०५ आमदार घेऊन घरी बसणारे फडणवीस?? तुलना शक्यच नाही. घरी बसलेले १०५ अजून अभंग आहेत त्यातला एक तरी फुटला का? कुणाला हौस आहे इडी सीबीआय चौकश्या मागे लावून घायच्या?? भाजपमध्ये आलं की चौकश्या बंद होतात, फाइली क्लिअर होतात, भाजपमध्ये राहून “सुरक्षित” रीत्या भ्रष्टाचार करता येत असेल तर कुणी का फुटेल?? ५६ आणि ५४ जागा आलेले दोन्ही पक्ष दुभंगुन त्यांच्या नेत्यांना धरणी आपल्याला पोटात घेईल का अशी स्थिती करणाऱ्या श्री फडणवीस अशी गद्दारी हया आधी २ वेळा झालीय, ठाकरेंना ह्याचा अनुभव आहे त्यामुळे धरनी पोटात वगैरे अस काहीही झालेल नाही. उलट मुख्यमंत्री पदाऐवजी अमित शहानी उपमुख्यमंत्री केल्यामुळे श्री. फडणविसाना तस वाटलं असाव. यांच्या नखाची तरी सर आहे का आपली? आजीबात नाही. नी कुणाला हवी असेल असही आजीबात वाटत नाही. "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" म्हणत ते आले सुद्धा आणि दोन्ही विरोधी पक्षाची शकले केली. ते आले पण फौजदराचे हवालदार बनून. :) साहेब काहीही करू शकतात असे म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडाला कुलूप लागलंय करुच शकतात की, सिंचन नी इतर घोटाळ्याच्या फायलि क्लिअर केल्या. आता कुणी भाजपेयी बोंबलतो का सिंचन घोटाळ्याच्या नावाने?? नाही ना? राष्ट्रपतीला रात्री २ वाजता उठवून राष्ट्रपती राजवट उठवायला लावली, १०५ घरी बसवून महाराष्ट्र वाचवला.. आणखी काय काय करावं साहेबानी?? :) कारण साहेब काहीही करू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झालंय. अस असतं तर “शरद पवार माझे गुरु” अस म्हणण्याची वेळ मोदींवर्क का आली असती?? १०५ आमदार घेऊन घरी का बसाव लागलं असतं?? :) बाकी तुमची इडी सीबी आय बद्दल ची बाष्कळ बडबड आता चालू होईल, त्याकडे मी साफ दुर्लक्ष करेनच. माहितीय तुम्हाला ईडी नी सीबीआय चा गैरवापर करुन सत्ता मिळवलीय तरी का आरती ओवाळताय नको त्याची?? फक्त बेडकी फुगली तरी तिचा बैल होत नाही पण फुटून झुरळ मात्र होतं एवढा लक्षात ठेवा म्हणजे झालं. सहमत. पाय जमिनीवर असावे. :) उगाच कुणाला विश्वगुरू वगैरे म्हणू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 04/18/2024 - 10:46

In reply to कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

मी साफ दुर्लक्ष करेनच.

मी साफ दुर्लक्ष करेनच.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 04/18/2024 - 11:48

In reply to मी साफ दुर्लक्ष करेनच. by सुबोध खरे

Permalink

हेच योग्य आहे. (इतकं रोस्टिंग

हेच योग्य आहे. (इतकं रोस्टिंग झाल्यावर)
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on गुरुवार, 04/18/2024 - 11:24

In reply to तुम्ही मिपाचे संजय राऊत आहात. by Trump

Permalink

संजय राऊत हा नामाभिधानाचे स्वागत!

संजय राऊत हा नामाभिधानाचे स्वागत!
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 04/18/2024 - 11:47

In reply to संजय राऊत हा नामाभिधानाचे स्वागत! by कांदा लिंबू

Permalink

फडणवीस म्हणा सर मला. मी

फडणवीस म्हणा सर मला. मी फेल्युअर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 04/18/2024 - 11:50

In reply to फडणवीस म्हणा सर मला. मी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

YOU ARE AN ABJECT FAILURE TO

YOU ARE AN ABJECT FAILURE TO EVEN REALISE WHAT DEVENDRA IS
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 04/18/2024 - 13:58

In reply to YOU ARE AN ABJECT FAILURE TO by सुबोध खरे

Permalink

कितीही आरत्या ओवाळा सर काहीही

कितीही आरत्या ओवाळा सर काहीही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/17/2024 - 21:21

Permalink

“मूर्ख --काहीतरी बोलायलाच

“मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.“ असे डॉक्टरांनी लिहिले. “ह्यात मनमोहनसिंग, मोदी, नेहरू” ह्याना कुठे बसवायचे? असे मी त्याना विचारले. डॉक्टर पुन्हा धाग्यावर फिरकले नाही. मी काय चुकीचे केले?? :)
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 04/17/2024 - 21:26

In reply to “मूर्ख --काहीतरी बोलायलाच by अमरेंद्र बाहुबली

Permalink

समोरच्याला फूट इन माउथ

समोरच्याला फूट इन माउथ केल्याचा अपराध केला.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/17/2024 - 21:39

In reply to समोरच्याला फूट इन माउथ by आग्या१९९०

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 04/17/2024 - 21:45

In reply to “मूर्ख --काहीतरी बोलायलाच by अमरेंद्र बाहुबली

Permalink

डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ...

डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ... ज्ञानी -- काहीच बोलत नाही.“.. म्हणूनच ते काही बोलायला आले नाहीत ... बाकी तुमचं चालुद्या
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/17/2024 - 21:46

In reply to डॉक्टरांनीच लिहिले आहे ना ... by अमर विश्वास

Permalink

पण तुम्ही आलात. :)

पण तुम्ही आलात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 04/17/2024 - 21:56

In reply to पण तुम्ही आलात. :) by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आम्ही इथेच आहोत हो ..

आम्ही इथेच आहोत हो .. पूर्वी ते १८८ नंबरचे महान तज्ञ होते .. तुम्ही त्यांचे सांप्रत काळातले नवीन अवतार आहात का ते माहीत नाही ... पण तुमच्या अपार ज्ञानसागरातले शिंतोडे मिपा वर वारंवार उडत असतात हे मात्र खरे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/17/2024 - 22:25

In reply to आम्ही इथेच आहोत हो .. by अमर विश्वास

Permalink

कपिलमुनी एकदम सत्य बोलले.

कपिलमुनी एकदम सत्य बोलले. “जरा विरोधि सूर दिसला की भाजपच्या लोकांची जी जळते ते बघून मजा येते” मला मजा येतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 04/18/2024 - 09:58

In reply to आम्ही इथेच आहोत हो .. by अमर विश्वास

Permalink

@अमर विश्वास

@अमर विश्वास कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on गुरुवार, 04/18/2024 - 10:47

In reply to @अमर विश्वास by सुबोध खरे

Permalink

एकदम मान्य ...

एकदम मान्य ...
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on गुरुवार, 04/18/2024 - 10:02

Permalink

चला शंभर वेळेस सांगून झाले

चला शंभर वेळेस सांगून झाले भगेंद्रा तुझे चुकले पण काही ऐकायला तयार नाही ... हद्द झाली हो...
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Fri, 04/19/2024 - 12:44

Permalink

माझं काय चुकलं?

लोकांनी कसोटी क्रिकेट चांगले असते असे म्हटले. कुणीही विचारलेलं नसताना मी "कसोटी क्रिकेट भिकार आहे" असं म्हणालो. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Fri, 04/19/2024 - 12:45

Permalink

माझं काय चुकलं?

खादाडीच्या ग्रुप मध्ये बियर आवडणारे लोक कोणती बियर चांगली यावर चर्चा करत होते. मी बियर पीत नसलो तरी "बियर फालतू असते" अशी पिंक टाकली. मला ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 04/19/2024 - 14:46

In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक

Permalink

हे काही माझ्या लक्षात नाही.

हे काही माझ्या लक्षात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Fri, 04/19/2024 - 12:46

Permalink

माझं काय चुकलं?

टेक्नॉलॉजी च्या ग्रुप मध्ये लोक चॅट gpt चा वापर यावर चर्चा करत होते. मला गूगल वापरता येत नसलं तरी मी "chat gpt चा काहीच उपयोग नाही" अशी पिंक टाकली. मला ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 04/19/2024 - 14:47

In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक

Permalink

चॅट जिपीटी ग्राऊंड लेव्हल वर

चॅट जिपीटी ग्राऊंड लेव्हल वर तितकं वापरलं जाणार नाही फक्त इतकच लिहिलं होतं सर.
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Fri, 04/19/2024 - 12:46

Permalink

माझं काय चुकलं?

यानंतर मी एका ग्रुप मेम्बरच्या युट्युब चॅनेल वर त्याच्या दिवंगत वडिलांविषयी असभ्य भाषेत अश्लाघ्य टिप्पणी केली, आणि मला सर्वच ग्रुप मधून लाथ मिळाली. माझं काय चुकलं? -नापासेन्द्र इन्जिनियर्बलि
  • Log in or register to post comments

Submitted by जोनाथन हार्कर on Fri, 04/19/2024 - 13:52

In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक

Permalink

तुमचं काहीच चुकलं नाही, मिपा

तुमचं काहीच चुकलं नाही, मिपा मालकांनि तुम्हाला मिपावर घेतलं हे त्यांचं चुकलं. - कुजके हाडूक
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 04/19/2024 - 14:49

In reply to माझं काय चुकलं? by वेडा बेडूक

Permalink

त्य ग्रुप मेंबरने समुहात

त्य ग्रुप मेंबरने समुहात माझ्याबद्दल घाण घाण लिहिलं होतं ते विसरले असालच. आणी नंतर गेलेल्या वडिलाना मध्ये आणून सहानुभूती मिळवू लागला तर मी तरी काय करणार सर? कुणी काहीही घाण घाण लिहिल्यावर शांत बसायला काय मी संत आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by वेडा बेडूक on Fri, 04/19/2024 - 19:23

In reply to त्य ग्रुप मेंबरने समुहात by अमरेंद्र बाहुबली

Permalink

वडिलाना मध्ये आणून

वडिलांना कुणी मध्ये आणलं, आणि कुणाला लाथ बसली हे सर्वांना ठाऊक आहे. मांजरानं डोळे मिटले तरी जग बघत असतं!
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Fri, 04/19/2024 - 18:24

Permalink

काही लोक असे असतात की जे

काही लोक असे असतात की जे सगळ्यांकडून व सगळीकडून अपमानित होऊन देखील पुन्हा पुन्हा तसेच वर्तन करीत राहतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 04/19/2024 - 18:41

In reply to काही लोक असे असतात की जे by कांदा लिंबू

Permalink

निर्लज्जम सदासुखी

निर्लज्जम सदासुखी
  • Log in or register to post comments

Submitted by अहिरावण on Fri, 04/19/2024 - 19:25

In reply to निर्लज्जम सदासुखी by सुबोध खरे

Permalink

+१^न

+१^न
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 04/19/2024 - 20:03

In reply to काही लोक असे असतात की जे by कांदा लिंबू

Permalink

काही लोकाना डूआयड्या घेऊन

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत कारण खऱ्या आयडीने त्यानी बरच “नाव” कमावलेल असतं. टीप- सदर वाक्याचा आणी अहिरावण व कांदालिंबू हया आयडींचा काहीही संबंध नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कांदा लिंबू on Fri, 04/19/2024 - 22:13

In reply to काही लोकाना डूआयड्या घेऊन by अमरेंद्र बाहुबली

Permalink

+१

काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत कारण खऱ्या आयडीने त्यानी बरच “नाव” कमावलेल असतं.
सहमत. काही लोकाना डूआयड्या घेऊन यावं लागत... जसं की अमरेंद्र बाहुबली
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/24/2024 - 19:00

In reply to +१ by कांदा लिंबू

Permalink

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? ........!!!!!!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com